Submitted by निंबुडा on 14 February, 2012 - 03:53
आज ना सकाळी गंमतच झाली
सहज म्हणून आकाशात पाहिलं तर चक्क चंद्रकोर दिसली
मनात आलं, दिवसाढवळ्या चंद्रकोर कशी काय उगवली?
आणि मग अचानक आठवलं...
काल रात्री मनाच्या आकाशात काळोख पसरल्यानंतर
तुझ्या आठवणी चंद्र बनून आल्या होत्या
मनाचा कोपरान् कोपरा लख्ख उजळला होता
क्षणापूर्वीची काळी काळोखी माझी रात
मग प्रकाशाचं धुकं लपेटून बसली होती
तुझी एक एक आठवण मग मी चंद्राकडून मागून घेतली
एक एक आठवणीची एक एक चांदणी बनवून आकाशाला टिकल्या लावल्या
या नादात पूर्ण वाटोळा चंद्र कणाकणानं पाझरला
नि चंद्रकोर बनून गेला!
शीतल चांदण्याच्या ऊबदार दुलईत मग माझी पहाट झोपून गेली होती
सकाळ झाल्यावर चांदण्या झाल्या धूसर...
पण चंद्रकोर तशीच राहिली बहुतेक!
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
निंबे आज काय सगळ्या चांदण्या
निंबे आज काय सगळ्या चांदण्या - चंद्र माबोवर पसरवणार आहेस का
ही पण मस्तच ग
(No subject)
निंबे आज काय सगळ्या चांदण्या
निंबे आज काय सगळ्या चांदण्या - चंद्र माबोवर पसरवणार आहेस का >>
हा हा हा अगं व्हॅलेंटाईन डे स्पेशल गं
मोदकाचा चांदोबा झालाय
मोदकाचा चांदोबा झालाय
मोदकाचा चांदोबा झालाय >>
मोदकाचा चांदोबा झालाय >> तरीच माझी पुर्ण चंद्र ची कविता निंबीला आवडली होती
निंबे
ही पण अप्रतीम
ही पण अप्रतीम
छान.
छान.
कित्त्त्त्त्त्त्त्ती
कित्त्त्त्त्त्त्त्ती कित्त्त्ती सुंदर्......मस्त च
एक नंबर
लै म्हन्जे लै म्हन्जे लै अवडली
सुंदर काव्य.
सुंदर काव्य.
सुंदर!
सुंदर!
आवडली
आवडली