उंच माझा झोका

Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया. Happy

Uncha Maza Zoka-Promo.jpgUncha Maza Zoka-News.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे मालिकेचा फोकस जो त्या काळात स्त्रियांची दुरवस्था, जाचक धर्मनियमांमुळे बांधुन टाकलेले विधवांचे जीवन, त्यावर उपाय म्हणुन एका काळापुढे पाहणार्‍या माणसाने आपल्या पत्नीला शिक्षण देण्याचा निर्णय, रमेची जबर इच्छाशक्ती,तिचे परिश्रम, बुद्धिमत्ता याकडे जाण्याऐवजी यमुला छळणार्‍या सासवा आणि तिची निरागसता, आईवरचे प्रेम 'एन्कॅश' करण्याचा प्रयत्न यावर जातोय.>>> Sad हो ना चिंगी!!!! फारच अपेक्षाभंग झालाय...

बागे, कथानकात रंगत होती आधी. आता दिवसेंदिवस कंटाळवाणी होत चाललीये. मालिकानिर्मितीमागचे ध्येय फारच सामान्य दिसते, त्याचाच हा परिणाम असावा. रमाचे पाय आपटणे (तेही कळी खुडलेली नसतांना) अगदीच तिच्या व्यक्तिरेखेला शोभणारे नव्हते. शिवाय ती जर खरंच समजूतदार असती, तर ताईसासूबाईंनी दिलेला रवा-बेसनाचा लाडू गपगुमान खाल्ला असता तिने. मला रवा-नारळाचा आवडतो असे म्हणून आगाऊपणा केला नसता. कितीही निरागस असे पात्र रंगवत असले, तरी एवढा कॉमनसेन्स तरी तिच्याकडून अपेक्षित होताच... असो!

श्रुती, तुमची पोस्ट एकदम जबरदस्त! Lol

या सगळ्या विधवा बायांना आपले नवरे मेले त्यापेक्षा
त्यांचे केस गेले, कुंकू नाही, दागिने नाही, चांगल्या चांगल्या साड्या नेसायला मिळत नाहीत याचंच जास्त वाईट वाटतय बहुदा Uhoh

ही केशवपनाची पद्धत फक्त ब्राम्हणांमधेच होती की काय? केशवपन करून त्या स्त्रीला विद्रुप करून आयुष्य काढायला लावण्यापेक्षा सती गेलेले बरे वाटत असेल कदाचित. त्यावेळच्या सर्व समाजसुधारकांचे खरंच आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

रीया, तुमच्या कमेंटमधून काय सुचवायचंय ते कळले नाही. केशवपन, दागिने कुंकू न लावणं , लाल आलवण या गोष्टी पदोपदी 'तुझा नवरा तू खाल्लास' असे कानाखाली वाजवून सांगत असतात. नवरा म्हणजे काय ते कळायच्या आत बाप शोभावा अशा पुरुषाशी लग्न, वयात येताच येणारे बाळंतपण, बाळंतपणात मृत्यू, त्यातून वाचलात तर त्याकाळच्या अल्प-आयुष्यमानामुळे नवर्‍याचा तरुणपणात, कदाचित त्याही आधी मृत्यू, नवर्‍याच्या मृत्यूनंतर जिवंतपणी मरणयातना असलेले विधवेचे आयुष्य या गोष्टींच्या तुलनेत साड्या, केस, दागिने ? Uhoh

तुम्ही जमल्यास गोविंद बल्लाळ देवलांचे शारदा हे नाटक वाचा/पहा. आपले लग्न आपल्या आजोबांच्या वयाच्या माणसाशी ठरले आहे हे कळल्यावरची शारदेची मनःस्थिती पहा. बॅरिस्टर हेही नाटक पुन्हा रंगमचावर आले आहे.(त्यात शैलेश दातार बॅरिस्टरच्या भूमिकेत आहेत) ते पहा. पिंपळमान मालिकेत या नाटकावर आधारित एक मालिका होती. त्यातले केशवपनाचे दृश्य स्त्री अत्याचाराच्या आतापर्यंत पाहिलेल्या कोणत्याही दृश्यापेक्षा भयंकर होते. दर महिन्याला न्हाव्यासमोर या बायकांना पुन्हा डोके द्यावे लागत असे.

यातले काहीही 'उंच माझा झोका' या मालिकेत पहायला मिळणार नाही याची खात्री आहे. छोट्या यमूच्या आनंदी होण्याच्या आणि रडारडीच्या झोक्यांवर प्रेक्षक झुलत राहतील.

बाईला बरं नसतांना घरातले सगळे (पुरूषांसकट) तिच्या पलंगाच्या आजुबाजुनी ऊभे राहुन चर्चा करत असत का त्या काळी?>>>>>

मुळात त्या काळी नवरा बायकोने असे double bed वर झोपायची रीत होती का?

नवर्‍याच्या मृत्यूनंतर जिवंतपणी मरणयातना असलेले विधवेचे आयुष्य या गोष्टींच्या तुलनेत साड्या, केस, दागिने ?

>>>>>>
अगदी अगदी हेच म्हणायचयं मला.
भरतदा मी पण फक्त त्या मालिकेमधल्या विधवांबद्दल बोलतेय
म्हणजे इतर कोणाबद्दल नाही
मी जितके दिवस ती मालिका पहातेय त्यातली एकही बाई आपल्या नवर्‍याच्या आठवणींनी रडलेली दिसली नाही

मालिकेतर स्त्रियांबद्दल काही बोलत नाहीये मी
गै.न.

त्याकाळच्या अनेक विधवांना नवरा म्हणजे काय हे कळायच्या आधी, नवर्‍याची ओळख व्हायच्या आधीच वैधव्य आलेलं असे. कोणीतरी एका थोराड बाप्याला आपण माळ घातली आणि घर सोडून दुसरीकडे आलो. तो बाप्या गायब झाला आणि आपल्यापासून सगळं काही चांगलं हिरावलं.. एवढच कळू शकलेल्या ८-९ वर्षाच्या मुली नवर्‍याची आठवण कशी काढणार?

त्याकाळच्या अनेक विधवांना नवरा म्हणजे काय हे कळायच्या आधी, नवर्‍याची ओळख व्हायच्या आधीच वैधव्य आलेलं असे. कोणीतरी एका थोराड बाप्याला आपण माळ घातली आणि घर सोडून दुसरीकडे आलो. तो बाप्या गायब झाला आणि आपल्यापासून सगळं काही चांगलं हिरावलं.. एवढच कळू शकलेल्या ८-९ वर्षाच्या मुली नवर्‍याची आठवण कशी काढणार?

>>>
हं! हे खर आहे पण ताईसासुबाई आणि दुर्गाआत्या मोठ्या दाखवल्यात जेंव्हा त्यांची लग्न झालेली... म्हणुन मी तस म्हणाले

यमीच्या आईचा मेकअप कमी हवा. ताईसासूबाईंनाही म्हणावं जरा आक्रस्ताळेपणा कमी करा. आता कथानक पुढे सरकायला हवे. यमीचे भाऊ तिच्या सासरी जाताना पेरू चिंचा नेण्याचा प्रसंग उगीच दाखवलाय. अशाने रसभंग होतो.

मालिका गोलगोल फिरतेय.
<<<<<छोट्या यमूच्या आनंदी होण्याच्या आणि रडारडीच्या झोक्यांवर प्रेक्षक झुलत राहतील.>>>>>>>
भरतला अनुमोदन

काल चुकून ही मालिका पाहिली.

शेवटच्या प्रसंगात जेव्हा यामिच्या माहेरचे लोक घरी जायला निघतात, तेव्हा सगळं कुटुंब अंगणात निलोप घ्यायला जमलं होत.

एकतर एवढ्या जुन्या काळात बायका अशा प्रकारे पुरुषांसमोर येत नसत. त्यांचे निरोप समारंभ माजघरात व्हायचे. शिवाय रानड्यांच्या घरातले सगळे पुरुष उघड्या डोक्यानी अंगणात उभे असलेले दाखवले आहेत. फक्त मृत्यूच्या प्रसंगीच असं बोडक्याने पुढे येत असतं. आज जरी ही पद्धत फक्त लग्न बिग्ना पुरती उरली असली, तरी १५० वर्षांपूर्वी हा प्रसंग 'अशक्य' श्रेणीत होता.

मालिका ऐतिहासिक असल्याचं दावा करत असल्यामुळे, काही किमान अभ्यास, संशोधन, होमवर्क याची अपेक्षा आहे. पण बहुतेक ऐतिहासिक मालीकांसारखे इथेही वाटोळे करणार हे नक्की.

या मालिकेची भाषा भलतीच पुस्तकी, बोजड आहे. यापेक्षा कोकणातली ब्राम्हणी घरांमधून बोलली जाणारी बोलीभाषा जास्त योग्य झाली असती. पण कदाचित तसं लिहिणारा माणूस, वर कुणीतरी म्हणल्याप्रमाणे, बजेटमध्ये बसत नसावा.

Atul Patankar >> +१

मालिकेची भाषा भलतीच पुस्तकी, बोजड आहे. यापेक्षा कोकणातली ब्राम्हणी घरांमधून बोलली जाणारी बोलीभाषा जास्त योग्य झाली असती >> हे तर पदोपदी वाटते .

मालिकेची भाषा भलतीच पुस्तकी, बोजड आहे. >> बहुतेक सगळी भाषा बोजड तर वाटतेच पण अगदी आजच्याच काळातलीच आहे. मग मधेच कधीतरी संवाद लेखकाला 'ही ऐतिहासीक मालिका आहे' याची आठवण होते मग तो मधेच एखादे वाक्य जुन्या वळणाचे वाटेल असा प्रतत्न करतो. खूपच केविलवाणा वाटतो तो प्रयत्न.

ती बारकी पोर लाजत लाजत स्वतःनी माझं नाव ठेवलंय वगैरे म्हणते ते तर जाम वैताग. का लाजायचे ते कळत नाही बिचारीला अन स्वतः अन काय कौतूक. ये जीना भी कोई जीना है? मराठीतला बालिका वधू फॉर्म्युला वाट्तो आहे.

माझं नाव ठेवलंय वगैरे म्हणते ते तर जाम वैताग. का लाजायचे ते कळत नाही बिचारीला अन स्वतः अन काय कौतूक. >>> अगदी अगदी. मी परवाचा एपिसोड पाहिला तेव्हा ती सारखी लाजतच होती. तेव्हा साबांना म्हटलंही की हिला लाजायचं तेवढं कळतंय वाटतं?

अमा आणि अश्विनी अगदी अगदी,
मला तो बलिकावधु फॉर्म्युलाच वाटतोय. तशीच दादीसा श्टाईल खेकसणारी काकुसासू Angry

अतुल, तुमचे म्हणणे मनापासून पटले. अभ्यास, संशोधन ह्या आघाड्यांवर ही मालिका पार फसते आहे. सोवळे-ओवळे, शिवाशीव ह्याचे प्रचंड प्रस्थ असलेल्या काळात नोकर मंडळी सहजासहजी स्वैपाकघरात फिरताना दाखवतात. मी सुरवातीला मालिका पाहत होते. पण आता मात्र राजीनामा दिला आहे!

अनया, अगदी अलीकडे म्हणजे साठ सत्तर वर्षांपूर्वीपर्यंतही ब्राह्मणाच्या घरातल्या आतल्या भागात वावरणारे नोकर ब्राह्मणच असत. स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करून होईपर्यंत बायकांना सोवळे नेसून किंवा ओलेत्याने (धूतवस्त्र) राहावे लागे.जेवताना पुरुषमंडळी धाबळी किंवा रेशमी मुगटा नेसत. बाहेर (शौचादि किंवा इतर कारणांसाठी) जायचे झाल्यास दुसरे वस्त्र नेसून 'ओंवळे' व्हावे लागे.सोंवळे जपण्यासाठी कितीदातरी आंघोळी कराव्या लागत. स्वयंपाकीणबाई असल्याच तर त्या `सोवळ्या झालेल्या` म्हणजे केशवपन केलेल्या विधवा असत.खरकट्याचाही विधिनिषेध पुष्कळ होता. दूध, तूप, मध ह्या गोष्टी खरकट्या नव्हेत म्हणून सोवळ्यात त्यांना शिवलेले चाले. पण तांदूळ, डाळ, पोहे हे खरकटे म्हणून सोवळ्यात असताना त्यांना शिवता येत नसे. त्यामुळे सर्व शिधा आधीच काढून ठेवावा लागे.
बाहेर पडताना डोक्यावर पागोटे,पगडी,रुमाल असे काहीतरी बांधावेच लागे. घरी आल्यावर मात्र त्यासाठी दिवाणखान्यात किंवा माजघरात असलेल्या खास खुंट्यांवर ही वस्त्रे उतरवून ठेवली जात.
विधवा नेहमीच एकवस्त्रा असत. काही ठिकाणी तर त्या एकोडती किंवा 'उभे'च नेसत.(अवांतर: या विधवा स्त्रिया म्हणजे कर्त्या पुरुषांच्या हक्काच्या 'रां*' असत. त्यांना उपभोगणे सोयीचे व्हावे म्हणून ही नेसण्याची पद्धत असावी असे मी कुठेतरी वाचलेले आहे.) त्यांना विद्रूप केले जाई कारण त्या आकर्षक दिसू नयेत आणि घराबाहेरच्यांना त्यांचा मोह होऊ नये.
या विधवांची लैंगिक उपासमार होत असे आणि त्यामुळे त्या स्थूल होत. त्याला 'रां*मांस' म्हटले जाई. तसे झाले तर विधवांचे मीठ तोडत.( हे कुमारिकांच्या बाबतीतही करीत. त्या लवकर वयात येऊ नयेत आणि उफाड्याच्या दिसू नयेत आणि घोडनवर्‍या दिसून लग्न जुळण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून.)
ज्या घरात विधवा कर्त्या पुरुषापेक्षा वयाने खूप ज्येष्ठ असत तिथे विधवांच्या हाती सत्ता असे.बहुधा लैंगिक भूक नैसर्गिकरीत्या न शमल्यामुळे त्या खादाड आणि स्वभावाने खाष्ट, स्वामित्व गाजवणार्‍या बनत. प्रौढ विधवांचे जिणे त्या मानाने सुसह्य असे.पण बाल आणि तरुण विधवांचे हाल मात्र कुत्राही खाणार नाही असे असत. अश्या विधवेला दिवस राहिले तर एक तर तिला घरचा आड जवळ करावा लागे किंवा गुपचूपपणे तिची रवानगी पंढरपूरसारख्या ठिकाणी होई. तिथे तिला सोडून दिले जाई किंवा गावठी अघोरी उपायांनी तिला 'मोकळी' करण्याचे प्रयत्न होत. यातही मृत्यू ठरलेलाच असे. जिवंत राहिली तरी ती घराचे तोंड पुन्हा कधीच पाहू शकत नसे. असो तूर्त इतकेच पुरे.

प्रत्येक भागाच्या आरंभी एक पाटी दाखविली जाते : "ही मालिका रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित आहे. तथापि रंजकतेसाठी काही व्यक्तिरेखांची नावे , स्थळे , घटना, प्रसंग व संदर्भ नाट्यमय पद्धतीने पटकथेत समाविष्ट केले जाऊ शकतात. इतिहासाला धक्का पोचविण्याचा तसेच कोणत्याही व्यक्ती अथवा समुदायांच्या भावना दुखावण्याचा वाहिनी आणि निर्मात्याचा हेतू नाही."

कळ्ळं?

हीरा Sad
बरोबर आहे तुमचे.

बनियान पाहिलेत की नाही लोक्स परवा. ब्रँडचा छापही दिसणार असे वाटत होते. तेवढेच राहिले आहे. Sad

हिरा तुमचे पोस्ट अतिशय उत्तम आणि विचार करायला लावणारे परखड आहे. त्याकाळात सुरेख असणे व हक्काचा धनी ( तो कसे का ट्रीट करेना पण) नसल्यास फार वाईट स्थिती होत असणार,
हे लैंगिक भूक न शमल्याने जाडे होणे, नवपरिणीत सुनांवर डूक धरून बसणे किती भयानक. मध्ये ते एका तरुणीस ती ताईसासू लाकडाने डाग देते ते तर बघवेना मला. जुन्या काळच्या नवर्‍या बरोबर रम्य काळ घालविल्याच्या आठवणी पण मोकळेपणी काढू देत नाही हा कसला समाज. असे वाटले.

हिरातै Sad
बाप्रे
हे सगळं मला अजिबात माहित नव्हतं
खरच मग त्यांचे एकंदर हालच होते Sad
रानाड्यांच्या घरात पुरोगामी विचारांचे वारे वाहात असल्याने बहुदा हे अस काही नसावं
अर्थात हे माझं मत आहे. ते चुकीच असु शकत

Pages