घरखुळ (भाग २: बोध)

Submitted by योग on 20 May, 2008 - 14:23

त्या दिवसापासून दोघानी ठरवून टाकल की इतक्या इतक्या बजेट पेक्षा जास्तीच्या फंदात पडायचे नाही.
या घरसंशोधनातून बर्‍याच गोष्टी समोर येत होत्या. बहुतांशी मारवाडी बिल्डर्स हे क्वालिटी च्या बाबतीत जागरूक असतात. इमारत जितकी बाहेरून चान्गली दिसायला हवी तितकेच त्याचे interior ही चान्गले असावे असा एक त्यान्चा दृष्टीकोन असतो. जागेचा वापरही सुट्सुटीत केलेला असतो. बान्धकामात वापरला गेलेला दगड, मार्बल, कोटा, रंग, प्लास्टर, pvc fitting बरेचसे सर्व अगदी international std नुसार असते. बहुदा NRI आणि उच्चवर्गाला समोर ठेवून ही बान्धकामे केलेली आहेत असे दिसून येते.
एका नावाजलेल्या मारवाड्याकडे असाच अनुभव आला. इमारत अप्रतिम. कुठेही गिचमीड नाही, कोम्बाकोम्ब नाही, सर्वच चान्गले. इमारतीच्या गच्चीवर सौना, स्विमिंग पूल वगैरे खास आकर्षण. बिल्डर्-मालक स्वता हजर होते. "चार flat आहेत, बघून घ्या.. इथे नाही आवडला तर दुसरीकडे पण आपलच काम चालू आहे, तिकडे बघा.. मनासारख वाटल तर इथेच डील करू"...टीपिकल धन्द्याचे शब्द इव्हाना मलाही तोंडपाठ झाले होते.
मि फेरी मारून पुन्हा त्यान्च्या ऑफिस मधे आलो.
साहेब, झकास बान्धली आहेत इमारत, खूप आवडली..पण एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणायाची होती, राग मानू नका.. मि जरा चाचपडत बोललो.
काय झाल..? साहेबानी काळजीने विचारल.
काही नाही, swimmin pool च्या खाली changing room/maintenance room मधला बिम बरोबर बान्धला नाहीये.. अगदी मधोमद मोठी crack आहे, आणि slab देखिल यामूळे लवकर खराब होईल असे वाटते.. waterproofing मधेही गडबड आहे.. जरा पुन्हा बघून घ्या तुमच्या इन्जीनीयर कडून.
साहेबानी तडक फोन लावून इन्जीनीयर ला पाठवून पहाणी केली, दरम्यान मला बसवून घेतले..तो परत आला.. अन बिम च्या crack बद्दल सान्गितले.
त्या मालकाने तिथेच आमच्या समोर त्याला कान्द्यासारखा सोलला.. मलाच उगाच अपराधी वाटू लागल, म्हटल आपल्यामूळे बिचार्‍याची नोकरी जायला नको.
"जोशी साब माफ करो... ये छोकरा लोग देखता नहि है... पण तुम्ही सान्गितलत खूप आभार. उद्याच दुरुस्त करून घेतो." मग पुन्हा माझी व्यावसायीक वगैरे चौकशी केल्यावर, "चलो आपके लिये २% कम कर देता हू... Friday ला चान्गला मुहूर्त आहे, डिल करून टाकू." म्हणून साहेब मोकळे झाले.

हे डील नो डील प्रकरण एव्हाना चान्गलच माहीत झाल्यामूळे यावेळी चक्क मि, "ठीक आहे मागाहून फोन करतो मग भेटू" सान्गून तिथून पसार झालो.

इतके दिवस माझ्या बरोबर उमेशचिही ससेहोलपट चालू होती.. कुठे इमारत चान्गली तर बाजूला झोपडपट्टी, कुठे amenities चान्गल्या तर मूळ बान्धकामात कमी, कुठे बाजूचा मोकळा निसर्ग चान्गला तर चक्क डास अन किड्यान्चा त्रास, कुठे दुरून दिसणारे टोलेजन्ग टॉवर चान्गले पण जवळ जाताच अन्गावर येणार्‍या एकमेकास चिकटून बसलेल्या इमारती, कुठे सगळेच चान्गले असेल तर नेमकेच नको त्या प्रान्तातील शेजारी किव्वा समोरच्याच्या बेडरूम मधिल अन आपल्या किचन मधिल दृष्ये एकमेकास सहज दिसतील इतकी "जवळीक".. काहितरी कुठेतरी माशी शिंकतच होती. त्यातून मी जास्तच टेक्निकल अन्गाने तपासून बघत असल्याने मनासारखे काही पटेना. खर तर राहून राहून आश्चर्य वाटत होते, ज्या गोष्टी आपल्याला खटकतात तिथे बाकीचे लोक येवून कसे बुवा राहतात. म्हणजे अस बघा:
१. आता जरा traffic jam होतो इकडे पण उद्या नविन fly over बान्धणार आहेत.. (हा उद्या कधी उगवणार?)
२. पाठीमागे hospital आहे पण त्यान्ना आपला काही त्रास होणार नाही...(ते कसे काय..?)
३. ते डंपीन्ग ग्राऊंड आहे ना तिकडे पालिकेने ग्रीन झोन डिक्लेयर केलाय त्यामूळे आज ना उद्या तिथे ग्रीन पार्क होणार्..मग कचर्‍याचा वास येणार नाही.. (तोवर काय...? घरात दिवसभर भूतल पन्ड्या धूप अन केवडा, नागचंपा, चन्दन जाळत रहायचे काय....?)
४. सन्कुलातच मोठे देव-देवीचे मन्दीर आहे...(म्हणजे नवरात्रात दहा दिवस कानाचा ब्यान्जो होणार नाहितर दन्गल झालीच तर पहीला राडा आमच्या इथे होणार)
५. आपल्या संकुलाच्या बाजूला मस्त मोकळे मैदान आहे तिथे कुठलेही दुसरे बान्धकाम होणार नाही, तेव्हा कायम मोकळी हवा, भरपूर प्रकाश तुम्हाला मिळत राहील.. ("मस्त मोकळे मैदान" यातला मतीतार्थ मुंबईतील शेम्बड्या पोरालाही माहित असतो...)
६. सध्ध्या जरा मेन रस्त्याला जाताना crossing चा प्रॉब्लेम आहे पण पादचारी पूल बान्धायची परमिशन लवकरच मिळणार आहे.. (तोवर, अगदी वाणी सामान आणायला किव्वा पानपट्टी खायला बाहेर गेलेला इहलोकातून परलोकात कधी cross करेल याचा नेम नाही..)

आणि या गनगन्चुम्बी पसार्‍यापूढे रस्ते अन इतर नागरी सुविधा मात्र त्याच... घरान्च ठीक आहे लोक एकमेकाच्या डोक्यावर राहू शकतात, पण रस्त्याच काय? एकाच्या टपावर दुसरी गाडी? का पादचार्‍यान्नीही एकमेकांच्या अन्गा खान्द्यावरून चालायच? रोज दादरच्या western side च्या पूलावरून रानडे रोड कडे जाणार्‍या चाकरमान्यांची जशी किमान अपेक्षा एकच असते "जरा सुखाने चालू द्या"... अगदी तसेच.
एकीकडे प्रत्त्येक मजल्यानुसार वर जाणारी आर्थिक सुबत्ता, निर्देशांक अन दुसरीकडे पाय ठेवायलाही जागा नसलेली जमिनीवरील उदासीनता... इतकी विषमता फक्त एकाच शेवटाकडे नेवू शकते.. गगनचुम्बी स्मशान इमारत-"मोक्ष मंजिल". कारण जमिनीत पुरायला वा जाळायला "दो हात जमिन" तरी हवी ना!
"विसाव्या मजल्यावरून उडी मारून तरूणीची आत्महत्त्या" किव्वा "चंदनवाडीमधे शवावर अंत्यसंस्कार" या असल्या आताच्या मथळयाच्या जागी मग "गच्चीवरील स्विमिंग पूल बना मौत का कुवा", किव्वा "मोक्ष-मंजिल" मधे आपल्या वडीलान्च्या अंत्यसंस्काराला जाणार्‍या तरूणाचा "लिफ्ट मधे अडकून गूढ मृत्त्यू"वगैरे वाचायला मिळेल..

अशा एक ना अनेक गोष्टीन्मूळे एकन्दरीत शहरातील टॉवर मधे रहायचे म्हणजे केवळ "जय हनुमान" म्हणून आकाशमार्गे जाता येत असेल तर ठीक अन्यथा "हे राम" म्हणत थेट अकाली मोक्षप्राप्तीचे चान्सेस जास्ती. कई़क लाखांचे कर्ज डोक्यावर चढवून नेहेमीच्या जगदीश पानवाल्याकडे पानपट्टी खायला निघालेला असा क्षणात cross over होतो - जगदीशा हा तुझा कुठला न्याय?

समर्थ म्हणतात " थाम्बला तो सम्पला". तेव्हा मुंबईचा शांघाय, सिंगापूर होईपर्यंत थाम्बायची आमची तरी तयारी नाही मग पर्याय शोधणे आलेच.. ("हे विश्वची माझे घर" हेही बहुदा याच context मधे समर्थान्नी म्हटले असावे! )

माझी ही तगमग अन व्यथा त्या एका माऊलीलाच कळत असते. त्यावर "तुला आता "तिकडच्या" रहाणीमानाची सवय झाली आहे, इथे आवडणार नाही... इतकच आहे तर मग एक स्वतंत्र बंगलाच बान्धायला हवा, मग सगळ मनासारख करता येईल... " घरचेच जेव्हा अशी परकीयत्वाची जाणीव करून देतात तेव्हा मि मनानेही परका होतो. "इकडचा का तिकडचा" हा मानसिक jet lagg मग पुढील बरेच महिने देशातून परत आल्यावर दिवस रात्र छळत राहतो.

स्वताच्या शहरातून असे तडीपार व्हायची वेळ आली तेव्हा "स्वताचा बंगला" या जुन्याच कल्पनेने मग पुन्हा एकदा उचल खाल्ली! problem एकच होता, मुम्बईत बन्गला म्हणजे दोनच: मुख्ख्यमंत्र्यान्चा "वर्षा" किव्वा बच्च्चन कुटुम्बीयान्चा "जलसा". बाकी बन्गले बान्धायला जागा उरलीच आहे कुठे?
पुण्यात अजूनही मुंबईच्या घराच्या अर्ध्या किमतीत बन्गला "येतो"या सर्वसाधारण निरागस कल्पनेला मी बळी पडलो, अन टॉवर नाही तर निदान एक मनासारखा बन्गला तरी या आशेने सुखावून गेलो. त्यातून देशवारीत खास पुण्यातील आप्त स्वकीयान्ची भेट अजून शिल्लक होतीच. मग काय, जाम भी है, शाम भी है, म्हणत माझ्या या नव्या अध्यायाला सुरुवात झाली...
आता पुण्यात जावून घर घेवूनच यायचे अशा निश्चयाचा महामेरू, पुण्यातील बहुत जनान्चा आधारू घेत हा गड जिंकायचे ठरवले...

काय हो मुंबईकर शेवटी "आमच्या" पुण्यातच बघणार ना घर.. बहिणीचा फोन वरून खास पुणेरी टोमणा..

परत एकदा या देशात "माझे" असे उरले काय? मी विचार करत होतो... घर मिळेपर्यंत या प्रश्णाचे उत्तर मिळणार नव्हते. ते काही नाही ठरवून टाकले, "चलो पुणे"!

(क्रमशा:)

गुलमोहर: 

घर पहावे बांधून!
'कथा बंगल्याची' लवकर येऊ द्या.

निखिल.

अतिशय सुन्दर कथा.... लेखन शैली छान आहे...

Chhan vatatay vachayala......................pudhacha bhag.........???

>>>घरचेच जेव्हा अशी परकीयत्वाची जाणीव करून देतात तेव्हा मि मनानेही परका होतो. "इकडचा का तिकडचा" हा मानसिक jet lagg मग पुढील बरेच महिने देशातून परत आल्यावर दिवस रात्र छळत राहतो.<<<

खरे आहे. छान लिहीले आहे.

बहुतांशी मारवाडी बिल्डर्स हे क्वालिटी च्या बाबतीत जागरूक असतात. इमारत जितकी बाहेरून चान्गली दिसायला हवी तितकेच त्याचे interior ही चान्गले असावे असा एक त्यान्चा दृष्टीकोन असतो. जागेचा वापरही सुट्सुटीत केलेला असतो. बान्धकामात वापरला गेलेला दगड, मार्बल, कोटा, रंग, प्लास्टर, pvc fitting बरेचसे सर्व अगदी international std नुसार असते. बहुदा NRI आणि उच्चवर्गाला समोर ठेवून ही बान्धकामे केलेली आहेत असे दिसून येते................

१००% अनुमोदन, मी प्रत्यक्ष ह्यातुन गेलो आहे, मारवाडी बिल्डर्स ची क्वालिटी खरोखर ऊत्तम असते.