Submitted by अविनाश जोशी on 23 March, 2012 - 07:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
१ कि मोठे बटाटे
हिरवी मिरची , आले, कोथींबीर, लाल तिखट, मीठ
तळण्यासाठी तेल,
डाळीचे पीठ ई.
चित्र खालील्प्रमाणे
क्रमवार पाककृती:
कांद्याची खेकडा भ़जी नेहमीच होतात. बटाटा मात्र काप भजी होतात. ह्या भज्यांना तेल जास्त लागते व ती कुरकुरीत नसतात.
बटाट्याची खेकडा भजी हा फार चांगला पर्याय आहे.
१. बटाटे सोलुन घ्यावेत.
२. वाळवणाच्या किसणीवर कीसावेत.
३. कीस पाण्यात ठेवावा. पाण्यात थोड मीठ टाकावे.
४. थोड्यावेळाने चाळणीमधुन कीस गाळुन घ्यावा. त्यात एक चमचा तेल टाकुन मिसळावे
५. कांदा भाजी सारखेच पीठ करावे.
६. पीठात कीस, मिरच्यांचे बारीक तुकडे, तिखट, मीठ टाकावे. मीठ काळजीपुर्वक टाकावे. नेहमीपेक्शा कमी लागते
७. चवीप्रमाणे आले, लसुण वाटुन टाकावी
८.तेल गरम करुन कांदा भजीप्रमाणे करावीत
वाढणी/प्रमाण:
५/६ जणांकरता सॉस बरोबर
अधिक टिपा:
बटाट्याचा वाळलेला कीस ही भीजवुन वापरता येतो.
माहितीचा स्रोत:
मध्यप्रदेश मधे बिलासपुर जवळ एका छोट्या स्टेशनवर पाहीली. फारच खमंग होती. त्यानंतर करुन बघीतली. प्रयोगात असे दिसले कि ह्या प्रमाणे नुडल्स कींवा कुरडईची भजी सुद्धा छान होतात.
आहार:
पाककृती प्रकार:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

मस्त!! फोटो ????
मस्त!!
फोटो ????
छान वाटली रेसिपी...
छान वाटली रेसिपी...
टाकतो..फोटो टाकतो.'''':-))
टाकतो..फोटो टाकतो.'''':-))
रेसिपी अगदी मस्त आहे.. फोटो
रेसिपी अगदी मस्त आहे.. फोटो टाकल्यास अजुन छान दिसेस्ल..
ही पाककृती करून पहायला हरकत
ही पाककृती करून पहायला हरकत नाही!
८१ किलो बटाटे... फ्याक्टरी
८१ किलो बटाटे... फ्याक्टरी काढायची आहे का?
छान रेसिपी. फोटोची वाट बघतोय.
छान रेसिपी. फोटोची वाट बघतोय.
रेसेपी चांगली वाटतेय, पण
रेसेपी चांगली वाटतेय, पण कांदा भजी प्रमाणे क्रिस्पी होईल का?

कृती छान. बिलासपूर हो,
कृती छान.
बिलासपूर हो, विलासपूर नाही..
आमच्या बाबा.न्चे गाव 
नक्की करुन पहाणार ! मस्तच !
नक्की करुन पहाणार ! मस्तच !
मस्तच फोटो ???
मस्तच फोटो ???
माबोवर फोटो अपलोड
माबोवर फोटो अपलोड करण्यापेक्शा भजी करणे फार फार फार सोपे आहे..
माबोवर फोटो अपलोड
माबोवर फोटो अपलोड करण्यापेक्शा भजी करणे फार फार फार सोपे आहे..
>>>>>
तेच माझे मत होते इथे फोटो टाकण्या पेक्षा सगळ्यांना खायलाच बोलावले असते भजी बनवून.
हंम्म्म्म्म्म्म मग केंव्हा
हंम्म्म्म्म्म्म
मग केंव्हा बोलावताय ?
व्वा! मस्तच!!! एकदम तोंपासु
व्वा! मस्तच!!! एकदम तोंपासु
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
छान रेसिपी.. हटके "माबोवर
छान रेसिपी.. हटके

"माबोवर फोटो अपलोड करण्यापेक्शा भजी करणे फार फार फार सोपे आह""
अविनाश ,सवय होईल पटकन .. आता नेक्स्ट रेसिपी कोणती टाकताय???
कृष्णा.. "तेच माझे मत होते इथे फोटो टाकण्या पेक्षा सगळ्यांना खायलाच बोलावले असते भजी बनवून""

छान पाकृ!
छान पाकृ!
मस्तच भजी आयडिया ची कल्पना
मस्तच भजी
आयडिया ची कल्पना आवडली.
आणि फोटो पण भारी. नक्की करणार.
वा ! छान आहे ही कल्पना
वा ! छान आहे ही कल्पना
आज केले होते हे भजे. एकदम
आज केले होते हे भजे. एकदम भारी
धन्यवाद!
मस्त रेसिपी.करून बघेन.फक्त
मस्त रेसिपी.करून बघेन.फक्त भजी आतून शिजतात का कांदाभजी सारखी. फोटो हवे होते म्हणजे आयडिया आली असती.आता तुम्हाला फोटो टाकता येतात का?
आजच केली रात्री च्या जेवणाला.
आजच केली रात्री च्या जेवणाला. खुप छान झाली batata खेकडा भजी. आवडली सगळ्यांना. फोटो काढण्याच्या आधीच संपली. Thank you Avinash Joshi