उंच माझा झोका

Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया. Happy

Uncha Maza Zoka-Promo.jpgUncha Maza Zoka-News.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप दिवसांनी इतकी छान मालिका पहायला मिळते आहे. Happy

प्रोमो, टायटल साँग आणि १० तारखेपर्यंतच्या भागांचे सारांशात्मक भाग झी मराठीच्या अधिकृत युट्युब चॅनलवर उपलब्ध आहेत. ते इथे पाहता येतील: http://www.youtube.com/user/zeemarathi/videos?query=uncha+maza+zoka

माझ्या मते ही मालिका न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि रमाबाई रानडे यांच्या सहजीवनावर आधारित आहे. बालविवाह हा त्या कथानकातला एक महत्त्वाचा पैलू आहे.
त्यासंदर्भात रविवारच्या म.टा.च्या पुरवणीत एक छान माहितीपर लेख आला होता.

माझ्या मते ही मालिका न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि रमाबाई रानडे यांच्या सहजीवनावर आधारित आहे. बालविवाह हा त्या कथानकातला एक महत्त्वाचा पैलू आहे.>>>
हो का ललिता? ही माझ्यासाठी नवीन माहिती आहे. धन्यवाद. Happy

त्यासंदर्भात रविवारच्या म.टा.च्या पुरवणीत एक छान माहितीपर लेख आला होता.>>> लिंक असेल तर देशील? कोणत्या रविवारी आला होता? लिंक सापडली तर वाचेन नक्की. Happy

मटाच्या साईटवर लिंक शोधणं महाकर्मकठीण काम. Angry

परवाच्या ११ मार्चच्या 'संवाद' पुरवणीत होता तो लेख.

हम्म्म प्रयत्न केला मी. पण मटाचे सर्च ऑप्शन्स व्यवस्थित नाहीयेत. Sad

असो, पण ही मालिका अल्पावधीत बरीच लोकप्रिय झाली असल्याचे त्यानिमित्ताने केलेल्या गुगल सर्च मध्ये समजले. Happy
मालिकेचे फेसबुक पेज

मालिकेसंबंधी काही लेखः
झी मराठीची नवी मालिका ‘उंच माझा झोका’

'उंच माझा झोका' झी मराठीवरील नवी मालिका 'उंच माझा झोका' झी मराठीवरील नवी मालिका

गप्पा ‘उंच माझा झोका’ मधील छोट्या रमाशी!

व्हय व्हय, गावतूया... फायरफॉक्सवर मटाचा सर्च ऑप्शनचा बॉक्स ब्लॉक होतोय. मात्र पूर्ण पेज allow केल्यावर दिसतो तो. Happy

रमाबाई रानड्यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? काही केल्या आठवत नाहीये.
ते वाचून रमाबाई रानड्यांची आणि म.गो.रानड्यांची जी प्रतिमा होती ती अर्थातच धूळीला मिळाली.
रमाबाई आगाऊ आणि रानडे प्रेमळ वाटतायेत.
बाकी नौवारीच्या पदराला लावलेल्या पिनांपासून सुरवात आहे. फारसे ऑथेंटिक वाटत नाही. फील.

>>रमाबाई आगाऊ आणि रानडे प्रेमळ वाटतायेत.
रैना, पण त्या वयाचा विचार केला तर लहान मुलगी तशी असेलही ना?

रमाबाई रानड्यांच्या आत्मचरित्राचे नाव काय?>>>>>>>> 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी'

@ रैना.. कसल्यातरी आठवणी असे काहीसे नाव आहे Happy आठवत नाहिये..असो मालिका चांगली आहे मात्र..आणि यमुना आगाऊ तरी नाही वाटते..

असो Happy

तर आत्तापर्यंतचे कथानकः

यमुना ही ११ वर्षाची अल्लड, निरागस पण तरीही अतिशय समजूतदार मुलगी- हिच्या भोवती कथानक फिरते.

बालविवाहाची प्रथा असण्याच्या त्या काळात ११ वर्षाची यमू म्हणजे 'घोड नवरी'च संबोधली जाते. आईच्या हाताखाली काम करता करता आयुर्वेदशास्त्र शिकलेली यमू ब्रिटिश माणसाचा खोकला आणि शेजारची आज्जींचा ताप यावरही उपाय करते. गोर्‍याला शिवणे तसेच समोरच्या दरवाजाने घरातल्या स्त्रीने येऊ नये, हे प्रघात अनवधानाने मोडल्याने बरेच बोलणेही बसते तिला.

वडलांकडून निरुपण शिकून, ते ही वारकर्‍यांसमोर स्पष्ट शब्दात कथन करणारी यमू सर्वांच्या कौतुकास पात्र होते.

तिच्यावर प्रेम करणारे, तसेच तिचा दु:स्वास करणारेही आहेतच.

तिच्यासाठी जे स्थळ सुचवले गेले, तो मुलगा उच्चविद्याविभुषित असून मोठ्या प्रतिष्ठित घराण्यातला आहे. तो सुधारक विचारांचा असून विधवा पुनर्विवाह मानणारा आहे. पण वडलांपुढे त्याचे काहीच चालणार नाही, असे दिसते. सगळे चांगले असले तरी तो बिजवर असल्याने यमुनेचे वडील या विवाहाबाबत विशेष खुश नाहीत, तरीही ह्या स्थळाचा विचार ते करत आहेत. मुलाचे पात्र अजून दाखवलेले नाही.

कालच्या भागातः
मुलाच्या घरुन बाळं भटजी हे स्नेही मुलीला पहायला आले आहेत. त्यांनी मुलीच्या वडलांना ते कोण आहेत आणि कुठल्या हेतूने आलेले आहेत, याची कल्पना मुलीच्या घरी न देण्याविषयी सागितले आहे, जेणेकरुन सगळे जसे आहेत, तसे वागतील आणि खरे संस्कार समजतील. पण तरीही वडिल पत्नीला या गोष्टीची कल्पना देतातच.

मंदार जोशी,
हो खरंय. वयाचा विचार करता असूही शकते.

सगळ्यांचे धन्यवाद. 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' साठी.
कोणी वाचले असेल इतक्यात तर लिहा ना त्याबद्दल. आता आठवतही नाही नीटसे.

रमाबाई रानड्यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? काही केल्या आठवत नाहीये.
ते वाचून रमाबाई रानड्यांची आणि म.गो.रानड्यांची जी प्रतिमा होती ती अर्थातच धूळीला मिळाली.>>>>

मी ते चरित्र वाचले आहे. रमाबाई सारख्या लिहीता वाचता न येणार्‍या कळीच, रानड्यांनी एका फुलात रुपांतर केलं. प्रीति तू सांगीतलेला लेख मी वाचला होता. अतिशय छान माहिती आहे. रानड्यांची बाजु छान मांडली आहे. त्या काळात सुधारकांना अनेक त्रासांना सामोरे जायला लागले. रानडे विधवा विवाहाचे पुरस्कर्ते होते. ते स्वतः विधुर झाल्यावर विधवेशीच विवाह करणार होते. पण वडिलांच्या अति आग्रहामुळे त्यांना कुमारी विवाह करावा लागला. उलट ते चरित्र वाचताना रमाबाईंची प्रगती छान कळुन येते. १२० वर्षांपुर्वीचे त्यांचे सहजीवन येवढे सम्रुध्ध असु शकते हे वाचुन उलट आनंद झाला.

नेहेमीच्या सासुसुना, लग्न, पाचकळ विनोद, हेवेदावे असलेल्या फालतु मालिकांपेक्षा ही वेगळ्या विषयाची मालिका आहे. थोडे काही दोष असतिल तर कानाडोळा करुया. कारण नाहीतर चांगले विषय पहायला मिळणारच नाहीत.

झी टी.व्ही. च अभिनंदन....

नेहेमीच्या सासुसुना, लग्न, पाचकळ विनोद, हेवेदावे असलेल्या फालतु मालिकांपेक्षा ही वेगळ्या विषयाची मालिका आहे. थोडे काही दोष असतिल तर कानाडोळा करुया. कारण नाहीतर चांगले विषय पहायला मिळणारच नाहीत.
>>>
अनुमोदन.

यमुनाचे संवाद खरच खुप छान आहेत.

"मराठीत स्त्रीने लिहिलेले पहिले आत्मचरित्र म्हणून ज्याची नोंद होते, ते रमाबाई रानडे यांनी शंभर वर्षांपूर्वी लिहिलेले ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ हे पुस्तक वाचत होते. ‘पती हाच परमेश्वर’ मानून त्याच्या सेवेला सर्वस्वी वाहून घेण्यात धन्यता मानणाऱ्या स्त्रीच्या मनोधैर्याचे एक मोहक रूप पुस्तकाच्या भाषासौंदर्यातून जाणवत होते. आठवणी सांगताना रमाबाई रानडे यांनी यजमानांचा उल्लेख करताना किंवा त्यांच्याविषयी लिहिताना ‘स्वत:’ असा शब्द वापरला आहे. आणि पुस्तकात तो थोडय़ा ठळक अक्षरात छापला आहे. उदा. ‘ही हकीकत वन्संकडून ‘स्वत:स’ कळल्यावर मामंजींचा स्वभाव करारी असल्यामुळे त्यांचा कोल्हापुरी जाण्याचा बेत ऐकून वाईट वाटले.’ किंवा ‘हे व्रत संभाळण्याकरिता माझे रडणे व सुकलेले तोंड ‘स्वत:च्या’ नजरेस येऊ नये म्हणून अतिशय जपावे लागे.
‘स्वत:’ या शब्दाबरोबरच त्यांनी ‘जवळ’ हा शब्दही त्यांनी वापरला आहे. उदा. ‘महिन्याच्या खर्चाकरिता नेमून दिलेल्या रकमेशिवाय ‘स्वत:ची’ परवानगी घेतल्यावाचून मी पाच रुपयांपेक्षा जास्त खर्च करीत नसे. जास्त खर्च करावयाचा झाल्यास ‘जवळ’ विचारले तर लागलीच होय म्हणावयाचे.’
‘केव्हा केव्हा तर अति झाले म्हणजे एकीकडे मी जाऊन रडे. पण ही गोष्ट ‘जवळ’ बिलकूल सांगत नसे. याबद्दल आपण ‘जवळ’ काही विचारावे व आपल्याला काय वाटते ते सांगावे."
सुचित्रा साठे
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=183963:...

Pages