माझा बाप

Submitted by अनिल तापकीर on 29 March, 2012 - 03:03

भासला माझा बाप मज वटवृक्षासमान
देई आम्हास सावली,सोसुनी तप्त ऊन

नाही आम्हास लागू दिली, दुखाची झळ
लेकरे सुखात राहावी हीच त्याची तळमळ

झिजला, कष्टला,राबला अपार
धैर्याने रोखले संकटांचे डोंगर

आईसारखी माया करुनी ठेविला बापाचा धाक
गाउनी अभंग संतांचे मार्ग दाविला नेक

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

धन्यवाद भिडे साहेब, कविता लिहिताना माझे स्वर्गीय वडील सारखे डोळ्यासमोर येत होते. दिवसभर शेतात राबूनही ते कधीही त्रासले, वैतागले नाही.
आयुष्यात माझ्या वडिलांनी कधी पाच बोटे मला लावली नाही किंवा कधी जास्त माझ्यावर रागावले नाही. त्यांनी आपल्या मनाची शांती कधीही ढळू दिली नाही
म्हणून हि कृतज्ञता.

आईसारखी माया करुनी ठेविला बापाचा धाक>>

खरे आहे

प्रत्येकाच्याच (अपवाद सोडून) मनात वडिलांबद्दल आदर, प्रेम आणि काहीशी कीव अशा भावनांचे मिश्रण सापडते. अनेकांना वडिलांनी केलेल्या कष्टांच्या तुलनेत स्वतःचे जीवन तसे सहज जगता येत आहे असेच वाटते. कदाचित हे काळातील बदलांमुळे घडत असावेही. पण भावना त्या भावनाच. Happy

कविता थोडी वर्णनात्मक वाटली.

मात्र आपल्या वडिलांसारख्या माणसांना नमस्कार करावासा वाटतो. Happy

युरीही त्याच अर्थाने म्हणत असावेत की वडिलांवर केलेली रचना ही नुसती कविता असू शकत नाही

धन्यवाद

धन्यवाद, युरीजी आपण या रचनेला काय नाव द्याल?
धन्यवाद, बेफिजी आपल्यासारख्या जाणकारांच्या प्रतिक्रिया लिहिण्यासाठी नवीन बळ देतात

धन्यवाद उमेशजी,..........
युरीजी आपण बेफिंशी सहमत आहात तर,धन्यवाद.

कवितेपलिकडचे काव्य, सत्यापलिकडचे सत्य. सत्यम शिवम सुंदरम कविता. आपल्या पित्यास प्रणाम.