पुरातन अवशेष - ओळख आणि चर्चा

Submitted by वरदा on 11 February, 2012 - 10:10

एवढ्यातल्या एवढ्यात दोन-तीन प्रचिंच्या बाफवर मंदिरांच्या, मूर्तींच्या अवशेषांबद्दल मला मत विचारण्यात आलं. प्रत्येक वेळा अशा शंका त्या बाफवरून माझ्यापर्यंत किंवा इतर तज्ज्ञांपर्यंत पोचतीलच असं नाही, म्हणून हा नवा बाफ.

ज्याला/ जिला एखाद्या प्राचीन/मध्ययुगीन अवशेषांबद्दल माहिती हवी असेल, त्यांनी इथे छोटं प्रचि किंवा त्याचा दुवा डकवावा (यात देऊळ, मूर्ती, शिल्प, नाणी, वीरगळ, शस्त्रास्त्रं, खापरं, लेख, स्थापत्याचे अवशेष असं काहीही येऊ शकतं).

मी सर्वज्ञ नक्कीच नाही. मला जेवढी शक्य आहे तेवढी माहिती मी देईनच, आणि जे मला येत नाही त्याची ओळख पटवणारी इतर लोकं इथे निश्चितच असतील. तेव्हा आपल्या सर्वांच्या (माझ्यासकट) ज्ञानात काहीनाकाही भर पडेलच! त्या निमित्ताने आपण आपल्या आसपास काय सांस्कृतिक वारसा आहे हे थोडंसं सजगपणे पाहू लागलो तरी वारसा संवर्धनाच्या दृष्टीने खूप महत्वाचं पाऊल पडेल..... शिवाय एका अत्यंत प्राथमिक पातळीवर, थोडंसं विस्कळित का होईना, पण अज्ञात अवशेषांचं एक डॉक्युमेंटेशन सुरू होईल अशी आशा आहे.

काही मराठीतून उपलब्ध असलेली बेसिक पुस्तके -
१. प्राचीन भारतीय मूर्तीशास्त्र (नी. पु. जोशी)
२. प्राचीन भारतीय कला (म. श्री. माटे)
३. पुराभिलेखविद्या (शोभना गोखल)
४. प्राचीन भारतीय नाणकशास्त्र (म. के. ढवळीकर)
५. महाराष्ट्र: इतिहास - प्राचीन काळ - स्थापत्य व कला (अ.प्र. जामखेडकर)
६. महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार (कल्पना रायरीकर व मंजिरी भालेराव)

यातील शेवटची दोन पुस्तके अलिकडची आहेत व सहजी उपलब्ध आहेत. पहिली चार ही महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने काढली होती. त्यातील नाणकशास्त्र व पुराभिलेखविद्या ही कॉन्टिनेन्टलने पुनर्प्रकाशित केली आहेत. बाकीची मिळणं जरा दुरापास्तच आहे.
आणखी लक्षात येतील तशी इथे यादी टाकेन. उद्देश असा की ज्यांना रस आहे त्यांना ती पुस्तके वाचून स्वतःच अनेक गोष्टी उलगडतील. Happy

त.टी.
१. खूप प्रचि आल्याने सर्व्हरवरील ताण वाढेल हे खरं आहे, पण जर वाहतं पान झालं तर डॉक्युमेन्टेशनच्या दृष्टीने अडचण येईल. यावर उपाय सुचवल्यास आभारी राहीन.

२. कृपया इथे हिंदू संस्कृती वि. मुस्लिम आक्रमक, जातीय व इतर सामाजिक भेदाभेद, स्वघोषित संस्कृतिरक्षक वि. स्वघोषित बुप्रावादी असे वाद घालू नयेत अशी नम्र विनंती. त्यासाठी इतर बाफांची रणांगणं झाली आहेतच. या बाफाची समिधा त्यात टाकू नये. त्यापेक्षा या उपक्रमात सहभागी झालात तर सांस्कृतिक वारसा संवर्धनाला थोडाफार का होईना हातभार लागेल.
तसेच मला इथे ताजमहाल आणी अशाच वास्तू हिंदू आहेत का आणखी काही यावर चर्चा नको आहे. ज्यांना अशा वादांत रस आहे त्यांनी कृपया नवा धागा उघडावा. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम धागा आहे. मी अजून सगळं वाचलं नाहीये, पण जसा जसा वेळ होईल तसं तसं वाचणार आहे.
मला एक वेगळाच प्रश्ण आहे.
तुमच्या या फिल्डमधे 'इमेज सर्च' ला एकूणच खूप महत्त्व असणार असा माझा अंदाज आहे. पूर्वी जेव्हा असे 'इमेज सर्च टुल्स' नव्हते तेव्हा पुस्तकातुन, छापील पेपर मधून, संदर्भग्रंथातून ही माहिती मिळवली जात असणार. हे 'लिटरेचर सर्च' महा कठिण काम असेल ना?
आता जेव्हा इंटरनेट्वर अनेक इमेज सर्च टूल्स उपलब्ध आहेत, तर खास तुमच्या रिसर्च साठी कोणी असे 'डेटाबेस' तयार केले आहेत का? नसतील तर कोणत्या संस्था त्यासाठी काही प्रयत्न करत आहेत का जेणेकरून संशोधनाचे काम थोडेतरी सोपे होईल?
मी इंटरनेटवर सहज कुतुहल म्हणून सर्च केलं तर काही डेटाबेस सापडले. असे भारतातल्या अभ्यासाकरता खास डेटाबेस आहेत का? असतील तर ते तुम्हा रिसर्चर्सना उपलब्ध आहेत का?

एकाद्या ग्रॅज्युएट स्टुडंट, किंवा पोस्टडॉक्टरेटचा हा 'रिसर्च चा विषय' होऊ शकेल. कॉप्युटर क्षेत्रातल्या कोणाशीतरी collaborate करुन असा database तयार करायचा. या दृष्टीनी काय काम झालं आहे का तुमच्या क्षेत्रात, खास करुन भारतात?

रार, महत्वाचा प्रश्न आहे. माझ्या माहितीप्रमाणे बंगलोरच्या मायक्रोसॉफ्ट रिसर्चच्या ऑफिस मधे (आणि बहुदा हैद्राबादच्या ओस्मानियामधे) काही काम सुरु आहे. नेमके दुवे शोधायचा प्रयत्न करीन (२ वर्षांपुर्वी त्यांच्या वार्षीक कार्यक्रमाला गेलो होतो तेंव्हाचे आठवते आहे).

भांडारकरमधे सुद्धा काहीतरी नक्कीच सुरु असणार (किंवा डेक्कनला ज्याबद्दल वरदा सांगेलच).

>>>> १) आपल्याकडे जी पूजेतली मुख्य मूर्ती असते ती नेहमी सुबक आणि तुळतुळीत पॉलिश केल्यासारखी दिसते. पण खांबावरच्या, बाहेरच्या बाजूच्या, भिंतीवरच्या ज्या मूर्ती असतात त्या सुबक असल्या तरी त्यावर पॉलिश केल्यासारखे दिसत नाही. माझी शंका अशी कि त्या मूळातच तशा असत कि त्यावर हवामानाचा परिणाम झाल्याने त्या तशा दिसतात. त्याकाळी त्यावर लेप वगैरे लावला होता आणि नंतर तो नष्ट झाला, असे झाले असेल का ? <<<<<
दिनेशभौ, तुमचा प्रश्न भन्नाटच आहे Happy पण आता अस बघा, हल्ली नै का ते वेगवेगळ्या फिल्म्स फेस्टिवल मधे किन्वा प्रत्यक्षात सिनेमातुन वगैरे, मुख्य नटनटी, गाण गात गात नृत्य वगैरे करताना दाखवितात, तर नीट बघितले तर लक्षात येते की, मुख्य नट-नटी यांची वेषभूषा/मेकप वगैरे सगळेच अन्य "समुह कलाकारांपेक्षा" वेगळे उठून दिसेल असे असते, तस्मातच, मुख्य पुजेची मूर्ति ही अगदी चकाचक्क पॉलिश वगैरे केलेली, हारतुरे घातलेली, षोडशोपचारे पूजा वगैरे केलेली असणार, तुलनेत बाकि समुहातील मूर्ति दुर्लक्षिणे वा त्यान्चे अस्तित्व निव्वळ शोभेच्या गरजेपोटि ठेवणे हा तर मानवी स्वभावच आहे ना! असो. मला मानवी स्वभावावर जायचे नाहीये, पण असते ते असेच असते, उत्सव मूर्तिला महत्व, बाकी सगळा फाफटपसारा! नै का?

वरदा, त्याचे वाचन झालय, पण मिळतो तो ढोबळ अर्थ मिळतो, शब्दशः मजकुर मिळाला नाहीये म्हणून विचारले.

लिंबुटिंबु, आत्ताच एका या विषयाशी संबंधित असलेल्या मैत्रिणीकडे चौकशी केली. तेव्हा किल्ल्यांवरचे बरेचसे शिलालेख वाचन झाले असले तरी प्रकाशित झालेले नाहीत असं कळलं. त्यातलेही जे पर्शियन आहेत त्याचं काहींचं वाचन प्रकाशित आहे. लोहगडवरच्या लेखाचं शब्द-बाय-शब्द वाचन प्रकाशित नाहीये असंही ती म्हणाली.
मुळात किल्ल्यावरील शिलालेख त्रोटक असतात. आणि काही माननीय अपवाद वगळता बहुतेक संशोधक हे राजकीय इतिहासात जास्त रस घेणारे असतात. त्यामुळे अशा त्रोटक शिलालेखांतून इतर काही माहिती असेल तर ती कदाचित त्यांच्या दृष्टीने फारशी महत्वाची नसावी. आणि बरेच वेळा कागदपत्रांतील किल्ल्यांविषयी माहिती असतेच उपलब्ध. अशीही काही कारणं हे लेख न प्रकाशित होण्यामागे असू शकतात!

जमल्यास ह्यातल्या काहींचा अर्थ हवाय.. Happy ह्याचे वचन झाले आहे का?
रतनवाडी येथील विखुरलेले अवशेष..

१.

२.

३.

४.

मलाही एक माहीती हवी आहे...

माझ्या वाचनात असे आले आहे की उत्तर कोकणातील शिलाहार राजांनी ठाणे आणी परीसरात १२ शिवमंदीरे बांधली जशी की अंबरनाथचे शिवमंदीर, ठाण्याचे कौपीनेश्वर, लोणाडचे शिवमंदीर आणी आटगांवचे शिवमंदिर... कोणाकडे उर्वरीत मंदिरांची नावे आहेत काय?

अजून एक - मी बर्‍याच विरगळांवर (वरती रोहनने दिलेल्या विरगळांवर पण) विरगळांच्या ३ भागांपैकी सर्वात वरच्या भागावर देवी पार्वती शिवलिंगाची पुजा करताना कोरलेली दिसते...विरगळ जर कोण्या विराची आठवण म्हणून बनवले जात असतील तर देवी पार्वतीची शिवपुजा दाखवण्याचे कारण काय असावे बरे?

तसेच विरगळ जर विरांच्या युद्धाची व विर जिथे युद्धात धारातिर्थी पडले तिथे ठेवले जात असतील तर आज जिथे विरगळ आढळतात तिथे कधी काळी युद्ध झाले असे मानावे काय?

हो लिंबू, पण हा फरक अगदी लक्षात येण्यासारखा असतो.
वरदा, इतके सुंदर, सुबक (म्हणजे डीटेल्समधे ) मूर्तीकाम करणारे कलाकार, शिलालेख तेवढे त्रोटक का ठेवत असावेत ? का एकंदरच दस्तावेज ठेवण्याकडे कल नव्हता ? एवढी प्रचंड बाहुबलीची मूर्ती, पण खाली केवळ दोन ओळी कोरलेल्या !
का त्यावेळी भाषाच अशी त्रोटक होती ? का त्या कलाकारांना, आश्रयदात्याला आपले नाव गुप्त ठेवायचे होते ?
का हे शिलालेख, त्या कलाकारांनी स्वतःच्या मर्जीने (म्हणजे परवानगी नसताना) आपली स्वाक्षरी म्हणून कोरले ?

वरदा, कार्बन डेटींग पद्धतीने किती अचूक तारीख मिळू शकते? म्हणजे विज्ञानात शिकल्याप्रमाणे त्या पद्धतीने अगदी तारीख महिना नाही तरी अचूक वर्ष कळले पाहिजे. पण काही कारणाने यात अडथळा येऊन अचूक वर्ष न कळता त्याचे दशकच कळू शकते असे होऊ शकते का?

कार्बन डेटींगसारखी खात्रीची प्रणाली असताना ताजमहालच्या वादावर कायमचा पडदा का टाकला जात नाही? (हा प्रश्न केवळ माझ्या उत्सुकतेपोटी विचारला आहे. उगाच कोणी राजकीय / धार्मिक वाद सुरु करू नयेत)

कार्बन डेटिंगने फक्त organic पदार्थांचे कालमापन करता येते. दगडाचे नाही. त्याच्या कालमापनातील तांत्रिक बाबींसाठी http://en.wikipedia.org/wiki/Radiocarbon_dating हा दुवा बघा. सोप्प्या भाषेत विशद केलं आहे. किंवा http://www.c14dating.com या दुव्यावर आणखी तपशीलात माहिती आहे.

ताजमहाल कुठल्या काळातला आहे हा वाद फक्त पु. ना. ओक व त्यांच्यावर विश्वास असलेल्या लोकांच्यासाठी अस्तित्वात आहे. बाकी कुठल्याही पुरातत्वज्ञ वा इतिहासकारांसाठी तो 'वाद' अस्तित्वात नाहीये. कारण पु. ना. ओक यांना इतिहासाचे कुठलेही प्रशिक्षण नाही. ४ कागद संदर्भाविना उचलायचे आणि काहीतरी सनसनाटी विधानं करायची याला इतिहासलेखन म्हणत नाहीत. असो.

छान धागा..किती शिकण्यासारखे आहे तुम्हा सर्वांकडून.. Happy
माझ्याकडे इथे देण्यासारखे काही नाही Sad पण ह्या विषयात खूप रस आहे..

>>>>>माझ्या वाचनात असे आले आहे की उत्तर कोकणातील शिलाहार राजांनी ठाणे आणी परीसरात १२ शिवमंदीरे बांधली जशी की अंबरनाथचे शिवमंदीर, ठाण्याचे कौपीनेश्वर, लोणाडचे शिवमंदीर आणी आटगांवचे शिवमंदिर... कोणाकडे उर्वरीत मंदिरांची नावे आहे>>>>>स्वच्छंदी

डोंबिवली जवळ, खिडकाळी गावात एक पुरातन शिव मंदिर आहे...कदाचित ते हि या १२ शिव मंदिरांपैकी असू शकेल

वरदा,

पु.ना. ओकांचं सोडा. शहाजहानच्या कुठल्या दरबारी कागदपत्रात ताजमहाल बांधल्याची नोंद नाही. काम केव्हा सुरू झालं, केव्हा संपलं, किती पैसे लागले, किती मजूर खपत होते, इत्यादि माहिती मुघल पत्रांत कुठेही सापडत नाही.

आता पु. ना. ओकांकडे वळू. तुम्ही म्हणता की त्यांना इतिहासाचे प्रशिक्षण नव्हते. आता असं बघा की, ताजमहाल शहाजहानने बांधला हे तावर्निये नावाच्या एका फ्रेंच प्रवाश्याने लिहिले आहे. हा इसम बखरकार किंवा इतिहासकार नव्हता. तो एक जवाहिर्‍या होता. त्याला वास्तुशास्त्राचं कसलंही प्रशिक्षण नव्हतं. तरीपण भारत सरकारने त्याच्या अविश्वासार्ह नोंदीस का अधिकृत मानलंय?

आजून एक शंका : Archeological Survey of India या सरकारी संस्थेने ताजमहालाचं सर्वेक्षण केलंय का? माझ्या माहितीप्रमाणे केलेलं नाही. काय कारण असेल बरं? आपला काही अंदाज?

आ.न.,
-गा.पै.

गामापैलवान,
ताजमहालाची कुठल्याच कागदपत्रांत नोंद नाही, हे चूक आहे. सतराव्या शतकांतल्या अनेक कागदपत्रांमध्ये इसा खान, चिरंजी लाल, अमानत खान, मीर अब्दुल करीन या स्थापत्यविशारदांनी ताजमहाल बांधला अशी नोंद आहे. पुस्तकांची नावं वेळ मिळेल, तसं इथे लिहीन. भांडारकर संस्थेच्या ग्रंथालयात ही पुस्तकं उपलब्ध आहेत.

माझ्या संग्रहात कानेटकर नामक गृहस्थांनी १८७२ साली लिहिलेलं दिल्लीचं प्रवासवर्णन आहे. हे कानेटकर पुण्याचे असून अभियंता होते. या प्रवासवर्णनात दिल्लीचा इतिहासही दिला आहे. वर उल्लेखलेल्या इसा खानने ताजमहाल आणि लाल किल्ला या दोन्ही वास्तू बांधल्या, असा त्यात स्पष्ट उल्लेख आहे.

बाकी, पु. ना. ओकांनी २००० साली जी याचिका दाखल केली होती, ती भारताच्या सुप्रिम कोर्टानं कधीच रद्द केली आहे.

चिनूक्स, परस्पर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
अ‍ॅडमिनने बंदी घातलेल्या कुठल्याही आयडीबरोबर संभाषण साधण्यात मला रस नाही. आणि त्यांच्या नेहेमीच्या वादंगांचा मला अतिशय वीट आलेला असल्याने वरती हेडरमधे तळटीप होती ती परत एकदा सर्वांसाठी म्हणून वरती ठळक करतेय.

महाराष्ट्रात, देशात असंख्य पुरातन अवशेष धूळ खात दुरवस्थेत पडलेत. त्यांच्याकडे लक्ष देणे, त्यांच्या संवर्धनासाठी काही हातभार लावणे दूरच; पण नाही तिथे वेल-डॉक्युमेन्टेड आणि वेल-रीसर्च्ड अवशेषांवर फालतू वाद उकरून काढायला मंडळी एका पायावर तय्यार. असो.

धन्यवाद मुग्धा आणि रुणुझुणू Happy

हे मी काढलेले काही फोटो.

हे फोटो आहेत महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांत असलेल्या काही ग्रीक शिल्पांचे.

१. भाजे लेण्यातील पिगॅससची प्रतिमा (पंख असलेला घोडा)

२. भाजे लेणीतीलच सेंटोरचे शिल्प (अर्धे शरीर पशूचे आणि अर्धे मानवाचे)

३. नासिक लेणीतील (पांडवलेणी) ग्रीक उपदेवता अथेनाचे शिल्प (घुबड)

४. नासिक लेणीतील ग्रिफिन शिल्प (मुख गरुडाचे आणि धड पशूचे अशी याची रचना)

५. नासिक लेणीतीलच स्फिन्क्स प्रतिमा

वरदा,

उत्खनन, अवशेषांची ओळख यांची आधुनिक तंत्रे या बद्दल लिहीशील का? ती तंत्रे वापरून भारतात पुरातत्वीय उत्खनन फारसे झालेले नाही असा उल्लेख प्रा.ढवळीकरांनी त्यांच्या त्यांच्या 'कोणे एके काळी....' या पुस्तकात केला आहे. अर्थात पुस्तकाची प्रथम आवृत्ती २००० सालची आहे त्या नंतर बरेच काही घडले असेल.

ती नवीन तंत्रं आणि त्यांची findings याबद्दल माहिती कुठे मिळेल?

वरदा,

आपल्याला वाद उकरून काढायचे नाहीयेत तर पु.ना.ओकांचं नाव घेतलंत कशाला?
temp_01.JPG

मी केवळ पुरावा मागितलाय. द्यायचा नसेल तर आपली मर्जी!

प्रशासकांनी माझे सदस्यनाम गोठवले त्यास मायबोलीबाह्य कारणे आहेत (माझी त्याबद्दल तक्रार नाही). तशीच व्यवधाने आपल्यालाही सांभाळायची असतील असे गृहीत धरतो.

आ.न.,
-गा.पै.

पाटील. गेल्या शुक्रवारीच नरिमन पॉईंट येथे मुंबई मधील किल्ले ह्यावर एक कार्यक्रम होता. Happy

रुईया महाविद्यालयामधील इतिहासाचे प्राध्यापक (नाव लक्ष्यात नाही) यांच्याकडे माहिती मुळु शकेल.

चिनूक्स,

>> इसा खान, चिरंजी लाल, अमानत खान, मीर अब्दुल करीन या स्थापत्यविशारदांनी ताजमहाल बांधला
>> अशी नोंद आहे.

या बाफवर लेखिकेने (वरदा) जी तळटीप टाकली आहे त्यानुसार ताजमहालावर चर्चा करणे टाळतो आहे. तुम्हाला विपूमध्ये याचं उत्तर दिलंय.

आ.न.,
-गा.पै.

@ डोंगरवेडा.. मस्तच नाणेघाटाच्या जवळपास वाकाटकांच्या काळात एक महत्वाच नगर होत ज्यात यवन व्यापारी मोठ्य संख्येने होते. ज्यांन्नी बौद्ध लेण्यांना दाने दिली ... असे वाचून आहे... वरदा ह्यावर जर डिटेल मधे सांङू शकशील का?

@पेशवा: ते शहर म्हणजेच जुन्नर असावे. पण वाकाटकांच्या काळात जुन्नरचा उल्लेख फारसा वाचण्यात आलेला नाही. पण जुन्नर हे सातवाहनांची अगदी सुरुवातीची राजधानी असू शकते. सातवाहनांनंतर क्षत्रपांनी जुन्नर ही राजधानी केली.
शिवनेरी, जीवधन, हडसर, चावंड, निमगिरी हे सर्व किल्लेही त्याच काळातले.

सातवाहन आणि क्षत्रप राजवटींमध्ये यवन व्यापारी पुष्कळ प्रमाणात होते हे निर्विवाद. यवनांनी लेणी बांधकामासाठी दिलेल्या दानांचे कित्येक शिलालेख उपलब्ध आहेत.

त्या शहराचं नाव धेनुकाकट. ते नक्की कुठे होतं यावर तज्ज्ञांमधे वाद आहेत.

डोंगरवेडा, तुम्ही काढलेल्या फोटोंवर माहिती द्यायला मी त्यातल्याच तज्ज्ञ व्यक्तीला सांगेन. ती माबो सदस्य आहे पण फारशी अ‍ॅ़क्टिव्ह नसते.

@वरदा:
धेनुकाकट म्हणजे हल्लीचे डहाणू.. क्षत्रपांची राजधानी भडोचच्या आसपास होती असे मानले जाते, तसेच एकूण पश्चिम किनारपट्टीवरील क्षत्रपांचा एकंदरीत वावर बघता डहाणू हेच धेनुकाकट असणे हे तर्कसंगत आहे. आंध्रप्रदेशातील अजून एका शहराचे पूर्वीचे नावही धेनुकाकट अथवा धन्यकाकाकट असे आहे.

वरदा,
मुरुड जंजिर्याच्या आधी सहा किमी नांदगांव नावाचे गांव आहे, तिथे भटकत असताना माझा भाऊ विशाल याला काही पुरातन मुर्तींचे अवशेष दिसले. मी नंतर जाऊन ते पाहुन आलो. ही जागा तशी शेतातच आहे. पण अक्शि पासून रेवदंड्यापर्यंतच्या बहुतेक जुन्या देवळांसमोर तलाव आहेत. तसाच एक तलाव इथेही आहे. बाजुलाच असणार्‍या वडाच्या झाडाजवळ हे अवशेष वर्षानुवर्ष पडुन असल्याचे काही स्थानिक सांगतात. त्यातले बहुतेक अवषेश हे अर्धवट जमिनीत पुरलेले, तर काही झाडांव्या मुळात अडकलेले आहेत. तुटलेली भंगलेली शिवपिंडी, नंदी आहेत. नीट निरिक्षण केले असता जुना चौथराही दिसतो. मी काढलेले फोटो इथे टाकतोय, त्यावर प्रकाश टाकावा ही विनंती.

१. IMG_1190 MB.jpg

२.
IMG_1189 MB.jpg

३.
IMG_1191 MB.jpg

४.
IMG_1194 MB.jpg

५.
IMG_1215 MB.jpg

६.
IMG_1216 MB.jpg

७.
IMG_1218 MB.jpg

८.
IMG_1230 MB.jpg

आम्ही दोघे हे फोटो काढत असताना पाहुन तिथेल्या एका काकांनी आम्हाला अजुन एका जागेविषयी सांगितले.
या अवशेषांपासुन पुढे जवळ जवळ एक दिड किमी अंतरावर असलेल्या डोंगरावर त्याच्या जागेत काही वर्षांपुर्वी खोद्काम चालु असताना एक आयताकृती दगड मिळाला, त्यावर असलेले कलष आणि गायीचे शिल्प पाहुन हा काहितरीहावित्र दगड असावा अशी त्यांची समजूत झाली. त्यांनी तो दगड तिथेच एका जागी उभा केला. या दगडाचा आकार अंदाजे १ फूट रुंद आणि अडीच फुट उंच आहे. प्रथमदर्शनी पाहताना तो मला गद्धेगाळ वाटला पण यावर कोणताही शिलालेख नाहिये. त्याचाही फोटो इथे टाकतोय.

IMG_1358 MB.jpg

chariots of the gods by Eric Von Daniken

विचार करायला लावणारे पुस्तक

एकदा तरी वाचा

Pages