मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे जाण्यासाठी रिलायबल टॅक्सी/बस सेवा कुठली आहे?

Submitted by झी on 23 March, 2011 - 20:41

मी पहिल्यांदाच एकटी भारतात जाणार आहे. त्यात मुंबई -पुणे हा प्रवासही एकटीने करायचा आहे.कोणाला मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे जाण्यासाठी रिलायबल टॅक्सी/बस सेवा कुठली आहे हे माहीती आहे का? फ्लाईट मध्यरात्री पोचले तर सकाळ पर्यंत एअरपोर्ट वर थांबायचे का (एकटी आहे म्हणुन) की रात्रीच टॅक्सी /बस मिळते? आता मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे (सिंहगड रोड) जाण्यासाठी जायला साधारण किती वेळ लागतो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मध्यरात्री ओला/उबरने पुणे मुंबई एअरपोर्ट प्रवास करणे बायकांसाठी कितपत सुरक्षित आहे?>> नाही सुरक्षित. म्हणजे ड्रायवर चांगला भेटेलच. पण रात्रीचा एक्स्प्रेस हायवे प्रवास शक्यतो करू नये. अगदीच तसे इमर्जन्सी कारण असल्याशिवाय. मुंबईत उतर्ल्यावर एअर्पोर्ट वर किंवा जवळ हॉटेलात एक रात्र काढोन नेक्स्ट डे सकाळी पुणे प्रस्थान करावे. टॅक्सीचा काही इशू नाही. पण सांगता येत नाही. फारिनचे पब्लिक असल्यास डॉलर्स, आयफोन लॅपटोप मिळून लाख दीड लाख ऐवज सहज असतो. वाटमारी होउ शकते.

Pages