"मी मराठी.."
लहानपणी आपण कितीतरी नवे नवे खेळ शोधून काढत असतो, सुट्ट्यांचा वेळ मस्त मजेत घालवत असतो. मोठं होताना या खेळांचं बोट कधी सुटतं ते कळतही नाही आणि मग ते आपल्या बालपणीच्या, गावाला, भावंडांसोबत घालवलेल्या सुट्ट्यांच्या आठवणींचे फुलपंखी रंग बनून राहतात. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्या अल्लड वयात जाऊन ती मजा पुन्हा लुटता येते का पाहणार आहोत. आपण सर्वांनी आयुष्यात हमखास एकदा तरी खेळलेला खेळ म्हणजे - नाव गाव फळ फूल!! खेळूया पुन्हा एकदा? आम्ही एक अक्षर देणार आणि त्यावरुन तुम्ही पटापट लिहून काढायचंय -
१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
आता सारे चतुर मायबोलीकर लक्षात घेऊन या खेळाचे नियम किंचित कडक केलेत बरं! काय आहेत हे नियम?
१. अक्षर दिल्यानंतर पूर्ण १३ उत्तरे लिहिल्यानंतरच पोस्ट टाकायची आहे. अर्धवट पोस्ट केल्यास, तुम्ही इतरांना मदत करता आहात हे गृहित धरुन फाऊल धरण्यात येईल व ते अक्षरच बाद करण्यात येईल. तेव्हा इतर प्रयत्न करणार्या मायबोलीकरांचा वेळ वाया जाऊ देऊ नका.
२. एकदा एका अक्षरावर पूर्ण १३ उत्तरांचे पोस्ट पडले की इतरांनी पुढील अक्षराची वाट पहावी. पहिल्या पूर्ण १३ उत्तरांच्या पोस्टीस महत्त्व आहे हे लक्षात घ्या. पुढच्या पोस्टी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्वरीत उत्तरांना महत्त्व आहे.
३. ठराविक वेळाने संयोजक पुढचे अक्षर देत राहतील. हा खेळ सर्व मायबोलीकरांना खेळता यावा याची काळजी घेतली जाईल.
४. जास्तीत जास्त अक्षरांसाठी सर्वात आधी १३ प्रश्न पूर्ण करणार्यांस बक्षिस.
५. अट फक्त एकच, प्रत्येक उत्तर 'मराठी'तच पाहिजे.
आम्ही इथे एक अक्षर उदाहरणादाखल दिले आहे.
१. मराठी नाव - परिमल
२. महाराष्ट्रातील गाव - पुणे
३. मराठी कलाकाराचे नाव -पुष्कर श्रोत्री
४. मराठी पुस्तकाचे नाव - पांगिरा
५. मराठी लेखक/लेखिका - पु. ल. देशपांडे
६. मराठी कवी/कवयित्री - शिरीष पै
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - पाऊले चालती पंढरीची वाट
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - पदरी पडले पवित्र झाले
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - पिंजरा
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- पुरणपोळी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - पोपट
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - पुरंदरचा किल्ला
१३. मायबोली आयडी - पीहू
**** महत्त्वाची घोषणा ****
लोकहो:
आपण सर्वांनी ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! खेळाची रंजकता थोडी अजून वाढवण्यासाठी आम्ही ह्यात अजून ४ गोष्टी समाविष्ट केल्या आहेत. तर आता नवीन प्रश्नावली आहे अशी:
१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव
१६. मराठी अलंकाराचे नाव
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव
आणि आता अक्षर आहे:
नीधप माझ्यावर पण अण्याव झालाय
नीधप माझ्यावर पण अण्याव झालाय म्हणून नाहीतर आणखी एखाद दोन मिळाल्या असत्या
मंजुडी आपण गायब झालेल्या च साठीची कॅडबरी शेअर करुयात हे घे
द. भा. धामणस्कर - कवी
द. भा. धामणस्कर - कवी
(No subject)
१. मराठी नाव - जयंत २.
१. मराठी नाव - जयंत
२. महाराष्ट्रातील गाव - जळगाव
३. मराठी कलाकाराचे नाव -जयमाला शिलेदार
४. मराठी पुस्तकाचे नाव - जेव्हा माणूस जागा होतो
५. मराठी लेखक/लेखिका - जयवंत दळवी
६. मराठी कवी/कवयित्री - जोशी राम जगन्नाथ
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - जयोस्तुते श्री महन्मंगले शिवस्पदे शुभदे
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - जशास तसे
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - जाऊ बाई जोरात
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- जवसाची चटणी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - जवळा,
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - जयगड
१३. मायबोली आयडी - जागू
हहला हाणा!!
हहला हाणा!!
(No subject)
.
.
खरच हाणा.. मी रिफ्रेश करे
खरच हाणा.. मी रिफ्रेश करे पर्यन्त तर लिहिले हिने ..
आणि ५०% उत्तर सेम
असो चालयचच
१. मराठी नाव - जान्हवी २.
१. मराठी नाव - जान्हवी
२. महाराष्ट्रातील गाव - जमखिंडी
३. मराठी कलाकाराचे नाव - जयश्री गडकर
४. मराठी पुस्तकाचे नाव - जरिला
५. मराठी लेखक/लेखिका - ज्योत्स्ना देवधर
६. मराठी कवी/कवयित्री - वैभव जोशी
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - जे मत्त फुलांच्या कोशातून पाझरले
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - जांभूळ आख्यान किंवा जैत रे जैत
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- जवळा आणि जवस
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - जांभळा शिंजीर
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - जंजिरा
१३. मायबोली आयडी - जागो मोहन प्यारे
ह ह वर बंदी घाला.
ह ह वर बंदी घाला.
ह ह वर बंदी घाला.
ह ह वर बंदी घाला.
वैभव जोशी... सही! बरं मी आता
वैभव जोशी... सही!
बरं मी आता नाही पोस्टत.
गंमत केली गं हवे. ती तुझ्या
गंमत केली गं हवे. ती तुझ्या उत्स्फुर्तपणाला दिलेली दाद आहे गं.
१. मराठी नाव - जयश्री २.
१. मराठी नाव - जयश्री
२. महाराष्ट्रातील गाव - जालवा
३. मराठी कलाकाराचे नाव -जितेंद्र अभिषेकी
४. मराठी पुस्तकाचे नाव - जोगवा
५. मराठी लेखक/लेखिका - जयंत नारळीकर
६. मराठी कवी/कवयित्री - अरुण जाखडे
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - जिथे सागरा धरणी मिळते
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - ज्याच्या हाती ससा तो पारधी
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - जावयाची जात
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- जिलबी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - जिराफ
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - जंजीरा
१३. मायबोली आयडी - जिप्सी
गंमत ग.. न खेळता, पोस्टी
गंमत ग.. न खेळता, पोस्टी बघण्यात पण मज्जा येतीये
तू काय मधल्या वेळात उरलेल्या
तू काय मधल्या वेळात उरलेल्या सगळ्या अक्षरांची यादी काढून ठेवलीयेस का?
नी तै जमखिंडि कर्नाटकातलं की
नी तै जमखिंडि कर्नाटकातलं की वो.. बागलकोट, कर्नातकातलं
बरं मी आता नाही पोस्टत.
बरं मी आता नाही पोस्टत. <<<
हे हवेने सिरियसली लिहिलंय असं वाटतंय का तुला मंजू?
होय की. आपलं पटवर्धनांचं
होय की.
आपलं पटवर्धनांचं संस्थान म्हणून मी लिहून टाकलं. आत्ता तू म्हणल्यावर आठवलं
हे बरंय
हे बरंय
नाही खरच कामंधामं सोडुन हेच
नाही खरच कामंधामं सोडुन हेच सुरू आहे एक वाजल्यापासून. फार झाले आता.
चिडू नको हवे. आम्ही खरंच
चिडू नको हवे. आम्ही खरंच गमतीत म्हणतोय.
मला समजतय तुम्ही गमतीत
मला समजतय तुम्ही गमतीत म्हणताय. पण खरच कीटकॅट ब्रेक बनता है!
तुंबलेली कामे आटोपून तासाभरात घरी जाणार. रात्रपाळी पर्यंत खेळ सुरू असला तर भेटुयात
द्या आता नविन अक्षर. हह,
द्या आता नविन अक्षर.
हह, ब्रेक घे(च).
HH अभिनंदन!
HH अभिनंदन!
(No subject)
जवळा हा कसला प्राणी पक्षी
जवळा हा कसला प्राणी पक्षी आहे?
उ हे अ च्या बाराखडीत नाही का?
१. मराठी नाव - उल्का २.
१. मराठी नाव - उल्का
२. महाराष्ट्रातील गाव - उल्हासनगर
३. मराठी कलाकाराचे नाव -उषा नाडकर्णी
४. मराठी पुस्तकाचे नाव - उषःकाल
५. मराठी लेखक/लेखिका - नीला उपाध्ये
६. मराठी कवी/कवयित्री - निरंजन उजगरे
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - उठा उठा हो सकळिक
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - उचलली जीभ लावली टाळ्याला
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - उंबरठा
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- उंबर
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - उंदीर
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - उंदेरी
१३. मायबोली आयडी - उदय
. मराठी नाव - उमा २.
. मराठी नाव - उमा
२. महाराष्ट्रातील गाव -उसगाव
३. मराठी कलाकाराचे नाव -उषा किरण
४. मराठी पुस्तकाचे नाव - उचल्या
५. मराठी लेखक/लेखिका - प्रभाकर वामन ऊर्ध्वरेषे
६. मराठी कवी/कवयित्री - जयकृष्ण उपाध्ये
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - उठा उठा चिऊताई
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - उखळ पांढरे होणे
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव -उलाढाल
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- उसळ
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - ऊंट
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - उल्हासगड
१३. मायबोली आयडी - उदय
१. मराठी नाव - उर्वशी २.
१. मराठी नाव - उर्वशी
२. महाराष्ट्रातील गाव - उल्हासनगर
३. मराठी कलाकाराचे नाव - उपेंद्र दाते
४. मराठी पुस्तकाचे नाव - उषःकाल होता होता
५. मराठी लेखक/लेखिका - ऊर्मिला पवार
६. मराठी कवी/कवयित्री - निरंजन उजागरे
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - उठा उठा हो सकळीक
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - उंच वाढला एरंड, परी होई का इक्षुदंड
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - उलाढाल
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- उकडीचे मोदक
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - उंदीर
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - उदगीरचा किल्ला
१३. मायबोली आयडी - उजू
Pages