’हा भारत माझा’ चित्रपटाचा खास खेळ मायबोलीकरांसाठी!!!

Submitted by Admin-team on 9 February, 2012 - 23:53

ठिकाण - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI), लॉ कॉलेज रस्ता, पुणे

अधिक माहिती - सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ’हा भारत माझा’ या चित्रपटाचा खास खेळ मायबोलीकरांसाठी आयोजित केला आहे. या प्रसंगी दिग्दर्शक सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर व चित्रपटातले कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित राहून मायबोलीकरांशी संवाद साधणार आहेत. मायबोली.कॉम हे या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत.

Slide16.JPGभ्रष्टाचार म्हणजे काय, आणि गांधीटोपी घालून, मेणबत्त्या पेटवून, फेसबुकावर 'लाइक'चं बटन दाबून तो कमी होतो का, या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न म्हणजे सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांचा अण्णा हजार्‍यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेला 'हा भारत माझा' हा नवा चित्रपट.

अजिबात चुकवू नये, असा हा चित्रपट आहे. गोव्यातल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात या चित्रपटाचं प्रचंड कौतुक झालं होतं. पुण्याच्या दहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात या चित्रपताला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा व श्रीमती उत्तरा बावकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित व्हायला अजून काही महिन्यांचा अवकाश आहे. पण लवकरात लवकर हा अप्रतिम चित्रपट तुम्हां सर्वांपर्यंत पोहोचावा, व दिग्दर्शक, कलाकार यांच्याशी थेट गप्पा मारता याव्यात, म्हणून हा खास खेळ आयोजित केला आहे.

सर्व मायबोलीकर, त्यांचे आप्तस्वकीय आणि मित्र यांनी या खेळास उपस्थित राहावं, अशी विनंती.

कार्यक्रमाची रूपरेषा -
गुरुवार, दि. २३ फेब्रूवारी, २०१२.
संध्याकाळी ६.३५ ते ७.०० - कलाकारांची ओळख, सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर या चित्रपटाची पार्श्वभूमी सांगतील.
७.०० - ९.०० - चित्रपट (मध्यांतराविना)
९.०० - ९.३० - दिग्दर्शक व कलाकारांशी चर्चा.

(विशेष सूचना) - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर असल्यानं चित्रपट ठीक ७ वाजता सुरू होईल.

देणगी प्रवेशिका - रुपये पन्नास फक्त.

प्रवेशिका कुठे व कधी मिळतील, हे आम्ही लवकरच जाहीर करू. अधीक माहितीसाठी हा धागा पहा.

चित्रपटाचा खेळ आयोजित करण्याचा मायबोलीचा हा पहिलाच प्रयत्न आहे. या प्रयत्नास तुम्ही सगळे पाठिंबा द्याल, ही खात्री आहे.
गुरुवार हा कामाचा दिवस आहे, याची कल्पना आहे, पण अनेक पर्यायांचा विचार करून ही तारीख व वेळ ठरवण्यात आली आहे.

या चित्रपटासाठी आणि मायबोलीवरच्या प्रेमासाठी तुम्ही एक दिवस ऑफिसातून जरा लवकर निघावं, आणि चित्रपटाचा आनंद घ्यावा, ही विनंती . Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

वॉव, मस्तच.
मी नक्की येणार. पिफ मध्ये पहायचा राहिला होता. या चित्रपटाचे रिव्युज छान ऐकले होते.
मी वाटच पहात होते कधी थिएटर मध्ये येतोय ते.
धन्यवाद अ‍ॅडमिन टीम आणि माध्यम प्रायोजक.

>>> राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI), <<<
इथे नेमके कसे येता येईल? चतु:शृन्गीकडुन आलो तर कसे कसे यायचे? वनवे वगैरे कुठे आहेत? की चान्दणी चौकातुन खाली उतरुन पौडरोडवरुन येणे बरे पडेल?

nakki yenar!

लिंबु, चतु:श्रुंगीवरून सेनापती बापट रोडने सरळ सिंबायोसिस कॉलेजवरून लॉ कॉलेज रोड पकडायचा, वन वे कुठेही नाहीये अधेमधे , चांदणी चौक वगैरे करण्यापेक्षा हे जास्त सोयीचं आहे.

Pages