पिलानसबर्ग नॅशनल पार्क

Submitted by शापित गंधर्व on 7 March, 2012 - 09:27

गेल्या डिसेंबर मधे केप टाऊन ची ट्रिप झाल्या नंतर बर्‍याच दिवसात कुठे फिरायला जायला मिळाले नाही. परत एकदा क्रुगरची ट्रिप करायची आहे पण त्या साठी ३/४ दिवसांची सलग सुट्टी मिळाली पाहीजे जी सध्या तरी शक्य नाही.

अगदीच काही नाही त्या पेक्षा दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणुन गेल्या विकांताला पिलानसबर्ग नॅशनल पार्क ची एक दिवसाची ट्रिप केली.

पिलानसबर्ग नॅशनल पार्क जोहानासबर्ग पासुन ९०/९५ की मी अंतरावर आहे. आकाराने क्रुगर पेक्षा खुपच लहान पण पिलानसबर्ग नॅशनल पार्क मधेही सगळ्या बिग फाईव्ह चे दर्शन होते असे ऐकुन होतो.
पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर पदरी निराशाच आली. दिवसभर पार्कच्या सगळ्या भागात फिरलो पण बिग फाईव्ह मधल्या हत्ती व गेंड्या शिवाय बाकी कुठलाच प्राणि दिसला नाही. झेब्रे, वाईल्ड बिस्ट, जिराफ, इंपाला, स्टिनबॉक या सगळ्या प्राण्यांच आता काही अप्रुप वाटत नाही. इथे कुठल्याही नॅशनल
पार्कमधे गेलात तर हे सारे प्राणि तुम्हाला भरपुर प्रमाणात दिसतील.

सगळ्या प्राण्यांबद्दल क्रुगरच्या लेखात सविस्तर माहिती दिली होती म्हणुन मग इथे परत त्या बद्दल काही लिहीत नाही.

खुप चांगले नाही, पण त्यातल्या त्यात जे काही प्रचि मिळाले ते मी इथे डकवतोय. आशा करतो तुम्हाला आवडतील.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

!!! समाप्त !!!

गुलमोहर: 

खल्लास फोटो सगळेच Happy
चिक्कार आवडले रे :-), काही काही फोटो तर खासच. १५ विशेष आवडला. Happy
मगर......दिल अभी भरा नही.... Happy अजुन येऊ देत. Happy

अरे शापिता... तुझ्यामुळे घरबसल्या असल्या पार्कची सफर होतेय.. मस्तय एकदम.. १,१२,१३,१४,२१ खूप आवडले

सुंदर फ़ोटो. आणि प्राण्यांबद्दल लिहिले आहेस ते खरे.
आता या प्राण्यांचे कौतुकच राहिले नाही, आपल्याला.

प्रतिसादात लिहायचे म्हणुन आवडलेल्या फोटोंचे क्रमांक लक्षात ठेवायला सुरवात केली पण थोड्याच वेळात कळलं की सगळेच आवडत आहेत Happy
खूपच सुंदर.

मस्त आहेत फोटो. प्रचि १२ फार जबरदस्त आहे. ती दगडांची टेकडी आणि मोठे पंख . वेगळाच इफेक्ट आलाय. प्रचि १४ क्युट आहे एकदम.

सगळेच फोटो छान. मलाही जिराफांचा ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट (प्रचि २२) सगळ्यात आवडला.

आहाहा.. रंगपंचमी च्या दिवशी दिनेश दा ,जिप्सी च्या फुलांबरोबर तुझ्या कलरफुल फोटोंची भर पडली...
काय एकेक सुरेख पशुपक्षी आहेत..
तो रायनो बगळ्याशी काय संवाद साधत असेल?? Happy
हत्ती तर काय सॉलिड दिस्तायेत..
फारच छानफोटोज..
अजून आहेत का?? Happy

मस्त आहेत की फोटो. Happy
बिग फाइव्ह दिसले नसले तरी बर्‍याच पक्ष्यानी दिलच आहे दर्शन. Happy

सुरेख. कासवाची राईड ... Lol

प्रचि १९ ची कल्पना अतिशय झकास!!!! Happy

हे पार्क सन सिटीपासून अगदी जवळ आहे. आम्ही गेलो त्यावेळी चित्ता दिसला नाही. पण आमच्या गाडीच्या शेजारीच चाललेल्या गेंड्यांच्या मारामारीमुळे ट्रिप रोमांचकारक झाली होती. कसली भयानक धुडं होती ती!

सेक्रेटरी बर्डही दिसला होता. तो खरंच थेट 'येस मिनिस्टर' मधल्या सर हंफ्री अ‍ॅपलबी सारखा दिसतो. Happy

शाग, काय सुंदर प्रचि आहेत ! तुझा कॅमेरा आणि स्किल्स दोन्ही मस्तच !

सगळेच पक्षी फार सुंदर टिपले आहेस. रंग अप्रतिम आहेत त्यांचे.
कासवाची राइड एकदम गोड !
हत्ती जबरी. एकदम रुबाबदार !
झिब्राज काय मस्त दिसताहेत त्या पार्श्वभुमीवर. रंग इतके आकर्षक आहेत कि आम्हाला 'अ‍ॅनिमल प्रिंटस'चं मोह का होतो ते कळलंच असेल.
प्रचि २६ मधला रायनो आणि पक्षी एकमेकांशी काही बोलताहेत असं वाटतं.
जी फॉर जिराफ भारीच. Happy
शेवटच्या प्रचिमधला रायनो, एकदम सरकारी ऑफिसमधल्या बधिर माजोरी ऑफिसरसारखा दिसतो आहे. एकदम बधिर & तुसडे भाव.

Pages