चित्रात संवाद भरा! - चित्र क्र. ४ समाविष्ट

Submitted by निंबुडा on 23 March, 2012 - 05:17

चित्र क्र. १

या चित्रातील या दोन लहानग्यांमध्ये काय काय संवाद घडू शकतील? जरा कल्पनाशक्तीला ताण द्या आणि त्यांच्या तोंडी संवाद भरा.
थोडी हसवणुक Happy

38.jpg

चित्र क्र. २

शोले! हिंदी सिनेमा जगतातील एक अजरामर नाव. हा सिनेमा न पाहिलेली व्यक्ती दुर्मिळच! या सिनेमातल्या "अंग्रेजके जमानेके जेलर" असलेल्या असरानीचा हा सिनेमातला एक शॉट. चला आता या चित्रात संवाद भरु! Happy

sholay23.jpg

चित्र क्र. ३

पुन्हा एकदा शोलेच!

hema-bigb-dharmendra.jpg

चित्र क्र. ४

funny4_0.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, निंबे, उदय Lol

मामी ईष्टाईल, पण थोडं येगळं

"एSSS, तुला केशच नैत."
"जा ले, तुला तली कुथेत??."

स्मितू, सिनेमातल्या गाण्यात ते नवरा बायको नसतातच. मुलं म्हणतात ना एकाची मम्मी आणि दुसर्‍याचा तो पापा

दोन्ही बाळं एकाच वेळीं -
" माझा व्हाईस-प्रेसिडेंट होशील ? "
किंवा ,
" आतां प्रेसिडेंट व्हायची पाळी माझी आहे !"

"त्या माबोवर फुटेज खाणार्‍या कविता तुझ्याच ना?"
"आणि त्यावर निगेटिव्ह प्रतिक्रिया देणारा ड्यु-आय तुझाच ना??????"

उजवीकडचं बाळः ए उद्या मी गाल्डनमदे जानाले मम्मीशोबत Happy तू पन येशील?
डावीकडचं बाळः चालेल, नक्की येनालेश ना पन? नाई आलाश तल मी कट्टी हा!
उजवीकडचं बाळः येतो ले डोक्याला शॉत नको लाऊ तू Proud

आग्री भाषेत ही बाळे अशी संवाद साधतीलः

काळं बाळः जल्ला तू लईच गोरा हैस रं बाल्या. तु कंचा साबन लावतंस? मना पन सांग ना! Happy
गोरं बाळः ते शिक्रेट हाय, मी तुला सांगला तर गावांच्या समद्या पोरी तुज्याकडंच बगतील.ना म्या र्‍हाईन तसाच! Wink

Pages