पिलानसबर्ग नॅशनल पार्क

Submitted by शापित गंधर्व on 7 March, 2012 - 09:27

गेल्या डिसेंबर मधे केप टाऊन ची ट्रिप झाल्या नंतर बर्‍याच दिवसात कुठे फिरायला जायला मिळाले नाही. परत एकदा क्रुगरची ट्रिप करायची आहे पण त्या साठी ३/४ दिवसांची सलग सुट्टी मिळाली पाहीजे जी सध्या तरी शक्य नाही.

अगदीच काही नाही त्या पेक्षा दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणुन गेल्या विकांताला पिलानसबर्ग नॅशनल पार्क ची एक दिवसाची ट्रिप केली.

पिलानसबर्ग नॅशनल पार्क जोहानासबर्ग पासुन ९०/९५ की मी अंतरावर आहे. आकाराने क्रुगर पेक्षा खुपच लहान पण पिलानसबर्ग नॅशनल पार्क मधेही सगळ्या बिग फाईव्ह चे दर्शन होते असे ऐकुन होतो.
पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर पदरी निराशाच आली. दिवसभर पार्कच्या सगळ्या भागात फिरलो पण बिग फाईव्ह मधल्या हत्ती व गेंड्या शिवाय बाकी कुठलाच प्राणि दिसला नाही. झेब्रे, वाईल्ड बिस्ट, जिराफ, इंपाला, स्टिनबॉक या सगळ्या प्राण्यांच आता काही अप्रुप वाटत नाही. इथे कुठल्याही नॅशनल
पार्कमधे गेलात तर हे सारे प्राणि तुम्हाला भरपुर प्रमाणात दिसतील.

सगळ्या प्राण्यांबद्दल क्रुगरच्या लेखात सविस्तर माहिती दिली होती म्हणुन मग इथे परत त्या बद्दल काही लिहीत नाही.

खुप चांगले नाही, पण त्यातल्या त्यात जे काही प्रचि मिळाले ते मी इथे डकवतोय. आशा करतो तुम्हाला आवडतील.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

!!! समाप्त !!!

गुलमोहर: 

शापित गंधर्व, सर्व फोटो एकदम मस्त आलेत. विनार्च म्हणते त्याप्रमाणे कोणताही एक फोटो अधिक आवडला असे म्हणताच येत नाही.

मस्त फोटो. Happy आवडले.

पक्ष्यांच्या काही फोटोमधे मात्र फोकस चुकला आहे असे वाटले. १२ नंबर आवडला.

खुपच छान.....
तो पक्षी उत्खननात सापडलेलल्या पक्षाच्या सांगाड्यासारखा वाटतोय.

सगळ्यांचे मनापासुन आभार.

हे पार्क सन सिटीपासून अगदी जवळ आहे.>>>> हो अगदी १०/१५ किमी वर. माझी सनसिटी ची ट्रिप करायची रहालिय अजुन.

प्रचि २६ मधला रायनो आणि पक्षी एकमेकांशी काही बोलताहेत असं वाटतं.>>> हम्म्म्म. बराच वेळ तो र्‍हायनो त्या बगळ्याला हुसकावुन लावायचा प्रयत्न करत होता आणि बगळा सारखा सारखा त्याचा डोक्यावर बसायचा Happy

शेवटच्या प्रचिमधला रायनो, एकदम सरकारी ऑफिसमधल्या बधिर माजोरी ऑफिसरसारखा दिसतो आहे. एकदम बधिर & तुसडे भाव.>>> Lol

१७ व्यातला प्रयोग खूप आवडला>>> धन्यवाद. बॅग्राउंड ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट ठेउन फक्त पाण्यातील प्रतिबींब कलर ठेवायचा प्रयत्न केला.

पक्ष्यांच्या काही फोटोमधे मात्र फोकस चुकला आहे असे वाटले>>> हो अरे. खुपच लाजाळु होते ते. क्रुगरला गडीतुनच फोटो घेतले होते आणि तिथले पक्षी गाड्यांना सरावलेले असल्याने त्यांच्या जवळ जाता येते. इथे तो प्रकार नव्हता.

१३ कोण आहे?>>> लाँग टेल्ड विडोबर्ड (खाली आंतरजालवरुन घेतलेला फोटो दिलाय)

१९ ची कल्पना चांगली. फोटोशॉप वापरले का?>>> हो.

तो पक्षी उत्खननात सापडलेलल्या पक्षाच्या सांगाड्यासारखा वाटतोय>>> कुठला? प्रचि १३ का?

Long-tail-Widow.jpg

मस्त आहेत की फोटो. Happy
शाग, काय सुंदर प्रचि आहेत ! तुझा कॅमेरा आणि स्किल्स दोन्ही मस्तच !
सुंदर फोटो रे स्मित
जबरी फोटो काढलेत रे शागं स्मित

सकाळी च बघितले होते आता वरील अनुमोदन ....

गंधर्वा - काय अप्रतिम फोटो काढ्तोस रे - फार फार सुंदर.........
तुझा पेशन्सही वाखाणण्यासारखा.....

छान फोटोग्राफि................तुम्हीपण आवड्त्या फोटोग्राफर मध्ये............

सगळे प्रचि सही.....

त्यातल्या त्यात... प्रचि ७... फारच क्युट,
प्रचि १०, १७ मध्ये मस्तं टायमिंग......
उरलेले सगळेच..... झकास फोटोज.....

आवडले... Happy

वाह्...एकदम "दिल खूश" फोटो आहेत शां ग्.... एकदम बोलती बंद मी आधी क्रमांक लक्षात ठेवणार होते तो पाहते तर सगळेच मनपसंद....

>>.खुप चांगले नाही, पण त्यातल्या त्यात जे काही प्रचि मिळाले ते मी इथे डकवतोय<< हे काय तरीच!

काय एक एक सरस फोटो आहेत महाराजा!

Pages