’हा भारत माझा’ चित्रपटाचा खास खेळ मायबोलीकरांसाठी!!!

Submitted by Admin-team on 9 February, 2012 - 23:53

ठिकाण - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI), लॉ कॉलेज रस्ता, पुणे

अधिक माहिती - सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ’हा भारत माझा’ या चित्रपटाचा खास खेळ मायबोलीकरांसाठी आयोजित केला आहे. या प्रसंगी दिग्दर्शक सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर व चित्रपटातले कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित राहून मायबोलीकरांशी संवाद साधणार आहेत. मायबोली.कॉम हे या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत.

Slide16.JPGभ्रष्टाचार म्हणजे काय, आणि गांधीटोपी घालून, मेणबत्त्या पेटवून, फेसबुकावर 'लाइक'चं बटन दाबून तो कमी होतो का, या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न म्हणजे सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांचा अण्णा हजार्‍यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेला 'हा भारत माझा' हा नवा चित्रपट.

अजिबात चुकवू नये, असा हा चित्रपट आहे. गोव्यातल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात या चित्रपटाचं प्रचंड कौतुक झालं होतं. पुण्याच्या दहाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात या चित्रपताला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा व श्रीमती उत्तरा बावकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित व्हायला अजून काही महिन्यांचा अवकाश आहे. पण लवकरात लवकर हा अप्रतिम चित्रपट तुम्हां सर्वांपर्यंत पोहोचावा, व दिग्दर्शक, कलाकार यांच्याशी थेट गप्पा मारता याव्यात, म्हणून हा खास खेळ आयोजित केला आहे.

सर्व मायबोलीकर, त्यांचे आप्तस्वकीय आणि मित्र यांनी या खेळास उपस्थित राहावं, अशी विनंती.

कार्यक्रमाची रूपरेषा -
गुरुवार, दि. २३ फेब्रूवारी, २०१२.
संध्याकाळी ६.३५ ते ७.०० - कलाकारांची ओळख, सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर या चित्रपटाची पार्श्वभूमी सांगतील.
७.०० - ९.०० - चित्रपट (मध्यांतराविना)
९.०० - ९.३० - दिग्दर्शक व कलाकारांशी चर्चा.

(विशेष सूचना) - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर असल्यानं चित्रपट ठीक ७ वाजता सुरू होईल.

देणगी प्रवेशिका - रुपये पन्नास फक्त.

प्रवेशिका कुठे व कधी मिळतील, हे आम्ही लवकरच जाहीर करू. अधीक माहितीसाठी हा धागा पहा.

चित्रपटाचा खेळ आयोजित करण्याचा मायबोलीचा हा पहिलाच प्रयत्न आहे. या प्रयत्नास तुम्ही सगळे पाठिंबा द्याल, ही खात्री आहे.
गुरुवार हा कामाचा दिवस आहे, याची कल्पना आहे, पण अनेक पर्यायांचा विचार करून ही तारीख व वेळ ठरवण्यात आली आहे.

या चित्रपटासाठी आणि मायबोलीवरच्या प्रेमासाठी तुम्ही एक दिवस ऑफिसातून जरा लवकर निघावं, आणि चित्रपटाचा आनंद घ्यावा, ही विनंती . Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढच्या वेळी शनिवार / रविवारचा असा काही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विचार झाला तर आम्हांलाही येता येईल Happy तेह्वा शक्य झाल्यास भविष्यात शनिवारी किंवा रविवारीही असा काही कार्यकम आयोजित करता आला तर पहावा, अशी विनंती.

शनिवारी किंवा रविवारीही असा काही कार्यकम आयोजित करता आला तर पहावा>> यावेळीही तोच प्रयत्न होता. पण एकंदर सभागृहांच्या उपलब्धतेनुसार शेवटी गुरूवार निवडावा लागला.

कृपया या चित्रपटाचा एक खेळ मुंबई/ठाण्यात जरूर आयोजित करावा. माबोकर त्यास नक्की भरभरून प्रतिसाद देतील अशी खात्री आहे. आम्ही मुंबईकर या शो पासून वंचित राहू नयेत म्हणून अ‍ॅडमिन ना ही विनंती, की आम्ही पुण्यात येऊ शकत नसल्याने, मुंबईत याचे आयोजन करावे.

मुग्धानंद,
जरूर. त्याने अगदी अवश्य बघावा असा हा चित्रपट आहे.
आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासाठीही तुम्ही प्रवेशिका घेऊ शकता.

आपल्याला किती प्रवेशिका हव्या आहेत, व त्या पुण्यात कुठल्या भागातून घेणं सोयिस्कर आहे, हे http://www.maayboli.com/node/32600 या धाग्यावर नोंदवलं, तर तशी सोय करण्याचा आम्ही प्रयत्न करू.

हा चित्रपट एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये बघण्याची संधी मिळाली होती. खुपच आवडला, अगदी "खराखुरा" चित्रपट आहे हा Happy शक्य असेल त्यांनी आवर्जून पहाच.
या दिवशी खुप मायबोलीकर भेटतील, त्यासाठी यायची खुप इच्छा आहे. पण मी आधी हा चित्रपट बघितला आहे, त्यामुळे एक सीट अडवायची नाहीये Happy पण मला त्याच्या नंतरच्या दिग्दर्शक व कलाकारांशी चर्चेला यायला जरूर आवडेल. प्रायोजक अशी काही परवानगी मिळेल का ? तिकिटं शिल्लक असतील तर तेही काढायची तयारी आहेच Happy फक्त ज्यांनी चित्रपट पाहिलेला नाही त्यांना आधी संधी मिळावी म्हणून ही विचारणा Happy

अवल,

पुन्हा एकदा बघा हा चित्रपट Happy यावेळी कुटुंबीयांनाही घेऊन या.. उद्या कोथरुडला तुम्हांला प्रवेशिका घेता येतील.

चांगला उपक्रम. नाही जमणार यायला. सध्या कामानिमित्त दुबईला आहे. नातेवाईक, मित्रमंडळींना नक्की कळवितो.

(विशेष सूचना) - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर असल्यानं चित्रपट ठीक ७ वाजता सुरू होईल. - हे आश्चर्य आणि आनंद आहे.

या चित्रपटाची सिडी/ डिव्हीडी उपलब्ध आहे का ? भारताबाहेरिल मराठी लोकांना हा चित्रपट कसा बघता येइल ?

शुभेच्छा !!!

विजय देशमुख,

या चित्रपटाची सीडी/डीव्हीडी अजून उपलब्ध नाही. पण येत्या काही महिन्यांत हा चित्रपट तुम्हांला आंतरजालावर बघता यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मायबोलीवर तुम्हांला त्याबद्दल माहिती वाचायला मिळेलच. Happy

’हा भारत माझा’ चित्रपटाचा खास खेळ मायबोलीकरांसाठी!!! हा धागा तुम्ही पाहिलाच असेल. पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (National Film Archives of India) येथे हा खेळ होणार आहे. मायबोलीच्या आतापर्यंतच्या वाटचालीत पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा खेळ मायबोलीकरांसाठी प्रदर्शित करत आहोत. चित्रपटाचे दिग्दर्शक, कलावंत तसेच अनेक मान्यवरांसोबत हा चित्रपट पाहण्याची संधी तुम्ही नक्कीच चुकवणार नाही याची खात्री आहे. तुम्ही स्वतः पुण्यात सध्या जरी नसलात तरी तुमच्या आप्तस्वकीय आणि मित्रमंडळीना जरूर कळवा.

प्रवेशिका वाटप :

शनिवार व रविवार - १८ व १९ फेब्रुवारी - संध्या. ५ - ८ - बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातल्या पारावर.

संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक -

चिनूक्स - ९९७०८ ४२४०५
अरभाट - ९८६०९ ८९३४२

२३ तारखेला राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इथे प्रवेशिका विक्री होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

कृपया या चित्रपटाचा एक खेळ मुंबई/ठाण्यात जरूर आयोजित करावा. अ‍ॅडमिन ना ही विनंती, की आम्ही पुण्यात येऊ शकत नसल्याने, मुंबईत याचे आयोजन करावे.

...

Pages