म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ११ (लोला)

Submitted by संयोजक on 26 February, 2012 - 01:14

MMGG.jpg

चित्रसंच ३

मायबोली आयडी - लोला
पाल्याचे नाव - राहूल
वय - ८ वर्षे
गोष्टीचे नाव- फिलच्या साहसकथा- सोनेरी सायकल.

Rahul_Story_MBD_PIC_3.pdf (932 KB)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी गोष्ट!! गो राहुल!!
इंग्लिश कोडे काय मस्त आहे. Lol

बापरे, काय सॉलिड आहे ही गोष्ट. आव्हान काय, तंत्र काय, हे इतके शब्द येतात राहुलला ? आणि तेही लिहीता पण येते. कौतुक आहे तुम्हा सर्वांचेच. Happy

"Why can you trust numbers?"

"Because you can always count on them..."

Wow!!!! मस्तच रे राहुल! Happy मुलगा, ढग, सायकल आणि जंगलातला रस्ता या चार चित्रांवरुन चांगलीच सुरस कथा बनवलीस रे! कल्पक आहेस तू. अक्षर पण भारी. Happy लोला, तुझा लेक हुश्शार आहे गं. Happy

ढगाला शांत करायच तंत्र आणि राक्षसाला चकवण्याची हुशारी फिल कडून शिकायला हवी Lol
मस्त गोष्ट, शाब्बास राहुल Happy

धन्यवाद. गोष्ट आलेली बघून खूष झाला. मी हे संयोजकांना कळवले होते तेच इथे लिहीते.
--
संयोजक,

माझा आयडी - लोला
मुलाचे नाव - राहुल
वय - ८ (तो रविवारी २६ तारखेला ९ चा होईल. पण अजून झाला नाही म्हणून त्याने गोष्टीच्या पानावर ८ च लिहिले आहे. Happy )

चित्रसंच ३
मुलगा, ढग, सायकल (दुचाकी), जंगलातला रस्ता

त्याने कथा इंग्रजीतून लिहिली. मी भाषांतर करायला मदत केली. देवनागरीत टाईप करुन, प्रिन्ट काढून दिली. मग त्याने बघून लिहिली. त्याला फारशी अक्षरओळख नव्हती. या निमित्ताने थोडी झाली आणि शब्दांचे अर्थही कळाले.
धन्यवाद.

-लोला
---

माझाही 'केल्याने भाषांतर' उपक्रम झाला. Wink त्याने मराठी लिहिण्याचे काम खूप पेशन्सने केले आहे Lol म्हणून मुद्दाम गोष्ट लहान ठेवली. मूळ इंग्रजी कथा इथे देते.

Adventures of Phil - The Golden Bicycle.

Once upon a time there was a kid named Phil. One day Phil was digging a hole in his backyard. He found a map to a treasure, a golden bicycle. He knew the bicycle is there because he read about it in a true story. And there it was, the map!

When it was night time, he sneaked out to find the treasure. He started walking on the path in the map. His first challenge was to calm down an angry cloud. Phil knew a technique to calm things down and he used it on the cloud and it worked. He passed through. The next challenge he needed to follow a path through a dangerous jungle. Walking slowly as a boy could, a lamp appeared in front of him! He thought it was a trap but he still rubbed it and out came a genie! The point of the genie was to trick somebody into wishing total disaster. But Phil outsmarted him and focused on his journey.

Soon he found himself looking at a cave that possessed the golden bicycle. But he had to figure out a riddle and it was "why can you trust numbers?" and he guessed "because you can always count on them." He was correct. So he took the bicycle home and lived happily ever after.

The End.

त्याने कथा इंग्रजीतून लिहिली. मी भाषांतर करायला मदत केली. देवनागरीत टाईप करुन, प्रिन्ट काढून दिली. मग त्याने बघून लिहिली. त्याला फारशी अक्षरओळख नव्हती. या निमित्ताने थोडी झाली आणि शब्दांचे अर्थही कळाले.>>>>> हे महान काम केलय राहुलने! खुपच कौतुकास्पद!

राहुलचं भरपूर कौतुक. मराठी अक्षरं लिहायची सवय नसतानाही अक्षर खरंच चांगलंय आणि गोष्टही चांगली झालीये.

राहूलचे इन्ग्लिश सफाईदार आहे. भाषांतरही फार छान जमलंय, लोला. त्याला मराठी लिहायला जमत नसूनही त्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. याचा अर्थ, या वरवर सोप्या दिसणार्‍या गोष्टीमागे बरेच कष्ट घेतलेत राहूलने आणि त्याच्या आईने.

आणि हो! हॅपी बर्थ डे अ‍ॅन्ड मेनी मोअर हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, राहूल. Happy

मोठ्ठी शाब्बासकी राहुलला ! गोष्ट खूप आवडली. केवढी कल्पनाशक्ती लढवलीय आणि शेवटच्म कोडं तर भारीच. मराठी अक्षर फार सुंदर काढलंय Happy

मस्त Happy

इंग्लिश गोष्ट सांगण्याचे तंत्र मस्त आहे राहुलचे. मराठी अक्षरओळख नसतान एव्हढे व्यवस्थित लिहिले आहे म्हणजे कमाल वाटली. वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Rahul & Lola:
This is something wonderful. An eight year old boy writing with so much maturity!! His Marathi handwriting is so great. Sense of creation is really amazing. If you like, I will offer some tips to make the story still more interesting.
Satish uncle (Pradyumnasantu)

Happy Birthday Rahul . तुझी मराठीत लिहिलेली गोष्ट खूप आवडली Happy . असाच लिहित राहा Happy

Pages