चॉकलेट केक - बदामाची पावडर घालून (फोटोसहित)

Submitted by सानी on 23 February, 2012 - 09:55

अतिशय चविष्ट, सोपा आणि हमखास यशस्वी चॉकलेट केक. मुख्य म्हणजे यात पीठ, मैदा वगैरे काहीही नाही. फक्त चॉकलेटची तोंडात विरघळणारी अशी छान चव येते. Happy

साहित्यः

बटर - २०० ग्रॅम
बिटर चॉकलेट (७०% कोको असलेलं)- २०० ग्रॅम
बदामाची पावडर - २०० ग्रॅम
साखर - २०० ग्रॅम
व्हॅनिला फ्लेवरची साखर - एक सॅशे (१५ ग्रॅम)
बेकींग पावडर - अर्धा सॅशे (७ ग्रॅम)
अंडी - ४
चिमुटभर मीठ

कृती:

एका भांड्यात पाणी उकळायला ठेवायचं, ते उकळलं, की दुसर्‍या एका छोट्या भांड्यात चॉकलेटचे छोटे तुकडे करुन ते भांडं त्या मोठ्या भांड्यात तरंगत ठेवायचं. अशाप्रकारच्या इन्डायरेक्ट हिटने चॉकलेट वितळलं, की ते चॉकलेट, बदाम पावडर, साखर, रुम टेम्परेचरवर असलेलं मऊ बटर आणि बाकी घटक एकत्र करुन केकबीटरने ३ मिनिट बीट करायचं. केकमोल्डमध्ये हे सगळं मिश्रण घालून प्री हिटेड ओव्हन मध्ये केक १६०° वर ४० मि. बेक करायचा.

टिपा:

१. चवीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करता येईल.
२. केकमध्ये बदामाचे छोटे काप चवीसाठी टाकता येतील.
३. मोल्डला बटरचा एक कोट करुन घ्यायचा- केक चिकटू नये म्हणून.
४. आवडत असल्यास जास्तीचं चॉकलेट आणून ते वरिल कृतीत दिल्याप्रमाणेच वितळवून त्याचं कोटींग केक करुन झाल्यानंतर थंड झाल्यावर केकभोवती करता येईल. त्याने अजूनच छान लागतो केक आणि अर्थात दिसतोही. Happy फोटोत दिसत असलेल्या केकचा तसा डार्क चॉकलेटी रंग त्या कोटींगमुळेच आला आहे.
५. ड्रायफ्रूट्सची सजावट करायची असल्यास ती कोटींग केल्या केल्या पटकन करावी. चॉकलेट फारच पटकन पुन्हा घट्ट होतं.

माहितीचा स्रोतः जर्मन मैत्रिण

Chocolate cake.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सानी
भारतात कधी येणारेस ? जर्मन बेकरी चालू होतीये. चीफ शेफची जागा खाली ठेवायला सांगू का ? हा केक जर्मन बेकरीत मस्टच आहे Happy

अगं त्या फोटोचं रिझोलूशन नीट नाहीये असं वाटलं मला. बरं परत टाकला बघ गं आता. Happy आणि ते शीर्षक जरा मोठं वाटलं होतं, म्हणून बदललं होतं.

थॅन्क्यू स्वाती Happy

किरण Happy Happy

थॅन्क्यू अल्पना, भुंगा Happy

भुंग्या, माझं नशीब किती थोर!!! तू त्या डेकोरेशनच्या शुगर स्टिक्स नाही मोजल्यास Lol

सानी, मस्तच आणि झटपट रेसिपी.... Happy

नक्की करुन बघणार....आणि लोकांना खिलवणार... Happy

नेक्स्ट टाईम पाकृ लिहीताना, पानाच्या उजवीकडे 'नवीन पाककृती' असा ऑप्शन आहे तो वापर, म्हणजे सोप जाईल Happy

अर्र्र्र्र्रे लाजो Happy खरंच की! पाहिलाच नाही तो ऑप्शन मी. तिथे किती व्यवस्थित सगळं क्रमवार आखून दिलंय. Happy थॅंक्यू सो मच गं. Happy

थॅंक्यू गं सायो. पाकृ लिहिण्याची पहिलीच वेळ, त्यामुळे बर्‍याच गोष्टी पहिल्यांदाच कळतायत तुम्हा सर्वांमुळे Happy

दिनेशदा, ७ वा नव्हता हो बड्डे कुणाचा. तेवढ्याच मेणबत्त्या शिल्लक होत्या. म्हणून तेवढ्याच लावल्यात. Lol

फुलपाखरु, सुलेखा, खुप खुप आभार्स. Happy

व्वा!! मस्तच्......सध्य केक्सची लाट आलेली दिसतीये...कालच एक केला ..आता हा आणखी सोपा म्हन्जे केलाच पाहिजे!!...धन्स सानी.

मस्त... पाकृ पण सोपी आहे.... शिवाय 'हमखास यशस्वी' म्हटलयं म्हणजे करून पहायला काहिच हरकत नाही. Happy
घरात बरीच chocolates शिल्लक आहेत, कशी संपवावीत ह प्रश्न होता. पाकृ टाकल्याबद्दल धन्यवाद!

केक मस्त दिसतोय! Happy

२००ग्रॅम बदाम,२००ग्रॅम बटर आणि २००ग्रॅम चॉकलेट .. डायटिंगवाल्यांनी इकडे येऊ नये झालं.. Proud

चिंगी Lol ते काही नाही....केक आपण कधीतरीच खातो ना? आणि बड्डेला वगैरे केलेल्या केकचा छोटासाच तुकडा आपल्या वाट्याला येत असल्याने बिनधास्त बनव आणि खा गो बाय. नको ते डाएट बिएटचे विचार करुस. Happy

सर्वांची मनापासून आभारी आहे लोक्स Happy

केक बनवला आणि यशस्वीरित्या जमला असेल तर तसे कळवायला आणि जमल्यास फोटो दाखवायल विसरु नका. Happy