Submitted by आद्या on 15 March, 2012 - 06:43
वाट वारंवार पायाखालची ठेचाळली
आंधळे ऐसे जिण्याला जिंदगी कंटाळली
झाकलेल्या भाकिताच्या शेकडो रेघांतुनी
प्राक्तनाची रेघ होती नेमकी ढेपाळली
ज्या स्मृतींनी तेवलेले सांजवेळीचे दिवे
त्या स्मृतींची सावली तुज पाउली रेंगाळली
सापडे ना आज हक्काचा स्वत:चा चेहरा
आरशानेही तशी मग शक्यता फेटाळली
आठवावी लागली म्हणतेस अपुली भेट 'जी'
एवढया गर्दीतही मी 'ती' स्मृती सांभाळली
दोष कोणा द्यायचा अन रोष कोणी घ्यायचा
कैक पानांची जुनी यादी अता गुंडाळली
वेदनांचे केवढे ओझे उराशी वाहिले
जीव जाता शेवटी हर वेदना ओशाळली
आद्या
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
झाकलेल्या भाकिताच्या शेकडो
झाकलेल्या भाकिताच्या शेकडो रेघांतुनी
प्राक्तनाची रेघ होती नेमकी ढेपाळली>> छान
ज्या स्मृतींनी तेवलेले सांजवेळीचे दिवे
त्या स्मृतींची सावली तुज पाउली रेंगाळली>> मस्तच
सापडे ना आज हक्काचा स्वत:चा चेहरा
आरशानेही तशी मग शक्यता फेटाळली>> छान
सापडे ना आज हक्काचा स्वत:चा
सापडे ना आज हक्काचा स्वत:चा चेहरा
आरशानेही तशी मग शक्यता फेटाळली >>>>
सुंदर!
नानुभाऊ
छान...... दोष कोणा द्यायचा अन
छान......
दोष कोणा द्यायचा अन रोष कोणी घ्यायचा
कैक पानांची जुनी यादी अता गुंडाळली
वेदनांचे केवढे ओझे उराशी वाहिले
जीव जाता शेवटी हर वेदना ओशाळली
हे तर सुंदर.................
वाट वारंवार पायाखालची
वाट वारंवार पायाखालची ठेचाळली
आंधळे ऐसे जिण्याला जिंदगी कंटाळली >> हे एकदम भिडल !!
मस्त
मस्त
सुंदर!
सुंदर!
छानै... वाट ठेचाळणे नवीनच
छानै...
वाट ठेचाळणे नवीनच एरवी माणूस ठेचाळतो...
आंधळे ऐसे... आंधळ्या ऐशा ?
धन्यवाद लोकहो. @शाम आंधळे
धन्यवाद लोकहो.
@शाम आंधळे ऐसे. मधे जिणे हे कर्म म्हणून अभिप्रेत आहे. 'आंधळ्या ऐशा' मधे जिणे हे त्रुतीय पुरुषी नाम ठरेल. मला कर्म म्हणून जास्त योग्य वाटलं.
मस्त
मस्त
झाकलेल्या भाकिताच्या शेकडो
झाकलेल्या भाकिताच्या शेकडो रेघांतुनी
प्राक्तनाची रेघ होती नेमकी ढेपाळली.........खयाल जाम आवडला
सापडे ना आज हक्काचा स्वत:चा चेहरा
आरशानेही तशी मग शक्यता फेटाळली...व्वा!
मला कर्म म्हणून जास्त योग्य
मला कर्म म्हणून जास्त योग्य वाटलं.... >>>
मतल्यातील मिसर्यांचा संबंध सांगू शकाल... म्हणजे मलाही समजेल..... जिणे नाम म्हणून योग्य की कर्म म्हणून.
@शाम, वाट ठेचाळत असल्याने
@शाम,
वाट ठेचाळत असल्याने जिंदगी'ला' जिणे कंटाळवाणे झाले आहे. तुम्ही. जिंदगी'चे' जिणे म्हणू शकता.
धन्यवाद!!
फार आवड्ली........ पण
फार आवड्ली........
पण (वैयक्तिक मत...)
@शाम आंधळे ऐसे. मधे जिणे हे कर्म म्हणून अभिप्रेत आहे. 'आंधळ्या ऐशा' मधे जिणे हे त्रुतीय पुरुषी नाम ठरेल. मला कर्म म्हणून जास्त योग्य वाटलं.>>>>
आंधळे ऐसे- हे जिणे या भाववाचक नामाचे विशेषण आहे असा माझा समज होता.तो बरोबर आहे काय ?
जिणे आन्धळे आहे : त्याला जिन्दगी कन्टाळ्ली आहे ............ हे पूर्ण वक्यात रूपान्तर होतेय. नही का !
वाट वारंवार पायाखालची
वाट वारंवार पायाखालची ठेचाळली
आंधळे ऐसे जिण्याला जिंदगी कंटाळली>>>>
शामराव, फारच तांत्रिक होताय
हा शेर 'अचूक' नव्हे
शामराव, फारच तांत्रिक होताय
शामराव, फारच तांत्रिक होताय >>> म्हणूनच थांबलो ना