मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे जाण्यासाठी रिलायबल टॅक्सी/बस सेवा कुठली आहे?

Submitted by झी on 23 March, 2011 - 20:41

मी पहिल्यांदाच एकटी भारतात जाणार आहे. त्यात मुंबई -पुणे हा प्रवासही एकटीने करायचा आहे.कोणाला मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे जाण्यासाठी रिलायबल टॅक्सी/बस सेवा कुठली आहे हे माहीती आहे का? फ्लाईट मध्यरात्री पोचले तर सकाळ पर्यंत एअरपोर्ट वर थांबायचे का (एकटी आहे म्हणुन) की रात्रीच टॅक्सी /बस मिळते? आता मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे (सिंहगड रोड) जाण्यासाठी जायला साधारण किती वेळ लागतो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

के के ट्रॅव्हल्स च्या बसेस असाय्च्या पूर्वी एअरपोर्ट वरून, अजुनही आहेत बहुदा, बघावं लागेल नेट वर.

के के तरी रीलायबल आहे, http://www.kktravels.com/

पण एकदम रात्र असल्यास एअरपोर्ट्वर थांबुन सकाळीच निघणे परवडेल. ते होम ड्रॉप देतात, त्यांना कॉल करुन कन्फर्म करा

केके ट्रॅव्हल बेस्ट आहे. त्यांचे ऑनलाइन रीझर्वेशन करता येते, पैसे मुंबईत गेल्यावर द्यायचे. माझ्या आईने वापरली ही सेवा २ महिन्यांपूर्वी, ती पण रात्री एकटीच गेली होती इथुन.
मुंबई विमानतळ मासळीबाजार वाटावा इतके जास्त भरलेले असते रात्री तेव्हा काळजी करू नका.

केके बेस्ट आहे मी एकटीच कित्येक वेळा जाते. तसच सँडी ट्रॅवल्सही चांगली सर्वीस आहे अस ऐकलय अनुभव नाही.

> सँडी ट्रॅवल्सही चांगली सर्वीस आहे अस ऐकलय अनुभव नाही.
केके चांगलं आहे. सँडीचीही सर्विस चांगली आहे. ६००/६५० घेतात...

झी, केके बेस्ट आहे. मी जून २०१० मधे गेले होते. त्यांच्या वेबसाईट्वर फोननंबर आहेत. तसचं मुंबई एअरपोर्ट्वर पण त्यांच्या एक दोन व्यक्ती सतत असतात. (त्यांचे ही फोन नं बुकींग करतेवेळी घ्या) माझी फ्लाईट उशीरा पोहचली होती, तरी पण ते लोकं वाट बघत होते.

मुंबई विमानतळ मासळीबाजार वाटावा इतके जास्त भरलेले असते रात्री तेव्हा काळजी करू नका.>> अगदी अगदी!

सँडीज आणि केके ट्रॅव्हल्स दोन्हीही चांगले आहेत. फरक :

सँडीजः रु.१०० नी महाग (केके पेक्षा)... दर ९० मिनीटानी एक गाडी, ०२०-२५४४२८०० (डहाणूकर कॉलनी ब्रँच)
केके: रु.१०० नी स्वस्त (सँडी पेक्षा)... दर ६० मिनीटानी एक गाडी ०२०-२४३६९१९९

नेटवरसुद्धा बुकिंग करता येतं. दोघांना फक्त फ्लाइटची वेळ सांगायची... बरोब्बर येतात आपल्या नावाचा बोर्ड घेऊन. एकदम घरपोच सेवा..

जाहिरात केल्यासारखं वाटेल, पण हा स्वानुभव आहे!

केके ट्रॅव्हल्सचा माझ्या आईला आणि सासू-सासर्‍यांनाही चांगला अनुभव आहे. फक्त त्यांची बस भरेपर्यंत थांबावं लागलं होतं आणि घरपोच सेवा असल्यामुळे एकेका एकेका घरी असं करत करत पोचायला जरा जास्त वेळ लागला होता. पण सोबत सामान वगैरे असेल तर हा मार्ग उत्तम.
शक्यतो रात्री, पहाटे लवकर प्रायव्हेट टॅक्सी करू नका. अगदी प्रीपेड असेल तरी. गेल्या वर्षी माझ्या मामाला प्रीपेड टॅक्सीवाल्याने एक्सप्रेस हायवेवर चाकूचा धाक दाखवून लुटलं होतं Sad (अमेरिकेच्या विमानातून उतरलायस, तेव्हा बॅगेतले डॉलर्स टाक - या भाषेत. घड्याळ, चेन, मोबाईल आधीच काढून घेतलं होतं!!)

स्वस्त पर्याय हवा असेल तर केके चांगला आहे. शेअरिन्ग मधे नेतात.
पुण्यातुन कोणी रिसिव्ह करायला येणार असेल तर स्वतंत्र वाहन पुण्यातुनच ठरवून घेऊन येणे चांगले.
पुणे - मुंबई - पुणे असेल तर मी काही व्यवस्था करू शकतो.

धन्यवाद सर्वांना !! पहिल्यांदाच एकटी जात असल्याने काहीच माहीती नाही. केके च्या वेबसाईट वर बघते . महेश लागलेच तर तुम्हाला कळवते. मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे (सिंहगड रोड) हे अंतर खरच दोन तास आहे का? मी सकाळीच प्रवास करीन.

केकेचा माझा अनुभव देखिल चांगला आहे.पूर्वी त्यांच्या बसेस असत, हल्ली कॉलिस वगैरे गाड्या असतात.३-४ जणांनाच घेतात.त्यामुळे थोडा वेळ वाचतो.सगळे लोकं एकाच भागातले असतील तर उत्तम नाहीतर पुण्यात आल्यावर जास्त वेळ जातो.
मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे (सिंहगड रोड) हे अंतर खरच दोन तास आहे का?>> नाही २ तास नक्कीच नाही.आत्तापर्यंतच्या केकेच्या अनुभववावरुन एक्सप्रेस वे वरुन कोथरुड पर्यंतच साडे तीन -चार होतातच.ह्यात एखादा चहाचा ब्रेक असतो.

सँडीज वापरली आहे, नेहमी रात्रीचाच प्रवास केलाय. अनुभव चांगला आहे.

सँडीज चं पण ऑनलाइन बुकिंग आहे .सँडीजच्या ऑफिसात जाउन बुकिंग केलं ( अ‍ॅडव्हांस पैसे दिले ) तर ६०० रू, ऑनलाइन बुकिंग करून गाडीत बसल्यावर पैसे दिले तर ७०० रू.

यापूर्वी केके चा प्रत्येक अनुभव नेहमी चांगला होता पण यावेळी जरा विचित्र अनुभव आला.

चार लोकांची क्वालिस भरायला एक तासापेक्षा जास्त लागला आणि तोवर एअरपोर्टच्या अंधार्‍या पार्किंगमध्ये डासांनी वैताग आणला. आम्ही दोघे कर्वेनगरला जाणारे होतो आणि एक तासांनी आलेले दोघे विमाननगरचे त्यामुळे डायवर वैतागला. त्याचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी त्याने फुल टू गुटखा पुड्या चालू केल्या.
मग फुड मॉलवर थांबल्यावर अर्धा तास होऊन गेला तरी निघायचे नाव घेईना. सगळे त्याच्यावर सॉलीड वैतागलेले बघून गुपचूप गाडीत येऊन गाडी चालवायला लागला.
पण काही केल्या पन्नासच्या पुढे स्पीड घेईना. विचारून पाहिले तरी काहीच बोलेना. मग तो नाद सोडून दिला कारण प्रचंड झोप येत होती. जाग आली तेव्हा गाडी एक्स्प्रेस हायवेवर साईडला उभी आणि डायवर गायब. गाडी बंद, सगळे लाईट्स बंद आणि बाजूने फुल स्पीडने गाड्या.
खाली उतरून बघितलं तर हा पुन्हा गाडीच्या मागे जाऊ पुड्या खातोय. मग सगळ्यांचाच तोल गेला आणि त्याच्यावर पट्टा सोडला. केके ऑफिसला फोन करून झाला पण काही उपयोग नाही.
मग दहा-पंधरा मिनिटांनी एक गाडी आली, त्यातल्या एका बाईला, तिच्याबरोबरच्या तिच्या झोपलेल्या छोट्या बाळाला आणि त्या बाईच्या वडील की सासर्‍यांना आमच्या गाडीत शिफ्ट केले आणि आम्हाला त्या आलेल्या गाडीत. त्या लोकांना कल्याणीनगर की कुठेसे जायचे होते आणि त्या नवीन आलेल्या गाडीला कोथरूडला.
म्हणजे ह्या स्वापिंगसाठी एवढी सगळी नाटकं केली त्याने.

आधी पाच सहा वेळचा केके चा अनुभव चांगला होता. एखादाच डायवर असा विचित्रपणा करत असावा.

केकेचीच असावी बहुतेक, माझ्या ओळखीचा एकजण देशात आला असताना त्यांच्या गाडीने पुण्यात चालला होता. चालक सारखा झोपत होता म्हणून बरेच अंतर यानेच गाडी चालवली.
मला स्वतःला सॅन्डीचा एकदा वाईट अनुभव आलेला, लवकरच सविस्तर लिहिन.

महेश हो, आम्हाला पण केके चा २ दा अतीशय वाईट अनुभव आलाय.
माझे आई बाबा ईथून परत देशात गेले, तेव्हा मुंबईवरुन पुण्याला जाण्यासाठी केके चे बूकींग केलेले (सकाळची गाडी).
तो चालक अगदी शाळकरी मुलगा वाटत होता. अतीशय अनसेफ ड्रायवींग करत होता. वर झोकांड्या गेल्यासारखा.क्वालीस मधल्या सगळ्यांनी त्याला गाडी ढाब्यावर थांबून त्याला जरा फ्रेश होऊन,चहा देऊन आराम घ्यायला सांगीतला.पण एकूणात प्रचंड वाईट ड्रायवींग. आणि पुर्ण प्रवास असा जीव मुठीत धरुन करावा लागला.
यानंतर केके कडे तक्रार केली पण काय थातुर मातुर उत्तरे मिळाली.

यानंतर पण माझ्या मैत्रीणीला पण असाच सिमिलर अनुभव आला.
तीने पुण्याहून मुंबई ला येण्यासाठी केके चे बूकींग केले दुपारचे.
त्या ड्रायव्हर ने तर दुसर्‍या एका गाडीबरोबर रेस लावल्याप्रमाणे गाडी पळवली.
गाडीमधले सगळे प्रवासी अक्षरशः भीतीने ओरडते होते. तरी तो चालक गुर्मीत तशीच गाडी हाकत पोचला हायवे संपेपर्यंत.

मी आणि माझा मित्र आम्ही जपानहून आलो होतो आणि सॅन्डीजचे बुकिन्ग करून ठेवले होते आधीच.
छोटी ट्रॅव्हलर गाडी होती. ड्रायव्हर कोणीतरी गावकरी असावा (शर्ट टोपी पायजमा)
माझा मित्र सर्वात पुढे त्याच्या शेजारी बसला होता आणि मी मित्राच्या मागच्या सिटवर.
बाकी अजुन ६ लोक होते. रात्री १२ च्या नंतर एअरपोर्ट वरून निघालो. सगळेच झोपेत होते.
मला जाग आली तर माझा मित्र त्या ड्रायव्हरशी जोरजोरात बोलत होता. कारण त्याने एक्स्प्रेस हायवेला न जाता जुन्या रोडने गाडी चालवली होती. आम्हाला म्हणे कंपनी टोलचे पैसे देत नाही.
मग माणशी ५०० कशाला घेतात देव जाणे ? नंतर वाद कमी झाल्यावर आमच्या लक्षात आले की तो अशक्य झोपत होता. माझ्या मित्राने त्याला एक दोनदा पाठीवर थोपटून जागे केले, कारण गाडी रस्ता सोडणार होती. मग सर्वांची झोप उडाली. लोणावळा जवळ आल्यावर गाडी थांबवायला लावली.
त्याला चहा घ्यायला लावला, तसेच पाहिजे तर तासभर झोप काढ असेही सांगितले. पण ठिक आहे म्हणून निघाला. मग पुण्यात शिरल्यावर एकेकाला सोडत न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या समोरच्या लेनमधे गाडी नेऊन उभी केली, म्हणे ऑफिसातुन पेट्रोलला पैसे घ्यायचे आहेत. असे म्हणून एका बिल्डीन्ग मधे जो गायब झाला तो अर्धा तास झाला येईचना. मग मी आत गेलो तर आत एका दुकानाचे शटर अर्धवट उघडून कोणाशी तरी झोपेत असलेल्या माणसाशी बोलत होता. मी जाऊन आवाज चढवल्यावर म्हणे मालक कोथरूड वरून निघाला आहे पैसे घेऊन. Angry
माझा मित्र चिडून रिक्षा करून निघून गेला. मला घरी पोचायला सात वाजून गेले.

केकेचा प्रॉब्लेम आला म्हणून मी सँडीजने येतो हल्ली.

प्रॉब्लेम : पुण्याहुन मुंबईला येताना तवेरा देतात. तिथुन परत येताना १९८० मधली एक डबडा बस असते, पांढर्‍या रंगाची.. अशक्य खडखडाट! त्यात जास्त लोक्स मावतात. मग काम धंदे नसल्यासारखं सगळे लोक्स येईपर्यंत थांबा.. Uhoh

सँडीज मुं->पु सुद्धा तवेराच्च देतात.. फार थांबायला लागलं नाही त्यामुळे..

मलाही केकेचा असाच वाईट अनुभव आहे. मी आणि नवरा जागे होतो म्हणून समोरच्या ट्रक ला धडकता धडकता वाचलो. ड्रायव्हर चक्क झोपला होता गाडी चालवताना. तेव्हापासुन केके ने जाणं सोडलं.

एक ' मेरु ' नावाची टॅक्सी / कार सर्वीस आहे. मुंबई ए. पो. ते पुण्याला घरापर्यंत सोडतात. खूपच रिलाएबल आहे. गुगल वर मेरु नावाखाली त्यांची माहिती/फोन नं. वगैरे मिळेल.

केके ट्रॅव्हलसचा धक्कादायक अनुभव मला आला २/३ महिन्यापुर्वी. मी तरि आयुष्यात पुन्हा त्यांची service घेणार नाहि. माझे दुपारि १ वाजता मुंबईहुन विमान होते लंडनला. सकाळी पाच वाजता मी गाडि बुक केली होती. ४:३० वाजता त्यानी सागितले की गाडि येउ शकत नाहि. घाटात अडकली आहे. सुदैवाने माझ्याकडे दुसरा ओळ्खिचा गाडिवाल्याचा नंबर होता तो यायला तयार झाला. नाहितर माझी फ्लाइट गेलिच असती.

थोडी चर्चा येथेही आहे
http://www.maayboli.com/node/22505

विंग्ज रेडिओ कैब वापरुन पहा!

पुण्यातल्या पुण्यात विन्ग्ज रेडिओ कॅब चांगली आहे. मेरू आपल्याकडे (पुणे/मुंबई) किती प्रमाणावर आहेत, सर्व्हिस चांगली आणि स्वस्त आहे का ते माहित नाही. जर अनुभव असतील तर शेअर करावेत.

मी आजपर्यंत बर्‍याचवेळा केकेनी गेलो आहे. कधीही वाइट अनुभव नाही. फेब्रुवारी २०११ मध्ये पुणे ते मुंबई साठी मी केके बूक केली होती. विमानतळावर जास्त वेळ घालवायला नको म्हणून मी थोडी उशीराची केके बूक केली. बुकिंग करतानाच त्यांनी सांगितले की वेळ थोडी रिस्की आहे म्हणून पण तुमच्या जबाबदारीवर बुकिंग करा. मला वेळ होत होता तरी ड्रायवरने कधीही गाडी फार जोरात नाही पळवली पण त्याने मला वेळेवर पोहोचवलं विमानतळावर.
सुयोगनं दिलेल्या लिंकवर ज्या अपघाताबद्द्ल लिहिले आहे त्या अपघातानंतर केकेवाल्यांनी सर्व ड्रायवर्सना ८० किमी प्रतितासपेक्षा जास्त वेगानं गाडी चालवायला बंदी घातली आहे जे मी स्वतः अनुभवलं आहे. शिवाय मी त्या अपघाताबद्दल केकेवाल्यांशी बोललो. त्यांनी सांगितले की केकेच्या ड्रायवरची काही चूक नव्हती. एका चढावरती (पुण्याजवळ एक्सप्रेस वे संपतो तिथं) एक ट्रक अचानक मागे येउ लागला. त्या ट्रकला मागचे दिवेही नव्हते(नेहमीप्रमाणे). त्यामुळे केकेच्या ड्रायवरला काहीही करता नही आले आणि तो ट्रक केकेच्या गाडीला धडकला.

मुंबईत नेहमी अशी सर्विस देणा-यांना एसटी महामंडळ, पोलीस, हायवेचे पोलीस आणि पुणे मनपाचे हप्ते हे भरून ही सेवा स्वस्तात आणि रोजच्या रोज चालवणं परवडत नाही असं या धंद्यातल्यांच म्हणणं आहे.

एक ट्रक अचानक मागे येउ लागला. त्यामुळे केकेच्या ड्रायवरला काहीही करता नही आले आणि तो ट्रक केकेच्या गाडीला धडकला. - कायच्या काहि logic. ह्याचा अर्थ तो ट्रक slow होता, मग KK च्या ड्रायवर ने गाडी slow करायला हवी होती.

इथे फक्त ट्रक, रिक्षा, गाडी यांची नावे /पाट्या सुचवली जातील.. हुकूमावरून Proud
'सद्गूरू तुमचा आशीर्वाद'
'नमस्कार तर चमत्कार'
'पळेल तो ससा'
'वळण आहे पुढे, सावकाश जाऊद्या गडे'
'चल बैठे स्टेअरिंग के पीछे'....

परवा मी विंग्सची सर्विस वापरली. ड्रायवर (नाव ईश्वर) चांगला होता, ८० च्या पुढे गाडी चालवत नव्हता, बर्‍यापैकी नियमही पाळत होता. बोलायलाही ठीक.

पण मी बुक करताना "मी आधी निघेन पण मला उगाच १००-१२० ने जाणारा ड्रायवर नको" म्हणून सांगितले होते. त्याचा परीणाम की काय माहीत नाही.

दुसरे म्हणजे छोट्या कार्सना (इंडिका वगैरे) मागच्या सीट्सवर बेल्ट्स सहसा नसतात. मी पुढेच बसलो Happy

विंग्स २००० रू. घेतात पुण्याहून सहार ला सोडायला.

ठाण्या- मुंबईमधून सुद्धा विमानतळावर जायचे असेल तरी मेरू, मेगा अश्या कुठल्याच कॅबमध्ये मागच्या सीटला बेल्ट नसतात. मला तरी अजून कधीच बेल्ट दिसलेले नाहीत. मी सुद्धा पुढेच बसतो... Happy

माझ्या मैत्रिणीने (तिच्या नव-याने) मुंबई पुणे अशी कारसेवा (अयोध्या नाही) सुरू केली आहे. त्याबद्दल इथं लिहीलं तर जाहीरात होईल का ती ?

अरे, पाहीलंच नव्हतं..
त्यांनी नेहा ट्रॅव्हल्स या नावाने सुरू केलेली सेवा... आता मात्र विंग्ज ट्रॅव्हल्सशी करार केलाय. विंग्जवाला पण मित्रच आहे. रेट जास्त लावतो, मात्र सेवा चांगली आहे त्याची.

कुणी recent अनुभव / माहीती share कराल का मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे टॅक्सी/बस सेवेची.

कॄपया http://www.punemumbaipune.com/aboutus.html ही सर्वीस टाळा. परफेक्ट कॅब्स असे नाव आहे. अत्यंत टुकार..फार मनस्ताप दिला आहे.. भयंकर ड्रायवर आणि नियोजनशून्य, उद्धट स्टाफ..

मी नेहमी (ऑफिसची गाडी नसल्यास) केके ट्रॅवलने मुंबई एअर्पोर्ट-पुणे जातो-येतो. रात्री २ नंतरही प्रवास केलाय. ८० च्या वर वेग नाही हे सत्य आहे. आता पर्यंत तरी खुप चांगला अनुभव आलाय.

ठाण्याहुन एअर्पोर्टला जाताना मेरु, एझी कॅब, टॅब हे योग्य पर्याय आहेत ना? पुढच्या आठवड्यात गरज लागणार आहे.

टॅब सर्वात नवीन आणि उत्तम आहे... मेगा कॅब देखील चांगली आहे.
मेरुचा दर्जा हल्ली उतरल्यासारखा वाटतोय..

धन्यवाद मंजूडी आणि सेनापती, खुप आभार...जरा कन्फ्युज होते ह्या बाबतीत. मेरुच्या सध्याच्या संपाच्या वेगवेगळ्या बातम्या वाचुन त्यांच्या वापराबाबत जरा साशंकच होते.

आज काल परदेशातून डायरेक्ट पुण्यापर्यंत विमान सेवा आहे ( बर्‍याच ठिकाणाहून ) . पुणेकरांनी शक्यतो या पर्यायाचा प्राधान्याने विचार करावा Happy . आजकाल मुंबईतून( विमान तळाहून ) पुण्याला जाणे म्हणजे द्रवीडी प्राणायाम झाला आहे. ( पुढे मागे पनवेलचे विमानतळ चालू झाले तर हा त्रास अर्ध्यावर येईल अशी आशा )
सायन - पनवेल मार्गाचा विस्तार चालू असल्याने जागोजगी रस्ताचे काम चालू आहे, प्रचंड ट्राफीक जाम, त्यात प्रवास करण्याचा योग महिना अखेरचा दिवस असल्यास उरण फाट्याजवळ कंटेनर्स च्या वाहतूकीमुळे रस्ता जाम तसेच अवजड वाहतूकील परवानगी रात्रीची असल्याने आणि परदेशातील विमाने यायची जायची वेळ ही साधारण रात्रीचीच असते.ट्राफीक जाम मधून सुटका नाही . तात्पर्य पुणे पर्यंतच्या प्रवासास ४ ते ५ तास ग्रूहीत धरावेत.

प्रतिसाद थोडा अवांतर असला तरी वास्तव हेच आहे.

अमोल केळकर

अमोल, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. पण माझ्या माहितीत फक्त लुफ्तांसा आणि कदाचित सिंगापूर च्या फ्लाईट्स आहेत. त्यातही बरेचसे बुकिंग एजंट्स ते कव्हर करतात की नाही माहीत नाही. इतर पर्याय आहेत का?

Pages