स्वाती दांडेकर

Submitted by लालू on 29 March, 2006 - 12:18

Iowa च्या State representative या तुमच्या आमच्या सारख्याच मराठी मातीत जन्मलेल्या ' स्वाती दांडेकर ' . नोव्हेम्बर २००६ मध्ये त्या पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्याकरता निधी गोळा करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मेरीलंड मधे २५ मार्च रोजी त्यांची भेट झाली. मायबोलीसाठी मुलाखत देण्याचे त्यानी आनन्दाने कबूल केले होते. या कार्यक्रमानन्तर त्यांच्याशी झालेला हा ' संवाद'!

परिचय :
स्वाती दांडेकर यांचा जन्म नागपूरचा. नागपूर आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं. 'Biochemistry' मधली पदवी घेऊन पदव्युत्तर शिक्षण 'Dietetics' मधे केले. पती 'अरविन्द' यांच्याशी विवाह झाल्यानन्तर १९७३ मधे त्यांच्याबरोबर स्वाती Cedar Rapids, Iowa इथे आल्या. त्यांना 'अजय' आणि 'गोविंद' ही दोन मुले आहेत. अमेरिकेत आल्यानंतर Ph.D. करुन शिक्षणक्षेत्रात काम करावं किंवा cooking ची आवड असल्यामुळं शिकागो ला Culinary Institute मधे शिकून Chef व्हावं असं त्याना वाटत होतं.

SwatiDandekar.jpg
त्यानी अमेरिकेत कामाला सुरवात केली ते एक शिक्षिका म्हणूनच. प्रथम एक प्राथमिक शाळेच्या शिक्षिका म्हणून आणि नन्तर हायस्कूल मधेही शिक्षिका म्हणून काम केले. त्याच वेळी Parent-Teacher Organization च्या अध्यक्षा, Fund Raising committee च्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिले.

त्यांच्या, Lynn Marr School District च्या स्कूल बोर्डने एका वर्षी curriculum बदलण्याचा निर्णय घेतला. त्यातून काही advanced गोष्टी वगळण्यात येणार होत्या. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे फायदेशीर नव्हते. स्वातींनी इतर पालकांना आणि स्कूल बोर्डला ते पटवून दिलं आणि त्याना तसा निर्णय घेण्यापासून परावृत्त केलं. या घटनेनंतर स्कूल बोर्डाचे अध्यक्ष 'John Botkin' यानी त्याना स्कूल बोर्डची निवडणूक लढवण्याचे सुचवले. १९९६ मधे त्यानी ही निवडणूक लढवली. ८०% मते मिळवून त्या विजयी झाल्या. स्कूल बोर्डवर त्यांनी २ टर्म्स म्हणजे ६ वर्षं काम केलं.

'Iowa Association of School Board' च्या निवडणुकीतही मोठा विजय मिळवला. डेमोक्रॅटिक पार्टीच्या काही नेत्यांचे यामुळे त्यांनी लक्ष वेधून घेतले. They saw the diamond in the sand. स्वातीलाही आपले Social caring and Education हे goals डेमोक्रॅटिक पार्टीच्या philosophy शी जुळणारे वाटले. डेमोक्रॅटिक पार्टीचे एक नेते डिक मायर्स यानी त्याना 'Representative of District 36' साठी निवडणूक लढवण्यासाठी उत्तेजन दिले. तिथेही त्या यशस्वी झाल्या आणि अमेरिकेतल्या राज्यात representative म्हणून निवडल्या गेल्या आहेत अशा पहिल्या भारतीय महिला ठरल्या.

२००४ मधे त्यानी याच जागेसाठी पुन्हा निवडणूक लढवली आणि यशस्वी झाल्या. शिक्षणक्षेत्रातल्या अनुभवामुळे आणि त्याबद्दल असलेल्या तळमळीमुळे निवडून गेल्यानन्तरही त्यांच्या राज्यातील शिक्षण, Children's welfare याबद्दलच्या प्रश्नाना महत्व दिलं. शिक्षण संस्थांसाठी आर्थिक तरतूद करण्याची जेवढी गरज आहे तेवढीच शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची आणि प्रत्येक विद्यार्थी त्या दर्जाला पोहोचेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे त्यांचे मत आहे.

१.तुम्ही मायबोलीबद्दल ऐकले आहे का?

हो. मी ऐकले आहे. काही वर्षापूर्वी मी BMM ला गेले होते तिथे ऐकल्याचे आठवते आहे.

२. तुम्ही नागपूरच्या आहात, तर कुटुंबीय आणि मित्र - मैत्रीणी सोडल्यास नागपूरचे काय ' मिस' करता?

मी जन्मले आणि वाढले नागपूरमध्ये. नागपूरच्या ज्या values होत्या त्या मी आयोवामधे आणल्या. आणि आयोवामधल्या माझ्या मित्र मैत्रीणी आणि शेजार्‍यानी मला तसाच प्रतिसाद दिला. माझे शेजारी Joanne आणि डीन माझ्या मुलांसाठी अन्कल आणि आंट आहेत. त्यानी माझ्या मुलाना फिशिन्ग शिकवलं. सुरवातीला काही गोष्टी मी मिस केल्या. पण आयोवन्स नी मला अगदी आपलंस केलं आहे. आता भारतात गेले की ८ दिवसात मी आईला म्हणते, आता मला घरी जायचंय. तरी पण मी माझ्या आजीच्या, पणजीच्या हातचं जेवण मी करते. माझी पणजी खूप चान्गला स्वयंपाक करायची. पण आता या आठवणी आहेत त्यामुळं मी या गोष्टी भारतात असते तरी मिस केल्या असत्या.

३. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून भारताची वारी करायला वेळ मिळतो का?

हो, हो. आम्ही वर्षातून एकदा जातो. सहसा डिसेंबरमध्ये. माझ्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. माझ्या फॅमिलीसाठी मी नेहमीच वेळ काढते. याशिवाय गरज पडली तर जास्त वेळाही जाते.२ वर्षापूर्वी सासर्‍याना बरं नव्हतं तेव्हा we went there quite often..

शिक्षणक्षेत्र-

१. मुलांनी शिक्षणात यशस्वी होण्यासाठी पालकांनी कशा प्रकारे हातभार लावावा? यासाठी तुम्ही पालकांना काय सुचवाल?

I think parents should always be involved. आपल्या मुलाची क्षमता आई वडिलानाच माहित असते. टीचर्स ना हे माहित असणं नेहमीच शक्य नसतं It is 'three legged stool' , विद्यार्थी, शिक्षक आणि तिसरा पालक. यशासाठी तिन्हीची गरज आहे.

२. अमेरिकेतही चांगल्या शिक्षकांची गरज वाढते आहे, इतर counties , राज्ये इतकंच नव्हे तर परदेशातूनही शिक्षक आणण्याचे प्रयत्न चालू असतात. इथे लायक व्यक्ती आहेत पण या क्षेत्रात येण्यासाठी त्या process मधून जायला वेळ लागतो. त्याऐवजी ज्या लोकाना संबंधित कामाचा अनुभव आहे त्याना ताबडतोब काम सुरु करुन मग ही process पूर्ण करता येइल असे काही मार्ग असावेत असं तुम्हाला वाटतं का? अशा लोकाना तुम्ही काय सल्ला द्याल?

I think that is a state issue or local control. The process has worked very well for 200+ years. Just because we hit a bump, I am not ready to change it. I agree, we need to find out a way to make it easier for retired professionals to be teachers in highschool. आयोवामधे चान्गला volunteer program आहे. तिथे scientists, engineers येऊन मुलांना शिकवतात. volnteers म्हणून तुम्ही नेहमीच सुरुवात करु शकता. पण ती प्रोसेस बदलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही.

३. तुमचे शिक्षण भारतात झाले. त्या अनुभवाचा इथल्या शिक्षण संस्थाना फायदा करुन देण्यात काही उपयोग झाला का? दोन्ही पद्धतीत काय फरक आहे?

मी जे शिकवण्याचं काम केलं ते संपूर्ण volunteer work होतं. माझे जे subjects होते science तेच मी इथे शिकवले. मला भारतात जे शिक्षण मिळालं ते उत्तमच होतं. तुम्हाला जर चान्गलं शिक्षण मिळालं असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर तुम्ही यशस्वी होता, हे खरंच आहे. you have to be a lifetime learner, it applies everywhere in the world.
मी प्रायव्हेट शाळेत गेल्यामुळे ती पद्धती बरीचशी इथल्या सारखीच होता. मी टाटा पारसी स्कूल मधे शिकले. ही एक उत्तम संस्था होती. इथल्या आणि तिथल्या पद्धतीतला फरक असा मला नाही सांगता येणार पण इथे आल्यावर actually, मला जास्त साम्यच आढळले. फरकच सांगायचा झाला तर अगदी प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपाबद्दल म्हणत येइल. essay type and multiple choice एकापेक्षा दुसरी पद्धत चांगली किन्वा वाईट असं नाही म्हणता येणार. पण आता दोन्हीकडे दोन्हीही पद्धती सुरु झाल्या आहेतच.

राजकारण

१. भारतात शाळा कॉलेजमध्ये असताना कधी सामाजिक कार्यात भाग घेतला होता का?

I was very much involved in volunteer work. पारसी स्कूल ने याला नेहमीच उत्तेजन दिलं. माझे आजी-आजोबा, पणजी-पणजोबा हे खूप आधुनिक विचारांचे होते. माझी आजी was very socially conscious. आजूबाजूच्या लोकाना, गरीब स्त्रियाना मदत करणे हे मी आजूबाजूला होताना पहात आले त्यामुळे ते माझ्यातही आलं.त्यांनी हे केलं पाहिजे असं कधी सांगितलं नाही, पण मी त्याना करताना पहात होते म्हणून ते केलं पाहिजे हे जास्त पटलं.

२. तुम्ही कोणाला आपले राजकारणातले गुरु किंवा mentor मानता?

Gov. Tom Vilsack has been a very good mentor to me, आमचे आयोवाचे गव्हर्नर. काही Republicans ही माझे mentors आहेत. त्यांची मी नावं नाही घेऊ शकत कारण मी त्यान्ची परवानगी घेतलेली नाही. तसंच former Speaker of the House रॉन कोर्बेट. हे वयाने माझ्यहून लहान. He was in his early thirtees when became the speaker of the house. मेन्टॉर तुमच्यापेक्षा वयाने जास्त असायला हवेत असं नाही.

३. राजकारणात इथे तुम्ही यशस्वी झालात, भारतात असतात तर हे शक्य झालं असतं असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या यशाचं श्रेय तुम्ही इथल्या system ला किती देता?

you know, I don't think about that. पण मी इथे जे यशस्वी झाले त्याचं मोठं श्रेय आयोवाच्या लोकांना देते. They accepted me. I am a minority representing majority. It says a lot about people of Iowa. एका outsider ला आपलं म्हणून स्वीकारण्यासाठी मोठं मन लागतं.

४. तुम्हाला भारतीय राजकारणाची माहिती आहे का? तिथल्या घडमोडींशी कितपत परिचित आहात?

हो, मला त्यात स्वारस्य आहे, फक्त भारतीयच नव्हे तर जगातल्या इतर देशातील राजकीय घडामोडींबद्दल मी वाचत असते. पण मी असं ठरवलं आहे की मी कधी भारतीय किंवा इतर कोणत्याही देशाच्या राजकारणावर भाष्य करणार नाही. कारण you are not there.. तुम्हाला तिथल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव नसते म्हणून मी त्यावर कॉमेंट्स करत नाही.

५. राजकारणला " Dirty Politics " असंही म्हटलं जातं. या प्रकारचे काही अनुभव तुम्हाला आले का? असल्यास तुम्ही त्याचा कसा सामना केलात?

I would not call it dirty politics, पण मी एक अनुभव सांगू शकते जेव्हा पहिल्यांदाच मला कुणी असं म्हटलं की you are not like us.. माझ्या opponent नी माझी ethnicity हा इश्यू केला. but the public told her that Swati is not different! मी याला dirty politics म्हणणार नाही कारण she acted out of frustration. एका republican district मधे निवडणूक होते आहे. मी एक डेमोक्रॅट. पुन्हा ती प्रायमरीज मधून काही पॉप्युलर candidates ना हरवून विजयी झाली होती. तिला असं वाटत होतं की तिनं का जिन्कू नये? polls च्या रिझल्ट मध्ये मला पुढे पाहून तिला आश्चर्य वाटलं. मी स्कूल बोर्ड मेम्बर म्हणून काम केलं होतं. Vision Iowa या economic development program वर काम केलं होतं. We took 200 million and leveraged it to 2 billion dollars . स्कूल बोर्ड मेम्बर असताना आम्हाला प्रॉपर्टी टॅक्स वाढवता आला असता, पण आम्ही ते केलं नाही.
तर.. तुम्ही कोणत्या इश्यू वर प्रतिस्पर्ध्याचा विरोध करणार? and the only thing she thought.. may be my ethnicity . 'जी आपल्यातली नाही ती आपल्याला कशी represent करू शकते?' माझ्या campaign मधे मी माझ्या district मधल्या प्रत्येक म्हणजे जवळजवळ ११,००० घरांची दारे ठोठावली होती. सगळे मतदार मला ओळखत होते. It was not a shock to people.They all knew my story. So when she attacked me people got mad at her. आणि मी १०% नी निवडून येण्या ऐवजी १५% नी निवडून आले.

६. राजकारणातला आजपर्यंतचा सगळ्यात तुम्हाला घ्यावा लागलेला अवघड निर्णय कोणता?

अवघड निर्णय असं नाही म्हणता येणार. मला वाटतं,... I am for public schools.. I once went to bat for non-public education, like home-schools. So my friends in public schools were taken aback. पण मी त्याना म्हटलं की when you say, you are for education, we cannot fight among ourseleves. Now I feel that public school is definately should be our number one focus, but we cannot forget parochial schools and home-schoolers .
पण मी charter schools च्या मात्र विरोधात आहे. I want you know that. It takes away money from public schools. They have no accountibility to school board. Again, they can take the best and brightest from public schools and say they are more successful.

७. राजकारणात तुमची महत्वाकांक्षा काय आहे?

My ambition is to make Iowa very successful. To make one of a kind state in US, where the business community will say, this is where we want to be.

८. काही व्यक्तिगत महत्वाकांक्षा नाही का?

If I stumble upon something, if Iowans ask me to do it... पण मी असे काही प्लॅन करत नाही. My true ambition is to make Iowa a great state.

९. अमेरिकेतल्या भारतीयानी तुमच्याप्रमाणे इथल्या राजकारणात पडण्याचे स्वप्न पहावे का? त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल?

They should, they should. They should always be at the table. आजच्या तरुण पिढी कडे talent आहे, वेळ आहे. I would ask them to be part of it.

१०. भारत अमेरिका यांच्यातील बदलत्या राजकीय संबंधाबद्दल आपलं काय मत आहे? अण्वस्त्र कराराबद्दलचे बिल कॉंग़्रेसमधे पास होईल असे आपणास वाटते का?

You are talking about 2 democracies, large and oldest. India and US should ne partners and friends. It will help the world. It is a very good deal, but we have to do grassroot work. आपण सर्वानी आपापल्या congressman ना फोन करुन या बिलला सपोर्ट करण्याबद्दल सांगितलं पाहिजे. ते पास होईल पण it is very important. We have to do our job, all of us should start calling our comgressmen.

११. या कराराचे श्रेय तुम्ही प्रेसिडेन्ट बुशना द्याल का?

Ofcourse! I have lot of respect for what he has done . त्याचं श्रेय दिलंच पाहिजे. राजकारणात चान्गल्या गोष्टीचं श्रेय दिलं जातंच. If you don't like something you have the right to criticize. It is more like critique than criticism. So yes, I give him credit for that.

१२. २००८ च्या Presidential Election साठी Democratic party चा उमेदवार कोण असावं असं तुम्हाला वाटतं?

मी अजून याचा विचारच केलेला नाही. मी सध्या माझ्या यावर्षीच्या निवडणुकीमधेच बिझी आहे. एकदा हे वर्ष सरलं की आयोवात पुढच्या निवडणुकीचे वेध लागतील. Caucus साठी हे candidates आयोवात येतील तेव्हा ठरवेन.

समारोप -

मायबोलीवर trivia म्हणून टाकण्यात येणार्‍या प्रश्नांबद्दल सांगितले. त्याना ही कल्पना खूप interesting वाटली. त्यांची उत्तरं पुढीलप्रमाणं आहेत -

मला पिठलं भात आवडतो! It is my comfort food. माझी पणजी ते कोळशावर करायची. मन्द कोळशावर रात्रभर ते पिठलं तयार व्हायचं आणि भातही. मग दुसर्‍या दिवशी आम्ही ते खात असू. आजही मला कधी स्ट्रेस झाला तर मी पिठलं भात करुन खाते. I don't think anyone would guess this!

मला भावगीतं आवडतात. विशेष आवडतं म्हणजे ' जो आवडतो सर्वाना, तोचि आवडे देवाला '

मराठी वाचन तर सध्या चालू नाही. पण मला 'पेशवाई' वर वाचायला आवडायचं. तसं माझं आवडतं पुस्तक म्हणजे ' The Art of War' by Sungtzu. मी नुकतंच वाचलेलं पुस्तक 'The World is Flat' By Thomas Friedman.

शाळेत माझा आवडता विषय होता सायन्स ( केमिस्ट्री. )

मी टाटा पारसी स्कूल मधे शिकले. हे कदाचित लोकाना ओळखता येईल कारण माझ्या वेबसाईट वर ही माहिती आहे.

तुमची अमेरिकन राजकारणात निवडून गेलेल्या पहिल्या भारतीय महिला, state representative अशी ओळख सर्वाना आहेच. याहून वेगळी अशी तुमची ओळख करुन द्याल का?

I hope people remember me as a great Mom, ..and my kids will have to.... and good daughter and a great friend, I consider wife as a friend. Arvind, my husband gets a big credit. He supported me 110%. Because of him, my boys have also learned to respect women. मला एक सूनबाई आहे. तिचं नाव ऍलिसन कोल. she had to deal with 2 cultures, my political career. She has done a great job, she has handled it very well थोडे मराठी शब्द शिकली आहे, माझ्याकडून समोसे सुद्धा करायला शिकली आहे. So,these are my real values. मला एकदा एका रिपोर्टर ने विचारले होते, if you die tomorrow, what do you want people to say at the service.. आणि मी म्हटलं, if people say those three things, that I was a 'good daughter, good Mom, good friend' तर मला सगळं काही मिळालं.

त्यांच्या २००६ री-इलेक्शन साठी शुभेच्छा देऊन आणि मायबोलीकरांतर्फे आभार मानून मी मुलाखत संपवली.

*************************************************************

आभार - मायबोलीच्या ' संवाद' या नवीन उपक्रमात सहभागी केल्याबद्दल Admin यांचे आभार. तसेच मायबोलीकर Svsameer, Storvi, Rar, Anudon, Admin यांना त्यांनी वेळोवेळी केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद. fund-raising कार्यक्रमाच्या coordination committee चे श्री सुधीर वनमाळी आणि मुकुन्द आगाशे यांचे ही मुलाखत घडवून आणण्यात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल विशेष आभार.

Taxonomy upgrade extras: 

Ajay

Wednesday, March 29, 2006 - 1:49 am:

वा लालू, छान बोलतं केलं आहे त्यांना. भारतातून आलेली पहिल्या पिढीतली व्यक्ती, राजकारणासारख्या क्षेत्रात इतकी पुढे जाते याचं कौतुक, अभिमान आणि आदर याचं मिश्रण मुलाखत वाचताना झालं.

(आता सरकार दरबारी ओळख झाल्यावर घरात तुमचा वट वाढला असेल )

Aj_onnet

Wednesday, March 29, 2006 - 6:18 am:

फारच छान घेतली आहे ही मुलाखत.
खरे सांगायचे तर, ही मुलाखत वाचण्यापुर्वी 'स्वाती दांडेकरा' विषयी मला फारच थोडी माहिती होती. पण ह्या मुलाखतीतून, त्यांचा ह्या पदापर्यंतचा प्रवास अन त्याबरोबरच त्यांनी वैयक्तीक अन राजकीय आयुष्यात जपलेली तत्वे ह्यांचे जवळुन दर्शन झाले.
मायबोलीच्या ह्या नवीन उपक्रमाबद्दल सर्व संबधींताचे अभिनंदन

Maitreyee

Wednesday, March 29, 2006 - 6:40 am:

छान झाली मुलाखत! मुख्य म्हणजे या सगळ्याच गोष्टी आज पहिल्यांदाच वाचल्या मी. स्वाती दांडेकरांबद्दल आतापर्यन्त इतके डीटेल्स कुठेच नव्हते लिहून आले.
प्रश्न पण अगदी योग्य वाटले. छान ओळख करून दिलीस लालू! सर्व संबन्धितांचे अभिनन्दन.

Anilbhai

Wednesday, March 29, 2006 - 8:34 am:

अतिशय सुरेख झाली मुलाखत. सर्व भारतियांना अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे.

Kalandar77

Wednesday, March 29, 2006 - 9:23 am:

छान, लालू! मुलाखत आवडली!

Mahaguru

Wednesday, March 29, 2006 - 9:37 am:

अतिशय छान झाली मुलाखत. ती घेतल्यबद्दल आणि तिच्या बद्दल अधिक माहिती मायबोलीकरांपर्यंत पोचवल्याबद्दल लालु चे आभार !

काही प्रश्नांना तिने सावध (politically correct) उत्तरे दिली असे वाटले (अर्थात elections असल्याने तसे थोडेफार अपेक्षित होतेच) पण तरिही लालुने तिला खुपच बोलते केले.

एक विचारायचे होते ... मुलाखत मराठीतुन झाली की english मधुन? तिचे मराठी कितपत चांगले आहे?
तसेच मुलाखत घेताना, इतर काही गोष्टी जाणवल्या असतिल अथवा तिच्याबद्दल काही माहीति कळाली असल्यास ते अनुभव ही वाचयला आवडेल.

एकुण मुलाखत आवडली . धन्यवाद !

Vinaydesai

Wednesday, March 29, 2006 - 9:54 am:

मुलाखत आवडली.. चांगली माहिती आहे.. मला थोडी तुटक वाटली पण Q/A format मुळे असेल...

लालू आपल्या साठी तिची observations आणि अधिक माहिती लिहिलच...
त्यांच्या Re-election2006 साठि शुभेच्छा....

Keep it up Lalu...

Mjwatharkar

Wednesday, March 29, 2006 - 10:30 am:

मुलाखत चांगली आहे... ..

Milindaa

Wednesday, March 29, 2006 - 10:42 am:

मुलाखत आवडली.
लालू, चांगली घेतली आहेस मुलाखत.

Dineshvs

Wednesday, March 29, 2006 - 10:56 am:

लालु खुप नेमके आणि सगळ्यांच्या मनातले प्रश्ण विचारलेस.
अर्थात समोरचं व्यक्तिमत्वहि तसच होतं म्हणा.

Shyamli

Wednesday, March 29, 2006 - 11:52 am:

>>>>>तसेच मुलाखत घेताना, इतर काही गोष्टी जाणवल्या असतिल अथवा तिच्याबद्दल काही माहीति कळाली असल्यास ते अनुभव ही वाचयला आवडेल.

अनुमोदन mg ला

छान झालिये मुलाखत....
आवडली

Champak

Wednesday, March 29, 2006 - 12:52 pm:

छान अनुभव!

ही chemistry ची किमया!!

श्री. ठाणेदार ह्यांची पण एक मुलाखत घ्या!

Sms

Wednesday, March 29, 2006 - 1:45 pm:

Hey Lalu : Khoop chaan Mulakhat ghetali aahes.Keep up the good work

Mrinmayee

Wednesday, March 29, 2006 - 2:04 pm:

इतकी छान मुलाखत घेतल्याबद्दल लालु तुमच अभिनंदन! स्वाती दांडेकरांविषयी आधी ऐकल होत. त्यातून त्या 'नागपुरच्या' म्हणून जरा जास्तच आपुलकी वाटली (कारण मीही नागपुरकर)! इथल्या लोकांना आपलस करण हे शेवटी आपल्या हातात आहे हे त्यांनी खरच क्रुतीतून पटवून दिल!

Svsameer

Wednesday, March 29, 2006 - 2:33 pm:

लालू
छान मुलाखत घेतलीस. तुझं वैयक्तिक निरिक्षण किंवा मुलाखती दरम्यानचे काही किस्से वाचायला आवडतील.
>>काही प्रश्नांना तिने सावध (politically correct) उत्तरे दिली असे वाटले
महागुरूशी सहमत

Sandyg15

Wednesday, March 29, 2006 - 3:02 pm:

लालु, छान घेतली आहेस मुलाखत !

Storvi

Wednesday, March 29, 2006 - 4:18 pm:

मलाही सावध उत्तरं दिली असे वाटले. पण मुलाखत ब्येस्ट. लालु मस्तं

Mbhure

Wednesday, March 29, 2006 - 4:58 pm:

लालु मुलाखत आवडली.

मुलाखत प्रदर्शित होणार असल्याने अशीच उत्तरे अपेक्षित होती. तर काय....

Hems

Wednesday, March 29, 2006 - 7:24 pm:

लालू , चांगली झालीय मुलाखत. काही प्रश्न खूप आवडले.
तू यासाठी कशी तयारी केलीस , आणि या process दरम्यान अपेक्षित आणि अनपेक्षित अनुभव आले का हेही लिही ..' ललित ' मध्ये वगैरे.

Chafa

Wednesday, March 29, 2006 - 8:23 pm:

मस्त लालू! छान जमल्ये मुलाखत.

Lopamudraa

Thursday, March 30, 2006 - 3:39 am:

प्रश्न फ़ार नेमके आणि छान!!
उत्तरे सावध..

Tulip

Thursday, March 30, 2006 - 4:47 am:

खुप छान घेतलीस मुलाखत लालू. प्रश्न नेमके विचारलेस अगदी. त्यामुळे मुद्देसूद वाटली.

Sashal

Thursday, March 30, 2006 - 11:06 am:

छान झाली आहे मुलाखत ..

Rachana_barve

Thursday, March 30, 2006 - 11:26 am:

लालू आवडली मुलाखत. छान घेतली आहेस.. ...

Asami

Thursday, March 30, 2006 - 11:56 am:

एकदम मुद्देसुद नी आटोपशीर मुलाखत लालू

Ajay

Wednesday, March 29, 2006 - 1:49 am:

वा लालू, छान बोलतं केलं आहे त्यांना. भारतातून आलेली पहिल्या पिढीतली व्यक्ती, राजकारणासारख्या क्षेत्रात इतकी पुढे जाते याचं कौतुक, अभिमान आणि आदर याचं मिश्रण मुलाखत वाचताना झालं.

(आता सरकार दरबारी ओळख झाल्यावर घरात तुमचा वट वाढला असेल )

Aj_onnet

Wednesday, March 29, 2006 - 6:18 am:

फारच छान घेतली आहे ही मुलाखत.
खरे सांगायचे तर, ही मुलाखत वाचण्यापुर्वी 'स्वाती दांडेकरा' विषयी मला फारच थोडी माहिती होती. पण ह्या मुलाखतीतून, त्यांचा ह्या पदापर्यंतचा प्रवास अन त्याबरोबरच त्यांनी वैयक्तीक अन राजकीय आयुष्यात जपलेली तत्वे ह्यांचे जवळुन दर्शन झाले.
मायबोलीच्या ह्या नवीन उपक्रमाबद्दल सर्व संबधींताचे अभिनंदन

Maitreyee

Wednesday, March 29, 2006 - 6:40 am:

छान झाली मुलाखत! मुख्य म्हणजे या सगळ्याच गोष्टी आज पहिल्यांदाच वाचल्या मी. स्वाती दांडेकरांबद्दल आतापर्यन्त इतके डीटेल्स कुठेच नव्हते लिहून आले.
प्रश्न पण अगदी योग्य वाटले. छान ओळख करून दिलीस लालू! सर्व संबन्धितांचे अभिनन्दन.

Anilbhai

Wednesday, March 29, 2006 - 8:34 am:

अतिशय सुरेख झाली मुलाखत. सर्व भारतियांना अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे.

Kalandar77

Wednesday, March 29, 2006 - 9:23 am:

छान, लालू! मुलाखत आवडली!

Mahaguru

Wednesday, March 29, 2006 - 9:37 am:

अतिशय छान झाली मुलाखत. ती घेतल्यबद्दल आणि तिच्या बद्दल अधिक माहिती मायबोलीकरांपर्यंत पोचवल्याबद्दल लालु चे आभार !

काही प्रश्नांना तिने सावध (politically correct) उत्तरे दिली असे वाटले (अर्थात elections असल्याने तसे थोडेफार अपेक्षित होतेच) पण तरिही लालुने तिला खुपच बोलते केले.

एक विचारायचे होते ... मुलाखत मराठीतुन झाली की english मधुन? तिचे मराठी कितपत चांगले आहे?
तसेच मुलाखत घेताना, इतर काही गोष्टी जाणवल्या असतिल अथवा तिच्याबद्दल काही माहीति कळाली असल्यास ते अनुभव ही वाचयला आवडेल.

एकुण मुलाखत आवडली . धन्यवाद !

Vinaydesai

Wednesday, March 29, 2006 - 9:54 am:

मुलाखत आवडली.. चांगली माहिती आहे.. मला थोडी तुटक वाटली पण Q/A format मुळे असेल...

लालू आपल्या साठी तिची observations आणि अधिक माहिती लिहिलच...
त्यांच्या Re-election2006 साठि शुभेच्छा....

Keep it up Lalu...

Mjwatharkar

Wednesday, March 29, 2006 - 10:30 am:

मुलाखत चांगली आहे... ..

Milindaa

Wednesday, March 29, 2006 - 10:42 am:

मुलाखत आवडली.
लालू, चांगली घेतली आहेस मुलाखत.

Dineshvs

Wednesday, March 29, 2006 - 10:56 am:

लालु खुप नेमके आणि सगळ्यांच्या मनातले प्रश्ण विचारलेस.
अर्थात समोरचं व्यक्तिमत्वहि तसच होतं म्हणा.

Shyamli

Wednesday, March 29, 2006 - 11:52 am:

>>>>>तसेच मुलाखत घेताना, इतर काही गोष्टी जाणवल्या असतिल अथवा तिच्याबद्दल काही माहीति कळाली असल्यास ते अनुभव ही वाचयला आवडेल.

अनुमोदन mg ला

छान झालिये मुलाखत....
आवडली

Champak

Wednesday, March 29, 2006 - 12:52 pm:

छान अनुभव!

ही chemistry ची किमया!!

श्री. ठाणेदार ह्यांची पण एक मुलाखत घ्या!

Sms

Wednesday, March 29, 2006 - 1:45 pm:

Hey Lalu : Khoop chaan Mulakhat ghetali aahes.Keep up the good work

Mrinmayee

Wednesday, March 29, 2006 - 2:04 pm:

इतकी छान मुलाखत घेतल्याबद्दल लालु तुमच अभिनंदन! स्वाती दांडेकरांविषयी आधी ऐकल होत. त्यातून त्या 'नागपुरच्या' म्हणून जरा जास्तच आपुलकी वाटली (कारण मीही नागपुरकर)! इथल्या लोकांना आपलस करण हे शेवटी आपल्या हातात आहे हे त्यांनी खरच क्रुतीतून पटवून दिल!

Svsameer

Wednesday, March 29, 2006 - 2:33 pm:

लालू
छान मुलाखत घेतलीस. तुझं वैयक्तिक निरिक्षण किंवा मुलाखती दरम्यानचे काही किस्से वाचायला आवडतील.
>>काही प्रश्नांना तिने सावध (politically correct) उत्तरे दिली असे वाटले
महागुरूशी सहमत

Sandyg15

Wednesday, March 29, 2006 - 3:02 pm:

लालु, छान घेतली आहेस मुलाखत !

Storvi

Wednesday, March 29, 2006 - 4:18 pm:

मलाही सावध उत्तरं दिली असे वाटले. पण मुलाखत ब्येस्ट. लालु मस्तं

Mbhure

Wednesday, March 29, 2006 - 4:58 pm:

लालु मुलाखत आवडली.

मुलाखत प्रदर्शित होणार असल्याने अशीच उत्तरे अपेक्षित होती. तर काय....

Hems

Wednesday, March 29, 2006 - 7:24 pm:

लालू , चांगली झालीय मुलाखत. काही प्रश्न खूप आवडले.
तू यासाठी कशी तयारी केलीस , आणि या process दरम्यान अपेक्षित आणि अनपेक्षित अनुभव आले का हेही लिही ..' ललित ' मध्ये वगैरे.

Chafa

Wednesday, March 29, 2006 - 8:23 pm:

मस्त लालू! छान जमल्ये मुलाखत.

Lopamudraa

Thursday, March 30, 2006 - 3:39 am:

प्रश्न फ़ार नेमके आणि छान!!
उत्तरे सावध..

Tulip

Thursday, March 30, 2006 - 4:47 am:

खुप छान घेतलीस मुलाखत लालू. प्रश्न नेमके विचारलेस अगदी. त्यामुळे मुद्देसूद वाटली.

Sashal

Thursday, March 30, 2006 - 11:06 am:

छान झाली आहे मुलाखत ..

Rachana_barve

Thursday, March 30, 2006 - 11:26 am:

लालू आवडली मुलाखत. छान घेतली आहेस.. ...

Asami

Thursday, March 30, 2006 - 11:56 am:

एकदम मुद्देसुद नी आटोपशीर मुलाखत लालू

Arch

Thursday, March 30, 2006 - 4:48 pm:

लालू, आवडली मुलाखत. नेमके आणि सगळ्यांना interest असलेले प्रश्ण विचारलेस आणि लिहिलही छान आहेस

Mita

Thursday, March 30, 2006 - 6:26 pm:

आवडली मुलाखत. प्रश्न नेमके विचारलेत आणि उत्तरे पण छान दिलीत त्यांनी. विचार आवडले त्यांचे.
गळ्यात मंगळसूत्र आहे का ते काळ्या रंगाचं??

Seema_

Thursday, March 30, 2006 - 7:25 pm:

छान झाली आहे मुलाखत . hg चा हा नविन उपक्रम चांगला आहे .

Ashwini

Thursday, March 30, 2006 - 10:15 pm:

लालू, मस्तच.
तुझा हा नविनच पैलू कळला. मुलाखत घेणं हे एक कसब असतं आणि ते तुला perfect जमलय.

Upas

Thursday, March 30, 2006 - 10:37 pm:

To the point.. मुलाखत आवडली.. आणि हा उपक्रम देखिल..

Hawa_hawai

Friday, March 31, 2006 - 4:40 pm:

चांगले प्रश्न निवडलेत..मस्त गं लालू.

MG शी मी पण सहमत.

चांगला उपक्रम आहे.

Rahulphatak

Sunday, April 09, 2006 - 1:30 pm:

वा लालू ! खूपच छान !
विचारलेले प्रश्न नि trivia ची कल्पना मस्त !

एकंदरच ' संवाद " ही कल्पना आवडली.

Mrinmayee

Monday, April 10, 2006 - 1:55 pm:

खालिल लिन्क वर जाऊन कर्नल संजीवनी बाकरे ह्यांचाबद्दल वाचा. त्या US आर्मीत आहेत. मी त्यांना भेटले आहे बरेचदा. अतिशय गोड आणि प्रभावी व्यक्तिमत्व!!
http://www.abcdlady.com/2005-08/art1.php

Ninavi

Monday, April 10, 2006 - 2:43 pm:

लालू, चांगली झाली गं मुलाखत. हा उपक्रम आवडला.

Mkarnik

Saturday, April 22, 2006 - 6:05 am:

Lalu,
I am very much impressed by your prowess in interviewing persons. Tu mazi bhachi ahes ase tu sanganyapeksha ata mala mi Lalucha mama ahe ase sanganyat jast abhiman vatato.Abhinandan Pori.

Keep it up.

With blessings,
Kundamama
(Mukund Karnik)

Prashantkhapane

Wednesday, May 31, 2006 - 6:23 am:

good joy Lalu!! Well done.

Vinaydesai

Wednesday, May 31, 2006 - 8:46 am:

Prashant, where have you been? Long time no see?

Lalu

Thursday, March 30, 2006 - 11:10 pm:

धन्यवाद मंडळी.

खरं तर मायबोलीचे आणि तुम्हां सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत. मायबोलीसाठी ही मुलाखत घेण्यच्या निमित्तानं त्यांच्याबरोबर फक्त माझा असा वेळ मला मिळाला.

स्वाती Maryland मधे fundraiser साठी येणार आहेत हे बरंच आधी ठरलं होतं आणि मला माहित होतं. मी त्या event ला जाण्याचंही ठरवलं होतं. पण जेंव्हा या ' संवाद' उपक्रमाबद्दल कळलं तेव्हा वाटलं की या इथे येतच आहेत तेंव्हा त्यांची मुलाखत मिळाली तर बरं होईल. मी coordination committee च्या सदस्यांना यबद्दल विचारलं. त्याना ही कल्पना आवडली आणि त्यांनी स्वाती यांचा होकार मिळवून दिला. २५ मार्च ला २ event होते, एक लंच चा सोशल आणि संध्याकाळी बिझनेस मीटिन्ग. या दोन्हीच्या मधली वेळ मला मुलाखतीसाठी ठरवून दिली. मी ३० मिनिटे मागितली होती.

हे एकदा ठरल्यानन्तर तयारी सुरु झाली. त्यांची माहिती गोळा करणे, प्रश्न तयार करणे इत्यादी. आपले Admin, Storvi, Rar यांनी काही अतिशय चांगले प्रश्न सुचवले. इथे पण मेलामेला करुन शेवटी फायनल प्रश्णाॅही लिस्ट मी तयार केली. त्याचं वर्गीकरण केलं. दिलेल्या उत्तरांमधून काही प्रश्न तयार होतात त्यासाठी आणि ऐनवेळी सुचणार्‍या गोष्टींसाठी पण वेळ ठेवला.

मुलाखत टेप (audio) करण्यासाठी मी टेप रेकॉर्डर आणि फोटो काढण्यासाठी कॅमेरा या गोष्टीही आवश्यक होत्या.

२५ मार्च ला कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी एकदमच पोहोचलो. त्यांच्याबरोबर पती आणि काही मोजकीच मंडळी होती. मी आधी फोटो पाहिला असल्यामुळं त्याना ओळखलं. मला येताना पाहून त्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपली ओळख करुन दिली. माझी ओळख करुन घेतली. तेव्हाच मी त्याना सांगितलं की ' आज तुमचा interview घेणार आहे ना, ती मीच.' मग आम्ही बरोबरच आत गेलो, तिथे आधी आलेली काही मंडळी होती. सुरवातीला लंच झाला. कार्यक्रमात सुरवातीला त्यांची ओळख, नन्तर स्वातींचे भाषण आणि उपस्थितांसाठी प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम झाला. त्यांच्या भाषणातून आणि प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमातून काही नवीन माहिती मिळाली. ती ' परिचय' लिहिताना उपयोगी पडली.

कार्यक्रम संपल्यानंतर स्वाती, त्यांचे पती आणि बरोबरची मंडळी आणि मी कमिटीच्या एका सदस्यांच्या घरी गेलो. मुलाखत तिथेच होणार होती. भाषण करुन आणि तिथे काही प्रश्णाना उत्तरे देऊनही त्या थकल्यासारख्या दिसल्या नाहीत. चहा झाला तेव्हा अनौपचारिक गप्पा झाल्या आणि मग एका निवांत जागी बसून मुलाखत घेतली. त्या सुरवातीलाच म्हणाल्या की मी संपूर्ण मराठीत नाही बोलू शकणार. मी म्हटलं तुम्हाला जसं सोयीचं वाटेल तसं बोला. एरवी बोलताना त्या छान मराठी बोलतात. मुलाखत मराठी आणि english दोन्ही भाषेत झाली. मी बहुतेक प्रश्न मराठीतूनच विचारले. त्यानी उत्तर देताना जिथे इन्ग्रजी वापरले ते मी लिहिताना शक्यतो तसेच ठेवले आहे. त्यांच्या सन्ध्याकाळच्या कार्यक्रमाची वेळ होत होती, मधे काही विश्रांतीही मिळणार नव्हती तरी त्यानी घाई केली नाही. काही सावध उत्तरे दिली हे मान्य पण ती तशीच द्यायला हवी होती असं मला वाटलं. चांगले पॉलिटिशियन अशीच उत्तरे देणार. तो विषय सोडला तर बाकी मुलाखत म्हणजे ' गप्पा' च झाल्या.

लिहिताना प्रथम परिचय आणि मग मुलाखत असाच format निवडला कारण त्यांची बेसिक माहिती सर्वाना असेलच असे नाही. मुद्देसूद वाटावी म्हणून प्रश्न उत्तराच्या स्वरुपात लिहिली, त्यामुळे तुटक वाटत असेल पण तरी प्रश्नांचे वर्गीकरण केले आहे. जे उपप्रश्न विचारले त्यांची उत्तरे मूळ उत्तरातच ऍड केली आहेत. आणि बोलताना बरंच बोललं जातं. पण लिहिताना प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि त्याना जे सांगायचे होते ते व्यक्त होईल असे लिहिले आहे.

ही त्यांची वेबसाईट आहे. -
स्वाती दांडेकर
इथे अजून माहिती आहे. प्रश्न विचारण्यासाठी, इमेल करण्यासाठी आणि campaign contribution द्यायचे असेल तर लिन्क आहे.

मायबोलीच्या ह्या उपक्रमात आपल्या मायबोलीकरांना अशाच अनेक मराठी व्यक्तींच्या मुलाखती घ्यायला आणि वाचायला मिळोत!

वा, छान व्यक्तिमत्वाची ओळख झाली
बर, त्यान्च्या त्या इलेक्शनच पुढ काय झाल? सद्ध्या काय करतात?

त्या पुन्हा निवडून आल्या. सध्या आहेत स्टेट कॉन्ग्रेसमध्ये. त्यांच्या राज्यातली, आयोवामधली डेमोक्रॅटिक पार्टीची प्रेसिडेन्शियल प्रायमरी ३ जानेवारीला आहे. तिकडे लक्ष ठेवून असतील. Happy
-लालू