चल शोधूया सखे ती...
( दिलेल्या सिच्युएशन वर कविता हा ऑर्कूटवरचा एक उपक्रम होता. दोन मैत्रिणी अनेक वर्षांनी भेटल्यानंतर त्या कशा रिअॅक्ट होतील, काय बोलतील .. अशी ती सिच्युएशन होती ...)
वाहूनि गेले पाणी, नेमेचि पावसांत
भिजलो पुन्हा गं दोघी, भेटूनि आसवात
काही न बोलताही, संवाद काय झाला
कळले ना हे कुणाला, दोघींस आठवांत
येता बटा रूपेरी, कानावरी या काही
परि ओल भेटण्याची, हिरवीच गं मनात
थकलेय आज मी ही , गुंतूनि जगरहाटी
आलीस घेऊनिया, तू गारवा उन्हांत
आठवतात का ग, स्वप्नांच्या तेलवाती
मी तेवल्या सखे ग, तुझियाच अंगणात
तो कोवळा बहर, प्राजक्तसम मोहर_
तो मोरपंखी काळ, गेला कुठे क्षणांत..
गेल्या दिशेस दोन, वाटा भविष्यवेधी
पायात गेले काटे, आलो गं वास्तवात
लावूनि सांजवाती, कातरवेळा आल्या
ते क्षणं रेशमाचे, जपलेत मी ऊरात
फुटले गं बंध सारे , लाटांस बांध नाही
चल शोधूया सखे ती, स्वप्ने या लोचनांत..
संध्या
07.02.2010
भारतीतै दार कलते झुकते या
भारतीतै
दार कलते झुकते या तुमच्या कवितेत नायिका गतकाळच्या आठवणीत हरवून जाते यावरून आठवली कविता.
The poem consists of ten, two
The poem consists of ten, two line stanzas and each stanza describes a distinct stage in the story...
really good !
सास्मित, के अंजली, उमेश
सास्मित, के अंजली, उमेश वैद्य, निलिमा, भारतीताई
सर्वांचे मनापासून आभार
Pages