अशी आमुची इंग्रजी मायबोली

Submitted by मंदार-जोशी on 15 March, 2012 - 22:50

गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मराठी मनात खदखदत असलेली एक गोष्ट आज बोलून दाखवीन म्हणतो. एकीकडे मराठी भाषा दिन साजरा करत असताना आणि आम्ही मराठी आहोत असं म्हणत उत्तम आणि सकस साहित्यनिर्मिती करत असताना आपण आपल्याच मायमराठीत अनेक अनावश्यक परभाषिक शब्द - प्रामुख्याने इंग्रजी शब्द - घुसवत मराठीचा अपमान करुन तिचे भ्रष्ट रूप सादर करत आहोत.

काळाच्या ओघात मराठीमधे काही वस्तू, संस्था, आस्थापने, ठिकाणे व इतर काही गोष्टींना सुयोग्य मराठी प्रतिशब्द न निर्माण झाल्याने आपण त्यांचे परभाषिक शब्दच मराठीत सामावून घेत तेच वापरत आहोत. त्यांना योग्य मराठी प्रतिशब्द कुणी शोधून ते रूढ केल्यास उत्तम, पण तोपर्यंत तरी तेच वापरायला माझी काय कुणाचीच नाराजी असणार नाही. उदा. रेल्वे स्टेशन/स्थानकाला कुणी अग्निरथविश्रामस्थान म्हणा असं म्हणणार नाही. बँन्क हा इंग्रजी शब्दच आपण वापरणार. राँग नंबर याला काही 'चुकीचा लागलेला किंवा फिरवलेला नंबर' म्हणा असा आग्रह कुणीच धरणार नाही. काही काव्यरचना करताना एखादा हिंदी-इंग्रजी शब्द चपखल बसत असेल तेव्हा जरूर वापरावा, पण दैनंदित वापरात नको.

ज्या शब्दांना मराठी प्रतिशब्द अगदी सहज उपलब्ध आहेत, त्यांना डावलून आपण इंग्रजी शब्द का वापरायचे? माझे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आहे, पण वाचनामुळे मराठी शब्दसंग्रह उत्तम नसला तरी बरा आहे. तरीही अगदी सोपे शब्द अडल्यास त्यांचे प्रतिशब्द मी इतरांना विचारुन घेतो. तसेही आपल्याला करता येईलच की. मी आपल्याला विनंती करु इच्छितो की शक्यतो मराठी शब्दांचा वापर करा. आपणच आपल्या भाषेचा असा आदर केला नाही तर इतरांनी गावसकरचा गवासकर आणि तेंडुलकरचा तेंदुलकर केला तर त्यांना दोष का द्यायचा?

काही शीर्षके सापडली, ज्यात वापरलेल्या इंग्रजी शब्दांना सोपे मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहेत. सर्वप्रथम हे नमूद करु इच्छितो, की यात कुणालाही चिमटा काढण्याचा किंवा कुणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या मराठी मनात असलेली खदखद व्यक्त करतोय. उपलब्ध वेळ लक्षात घेता फक्त शीर्षकांचा विचार केला आहे, लेखनाला हात लावलेला नाही.

- - - - काही इंग्रजाळलेली शीर्षके - - - -

द्रविडचे रिटायर होणे = द्रविडचे निवृत्त होणे

daily alarm = रोजचा गजर

'वगैरे' Returns !!!! = पुन्हा एकदा 'वगैरे'

नवीन बुक स्टोअर सेट उप- समर्पक नाव योजावयाचे आहे = नवीन पुस्तकांचे दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे / नवीन पुस्तक दुकान - समर्पक नाव योजावयाचे आहे

सस्पेन्स, मर्डर्, थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी) = रहस्यमय, खून, थरारक, पुनर्जन्म, भूतपिशाच्च चित्रपट नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

टेस्टी पावभाजी जमण्याकरता टिप्स = चविष्ट पावभाजी जमण्याकरता क्लृप्त्या

दीड वर्षाच्या मुलाच्या activities = दीड वर्षाच्या मुलाच्या शारिरिक हालचाली / दीड वर्षाच्या मुलाची दिनचर्या

आंध्र स्टाईल मूग डाळीची खिचडी = आंध्र पद्धतीची मूग डाळीची खिचडी

चिकन सुके विथ काजु = काजू घातलेले सुके चिकन / सुके चिकन काजू सहित / सुकी कोंबडी काजू सहित

गुलमोहर: 

बाँडा ते काय तू सांगू नकोस! हिंदुत्व, हिंदुराष्ट्र असल्या गमजा मारणारे लोक हमखास फॉरेनात दमड्या मिळवत बसलेले असतात आणि मातृभाषा मराठी असल्या गमजा मारणारे, त्यांची मुलं कॉन्वेंटात शिकत असतात.. अगदी राज ठाकरेही याला अपवाद नाहीत.. आम्ही प्रगती आणि पैसा मिळवत बसतो.. तुम्ही मात्र क्रांतीची मशाल , भाशेची मशाल तेवती ठेवा !

फक्त मराठी शाळेत शुद्ध मराठी शिकवतात हा एक शुद्ध गैरसमज आहे . . .
मुले कॉन्व्हेंटमधे असून सुद्धा त्यांचे मराठी चांगले असू शकते . .

इथे शुद्ध शिकवण्याचा विषय नाही आहे.. व्यवहारात आपली भाषा वापरणे हा विषय आहे.. शाळेतले सहा तास इंग्रजीत म्हणजे सगळे महत्वाचे ज्ञान शिकायला इंग्रजी वापरल्यासारखे नाही का?

>>व्यवहारात आपली भाषा वापरणे हा विषय आहे..
अगदी बरोबर. मग इथे लिहिणार्‍यांची मुले कुठल्या माध्यमात शिकतात हा सुध्दा विषय नाही आहे Light 1

>>शाळेतले सहा तास इंग्रजीत म्हणजे सगळे महत्वाचे ज्ञान शिकायला इंग्रजी वापरल्यासारखे नाही का?
तुमची पोस्ट विषय सोडून आहे, तरीही उत्तर देतो. तुम्ही फारच वरवरचा विचार करता बुवा.
इंग्रजी माध्यम हे नाईलाजाने निवडावे लागते. कारण दहावीनंतर किंवा बारावी नंतर वैद्यक, वाणिज्य, व इतर शाखांचे शिक्षण मराठीत मिळत नाही. त्यामुळे शिक्षणासाठी इंग्रजी हे माध्यम निवडलं तरी मराठी उत्तम बोलता लिहीता येतं - आणि तसं येणारी मंडळी माझ्या परिचयात आहेत. परिचयात कशाला, वर मीच इंग्रजी माध्यमात शिकल्याचं लिहीलं आहे की स्पष्टपणे. माझं मराठी फार उच्च नसेल पण चांगलं म्हणण्याइतपत नक्कीच आहे.

>>महापौर हा शब्द आचार्य अत्र्यांनी मेयरला प्रतिशब्द म्हणून शोधला.<<
गामा पैलवानजी,
आचार्य अत्रे हे देखील भाषाप्रभू आणि मराठी भाषेला समृद्ध करणारे महान साहित्यिक होते यात तिळमात्र शंका नाही. मात्र येथे एका दुरुस्तीची आवश्यकता आहे.
'महापौर' हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेला आहे. त्यांच्या पक्षाचे श्री गणपतराव नलावडे पुणे महापालिकेचे 'मेयर' झाले तेव्हां त्यांचे अभिनंदन करतांना त्यांनी हा प्रतिशब्द मराठी भाषेला दिला आणि गणपतरावांनी त्यांच्या दालनाबाहेरच्या नामफलकावर त्याची ताबडतोब नोंद करवून घेतली आणि त्याचा सर्वत्र उपयोग केला गेला. 'वार्ताहर' हा शब्दही सावरकरानीच दिलेला आहे.
मात्र सावरकरांचा स्वातंत्र्यवीर असा जाहीर गौरव सर्वात प्रथम आचार्य अत्र्यांनी केला आणि तो सर्वमान्य झाला असे माझ्या वाचनात आले आहे हेही जाता जाता येथे नोंदवतो.

तुमची पोस्ट विषय सोडून आहे,

विषयाला सोडून कशी? म्हणजे शाळेत तुम्ही सहा तास परक्या भाषेत शिकता ते चालतं आणि कुणीतरी व्यवहारात एखादा इंग्रजी, फारसी शब्द वापरत असेल, तर त्याला मात्र तुम्ही भाषेचा अभिमान बाळगा म्हणून शहाणपण शिकवणार.. अजबच की! तुम्ही जशी तुमची निकड म्हणून अख्खी भाषा वापरताय तशी निकड म्हणून एखादा शब्द तोही वापरत असेल की!

जामोप्या, कृपया मराठी वाचता येत असेल तर लेखन नीट वाचा. नाही समजलं तर इथे पोष्टी टाकायला तुम्हाला आमंत्रण दिलेलं नाही. तुमची भंकस इतरत्र केलीत तरी चालेल.

इथे शुद्ध शिकवण्याचा विषय नाही आहे.. >> मान्य, पण भाषा शुद्ध च बोलावी (तसा प्रयत्न असावा) असे माझे मत आहे . .
म्हणजे -
१) 'न' ला 'न' आणि 'ण' ला 'ण'च म्हणावे.
"पप्पांण्ला फोण ... " - असे नको (खरेतर पप्पा सुद्धा नको )
२) काहि क्रिया आणि त्यांची क्रियापदे ठराविक असतात. त्यांचाच वापर करावा
माणसे "भेटतात" . . . वस्तू "मिळतात" . .
३) भाषांची भेळ करु नये
तूला मी लॉट ऑफ टाईम्स सांगितलय, कि डोन्ट डू ईट . . मला ईतकी परेशानी होते ना . . तू सोच भि नहि सकता .. आन्ड द्याट्स वाय मि ईग्नोर मारतो . . ..

कृपया शुद्ध भाषा व प्रमाण भाषा यात गल्लत करू नये. एखाद्या मोठ्या भाषिक गटाच्या नेहमी बोलल्या जाणार्‍या भाषेला अशुद्ध म्हणणे मला अपमानकारक वाटते. पाणी ला जे पानी म्हणतात त्यात काही अशुद्ध नाही - कारण असंख्य लोक तीच भाषा बोलतात.

प्रमाण भाषेसाठी ते नियम असणे वेगळे. मराठी वाचणार्‍या/ऐकणार्‍या सर्वांना एखाद्या शब्दाचा/वाक्याचा अर्थ व संदर्भ एकच असावा म्हणून प्रत्येक भाषेची एक "प्रमाण भाषा" असतेच. इंग्रजीची, हिन्दीचीही आहे. "जेवण केले का" चा प्रमाण मराठी अर्थ खाल्ले का असा होतो पण बर्‍याच लोकांच्या बोलीभाषेत स्वयंपाक केला का असाही होतो. वर्तमानपत्री मराठीत/बातम्यांमधे तो पहिल्या अर्थानेच यायला हवा. पण अनौपचारिकरीत्या बोलताना दुसर्‍या अर्थाने वापरला तर त्यात अशुद्ध काही नाही.

माझ्या मते शुद्ध भाषा असा काही प्रकारच नाही.

माणसे "भेटतात" . . . वस्तू "मिळतात" .

काही ठिकाणी वस्तूही भेटतात.. तुम्हाला असे शब्द वापरणारे लोक मिळाले नाहीत काय? Proud

तुम्ही फारच
वरवरचा विचार
करता बुवा.
इंग्रजी माध्यम हे
नाईलाजाने निवडावे
लागते. कारण दहावीनंतर
किंवा बारावी नंतर
वैद्यक, वाणिज्य, व इतर
शाखांचे शिक्षण मराठीत
मिळत नाही. त्यामुळे
शिक्षणासाठी इंग्रजी हे
माध्यम निवडलं
तरी मराठी उत्तम
बोलता लिहीता येतं -
आणि तसं
येणारी मंडळी माझ्या परिचयात
आहेत. परिचयात कशाला,
वर मीच
इंग्रजी माध्यमात
शिकल्याचं लिहीलं आहे
की स्पष्टपणे. माझं
मराठी फार उच्च नसेल
पण चांगलं म्हणण्याइतपत
नक्कीच आहे.>>>हे म्हणजे शाकाहारावर सुंदर भाषण द्यायचे आणि पौष्टिक आहे म्हणुन मांसाहार मनसोक्त हादडायचा .

आम्ही प्रगती आणि पैसा मिळवत
बसतो.. तुम्ही मात्र
क्रांतीची मशाल ,
भाशेची मशाल
तेवती ठेवा !>>>अगदी बरोबर. हे म्हणजे मरायला तुम्ही ,चरायला आम्ही.

तुम्ही मात्र क्रांतीची मशाल , भाशेची मशाल तेवती ठेवा !

अगदी सहमत .. त्यामुळे असले लेख फार सिरियसली घेऊ नयेत.. वा वा छान असं म्हणुन भाटगिरी करावी आणि सोडून द्यावं.

( जोशीबुवांच्या प्रोफाइलमधून त्यांच्या लेखांची फक्त टायटल्स चाळा, म्हणजे ते स्वतः कितने पानी मे आहेत ते कळेल. प्रिंटरची शाई कशी वाचवावी?, मायक्रो लेव्हल गप्पा , खिडकीत येत नाही टाटा करायला ती, श्रेयस हॉटेल, माकडाच्या हातात मोबाईल, आज माझ्या डायरीत केविलवाणं झालेलं एक गुलाबाचं फूल सापडलं.. , तुझ्या फोटोंसारखीच ,तू माझ्यासाठी घेतलेल्या पर्फ्युमची पावती , "पार्ट ऑफ लाईफ आहे, ..................... )

मराठीतील अनेक साहित्यीकांची मुले, मुली सिलिकॉन दरीत स्थाईक आहेत. हे साहित्यीक तिथे वर्षातुन तीन चार महीने जातात, नातवडांशी इंग्लिशमध्ये बोलतात. भारतात आल्यावर वेगवेगळ्या परीसंवादातून'मराठीवर इंग्लिशचे अतिक्रमण होत आहे' अशी बोंब मारत फिरतात.तसाच प्रकार या धाग्यावरचे काहीजण करत आहेत.

>>ज्या संकल्पना, यंत्रे, ज्ञान इ. परकीय भाषेतून आल्या आहेत त्यांना मराठीत शब्द शोधायचा अट्टाहास नसावा. कधी कधी तो हास्यास्पद ठरू शकतो>>
+१

मंदार जी.. सर्वप्रथम तुमच अभिनंदन एक चांगला विषय मांडल्या बद्द्ल! Happy

तुमचाच मुद्दा पुढे वाढवून मी असं म्हणेन कि नुसतंच मरठि नाही तर "शुद्ध" मराठि बोलले गेले पाहिजे. फक्त मराठिच नाहि कुठल्याहि भाषेचि खरी गम्मत तिच्या शुद्ध शब्दोच्चारांमध्ये आहे!

अनेक चुकिचे उच्चार आपल्याच मरठि भाषिकांचा तोंडून ऐकू येतात. उदा:

किति मार्क्स 'भेटले' (गुण हा शब्द फक्त शाळेच्या प्रगती पुस्तकात आढळतो हल्लि !), किति छान 'मूर्त्या' आहेत इ.

स्वत: पासून सुरुवात करावी असा विषय आहे हा!

नानुभाऊ Happy

जेबाँ,

>> मराठीतील अनेक साहित्यीकांची मुले, मुली सिलिकॉन दरीत स्थाईक आहेत. हे साहित्यीक तिथे वर्षातुन तीन
>> चार महीने जातात, नातवडांशी इंग्लिशमध्ये बोलतात. भारतात आल्यावर वेगवेगळ्या परीसंवादातून'मराठीवर
>> इंग्लिशचे अतिक्रमण होत आहे' अशी बोंब मारत फिरतात.तसाच प्रकार या धाग्यावरचे काहीजण करत आहेत.

हे जरी गृहीतक म्हणून खरे धरले तरी मूळ विषयाचं गांभीर्य कमी होत नाही! Happy

आ.न.,
-गा.पै.

सिलिकॉन दरी

http://www.marathibhasha.com/kosh-words/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A...

मराठी शब्द सिलिकॉनच आहे... कित्ती घाबरलो होतो मी ! मला वाटले होते वालुकाणूमूलगोलक असे कायतरी नाव निघते की काय!

आमच्या एक नातेवाईक बाई 'वापरणे' हा मराठी शब्द कधीच 'वापरत' नाहीत. त्या सगळे 'युज' करतात. गंमत म्हण्जे त्यांचे शिक्षण फक्त मराठी १०वी असून वय ६० आहे. पण जिथे तिथे असे ईन्ग्रजी शब्द वापरायची सवय्/खोड्च आहे त्यांना.

रानडुक्कर, माझ्या लेखनाशी सगळ्यांनी सहमत व्हावं असा आग्रह नाही, आणि मुळात हा लेख नव्हेच. मनातले सांगितले एवढंच आहे, पण लेखनाऐवजी अशा थेट व्यक्तिकेंद्रित टिप्पण्या येऊ लागल्या की उत्तर देणे भाग पडते. तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही खरं तर, कारण तुम्ही वरचा लेख वाचलेलाच नाही - असेल वाचला तर समजून घेण्याची गरज वाटत नसावी, तरी पण तुमचे मुद्दे किती पोकळ आहेत हे एकदा तरी दाखवून देणं गरजेचे आहे म्हणून........

>>जोशीबुवांच्या प्रोफाइलमधून त्यांच्या लेखांची फक्त टायटल्स चाळा, म्हणजे ते स्वतः कितने पानी मे आहेत ते कळेल.
अर्थातच. मी लेखातून स्वतःला वगळलेलं नाहीच Happy तुम्ही मात्र स्वतःला सोयिस्कर असं उचललंत. मी इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी आहे. तेव्हा काही चुकल्यास तुमच्या सारख्या स्वयंघोषित विद्वानानांनी ताबडतोब निदर्शनास आणावे Light 1

>>प्रिंटरची शाई कशी वाचवावी?, मायक्रो लेव्हल गप्पा , खिडकीत येत नाही टाटा करायला ती, श्रेयस हॉटेल, माकडाच्या हातात मोबाईल, आज माझ्या डायरीत केविलवाणं झालेलं एक गुलाबाचं फूल सापडलं.. , तुझ्या फोटोंसारखीच ,तू माझ्यासाठी घेतलेल्या
पर्फ्युमची पावती , "पार्ट ऑफ लाईफ आहे, ..................... )

(१) प्रिंटर याला मराठीत प्रतिशब्द नाही. मुद्रक हा शब्द व्यक्तीला उद्देशून वापरला जातो.

(२) मायक्रो लेव्हल गप्पा
---- याबद्दल मी वर एका प्रतिसादात कबूली दिलीच आहे. ते तुम्ही वाचून न वाचल्यासारखे केले असेलच.

(३) खिडकीत येत नाही टाटा करायला ती, श्रेयस हॉटेल, माकडाच्या हातात मोबाईल, आज माझ्या डायरीत केविलवाणं झालेलं एक गुलाबाचं फूल सापडलं.. , तुझ्या फोटोंसारखीच

वरच्या लेखनातील पुढील परिच्छेद वाचल्यास तुमच्या डोक्यात प्रकाश पडण्याची शक्यता आहे. पाडूनच घ्यायचा नसेल तर गोष्टच वेगळी आहे. बरं, रतन टाटा बाहेरचे आहेत का को? Wink

काळाच्या ओघात मराठीमधे काही वस्तू, संस्था, आस्थापने, ठिकाणे व इतर काही गोष्टींना सुयोग्य मराठी प्रतिशब्द न निर्माण झाल्याने आपण त्यांचे परभाषिक शब्दच मराठीत सामावून घेत तेच वापरत आहोत. त्यांना योग्य मराठी प्रतिशब्द कुणी शोधून ते रूढ केल्यास उत्तम, पण तोपर्यंत तरी तेच वापरायला माझी काय कुणाचीच नाराजी असणार नाही. उदा. रेल्वे स्टेशन/स्थानकाला कुणी अग्निरथविश्रामस्थान म्हणा असं म्हणणार नाही. बँन्क हा इंग्रजी शब्दच आपण वापरणार. राँग नंबर याला काही 'चुकीचा लागलेला किंवा फिरवलेला नंबर' म्हणा असा आग्रह कुणीच धरणार नाही.

(४) >>"पार्ट ऑफ लाईफ आहे, .....................

-- हे वाक्य कवितेतलं एक पात्र म्हणतं, हेही तुम्ही सोयिस्कररित्या लक्षात घेतलं नसेलच.

यासाठी याच परिच्छेदातलं शेवटचं वाक्य पहा >>
काही काव्यरचना करताना एखादा हिंदी-इंग्रजी शब्द चपखल बसत असेल तेव्हा जरूर वापरावा, पण दैनंदित वापरात नको.

आता तुम्हाला कुरापतच काढायची आहे हे उघडच आहे. ज्याला स्वतःचं नाव घ्यायची लाज वाटते उघडपणे वावरायला त्याच्याबद्दल अधिक काय बोलावे? उत्पादन दोष आहे तुमच्यात, त्याला तुम्ही तरी काय करणार? Wink Proud Lol Biggrin Rofl

Pages