मी मराठी!

Submitted by संयोजक on 29 February, 2012 - 15:29

"मी मराठी.."

लहानपणी आपण कितीतरी नवे नवे खेळ शोधून काढत असतो, सुट्ट्यांचा वेळ मस्त मजेत घालवत असतो. मोठं होताना या खेळांचं बोट कधी सुटतं ते कळतही नाही आणि मग ते आपल्या बालपणीच्या, गावाला, भावंडांसोबत घालवलेल्या सुट्ट्यांच्या आठवणींचे फुलपंखी रंग बनून राहतात. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्या अल्लड वयात जाऊन ती मजा पुन्हा लुटता येते का पाहणार आहोत. आपण सर्वांनी आयुष्यात हमखास एकदा तरी खेळलेला खेळ म्हणजे - नाव गाव फळ फूल!! खेळूया पुन्हा एकदा? आम्ही एक अक्षर देणार आणि त्यावरुन तुम्ही पटापट लिहून काढायचंय -

१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)

आता सारे चतुर मायबोलीकर लक्षात घेऊन या खेळाचे नियम किंचित कडक केलेत बरं! काय आहेत हे नियम?
१. अक्षर दिल्यानंतर पूर्ण १३ उत्तरे लिहिल्यानंतरच पोस्ट टाकायची आहे. अर्धवट पोस्ट केल्यास, तुम्ही इतरांना मदत करता आहात हे गृहित धरुन फाऊल धरण्यात येईल व ते अक्षरच बाद करण्यात येईल. तेव्हा इतर प्रयत्न करणार्‍या मायबोलीकरांचा वेळ वाया जाऊ देऊ नका.
२. एकदा एका अक्षरावर पूर्ण १३ उत्तरांचे पोस्ट पडले की इतरांनी पुढील अक्षराची वाट पहावी. पहिल्या पूर्ण १३ उत्तरांच्या पोस्टीस महत्त्व आहे हे लक्षात घ्या. पुढच्या पोस्टी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्वरीत उत्तरांना महत्त्व आहे.
३. ठराविक वेळाने संयोजक पुढचे अक्षर देत राहतील. हा खेळ सर्व मायबोलीकरांना खेळता यावा याची काळजी घेतली जाईल.
४. जास्तीत जास्त अक्षरांसाठी सर्वात आधी १३ प्रश्न पूर्ण करणार्‍यांस बक्षिस.
५. अट फक्त एकच, प्रत्येक उत्तर 'मराठी'तच पाहिजे.

आम्ही इथे एक अक्षर उदाहरणादाखल दिले आहे.

pa.jpg

१. मराठी नाव - परिमल
२. महाराष्ट्रातील गाव - पुणे
३. मराठी कलाकाराचे नाव -पुष्कर श्रोत्री
४. मराठी पुस्तकाचे नाव - पांगिरा
५. मराठी लेखक/लेखिका - पु. ल. देशपांडे
६. मराठी कवी/कवयित्री - शिरीष पै
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - पाऊले चालती पंढरीची वाट
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - पदरी पडले पवित्र झाले
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - पिंजरा
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- पुरणपोळी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - पोपट
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - पुरंदरचा किल्ला
१३. मायबोली आयडी - पीहू

**** महत्त्वाची घोषणा ****

लोकहो:

आपण सर्वांनी ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! खेळाची रंजकता थोडी अजून वाढवण्यासाठी आम्ही ह्यात अजून ४ गोष्टी समाविष्ट केल्या आहेत. तर आता नवीन प्रश्नावली आहे अशी:

१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव
१६. मराठी अलंकाराचे नाव
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव

आणि आता अक्षर आहे:

gha.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. मराठी नाव - तारा
२. महाराष्ट्रातील गाव - तासगाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - तनुजा
४. मराठी पुस्तकाचे नाव - तराळ अंतराळ / तुंबाडचे खोत
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - गोपिनाथ तळवलकर
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - भा. रा. तांबे
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) - तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी!
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) - ताटाखालचं मांजर,
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव - तांबडी माती
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.) - तोंडलीभात
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव - तरस
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - तोरणा
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.) - तेजा२०१०
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव - तापी
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव - तेरडा
१६. मराठी अलंकाराचे नाव - तोरड्या
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव - तुळजापूर

सोनाली, पायातील साखळ्यांसारख्या असतात तोरड्या.

ok... मला माहीत नव्हतं, thanks.

अलंकार, नदी, ती.क्षेत्र........अजुन अवघड करुन ठेवलं आहे..

१. मराठी नाव - चिन्मय
२. महाराष्ट्रातील गाव - चंद्रपूर
३. मराठी कलाकाराचे नाव - चंद्रकांत काळे
४. मराठी पुस्तकाचे नाव - चंद्रमाधवीचे प्रदेश
५. मराठी लेखक / लेखिका - चंद्रकांत वर्तक
६.मराठी कवी / कवयित्री - चंद्रशेखर गोखले
७.मराठी गाणे किंवा कविता - चांदण्यात फिरताना
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - चुकला फकीर मशिदीत
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव - चारशे कोटी विसरभोळे
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव - चवळीची उसळ
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव - चिमणी
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - चाकणचा किल्ला
१३. मायबोली आयडी - चिंगी
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव - चंद्रभागा
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव - चिंचेचे झाड
१६. मराठी अलंकाराचे नाव - चिंचपेटी
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव - चतु:शृंगी

मराठी नाव : चारुलता
२. महाराष्ट्रातील गाव : चिपळुण
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) : चंदावरकर दुर्गेश
४. मराठी पुस्तकाचे नाव : चारोळ्या
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) : चि. वि. जोशी
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) : चंद्रशेखर गोखले
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) : चंद्र आहे साक्षीला
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) : चुलीपुढं हागायचं आनं नशिबात होत म्हणायच.
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव : चारचोघी
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.) : चपाती
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव : चातक
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे : चिंचगड
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.) : चंपक
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव :चंद्रभागा/ चुलबंध नदी
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव : चाफा
१६. मराठी अलंकाराचे नाव : चपलाहार
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव : चतु:शृंगी

१. मराठी नाव - चारुता
२. महाराष्ट्रातील गाव - चळिसगाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - चित्रा
४. मराठी पुस्तकाचे नाव - चार आण्याची को>म्बडी (अनन्त गुरव)
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - चि वि जोशी
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - चन्द्रशेखर गोखले
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) - चांद्ण्यात फिरताना माझाधरलास हात
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) -चोराच्या मनात चांदणे.
९ -मरठी ंसिनेमाचे / नाटकाचे नाव - चारचौघी
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.) - चकुल्या
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव - चिमणी
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - चाकण चा किल्ला
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.) - चिमण
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव - चन्द्रभागा
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव - चाफा
१६. मराठी अलंकाराचे नाव - चमकी
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव - चिंचवडचा गणपती

अभिनंदन नीधप!

संयोजक ..... चॉकलेट बरोबर पुढच्या अक्षराची वेळ पण टाका ना........ तेव्हढच मधल्या वेळेत कामं उरकता येतील Proud

५ मिनिटे म्हणजे जरा जास्तच वेळ लागलाय. हह दोन तीन मिनिटात उत्तरे लिहून कॅडबरी क्लेम करत होती दिवसभर. Proud

मला पण ते कवि कवयित्री आठवत नाहीत पटकन. ते आठवले तर पिक्चर आठवत नाहीत. आता तर अलंकार वगैरे अ‍ॅड झालय.

य अक्षरासाठी खालील प्रश्नावली घेतली तरी हरकत नाही.

१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
११. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
१२. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे / देवी /देवतेचे नाव

खेळ संपायला थोडाच अवधी शिल्लक असल्याने ज्यांना "य" हे अक्षर घेऊन वरची प्रश्नावली सोडवायची असेल ते सोडवू शकतात.

लवकरच येत आहे नवीन अक्षर.

१. मराठी नाव : यशस्विनी
२. महाराष्ट्रातील गाव : येवला
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) : यशवंत दत्त
४. मराठी पुस्तकाचे नाव : युगांत
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) : यदुनाथ थत्ते
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) : यशवंत देव
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) : ये रे घना
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) : ये रे माझ्या मागल्या
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव : या सुखांनो या
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे : यशवंतगड
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.) : येडपट
१७. देवी/देवतेचे नाव : यम

Pages