उंच माझा झोका

Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59

ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया. Happy

Uncha Maza Zoka-Promo.jpgUncha Maza Zoka-News.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए ल दु गो अचानक ढीले पडू लागले व त्या राधाचा अभिनय ठोकळेबाज होतोय असं मला तरी वाटतय .कॉमेंट्स प्लीज

कालचा भाग आवडला मला, यमूच्या कोवळ्या डोळ्यातले भाव- 'नवरा पळाला' असे म्हणत टाळ्या पिटणारी ती,फार आवडली- नक्की काय झालंय ह्याची काही तमा नाही - इवलूसं तिचं विश्व- तीची आई सर्वस्व, त्या आईकडे परतायला मिळणार इतकेच तिला कळातंय- किती आठवण येते आहे तिला तिच्या आईची!!

तोषवी, मुलाखत पाहिली. लिंकसाठी आभार. Happy ज्यांना ज्यांना छोट्या यमुनेचे काम आवडते, तिची व्यक्तिरेखा आवडते, त्यांनी ही मुलाखत नक्की बघा. या यमुनेचे- तेजश्रीचे रानड्यांशी स्ट्राँग कनेक्शन दिसतेय... त्यांनी बांधलेल्या 'हुजुरपागा' शाळेतच ही शिकतेय, त्यांच्या सेवासदन संस्थेत तिचे आजोबा नोकरी करायचे, ही नवीन माहिती यानिमित्ताने समजली.

मुलाखत बघतांना समजले, की हे पिल्लू फारच टॅलेन्टेड आहे. एकदा वाचले, तरी मोठे मोठे डायलॉग्जही तिला लक्षात राहतात. यमुनेची व्यक्तिरेखा अक्षरशः जगतेय ही... "मी ज्या शाळेत शिकते ती आमच्या"स्वतः" यांनी बांधली आहे." असं ती म्हणाली. पूर्वीच्या काळी नवर्‍याला स्वतः म्हणत, ही माहिती मला या मालिकेमुळे नुकतीच समजली आहे. Happy

सध्या मी ही एकच मालिका पाहतेय. छान आहे.
यमु खुप्पच गोड. सगल्या व्यक्तीरेखा उत्तम.

फक्त मला ते यमुच्या वडीलांना अण्णा'साहेब' असं म्हण्तात ते काही पटले नाही. साहेब त्या काळी इंग्रजाला म्हणत असावेत ना? जाणकारांनी प्रकाश टाकावा Happy

साहेब त्या काळी इंग्रजाला म्हणत असावेत ना? >>> नन्ना, इंग्रजाला साहेब म्हणायचे की सर गं?

जाणकारांनी प्रकाश टाकावा Happy

-------------

यमू गेली एकदाची तिच्या सासरी. मोठं घर पाहून हरखून गेलीये. सासू प्रेमळ दिसतेय पण घरातल्या एका विधवेच्या कपाळावर आठ्या दिसल्या. यमूच्या सासुरवासाची ही नांदी का?

नाव घेण्याचा प्रसंग मजेशीरच होता. Happy

हो ना प्रज्ञा... Happy आजचा भाग केवढा मस्त होता ना! यमूचा घरातल्या सगळ्यांशी परिचय, तिचे आपल्या घरातील मंडळींना त्या घरच्या मंडळींमध्ये पाहणे (सासूच्या जागी आई, दिरांच्या जागी आपली भावंडे, आत्याच्या जागी नणंद) खुप आवडले. फार छान घरात पडली यमू... पुढच्या भागापासून यमूला रमा म्हणावे लागणार! Uhoh

एका लग्नाची दुसरी गोष्ट - खरोखरच मालिका कथानक weak झाल्यासारखे वाटते आहे. Interest जाऊ लागला राव!
बाकी मला सगळ्या काका काकूंची खरी नावे कुणी सांगेल का? छान कामं केली आहेत आतापर्यंत.
त्या कुहु चा होणारा नवरा अगदीच चम्या आहे!

sulu, 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' ह्या मालिकेवर धागा आहे. इथे http://www.maayboli.com/node/32153 बघू शकता. धागाकर्तीने तो धागा सार्वजनिक केलेला नाही, फक्त ग्रुप सभासदांसाठी आहे. धाग्यावर गेलात की तुम्हाला 'उपग्रह वाहिनी - मराठी' च्या सदस्यत्वाची विचारणा होईल. सभासद झालात की त्यावर चर्चा वाचू शकाल. तिथे नावं दिली आहेत.

मला आठवतेय, सुप्रियाकाकू म्हणजे लीना भागवत आणि वल्लभ काका म्हणजे मकरंद बापट (?) बाकी माहित नाही. वल्ली काकू 'असंभव' मध्ये सुनिल जोशीच्या बायकोच्या भूमिकेत पाहिली होती. तिचे नाव लक्षात नाही.

साहेब हा शब्द फारसी- अरबी आहे. हा शब्द आदरार्थी किंवा वयाने मोठ्या माणसां साठी संबोधन म्हणुन वापरात आहे. शिवाजी किंवा आधीच्या काळी ही "आबा साहेब" " मा साहेब" अशी संबोधने होती. मुळात शिवाजी राजे हे सिसोदिया घराण्याचे वंशज. त्या लोकांची मुघल वा यवनसत्ताधार्‍यां शी घसट / संबंध चाकरी किंवा रोटी बेटी साठी होतेच. त्यातुनच हा शब्द आला असावा.

इंग्रजाला आपण साहेब म्हणु लागलो तो त्याच्या कडे असलेल्या अधिकारा मुळे. आजही अधिकारी व्यक्तिला साहेब म्हंटले जाते.

त्या मुळे हा रमाबाईचा काळ तुलनेने अलिकडचा आहे. त्यात जर "अण्णासाहेब " उल्लेख आला तर तो रास्त आहे.

खालील गोष्टी बोर आहेत.
- रानड्यांच्या डोळ्यात सारखे पाणी. सारखे. इतके भावनिक, अगतिक व्यक्त होण्याची पद्धत होती तेव्हा?
- रमा सोडुन सर्वांना त्याच त्याच त्याच नौवार्‍या. मावशीची पिंक एके पिंक नौवारी अगदी लग्नाला सुद्धा बदलत नाही.
- मेकप. किती मेकप असावा मावशीला. शिल्पा तुळसकर मेकप शिवाय काम करायला नाही म्हणाली की काय?
- काही दिवसांनी इथे' रमा अभ्यास केला नाहीस तर फटके देईन असे रानडे म्हणतिल आणि त्याचे धा कोनातून १० वेळा प्रतिध्वनी दाखवतील कॅमेर्‍यातून.
- त्या दिग्दर्शनात गंमतच, जादूच नाहीये काही. तरी कलाकार चांगले आहेत बरेचसे. काल नीनाकुलकर्णींना पाहिलं आणि जरा बरं वाटलं.

बाकी Child abuse असे पुन्हा अधोरेखित झाले मनात. भयानक वाटले तो एवढा उंचथोरला माणुन त्या एवढ्याशा मुलीच्या गळ्यात माळ घालताना पाहून.

यमुना रडु लागली कि माझे ही डोळे ओलावतात .....
काल आई म्हणुन रडत तिच्या सासुला बिलगली तेव्हा मला ही गलबलुन आलं!! Sad

रैना+१

> भयानक वाटले तो एवढा उंचथोरला माणुन त्या एवढ्याशा मुलीच्या गळ्यात माळ घालताना पाहून.
खरंच.

सारखं जावद्या जावद्या .. सांभाळून घ्या असं ऐकू येतंय हल्ल्ली. Happy

> भयानक वाटले तो एवढा उंचथोरला माणुन त्या एवढ्याशा मुलीच्या गळ्यात माळ घालताना पाहून.
खरंच. >>> +१००००००००००

तरी बरं, हा माणूस संवेदनशील, हुशार आणि घरातली इतरही मंडळी विशेषतः सासू आणि आजेसासू प्रेमळ आहेत. पूर्वीच्या काळी पाऊणशे वयमान, सवंग, विकृत आणि अजूनही इतर विशेषणं असलेल्या मंडळींच्या गळ्यात अशी यमू पडत असेल... या विचाराने काटाच येतो अंगावर.

बाकी Child abuse असे पुन्हा अधोरेखित झाले मनात. भयानक वाटले तो एवढा उंचथोरला माणुन त्या एवढ्याशा मुलीच्या गळ्यात माळ घालताना पाहून.>>> +१. तिचे लग्न ठरते त्या प्रसंगानंतर मी बघूच शकले नाहीये ही मालिका. Sad इतकी गोड आणि गुणी मुलगी..तिचे दुपट्ट वयाच्या माणसाशी लग्न लावून देताना काहीच वाटले नसेल का??? अंगावर काटा येतो विचार करूनच. Sad

आपल्याला वाटतं सगळं आता ठीक आहे. पण आजही कष्ट करी समाजात लहान पणीच लग्न लावली जातात आणि कोवळ्या नवर्‍या त्यांचे बाप वाटतिल अशा बाप्यां बरोबर लग्न करतात. ऑफीस च्या कामा साठी मी बरेचदा साईट ना जाते त्या वेळेस कोकणातही अशा केसेस सापडतात.

मागिल साईट वीजीट्ला एका मध्यमवयिन कामगाराने ८ वा मुलगा झाल्याचे पेढे आणले. आधीच्या ७ मुली. ह्याच वय ४८. बायकोच २२. ही त्याची दुसरी बायको. आधीची ला पहिल्या ४ मुली झाल्या. मग ती असतानाच दुसर्‍या १५ वर्षांच्या मुलीशी लग्न केले. तिला पण पहिल्या ३ मुली झाल्या. आणि ४ था हा मुलगा. हा ग्रुहस्थ आमच्या साईट वर सुपरवायजर आहे. पगार ७ हजार. बरं हे काही दुर्गम भागात नाही तर दापोली सारख्या ठीकाणी. ह्यात तिकडे कोणाला फारसे नवल वाटले नाही. फार कॉमन गोष्ट वाटली.

माझ्या कामवाल्या बाईच्या मुली साठी पण मुलगा बघत आहेत. तिची नणंद आपला ३५ वर्षांचा दिर सांगुन आली आहे. मुलगी अताच १८ वर्षांची आहे. तिला आकोल्या कडचं स्थळ पहात होते.

ही परीस्थीती आहे मुंबईत. मग खेड्यात आणि दुर्गम भागात काय होत असेल ? आपण पांढरपेशे नुसतेच गप्पा मारत बसतो. बाकी भारताची प्रजा हे नियम धुडकावुन लावते.

ह्या सिरियलमधे जो पितळी पानाचा डबा दाखवलाय ना अगदि तसाच डबा माझ्याकडे पण आहे.
१)
PAN DABA - 2.jpgPAN DABA -3.jpgPAN DABA -4.jpg

एक मात्र खूप जाणवतेय.. पूर्वी स्त्रियांना फार वाईट वागवलं समाजाने! त्या लहान मुलीच्या भुमिकेत स्वतःला बघितलं आणि खूपच वाईट वाटलं! इतक्या लहान वयात पूर्वी मुलीना काय काय करावं लागलं.. !!

माधवच्या सावत्र आईचे काम करणार्या अभिनेत्रीचे खरे नाव काय आहे?

>> मलाही जाणून हवंय, फारंच लोभस आहे ती व्यक्तीरेखा, सहज अभिनय, सुंदरच!

मोकीमी- धन्यवाद. Happy

नन्ना, इंग्रजाला साहेब म्हणायचे की सर गं?> साने, मला नाही ठावुक. मी 'गोरा साहेब' ऐकलेलं म्हणुन शंका विचारली. Happy

बाकी मालिका मस्तच चालुये. यमु रडत होती तेव्हा मलाही रडु आले. माझी लेक दु:खी होउन माझ्याकडे नी टीव्ही कडे बघत होती. Happy

डेलिया, ही रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित मालिका आहे. बालविवाह हा त्याचा एक भाग आहे.

Pages