चल शोधूया सखे ती...
( दिलेल्या सिच्युएशन वर कविता हा ऑर्कूटवरचा एक उपक्रम होता. दोन मैत्रिणी अनेक वर्षांनी भेटल्यानंतर त्या कशा रिअॅक्ट होतील, काय बोलतील .. अशी ती सिच्युएशन होती ...)
वाहूनि गेले पाणी, नेमेचि पावसांत
भिजलो पुन्हा गं दोघी, भेटूनि आसवात
काही न बोलताही, संवाद काय झाला
कळले ना हे कुणाला, दोघींस आठवांत
येता बटा रूपेरी, कानावरी या काही
परि ओल भेटण्याची, हिरवीच गं मनात
थकलेय आज मी ही , गुंतूनि जगरहाटी
आलीस घेऊनिया, तू गारवा उन्हांत
आठवतात का ग, स्वप्नांच्या तेलवाती
मी तेवल्या सखे ग, तुझियाच अंगणात
तो कोवळा बहर, प्राजक्तसम मोहर_
तो मोरपंखी काळ, गेला कुठे क्षणांत..
गेल्या दिशेस दोन, वाटा भविष्यवेधी
पायात गेले काटे, आलो गं वास्तवात
लावूनि सांजवाती, कातरवेळा आल्या
ते क्षणं रेशमाचे, जपलेत मी ऊरात
फुटले गं बंध सारे , लाटांस बांध नाही
चल शोधूया सखे ती, स्वप्ने या लोचनांत..
संध्या
07.02.2010
सुरेख कविता.
सुरेख कविता.
थकलेय आज मी ही , गुंतूनि
थकलेय आज मी ही , गुंतूनि जगरहाटी
आलीस घेऊनिया, तू गारवा उन्हांत >>>>
....छान
सुंदर आहे
सुंदर आहे
सुंदर.
सुंदर.
गंगाधरजी, उल्हासकाका, उदयवन
गंगाधरजी, उल्हासकाका, उदयवन आणि विभाग्रजजी आपल्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार !
आलीस घेऊनिया, तू गारवा
आलीस घेऊनिया, तू गारवा उन्हांत
क्या बात है! खरच सुंदर!
खुप छान आवडली
खुप छान आवडली
फार फार सुंदर कविता आहे! फार
फार फार सुंदर कविता आहे! फार आवडली कल्पना !
लावूनि सांजवाती, कातरवेळा
लावूनि सांजवाती, कातरवेळा आल्या
ते क्षणं रेशमाचे, जपलेत मी ऊरात >>> हे कडवे खास आवडले.....बाकी कविता छानच आहे
सुंदर. त्या वेळी असं एखादं
सुंदर. त्या वेळी असं एखादं मैत्र असावं खरच..
सुरेख
सुरेख
छाsssन लिहिली आहेस गं..
छाsssन लिहिली आहेस गं..
स्वप्नांच्या तेलवाती, ओल भेटण्याची हिरवीच, वाटा भविष्यवेधी असे काही शब्दप्रयोग ज्जाम सूट झालेत..
सुंदर.
सुंदर.:)
जुनं चाळतांना ही कविता दिसली.
जुनं चाळतांना ही कविता दिसली. लक्षातच नव्हती...
येता बटा रूपेरी, कानावरी या
येता बटा रूपेरी, कानावरी या काही
परि ओल भेटण्याची, हिरवीच गं मनात
किती सुंदर, समर्पक शब्दयोजना!!!
प्रद्युम्नजी... आभार आपले
प्रद्युम्नजी...
आभार आपले
वा
वा
सांस, सुरेख ! रुपेरी केस
सांस, सुरेख ! रुपेरी केस कशाला गं, कॉलेजमधुन बाहेर पडुन काही वर्षं झाली कि हेच फिलींग असतं. अचानक मैत्रिण भेटुन जुन्या गोष्टींना उजाळा मिळणं यासारखं मोठं सुख नाही.
छानच........
छानच........
मस्त, सुंदर
मस्त, सुंदर
सह्ही!!!!!!
सह्ही!!!!!!
मंदार, मनिमाऊ, योगुली,
मंदार, मनिमाऊ, योगुली, राजेश्वर आणि स्मितू सर्वांचे आभार..
मनिमाऊ.. खरंय
मला खूप पुढे गेलेला काळ दिसला
फारच सुंदर रचना !
फारच सुंदर रचना !
अप्रतिम रचना, खूपच आवडली.
अप्रतिम रचना, खूपच आवडली.
मुकु, शांकली....खूप खूप आभार
मुकु, शांकली....खूप खूप आभार
सुंदर
सुंदर
व्वा! सुरेख!
व्वा! सुरेख!
सुंदर.
सुंदर.
तुझ्या कविता आवडतात छान
तुझ्या कविता आवडतात छान लिहितात.
फारच सुंदर कविता सांजसंध्या,
फारच सुंदर कविता सांजसंध्या, किरणने मला लिंक दिली म्हणून वाचनात आली. य्यतल्या भावनेशी १००% सहमत.. दोन मैत्रिणींचं भेटणं हा एक वेगळाच उत्सव. उद्या या विषयावरची माझीही एक कविता देते..
Pages