मी मराठी!

Submitted by संयोजक on 29 February, 2012 - 15:29

"मी मराठी.."

लहानपणी आपण कितीतरी नवे नवे खेळ शोधून काढत असतो, सुट्ट्यांचा वेळ मस्त मजेत घालवत असतो. मोठं होताना या खेळांचं बोट कधी सुटतं ते कळतही नाही आणि मग ते आपल्या बालपणीच्या, गावाला, भावंडांसोबत घालवलेल्या सुट्ट्यांच्या आठवणींचे फुलपंखी रंग बनून राहतात. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्या अल्लड वयात जाऊन ती मजा पुन्हा लुटता येते का पाहणार आहोत. आपण सर्वांनी आयुष्यात हमखास एकदा तरी खेळलेला खेळ म्हणजे - नाव गाव फळ फूल!! खेळूया पुन्हा एकदा? आम्ही एक अक्षर देणार आणि त्यावरुन तुम्ही पटापट लिहून काढायचंय -

१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)

आता सारे चतुर मायबोलीकर लक्षात घेऊन या खेळाचे नियम किंचित कडक केलेत बरं! काय आहेत हे नियम?
१. अक्षर दिल्यानंतर पूर्ण १३ उत्तरे लिहिल्यानंतरच पोस्ट टाकायची आहे. अर्धवट पोस्ट केल्यास, तुम्ही इतरांना मदत करता आहात हे गृहित धरुन फाऊल धरण्यात येईल व ते अक्षरच बाद करण्यात येईल. तेव्हा इतर प्रयत्न करणार्‍या मायबोलीकरांचा वेळ वाया जाऊ देऊ नका.
२. एकदा एका अक्षरावर पूर्ण १३ उत्तरांचे पोस्ट पडले की इतरांनी पुढील अक्षराची वाट पहावी. पहिल्या पूर्ण १३ उत्तरांच्या पोस्टीस महत्त्व आहे हे लक्षात घ्या. पुढच्या पोस्टी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्वरीत उत्तरांना महत्त्व आहे.
३. ठराविक वेळाने संयोजक पुढचे अक्षर देत राहतील. हा खेळ सर्व मायबोलीकरांना खेळता यावा याची काळजी घेतली जाईल.
४. जास्तीत जास्त अक्षरांसाठी सर्वात आधी १३ प्रश्न पूर्ण करणार्‍यांस बक्षिस.
५. अट फक्त एकच, प्रत्येक उत्तर 'मराठी'तच पाहिजे.

आम्ही इथे एक अक्षर उदाहरणादाखल दिले आहे.

pa.jpg

१. मराठी नाव - परिमल
२. महाराष्ट्रातील गाव - पुणे
३. मराठी कलाकाराचे नाव -पुष्कर श्रोत्री
४. मराठी पुस्तकाचे नाव - पांगिरा
५. मराठी लेखक/लेखिका - पु. ल. देशपांडे
६. मराठी कवी/कवयित्री - शिरीष पै
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - पाऊले चालती पंढरीची वाट
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - पदरी पडले पवित्र झाले
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - पिंजरा
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- पुरणपोळी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - पोपट
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - पुरंदरचा किल्ला
१३. मायबोली आयडी - पीहू

**** महत्त्वाची घोषणा ****

लोकहो:

आपण सर्वांनी ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! खेळाची रंजकता थोडी अजून वाढवण्यासाठी आम्ही ह्यात अजून ४ गोष्टी समाविष्ट केल्या आहेत. तर आता नवीन प्रश्नावली आहे अशी:

१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव
१६. मराठी अलंकाराचे नाव
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव

आणि आता अक्षर आहे:

gha.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उंदेरी हा किल्ला आहे?
खांदेरी-उंदेरी पैकी असेल तर ती बेटं आणि बंदरं आहेत ना?
म्हणून तर नाव आठवलं होतं तरी मी लिहिलं नाही.

वरच्या तीनही एंट्रीज बाद होत आहेत. भरत मयेकर, उंबर हा पदार्थ नसून फळ आहे. नंदिनी आपली सगळी उत्तरे बरोबर आहेत परंतु मायबोली आयडी आपण आणि भरत मयेकरांनी एकच दिला आहे. आणि आपल्या दोघांच्या पोस्ट्स एकावेळी नसल्याने ते ग्राह्य धरता येणार नाही.

नीधप, मायबोली आयडी uju हा रोमन मध्ये असल्याने आपली एंट्री ग्राह्य धरता येत नाही.

१. मराठी नाव - वासंती
२. महाराष्ट्रातील गाव - वरणगाव
३. मराठी कलाकाराचे नाव -वामन केन्द्रे
४. मराठी पुस्तकाचे नाव - वपुर्झा
५. मराठी लेखक/लेखिका - व पु काळे
६. मराठी कवी/कवयित्री - वा रा कांत
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - वाट इथे स्वप्नातील संपली जणु
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - वड्याचे तेल वांग्यावर
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - वास्तुपुरुष
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- वरणभात
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - वानर
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे -वासोटा
१३. मायबोली आयडी - वरदा

१. मराठी नाव :- वीणा
२. महाराष्ट्रातील गाव :- वर्धा
३. मराठी कलाकाराचे नाव :- विभावरी देशपांडे
४. मराठी पुस्तकाचे नाव :- वपुर्झा
५. मराठी लेखक / लेखिका :- सरोजिनी वैद्य
६.मराठी कवी / कवयित्री :- वंदना विटणकर
७.मराठी गाणे किंवा कविता :- वारा गाई गाणे
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण :- वरातीमागून घोडे
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव :- विहीर
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव :- वाटली डाळ
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव :- वाघ
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे :- विशालगड
१३. मायबोली आयडी :- वत्सला

१. मराठी नाव - वसंत
२. महाराष्ट्रातील गाव - वडाळा
३. मराठी कलाकाराचे नाव -वसंतराव देशपांडे
४. मराठी पुस्तकाचे नाव - वनवास
५. मराठी लेखक/लेखिका - व पु काळे
६. मराठी कवी/कवयित्री - वि. द. घाटे
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - विसरू नको श्रीरामा मला
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - वासरात लंगडी गाय शहाणी
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - वाडा चिरेबंदी
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- वरणफळं
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - वटवाघूळ
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - वासोटा किल्ला
१३. मायबोली आयडी - विजयकुलकर्णी

१. मराठी नाव - वैशाली
२. महाराष्ट्रातील गाव - वणी
३. मराठी कलाकाराचे नाव - वंदना गुप्ते
४. मराठी पुस्तकाचे नाव - विशाखा
५. मराठी लेखक/लेखिका - व.पु. काळे
६. मराठी कवी/कवयित्री - विंदा करंदीकर, वसंत बापट
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - वाटेवर काटे वेचीत चाललो
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - वेड घेऊन पेडगावला जाणे
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - वाडा चिरेबंदी
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- वरणफळे
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - वेडा राघू
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - वासोटा
१३. मायबोली आयडी - विनार्च

१. मराठी नाव - वासंती
२. महाराष्ट्रातील गाव - वाठार
३. मराठी कलाकाराचे नाव - गजानन वाटवे
४. मराठी पुस्तकाचे नाव - विशाखा
५. मराठी लेखक/लेखिका - व पु काळे
६. मराठी कवी/कवयित्री - वामन पंडित
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - वद जाऊ कुणाला शरण
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - वरातीमागून घोडे
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - वार्‍यावरची वरात
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव - वर्‍याचा भात
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - वाघ
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - वासोटा
१३. मायबोली आयडी - वरदा

मराठी नाव :- वामन
२. महाराष्ट्रातील गाव :- वडगाव
३. मराठी कलाकाराचे नाव :- विजु खोटे
४. मराठी पुस्तकाचे नाव :- वपुर्झा / विज म्हणाली धरतीला
५. मराठी लेखक / लेखिका :- विजया लाड
६.मराठी कवी / कवयित्री :- वंदना विटणकर
७.मराठी गाणे किंवा कविता :- वाट पाहुनी जिव शिणला
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण :-वड्याच तेल वांग्यावर
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव :- वादळवाट
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव :- वांग्याची भरली भाजी
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव :- विंचु Happy
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे :- विशालगड
१३. मायबोली आयडी :- विनय भिडे

.

१. मराठी नाव : तुषार
२. महाराष्ट्रातील गाव : तासगाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) : तुषार दळवी
४. मराठी पुस्तकाचे नाव : तारेवरची कसरत
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) : तोरड्मल / तांबे
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) : तुकाराम
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) : तु तेव्हा कशी/अशी.../ ती येते आणिक जाते
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) : तरण्याचे झाले कोळसे अन म्हाताऱ्याला आले बाळसे.
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव : तो मी नव्हेच
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.) : तांबडा रस्सा
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव : तरस
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे : तोरणा
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.) तात्या विंचु
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव : तापी
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव :तगार
१६. मराठी अलंकाराचे नाव : तोडे
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव : त्र्यंबकेश्वर

१. मराठी नाव - तनुजा
२. महाराष्ट्रातील गाव - तारकर्ली
३. मराठी कलाकाराचे नाव - श्रेयस तळपदे
४. मराठी पुस्तकाचे नाव - तेरूओ
५. मराठी लेखक/लेखिका - तारा भवाळकर
६. मराठी कवी/कवयित्री - तुकाराम
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - तुला पाहते रे तुला पाहते
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - तूझे आहे तुजपाशी परि जागा चुकलासी
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - तरूण तुर्क म्हातारे अर्क
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- ताकभात
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - तरस
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - तोरणा
१३. मायबोली आयडी - तात्या विंचू
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव - तापी
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव - तेरडा
१६. मराठी अलंकाराचे नाव - तोरड्या
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव - तुळजाभवानी

१. मराठी नाव- तोषवी
२. महाराष्ट्रातील गाव - तुळजापूर
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - तुषार दळवी
४. मराठी पुस्तकाचे नाव - तुंबाडाचे खोत
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - तोरडमल मधुकर
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - तांबे भा रा
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) - तरुण आहे रात्र अजुनी
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) - ताकाला गेल्यावर भांडं लपवणे
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव - ताबडी माती / तू तिथे मी
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.) - ताकभात
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव - तित्तर
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - तोरणा
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.) - तोषवी
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव - तापी
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव - तगर
१६. मराठी अलंकाराचे नाव - तोडे
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव - तळ्यातला गणपती (स्सर्सबाग, पुणे)/तुळजापूर भवानी

Pages