क्रूझचे अनुभव

Submitted by सुनिधी on 9 January, 2008 - 00:00

लोक हो, मला लवकरात लवकर मदत कराल का? आम्हाला alaska cruise वर july मधे ७ दिवस जायचे आहे. तर कोणाला अनुभव असेल तर प्लिज़ लिहा. मला ही माहिती हवी आहे.
१. कोणते cruise चांगले आहे? seattle पासून जाऊ का?
२. चांगले deals कुठे मिळतील
३. कोणता route चांगला असतो
४. काय टाळायला हवे
५. साधारण थंडी कशी असते तिथे july मधे
६. ते महाराजा,मसाला cruise वगैरे ने गेले तर चांगले आहेत का?
७. cruise वर कोणत्या मजल्यावर रूम घेऊ नये?
८. काय काय activities करता येतात?
९. शाकाहारी मिळेल का?
१०. अबब.. किती ते प्रश्न?????

alaska झपाट्याने फूल्ल होते, म्हणुन कोणाला कसलीही ऐकीव माहीती असेल तरी लिहा. गेला असाल तर उत्तमच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अलास्काची नाही पण करेबियनची क्रूझ केली आहे. माझ्या मते क्रुझ सारखा दुसरा सुखद सुट्टीचा अनुभव नाही. (परदेशात तरी).
१. आम्ही carnival ने गेलो होतो. चांगला, अनुभव नक्की परत जाईन.
६. मला तरी महाराजा, मसाला क्रुझ आवडणार नाही. सगळ्याप्रकारचे लोक असलेली जास्त आवडेल.
७. जितके वर तितके पैसे जास्त. ज्या खोल्यात अजिबात बाहेरचे दिसत नाही त्या स्वस्त असतात. पण त्यापेक्षा १ मजला वर, जिथे बाहेरचे दिसू लागते त्या थोडे जास्त पैसे पडले तरी घ्याव्या अशा मताचा मी आहे. पण खूप वरच्या घ्यायचीही आवश्यकता नाही. कारण तुम्ही फक्त झोपायचा वेळच खोलीत घालवता.
८. काय करता येत नाही ते विचारा. उलट जेवढे शक्य आहे ते करा (सगळे करणे वेळेअभावी शक्य होत नाही)
९. जेवण हा या प्रवासातला सगळ्यात आनंददायी अनुभव. बाकी कुठ्ल्याही सुट्टीवर गेलात की बाहेर जेवणाचा कंटाळा येतो तो इथे येत नाही कारण तुम्हाला हवे ते बनवून मिळते. २४ तास जेवण. आजकाल सगळ्या बोटीवर काम करणारे भरपूर भारतीय असतात. त्यामुळे शाकाहारीच काय पण हव्या त्या देशातले हव्या त्या प्रांतातले सगळे मिळते. आम्हाला तर मराठी वेटर मिळाला होता (प्रत्येक कुटुंबाला एक वेटर असतो तो सगळे मिळवून देतो). त्याला रोज संध्याकाळी शाकाहारी भारतीय जेवण सांगितले होते. त्यामुळे अगदी भरल्या वांग्याची भाजीही मिळाली. अर्थात सगळे पदार्थ मिळतिलच असे नाही कारण बोटीवर गोदामात ते शिल्लक असावे लागते. आधी हा माणूस बरीच वर्षे ताज हॉटेलात कामाला होता.

तुम्हाला हवे ते जेवण करून घालणे हा त्या त्या आचार्‍यासाठी साठी एक व्यावसायिक अभिमानाचा, आनंदाचा आणि प्रतिष्ठेचा भाग असतो. कारण दररोज त्याना मुख्यालयातून आलेल्या आदेशावरून तेच तेच पदार्थ करून घालावे लागतात. त्या ठराविक पाककृतींमधे त्याना स्वत:च्या मनाचा बदल करण्याचे स्वातंत्र्य नसते. त्यामुळे अशी काही खास मागणी केली (नुसती मागणी, हट्ट नाही) तर त्याना आपली सृजनशीलता पणाला लागली याचा कमालीचा आनंद होतो

आणि असे स्पेशल जेवण सांगितले म्हणून इतरांबरोबरचे मिळत नाही असे नाही. हवे असल्यास हे ही मिळते आणि तेही मिळते.
आपल्यालाच ते वाया जाऊ नये असे वाटते.

( Atlantic lobseter बरोबर भरली वांगी काय फर्मास लागतात म्हणून सांगू !)

pampering या शब्दाचा अनुभव घेण्यासाठी एकदा क्रुझवर जायला हवेच.

आणि ते बोट वगैरे लागेल अशी भिती बाळगायचे कारण नाही. कारण ते प्रकरण इतके मोठे असते(१२-१५ मजली) की १-२ तासानंतर आपण बोटीवर नसून एका भल्या मोठ्या हॉटेलात आहोत असे वाटू लागते. मुद्दाम समुद्राकडे बघितल्या शिवाय ती चालत आहे हे कळत नाही.

वेगवेगळ्या फळांचे रस फुकट असतात पण coke, pepsi अशा शीतपेयांना वेगळे पैसे पडतात. (रात्रीचे जेवण सोडून). आम्ही शीतपेये एरवीही कधी पीत नसल्यामुळे फरक पडला नाही. पण काही जण एकरकमी जास्त पैसे भरून अमर्याद शीतपेयांची सुविधा घेतात.

अजय, खूप चांगली आणि उत्साहवर्धक माहीती. चांगले deals कुठे मिळतील? AAA पहात आहे, अजून काही? खूप धन्यवाद.

Departure San Fransisco CA USA असणार्‍या Cruise ची कोणाला माहीती आहे का?. २ night cruise or 3 night cruise आहेत का?

अजय तुम्ही दिलेल्या माहितीचा उपयोग झाला. झक्किंनी पण भरपूर माहिती दिली होती ई-मेल वर. . आम्ही अलास्का ला जाऊन आलो. खूप मजा आली. थोड्या गोष्टी अपेक्षेपेक्षा वेग्ळ्या निघाल्या, जसे Holland America cruiseline वर भारतीय आचारी नाही त्यामुळे भारतीय्-शाकाहार मिळायला अडचण झाली. त्यानी प्रयत्न केला बनवायचा पण असफल. बोट जेमतेम अलास्काच्या दक्षिण टोकाला जाऊन येते, उत्तरेला फार जात नाही. पण हिमनग पहाणे फारच सूंदर!!! एकूणच अलास्का खूप स्वछ आणि सूंदर आहे. नुसते सर्वात वरील डेकवर बसून समूद्र पहाणे पण अप्रतीम!! आणि आराम तर इतका केलाय की बास.
बर्‍याच गोष्टी आहेत.. आम्ही पुन्हा cruise वर जाणारच. Royal Caribbian वर खूप भारतीय लोक कामाला आहेत आणि लहान मूलांसाठी पण खूप गोष्टी असतात म्हणे. . कोणाला जायचे तर त्यावर जावे.

नॉर्वेजियन चा कोणाला अनुभव आहे का? त्यांची डील्स चांगली आहेत.. पण इतकी स्वस्त असल्याने जरा शंका वाटत आहे.. Happy

मिळाला हा धागा ! Happy
आम्ही फ्लोरिडा वरून 'बहामाज' किंवा 'करेबियन' क्रुझ करायचं म्हणतोय. रॉयल करेबियन किंवा नॉर्वेजियन चा कुणाला काही अनुभव ?
अजय तुम्ही खूप चांगली माहिती दिली आहे. धन्यवाद ..
'कि वेस्ट' बद्दल कुणाचे काही अनुभव ? मिआमी ला साधारण एक दिवस पुरेल का..? (क्रुझ झाली कि बघायचा विचार आहे. )
आम्ही गुगल करतंच आहोत..कोणी प्रत्यक्ष जाऊन आलं असेल किंवा कुणाला काही अजून माहिती असेल तर प्लीज सांगा.

>>आम्ही फ्लोरिडा वरून 'बहामाज' किंवा 'करेबियन' क्रुझ
कॅरिबियन. बहामाजला क्रूज नको, तिथे जाऊन अ‍ॅटलांटिसमध्ये रहायचे. Happy
की वेस्टला काय? एक स्टॉप आहे का? चालेल.
>>मिआमी ला साधारण एक दिवस पुरेल का..?
नाही. Proud
>>रॉयल कॅरिबियन
चांगली आहे.

क्रूजवर रहाणे हाच यातला मुख्य भाग असतो त्यामुळे पोर्टवर फार काही बघता येईल अशी अपेक्षा ठेवू नका. त्यामुळे त्यांचे सर्वात मोठे, नवे जहाज जिथे जात असेल तिथे जायचे. Happy RC च्या Allure ने जा.

मला क्रुझचे काही अनुभव नाहीत पण पोर्ट किंवा समुद्रात राहणे किंवा समुद्राबद्दल काही शंका असतील तर सांगू शकीन.. Wink

लोला ,बिल्वा, सेनापती |थांक्यू ! Happy
कि-वेस्ट ला क्रुझ मधलाच एक दिवस आहे..(Nassau , CocoCay आणि कि-वेस्ट )
मिआमी ला पाहिलीच पाहिजेत अशी कोणती ठिकाणं आहेत ?

अरे हा धागा आधी पाहिलाच नव्हता !
आमचा रॉयल करेबियनचा अनुभव चांगला आहे एकदम ! अर्थात क्रुजचा तो एकमेवं अनुभव असल्याने बाकीच्यांशी तुलना करता येणार नाही.

Nassau , CocoCay आणि कि-वेस्ट >>>> तिनही ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स असतील ते करा जरूर. बाकी आता जाऊन पहायला फारसा वेळ नसतो आणि असला तरी तो क्रुजवरच घालवावा. Happy CocoCay बेट मस्त आहे. ते रॉयल वाल्यांचं स्वतःचं आहे वाटतं. कारण तिथे फक्त रॉयलच्या क्रुजवरचे लोकं असतात.

बाकी अजयच्या पोस्टला पूर्ण अनुमोदन. Happy

रॉयल कॅरेबियनची मायामीहुन निघणारी ४ रात्रींची बहामास क्रुझ मला आवडली (मी गेलो नाहीये.. रिसर्च करताना सापडली. जायचा विचार आहे). ३ पोर्ट कॉल्स आणी प्रत्येक ठिकाणी बराच वेळ दिलेला दिसतो. विशेषत: नॅसॉला रात्री बारा पर्यंत वेळ आहे. सगळी ठिकाणे जवळ जवळ आहेत आणी रोज पोर्ट कॉल्स त्यामुळे दिवसा शोअर एक्सर्जन्स आणी संध्याकाळी शिपवर अ‍ॅक्टिविटीज करता येतील.
http://www.royalcaribbean.com/findacruise/cruiseDetails/itinerary.do?pac... ही ती क्रुझ.

बाकी मायामी मला विशेष आवडले नाही. त्यापेक्षा की वेस्ट जास्त आवडले. मायामीजवळ १-२ अ‍ॅलिगेटर शोज दाखवणार्‍या पार्क्स आहेत त्या आवडल्या. स्वांपवरुन एअर बोट राईड कधी घेतली नसेल तर ती घ्या. मला खुप आवडली होती. http://gatorpark.com/

युरोप क्रुझचा कुणाला अनुभव आहे का? इटली, Mediterranean Islands ची माहिती मिळेल का इथे. >> तुम्ही बातम्या बघत नाही वाटतं. Happy

वर्षाविहार, उन्हाळी-हिवाळी-पावसाळी गटग ह्या धर्तीवर एक मायबोली स्पेशल क्रुझ यात्रा पण व्हायला हरकत नाही.

आम्ही पण कार्निव्हल ने गेलो होतो कॅरेबियन ला. अप्रतिम अनुभव.

pampering या शब्दाचा अनुभव घेण्यासाठी एकदा क्रुझवर जायला हवेच. <<<<

अजय, अगदी खरे. आम्हालाही भारतीय आचारी असल्याने रोज चविष्ट भारतीय जेवण मिळत असे.

बोटीच्या समोरच्या भागात डेकवर बसून गप्पा ठोकण्याचा आनंद वेगळाच. इतर अनेकही अविस्मरणीय गोष्टींची मजा क्रू़झवर घेता येते. अगदी स्विमिंग पूल पासून सगळ्या सोयी असतात. विशेष करून नजर जाईल तिथे दिसणार्‍या निळ्याभोर पाण्याचा देखावा म्हणजे एकदम मन शांतवून टाकणारा.
अलास्काचे माहीत नाही पण कॅरेबियन वर उन्हाळी कपडेच लागले होते.

मधुरिमा, +१, एकदा तरी कृझवर जायला हवे प्रत्येकाने. आम्ही गेल्या डिंसेंबर मधे किवेस्ट आणि कॉझुमेल मेक्सिकोला गेलेलो कार्निवल ने...खुप मजा आली.

- फोटोचे पॅकेज घ्या आणि भरपूर फोटो काढून घ्या. ते सगळे मिळतात. (सॉफ्ट कॉपीज)
- एक फॉर्मल नाईट असेल कॅप्ट्न्स डिनर च्या वेळी. तेव्हा भारतीय पारंपारिक कपडेही न्या.
- चांगली डील्स मिळतात पण हरिकेन सीजन निवडू नका.

>>बाकी मायामी मला विशेष आवडले नाही. त्यापेक्षा की वेस्ट जास्त आवडले.
अरेरे नात्या.. Proud
की वेस्ट्वरुन फोर्ट टॉर्टुगासची टूर असेल तर घ्या. पण पूर्ण दिवस जाईल.

गेल्या वर्षी कार्निवलची न्यूज वाचली ना? Wink
RC चांगली आहे. त्यांच्याही युरोपियन क्रूज आहेत. ओशियानिया आणि क्रिस्ट्ल या अजून काही युरोपियन. पण तिथे पहायला खूप काही असल्याने क्रूजने कितीसा वेळ मिळेल माहीत नाही. पण त्यांचे एक बरे आहे की ते एका पोर्टहून सुरु होतात आणि दुसर्‍याच पोर्टला सोडतात. ती दोन ठिकाणे बघता येऊ शकतात.

http://www.oceaniacruises.com/

http://www.crystalcruises.com/

बाकी मायामी मला विशेष आवडले नाही >>>> !!!! Happy

लालू, मायामी बद्दल एक फोटो फिचर लिही बरं !

मायामी कि वेस्ट दोन्ही मस्त आहेत ! दोन्हीकडे बाकी काही न बघता फक्त बीचवर डुंबत राहिलात तरी पैसे आणि वेळ वसूल! मायमीचं ते गेटर पार्क मस्त आहे एकदम. कि वेस्टला एक स्टेटपार्क आहे. तिथे थोडीशी फी आहे पण एकदच चांगला बीच आणि सगळ्या सोई आहेत.

आम्ही क्रुजवर भारतीय पदार्थ नाही खाल्ले. बाकीच्या इतक्या गोष्टी होत्या ट्राय करण्यासाठी!

फोटोचे पॅकेज घ्या आणि भरपूर फोटो काढून घ्या. ते सगळे मिळतात. (सॉफ्ट कॉपीज) >>> हो अगदी! ते प्रिंट करून पण ठेवतात तिथे. सगळे नाही घेतले तरी आपले बरे आलेले फोटो पहायला छान वाटतं. Proud

क्रुजवर 'फक्त मोठ्या माणसांसाठी' असलेले गेम क्वेस्ट्स वगैरे असतात. त्यांनाही जा नक्की. टिपी असतो एकदम.

अरे वा ! खूपच माहिती मिळाली कि ..सगळ्यांना खूप थान्क्स ! Happy
बहामाज ला वगेरे जायला ग्रीन कार्ड असेल तर काही विसा वगेरे लागत नाही हे माहित आहे..
मेक्सिको ची क्रुझ असेल तर लागतो का विसा ?
आम्ही गेल्या डिंसेंबर मधे किवेस्ट आणि कॉझुमेल मेक्सिकोला गेलेलो कार्निवल ने...खुप मजा आली. >>>> अमया तुम्हाला मेक्सिको साठी विसा लागला होता का?

आम्ही पूर्वी ग्रीन कार्ड असताना क्रूजने मेक्सिकोला गेलो होतो तेव्हा व्हिसा नाही लागला. आत्ताचे माहीत नाही.

- रुम अटेंडन्ट, वेटर इ. लोकांना टिप द्यावी लागते. कॅश देणार असाल तर जवळ ठेवा. टिप बिलात अ‍ॅड करता येते आणि त्याची प्रिन्टेड vouchers ते देतात ती पाकिटात घालून देता येतात.

- ५-७ नाईट्सच्या क्रूजला मोठा ग्रूप असेल तर मजा येते. आम्ही २ वर्षापूर्वी ४ फॅमिलीज मिळून गेलो होतो. आमच्या ग्रूपला एक शेफ, २ वेटर्स होते.

-काही स्पेशल ओकेजन असेल तर ते खास गोष्टी बनवतात. बर्थ्डे केक इ. अर्थात चार्ज पडेल.

- काही restaurantस कायम चालू असतात तिथेही डिनर घेऊ शकता. कारण डायनिंग हॉलमध्ये रोजचा लिमिटेड मेनू ठरलेला असतो त्यातून निवडावे लागते. त्याऐवजी एखादा दिवस लोक बाकी ठिकाणी जाऊन बफे जेवतात.

- लहान मुले, टीनएजर्स साठी RC वर भरपूर कार्यक्रम होते.

- जेवणाची(डिनर) वेळ साडेसहा किंवा साडेआठ असते. सोयीप्रमाणे घ्यायची. रात्री शोज असतात. ते रिपीट होतात त्यामुळे चुकला तर पुन्हा मिळू शकतो. वर परागने लिहिल्याप्रमाणे गेम्स इ. असतात.

- शोअर एक्स्कर्जन्सच्या वेळा बघून एक दोनच गोष्टी बुक कराव्यात. विशेषतः मेक्सिको इ. ठिकाणी ठरल्या वेळेपेक्षा उशीरा सुरु होणे, मग पुढचा कार्यक्रम रद्द होणे किंवा वेळ कमी मिळणे असे प्रकार होतात. सेफ गोष्टी कराव्यात, म्हणजे क्रूजलाईनच्या लिस्टमध्ये जी शोअर एक्स्कर्जन्स असतील शक्यतो तेवढीच.

कार्निवल चांगल आहे, फ्लोरिडावरोन सुटते ते बहामास वगैरे असते.

चांगली सरविस होती(७ वर्षापुर्वी) ( हो मी गेलेय ह्याची जाहिरात आहे) Proud

>>आम्ही पूर्वी ग्रीन कार्ड असताना क्रूजने मेक्सिकोला गेलो होतो तेव्हा व्हिसा नाही लागला. आत्ताचे माहीत नाही.>> आत्ताही लागत नाही. गेल्याच वर्षीचा अनुभव आहे.

@नात्या
>>>>युरोप क्रुझचा कुणाला अनुभव आहे का? इटली, Mediterranean Islands ची माहिती मिळेल का इथे. >> तुम्ही बातम्या बघत नाही वाटतं.
हो बघते ना. पण त्याने काही फरक पडला नाही आमच्या विचारात. Biggrin

@लोला. धन्स टीपस साठी.
>>>एक फॉर्मल नाईट असेल कॅप्ट्न्स डिनर च्या वेळी. तेव्हा भारतीय पारंपारिक कपडेही न्य>>>आमच्या एका मित्रानेही भारतीय पारंपरिक कपडे घातले होते त्या डिनर ला. कल्पना चांगली आहे. जेव्हा जाउ तेव्हा लक्षात ठेवू. Happy

नवीन जाणारे आणि जे आधी कर्निवलने गेले होते त्यांनी आता कार्निवलने जाऊ नका. धन्यवाद. Proud

फ्लोरिडातून सुटणार्‍या आणि पनामा कॅनालमधून चुकीच्या किनार्‍यावर नेऊन सोडणार्‍यापण आहेत.

युएसमधल्यांसाठी चांगला सीजन म्हणजे नोव्हेम्बर, डिसेम्बर. ख्रिसमज क्रूज असेल तर मध्यरात्री फीस्ट असते. सुंदर डेकोरेशन, मुलांसाठी कार्यक्रम इ. असतात. न्यू इयरलाही. कधी कोणी celebrity चे कार्यक्रम असतात. Taylor Swift होती त्या Allure वर.

धनश्री, २-३ फॉर्मल घेऊन जा. एक वेस्टर्न, एक भारतीय इ इ. आणि बदलून फोटो काढून घे. Wink

समाप्त.

मेक्सिको साठी विसा >> ( tourist, transit and business purposes only)
अमेरिकन ग्रीन कार्ड होल्डर तसेच अमेरिकन / ब्रिटीश/ युरोपियन/ कॅनडा पासपोर्ट धारकांना विसाची चिंता करायची गरज नाहीच.
तसेच नविन नियमांप्रमाणे भारतीय पासपोर्ट धारकांजवळ अमेरिकेचा कोणताही विसा असेल (h1/l1/h4/b1/visitor) तर त्यांना पण पोर्ट/विमानतळावरच विसा/परवानगी मिळतो. अमेरिकन विसा हा मल्टीपल एन्ट्री असावा लागतो तसेच इतर कोणत्याही विसा नियमानुसार पासपोर्ट आणि अमेरिकन विसा संपण्याची मुदत सहा महिन्याच्या आत नसावी.
मेक्सिकोच्या भारतातील कार्यालयाच्या संकेतस्थळावर ही माहिती आहे. काही महिन्यांपूर्वीच माझ्या वडीलांना घेउन मेक्सिकोला गेलो होतो. ते व्हिजिटर विसावर होते. त्यांना मेक्सिको मधे काहीही लागले नाही. कागदपत्रे पाहिली आणि शिक्का मारला.

आम्ही आत्तापर्यंत कधीच क्रूझवर गेलो नाहीयोत. आता जायचा विचार आहे. युकेहून सुटणार्‍या ( साऊथहॅम्प्टनहून बर्‍याच निघतात असे गुगलवर कळले पण बाकी कुठलीही पोर्ट्स चालतील ) चांगल्या क्रूझेसची माहिती कुणी देऊ शकेल का ? फक्त युके आणि स्कॉटलंडच्याच पोर्ट्सवर थांबणार असेल तर वेगळा व्हिसा लागेल का ?

आमचे मुख्य निकष :
१. निवांत पर्यटन करायचे आहे. किनार्‍यावर उतरुन काहीतरी ठिकाणं बघत फिरा ह्यापेक्षा क्रूझवर किती सोयी,सुविधा आहेत ते महत्वाचे.
२. फॅमिली फ्रेंडली क्रूझ हवी. मुलगा पाच वर्षांचा आहे. त्याला गुंतवून ठेवतील अशा अ‍ॅक्टिव्हिटीज पाहिजेत क्रूझवर. नाहीतर आम्हालाही एंजॉय करता येणार नाही Wink

Pages