अपॉईंटमेंट घेतल्याशिवाय नाही...

Submitted by ऋयाम on 1 March, 2012 - 23:38
  1. एकाच शहरात राहूनही नातेवाईकांना भेटणं कमी होणं.
  2. नोकरी करू लागल्यावर शाळेतल्या-कॉलेजमधल्या जुन्या मित्रांना भेटणं कमी होणं.
  3. मित्र-मैत्रिणींची लग्न झाल्यानंतर त्यांच्याशी भेटी न होणं.

असे प्रकार हल्ली बरेचदा होताना दिसतात. "भेटूया परत!" म्हणत निरोप घेतला, तरी परत भेटणं महिनोन महिने होत नाही, दिवस निघून जातात.

हल्ली फोन न करता कोणी कोणाकडे फारसं जात नाही. अचानक असं कोणी घरी आलं, तर आश्चर्य वाटतं. पण मग दर वेळेस सोय-गैरसोय पाहिली, त्यामुळेच भेटी होणं कमी होतंय का? लोकांना डिस्टर्ब करायला नको म्हणून एकमेकांकडे जाणं इतकं कमी होणं ही चांगली गोष्ट असावी असं वाटत नाही.

पूर्वी अचानक येऊन उभ्या ठाकणार्‍या माणसांमुळे कधी आनंद तर कधी गैरसोयही होत असे. अर्थात ते येणार्‍या माणसावरही अवलंबून, पण त्यामुळे ही नाती टिकून होती असं वाटतं. 'अपॉईंटमेंट' प्रकार 'अति' केल्याने त्याचा ह्या नात्यांवर परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं का?? आजकाल आपण गैरसोयीचा 'अति' विचार करतो असं वाटतं का?

* ह्यासाठी कोतबो गट बरोबर नाही बहुतेक. पण योग्य गट न शोधू शकल्याने इथे पोस्ट केलं आहे... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही. मला असं नाही वाटत. माणसं शेवटी माणसं असतात - कुठल्याही काळातली/देशातली असू देत - त्यांचे वर्तन थोड्याफार फरकाने सारखेच असतं. जी खरोखर जवळची असतात, त्यांना तुम्हाला आधी खास सांगावे लागत नाही. आणि कुलुप पाहून आबाळ होऊ नये, म्हणून लांबच्यांना(भौगोलिक अंतराने) तसंही आधी कळवून जाण्याची पद्धत होतीच की.

आताशा आपण कदाचित हा 'समोरच्याच्या गैरसोयीचा विचार करणे, दोन्ही बाजूंसाठी चांगले आहे', हा दृष्टीकोन वाढतोय, असं म्हणता येईल - जी अर्थात चांगली गोष्ट आहे. पण त्यानंतरही होणारी गैरसोय/आनंद कुठे टळते?

आजकाल सगळेच घड्याळाच्या काट्यावर चालतात/जगतात, त्यामुळे कदाचित तुम्ही म्हणताय तसं वाटू शकतं. पण थोडं निवांत आयुष्य जगून पहा, काहीच बदलेलं नाहीये, हे लक्षात येईल. >>> स्वानुभव. Happy

मला उलटकोणाअकडे जाताना फोन करून जाणेच जास्तं योग्यं वाटतं.
पूर्वी सेलफोन वगैरे सगळ्यां नसायचे, लँडलाइन सुध्दा सगळ्यांकडे असायचेच असं नाही , त्यामुळे हवं तेंव्हा फोन करून गप्पा अत्ता सारख्या होत नसत दररोज.. त्यामुळे अर्थातच प्रतय्क्ष भेटणे हा गप्पा मारण्याचा पर्याय होता.
पूर्वी आई-बाबा दोघही नोकरी करणार्‍या फॅमिलिज आजच्या तुलनेत कमी होत्या त्यामुळे अचानक जरी भेटायला गेलो तरी घरात कोणी तरी घरी असायचच.. अता लोक बिझी आहेत, सगळ्यांचे अपापले व्याप आहेत.. अचानक गेलो तर घरी कोणी असतील कि नाही याची गॅ रेन्टी नाही.
या शिवाय फेसबुक-ट्विटार-अगदी मायबोली सुध्दा व्हरचुअली २४ तास कनेक्टेड ठेवतेच मित्रमंडळींना.. त्यामुळे प्रत्यक्ष भेट नसली होत तरी लोकांना कनेक्टेड असल्याचं सॅटॅस्कॅक्शन मिळत असावं म्हणून प्रतय्क्ष भेटी पूर्वी पेक्षा कमी झाल्या असतील.

ओके!

मी फोन करणं न करणं हा मुद्दा म्हणत नाहीये पण. फोन तर हवाच...

सोय / गैरसोयीचा अति विचार असं म्हणतोय ...

हो.. मीच. Happy

सोय गैरसोय -
म्हणजे एकमेकांना वीकेंडलाच भेटणं, तेही जाऊदे म्हणणं.. करत महिनोनमहिने जातात. रहायला जवळच असूनदेखिल...

मग थोडा त्रास झाला तरी चालवुन घ्यायला हवं का?? शक्य नाही म्हणणं थोडंसं सेल्फिश आहे का??

आज जे खूप जवळचे मित्र आहेत त्यांच्या मैत्रीची सुरुवात बर्‍याचदा गैरसोयीतून झाली असते. म्हणजे खर तर तेंव्हा मैत्री प नसते. 'हा/ही टळेल तर बरे' अशीच भावना असते पण मग काही तरी घडते आणि मग 'एकमेकांशिवाय चैन पडत नाही' अशी अवस्था येते. तेंव्हा सुरुवातिची गैरसोय टाळली असती तर इतके सुंदर मैत्र जमलेच नसते. अर्थात हा फक्त त्या गैरसोयीचा एक पैलू झाला.

दिपांजली +१

सोय / गैरसोयीचा अति विचार असं म्हणतोय ...>>>>

हा विचार करायलाच हवा. कारण आजकाल घरातलं मनुष्य बळ कमी झालेलं आहे. प्रत्येकजण घड्याळ्याशी बांधलेला आहे. सोय्/गैरसोय ह्या गोष्टी नोकरी करणार्‍या बाईच्या घरात तर बघीतल्या गेल्याच पाहिजेत.

मागच्याच आठवड्यातिल उदाहरणः आमचे दोन नातेवाईक अचानक रहाण्यासाठी घरी आले. त्यांना सकाळची ७ ची गाडी पकडायची होती. मार्च जवळ आल्यामुळे मी ऑफीस मधुन उशीरा साडे आठ्ला घरी आले. नवरा तर खुप काम असल्याने ११ वाजता आला. हल्ली सासुबाईंची तब्येत अजिबात बरी नाही. त्या मुळे आल्या नंतर पुर्ण स्वयंपाक केला. हे नातेवाईक मी पहिल्यांदाच पहात होते. लग्न झाल्यास गेल्या १६ वर्षांत पहिल्यांदाच बघीतले. सकाळी परत साडेपाचला उठुन त्यांना चहा करुन दिला. ड्रायव्हर ला बोलावुन त्यांना गाडीवर सोडले.

आता ह्यात त्यांना आम्ही काहीही जाणवु दिले नाही. तरी गैरसोय झालीच. नाही कशी म्हणु.

त्यांनी येण्या आधी एक फोन जरी केला असता, तरी मी काहीतरी करुन, लौकर येवुन, माझ्यावर आणि सासु बाईंवर आलेला ताण घालवु शकले असते.

लोकांकडे जाण्या आधी त्यांना कल्पना दिली तर नीदान नीट व्यवस्था आणि ताण विरहीत सरबराई होवु शकते.

हे झालं दुरच्या लोकांच. जवळच्या म्हणाल तर जवळचे किती "जवळचे" आहेत हे महत्वाचे. एकदाका आपला सुह्रुद असेल तर वेळ काढला जातो. गप्पांची वाट पाहिली जाते. कधी समोर आला तरी सोय्..गैरसोय्...हे शुल्लक प्रश्ण होतात.

मलातरी वाटतं की हे सापेक्ष आहे. सरसकट ह्या गोष्टी होत नाहीत. नाहीतर मायबोली ग.ट.ग. झालीच नसती.

अचानक टपकलेली व्यक्ती आपल्या आवडीची असेल तर मग सोय्/बिय को गोली मारो..... मुळात तुम्ही जिथे आपलेपणाने जाणार आहात तिकडे तुमचे स्वागत कसे होइल ह्याचे भान जाणार्‍याने ठेवले पाहिजे.

आजकाल आपण गैरसोयीचा 'अति' विचार करतो असं वाटतं का
>> हो.
म्हणजे थोडा विचार करायलाच पाहिजे, पण अती विचारानं सहजता जाते - एक अवघडलेपण येतं.. पटकन कनेक्ट करता येत नाही समोरच्या माणसाला..
जास्त सोफिस्टिकेशन माणसाला जास्त आत्ममग्न आणि जास्त एकटं बनवतं असं मला वाटतं..

नानबा!

<म्हणजे थोडा विचार करायलाच पाहिजे, पण अती विचारानं सहजता जाते - एक अवघडलेपण येतं.. पटकन कनेक्ट करता येत नाही समोरच्या माणसाला..
जास्त सोफिस्टिकेशन माणसाला जास्त आत्ममग्न आणि जास्त एकटं बनवतं असं मला वाटतं..>
बरोब्बर, हेच म्हणायचंय मला!

आणि 'फोन न करता कोणाकडे जाऊया!' असं मुळात म्हणायचंच नाहीये. फोन तर बेसिक आहे आता... कृनोंघ्या:-)

पुर्वीसारखी घरात माणसे नसतात. (पुर्वी घर सहसा बंद नसे. ) त्यामूळे गैरसोय
पाहुण्यांची देखील होऊ शकते.

आणि वर सगळ्यांनीच नोंदवले आहे, कि पाहुण्यांनी पाहुण्यासारखे वागले नाही,
तर त्यांची अडचण होत नाही.
ते सगळे तूमचे संबंध किती दृढ आहेत त्यावर ठरते. मला ज्या घरात मोकळेपणा
वाटतो, तिथे मला पाणीदेखील मागायची गरज वाटत नाही, कारण मी स्वतःच त्या घरात ते घेऊ शकतो. आपण आपल्याच घरात वावरतोय असे मला वाटते.

आणि शक्यतो माझ्यामूळे कुणाची गैरसोय होणार नाही, हे पण बघतोच.
दुसर्‍यांना त्रास होईल, अशा सवयी आपल्याला नसाव्यात. शक्यतो त्या घरच्या
वातावरणात / रोजच्या व्यवहारात मिसळून जावे हे उत्तम.

म्हणजे थोडा विचार करायलाच पाहिजे, पण अती विचारानं सहजता जाते - एक अवघडलेपण येतं.. पटकन कनेक्ट करता येत नाही समोरच्या माणसाला..
जास्त सोफिस्टिकेशन माणसाला जास्त आत्ममग्न आणि जास्त एकटं बनवतं असं मला वाटतं..>> अगदी, वेल सेड. Happy

मला स्वतःल फोन करुन कुणाकडे जाणं किंवा कुणी तसंच माझ्याकडे येणं बरं वाटतं. अचानक गेल्याने कुणाच्या/ आपल्या ठरलेल्या प्लॅन्सचा विचका होऊ शकतो ना?
(कोतबो म्हणून आशेने आले पण भ्रमनिरास झाला Wink )

म्हणजे थोडा विचार करायलाच पाहिजे, पण अती विचारानं सहजता जाते - एक अवघडलेपण येतं.. पटकन कनेक्ट करता येत नाही समोरच्या माणसाला..
जास्त सोफिस्टिकेशन माणसाला जास्त आत्ममग्न आणि जास्त एकटं बनवतं असं मला वाटतं..>>>+१००. हे जसं लक्षात आलं तेव्हापासून मी ब-याचदा ती सहजता आणण्यात पुढाकर घेतेय इथल्या(परदेशातल्या) फ्रेंड सर्कल मध्ये. ज्यांना ते अपील होतंय ते सुद्धा मग ही सहजता जपतात आपणहून असा अनुभव आलाय अगदी सगळ्याच मित्रमंडळींकडून.

आमचे बरेच नातेवाईक आहेत(माझ्या आई-वडिलांकडचे). तेव्हा नेहमीच पाहुणे येत जात असत. मी लहान असताना फोन पण नव्हता घरी..पण मला अजुन आठवतं... जे कोणी गावाहून यायचे ते आपल्याबरोबर भाजी-भाकरी...अगदी तव्यावर परतलेली डाळ...असं काही घेऊन यायचे(प्रवासात भूक लागली तर खायला असेल सुध्दा....पण प्रवास अगदी २-३ तासाचा असेल). त्यामुळे आयत्यावेळेला स्वयंपाक वाढवणे किंवा बाहेरुन काही मागवणे ही वेळ नाही आली आईवर. गावाकड्चे जेवण मस्त लागतं म्हणून आम्ही मुलंच ते संपवायचो. अजुनही काका-मामा आले कि येताना ड्बा आणतात किंवा बाजारातून भाजी घेऊन येतात. माझी आईसुध्दा त्यांना परत जाताना डबा देते.
आता राहीलं मित्र-मेत्रिणींचं....जे आपले जवळ्चे असतात त्यांच्याशी आपण कोण्त्याना कोणत्या प्रकारे संपर्कात असतोच. आणि अचानक ते घरी आले तर त्यांची अड्चण वाटत नाही. त्यातून जर आपण कोणाकडे पाहुण्यांसारखे जाणार असू तर आधी कल्पना देऊन गेलेलच योग्य.

'अपॉईंटमेंट' प्रकार 'अति' केल्याने त्याचा ह्या नात्यांवर परिणाम होतो असं तुम्हाला वाटतं का?? आजकाल आपण गैरसोयीचा 'अति' विचार करतो असं वाटतं का?>>
हो असे होत जाते हे खरे आहे ..आपणही विचार करतो आणि समोरचा पण ..
कशी कधी आपल्याला जावेसे वाटत असते पण ..समोरच्याला त्रास होईल म्हणून भेटणे होत नाही ..आणि मग हळू हळू दुरावा येतो ..बोलणे, भेटणे होत नाही.....मग काहीतरी event ला भेटणे होते ..सगळे आपापल्या व्यापात व्यस्त असतात.भेटायचे तर असते पण जमत नाही .
"यायच्या आधी फोन करा बरंका .." असे बरोबर असेलही ...पण अचानक भेटलेले काही नातेवाईक ,मित्र मैत्रिणी आनंद देवून जातात.
कधी कधी फोन न करता हि जाता येईल असे हक्काचे नातेवाईक ,मित्र -मैत्रिणी असतील तर जीवन अधिक सोपे होते असा अनुभव आहे.

माझ्या बालपणी खेड्यात नातेवाईक/पाहुणे बिनदिक्कतपणे अचानक येत. मात्र त्या पाहुण्यातल्या स्त्रिया लगेच जे काम चालू असेल ते सुरूही करीत. भाजी निवडण्याचे काम असेल तर लगेच अर्धी भाजी घेऊन निवडण्याचे काम सुरू ही करीत्.पुरुष देखील यजमान ज्या कामात गुन्तला असेल त्यात लगेच सहभाग घेत . अगदी शेतावर जाऊन पाणी भरणे, पेरणी करणे अगदी घरच्या सारखे करीत. तरुण पाहुणी असेल तर ती अगदी स्वयंपाक करणार्‍या यजमानणीला उठवून स्वतः भाकर्‍या बडवायला बसे. अगदीच ज्येष्ठ नागरिक नसेल तर मला आठवत नाही की पाहुणे आलेत आणि आरामशीर बसलेत. यामुळे आलेल्या पाहुण्यांमुळे अगदी मनातून देखील नाराजी कमीच असे. (संबंध बिघ्डलेले नसतील तर.).दिनेशदा म्हनतात त्याप्रमाणे अजूनही खेड्यातले दरवाजे बन्द नसतातच.
शहरात मात्र कळवून जायची आवश्यकता आहेच. आमची एक भाची मावशीला सरप्राईज द्यायचे म्हणून अचानक रात्री पुण्यात आली . नेमके आम्ही त्यादिवशी महाबळेश्वरला होतो. अखेर आमच्या फॅमिली फ्रेन्डकडे तिची राहण्याची व्यवस्था फोनवरून करून द्यावी लागली.

ऋयाम , मला वाटत आपली स्वतःला केन्द्रस्थानी ठेउन आखलेली वर्तुळ असतात. आतल्या परिघातल्या माणसानी नाही घेतली अपॉइंट्मेंट तरी चालते. एकतर नात तेवढ औपचारिक नसत. सहसा आपल्या सोय गैर्सोयीची गणित त्याना माहित असतात. खरे आप्त असतात ते, पाहुणे नाही.
वाढत्या शहरीकरणामुळे हे परिघ लहान होतायत खरे. एकत्र कुटुम्ब ते इंडिव्हिज्युअल असा प्रवास करताना कुठे थाम्बायच ते कळल तर मला वाटत आप्तांची संख्या पाहुण्यां पेक्षा मोठीच राहिल . अर्थात हा मुद्दा वैयक्तिक पण नाहि का?

हे मुद्दे माझ्यामते शहरी भागात अधिक जाणवतात. खेड्याकडे अजूनही कधीही गेलं तरी 'आलेल्या पाहुण्यामुळे आपली गैरसोय झाली आहे' असं यजमानाला वाटत नाही... आल्यागेल्याचं आपलेपणाने स्वागत होतंच! पाहुणाही जर अगदी घरातल्यासारखा वागला (चटकन मदत करू लागणे) तर तेवढंच यजमानालाही बरं वाटतं. दुर्गभ्रमणात आजवर जेव्हा जेव्हा गावांमधल्या छोट्या छोट्या घरांमध्ये गेलो, तितक्या वेळा मलातरी अतिथ्याचाच अनुभव आला आहे. भलेही आम्ही त्या घरात दहाच मिनिटे थांबलो असू, पण शहरामध्ये अनोळखी पाहुण्यासाठी त्या दहा मिनिटांचाही चार्ज यजमानाच्या चेहर्‍यावर झळकला असता.

शहरांमध्ये शिक्षणातून आणि स्व-जाणीव वगैरेतून आलेल्या साईडइफेक्टस मुळे हे प्रश्न पडायला लागले आहेत. अर्थात, कोण आपल्यासाठी आणि आपण एखाद्यासाठी किती मॅटर करतो ही गोष्ट क्लिअर असली की सोय-गैरसोय हे मुद्दे उरत नाहीत. आफ्टरऑल, सगळी नाती पैशात मोजायची नसतात! Happy

ऋयाम, कंगनाने अपॉइंटमेंटशिवाय भेटायला नकार दिलाय नं? Wink उगाच जाऊ नकोस बरं, तिनी परवाच कुणालातरी stalker म्हणून अंदर करवलं Proud

"अति" ची व्याख्या बदलणार नं माणसाप्रमाणे? कुणाला "फोन करुनच जावं लागतं बॉ त्यांच्याकडे" हे अति वाटेल तर कुणाला त्यात काहीच विशेष नाही वाटणार.
वाढती अंतरं, प्रत्येकाची टाइट वेळापत्रकं, माणशी मोबाइल असण्याच्या काळात फोन करुन जावे हेच उत्तम. कुणाचीच गैरसोय नाही.
सहजता टिकवण्यासाठी अगदी आठव्डाभर आधीपासून अपॉइंट्मेंट घेण्याऐवजी "मी या भागात आलेय अन मला तासभर तुमच्याशी भेटायला वेळ आहे. तुम्हाला आहे का? घरी किंवा जवळच्या रेस्टॉरंट म्हध्ये भेटायचं का?" असं विचारावं. म्हणजे समोरच्याचे काही दुसरे प्लॅन्स नसतील (आणि त्यांना तुम्हाला खरंच भेटायचं असेल) तर भेट होतेच शिवाय फार फॉर्मल नाही वाटत. Communication is the key!रेस्टॉरंटमध्ये भेटायचा पर्याय दिल्याने "घर अस्ताव्यस्त आहे अन आवरायला वेळ नाही, मुलांचा अभ्यास आहे, घरातल्या आजारी लोकांना आराम हवाय, कामवाली सुट्टीवर आहे, घरच्यांचा आरामाचा दिवस आहे" इ. कारणामुळे टाळलेल्या भेटी नक्कीच होतात असा अनुभव आहे.

इथे अनेकांचा "गावाकडे जास्त आपलेपणा जाणवतो" टाइप सुर आहे त्याच्याशी असहमत. ज्याच्याकडे जातोय त्याच्या सोयीचा विचार करणे यात आपलेपणाचा अभाव नसून त्याच्या वेळेचा/त्या वेळेचं काय करायचं हे ठरवण्याच्या त्याच्या हक्काचा आदर करणे आहे. त्यातून जास्त आपलेपणा दिसतो असं मला वाटतं. नाहीतर "आम्ही आमच्या सोयीनी कधीही जाऊ, समोरच्याने प्रेमानीच/हसूनच आतिथ्य केलं पाहिजे" हा काय आपलेपणा? अन जिथे आपण इतक्या आपलेपणानी,सोय गैरसोय न बघता जातो (अगदी जवळचे लोक) तिथे त्यांनी आदरातिथ्य करावं अशीही अपेक्षा नसते आपली. कारण आपण घरच्या सारखेच अस्तो तिथे. नाही का?

ऋयाम, वरच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं 'बदललेली जीवनशैली, घड्याळाशी बांधलं जाणं' ही आहेत माझ्या मते.
नताशाचा 'कंगना' मुद्दा लक्षातच आला नव्हता Proud

फोन करुन जावे की नाही हा मुद्दा नाहीये.
इतक्या वेळा लिहूनही परत तेच लिहू का? खरंच अनपेक्षित आहेत असे प्रतिसाद. :|

माझ्या मते ह्या धाग्याचे नाव वाचून तसा समज होत असेल, पण सुरुवातीच्या काही लोकांचे प्रतिसाद पाहून मी स्पष्टीकरण दिलंय, ते का वाचत नाहीये?

एखाद्याच्या घरी फोन न करता जाणं, आणि तरीही त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे आदरातिथ्याची अपेक्षा करणार्‍यातला मी बिल्कूल नाही!

माझा प्रश्न साधा आहे.

हल्ली आपण एकमेकांच्या वेळाबद्दल, प्रायव्हसीबद्दल विचार करतो, जी फार उत्तम गोष्ट आहे.
माझी दुसर्‍यांकडून काही अपेक्षा नसून, स्वतःमध्ये आपण काही बदल घडवायची गरज आहे का? असा जो विचार माझ्या मनात येतो, त्याबद्दल हे लिहीलं आहे.

स्वतःचा वेळ हा एक्स्क्लुझिवली स्वतःसाठीच ठेवणं ह्या गोष्टीचं प्रमाण माझ्या लहानपणीपासून पाहता बरंच वाढलं आहे, असं मला वाटतं. ह्यातून हळूहळू मित्र/नातेवाईक यांच्यातले संबंध कमी होत आहेत असं मला वाटतं. प्रत्येकाची बिझी शेड्युल्स/नोकर्‍या सांभाळणे ह्यातुन शक्य होत नाही हे कुठलाही माणूस मान्य करेलच. माझं म्हणणं, हे शक्य करण्यासाठी प्रयत्न करून, स्वतःला थोडी असुविधा झाली, तरीही नात्यांसाठी ती स्विकारावी का? असा विचार मनात येण्याबद्दल आहे.

ऋयाम, मी लिहिलेला शेवटचा पॅरा तुझ्यासाठी नव्ह्ता रे. एका जनरल विचारधारेवरचं माझं मत समज. आता कोतबो मध्ये आपलं मत लिहायला हक्काची जागा, म्हणून लिहिलं Proud

तुझं म्हणणं आता आलं लक्षात. पण स्वतःत तेव्ढा बदल करणं शक्य आहे का याचं उत्तर माझ्यासाठी तरी "नाही" हेच आहे. खरं म्हणजे अगदी जवळच्या लोकांसाठी आपण थोडीफारच कशाला भरपूर गैरसोयही चालवून घेतोच. पण सगळ्यांसाठी? नो वे!

प्रतिसाद देणार्‍यांचे आभार! Happy

>>>आणि वर सगळ्यांनीच नोंदवले आहे, कि पाहुण्यांनी पाहुण्यासारखे वागले नाही,
तर त्यांची अडचण होत नाही.
ते सगळे तूमचे संबंध किती दृढ आहेत त्यावर ठरते. >>
हो, हे तर मान्यच आहे.

>>शहर आणि खेड्यातला बदल
ह्याबद्दलचं मतही मला पटतं, पण मग लाईफस्टाईल आणि

<<शहरांमध्ये शिक्षणातून आणि स्व-जाणीव वगैरेतून आलेल्या साईडइफेक्टस मुळे हे प्रश्न पडायला लागले आहेत. अर्थात, कोण आपल्यासाठी आणि आपण एखाद्यासाठी किती मॅटर करतो ही गोष्ट क्लिअर असली की सोय-गैरसोय हे मुद्दे उरत नाहीत. आफ्टरऑल, सगळी नाती पैशात मोजायची नसतात
>> बरोबर!

>>>>>>>
आजकाल सगळेच घड्याळाच्या काट्यावर चालतात/जगतात, त्यामुळे कदाचित तुम्ही म्हणताय तसं वाटू शकतं. पण थोडं निवांत आयुष्य जगून पहा, काहीच बदलेलं नाहीये, हे लक्षात येईल. >>> स्वानुभव.
>>>>>>>
धारा, ह्याचा अर्थ नाही समजला. कृ अजून लिहाल का!?

>>>>रेस्टॉरंटमध्ये भेटायचा पर्याय दिल्याने "घर अस्ताव्यस्त आहे अन आवरायला वेळ नाही, मुलांचा अभ्यास आहे, घरातल्या आजारी लोकांना आराम हवाय, कामवाली सुट्टीवर आहे, घरच्यांचा आरामाचा दिवस आहे" इ. कारणामुळे टाळलेल्या भेटी नक्कीच होतात असा अनुभव आहे.
>>>>
भेटी बाहेरच होणं, आणि त्याही कमी कमी करत जवळ जवळ बंदच होणं... मग नुसतं कोणाच्या लग्नात - त्याच्या मुलांच्या बारशात भेटणं- काय हो येत नाही.. येत जा..... वगैरे होतं असा माझा अनुभव आहे . त्यमुळेच हा धागा उघडलाय खर..

रच्याक : फोन न करता जाऊनही कोणी सहसा चिडत नाही, तो दिवस म्हणजे, वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रात्री बारा वाजता Proud

>> पण स्वतःत तेव्ढा बदल करणं शक्य आहे का याचं उत्तर माझ्यासाठी तरी "नाही" हेच आहे. खरं म्हणजे अगदी जवळच्या लोकांसाठी आपण थोडीफारच कशाला भरपूर गैरसोयही चालवून घेतोच. पण सगळ्यांसाठी? नो वे!
>> सगळ्यांसाठी नाहीच की! Happy काही नातेवाईक आणि मित्र असतातच स्पेशल, जे भेटले की आपण चांगलेच वागतो. पण नेहेमी बिझी असल्यामुळे असेल, किंवा त्यांच्याकडे काही काम नाही म्हणून असेल... कामाव्यतिरिक्त त्यांना भेटणं होत नाही. त्यांच्यासाठी नेमाने वेळ काढण्याबद्दल म्हणतोय....

एनीवे, फार शक्य नाही होणार हे अगदी मान्य... "शक्यतो प्रयत्न करावा " असं वाटत असतं.......

>>एका जनरल विचारधारेवरचं माझं मत समज. आता कोतबो मध्ये आपलं मत लिहायला हक्काची जागा, म्हणून लिहिलं >>
मान्य! परत ते ' फोन न करता' आलं म्हणून मला जरा ... माफी!!

Pages