घरखुळ (भाग १: शोध)

Submitted by योग on 19 May, 2008 - 14:38

घर पहावे बान्धून अन संसार पहावा करून्...ऐकले असेल ना? या वाक्यात दडलेला future continuos tense अनुभवला असाल तर मराठी भाषेची ही शब्द सम्पन्नता अधिक appreciate कराल. गम्मत म्हणजे या दोन पैकी एका गोष्टीत पडलात की दुसरी आपसूक गळ्यात पडते, मग जोडीच्या सोनसाखळीसारखे फक्त राज्य घेत रहायचे, अन तेही न सम्पणारे. Only relief is फारतर या साखळीत अजूनही न अडकलेल्या स्वच्छंदी जीवाना "आऊट" करायचे अन मग "आता कसे फसलात" म्हणून एक भेसूर आनन्द घ्यायचा. आपल्या फरफटीतही अशी छोटी छोटी सुखे मिळवण्याची ही Art Of Living आयुष्यच तुम्हाला शिकवत. जन्मभर हा कोर्स करायची फक्त तयारी हवी.

तर अलिकडील देशवारीत असेच एक राज्य माझ्या वाट्याला आले. तस देशवारी कामानिमित्त होती पण जातोच आहोत तर एक नविन घर निदान "बघावे" तरी असा मध्यम वर्गीय अधान्तरी कीडा डोक्यात आधीपासूनच वळवळत होता. नाही म्हणायला एकन्दर किमतीचा अन्दाज घेवून इथल्याच स्थानिक ब्यान्केतून गरज लागल्यास काही रकमेच कर्ज मन्जूर करून घेतल होत. आजकाल हे international banking मुळे शक्य झालय. त्यातूनही तुमची इथली(स्थानिक्/भारताबाहेरील) ब्यान्क भारतातही असेल तर मार्ग अधिकच सुकर आहे. खर तर मुम्बई पुणे असा रोजचा प्रवास करावा तितक्या सर्रास आजकाल लोक परदेशवार्‍या करत असतात, तरीही NRI या उपाधीमागे अनेक फायदे आहेत, त्यापैकीच एक म्हणजे अस एका आठवड्यात कर्ज मन्जूर करून घेण. आमच्या वडीलान्च्या काळी निव्वळ ब्यान्केच passbook येईपर्यंत एक आठवडा लागत असे. अनेक वर्षे ब्यान्केची इमाने इतबारे चाकरी करून निव्वृत्त झाले तेव्हा computerised passbook update and banking हा त्यान्च्या करियरचा हायपॉईंट होता..अजूनही आहे!

तर अशी प्राथमिक तयारी करून निघताना "हे राज्य तुला एकटयानेच घ्यायचे आहे मि हात धरायला सुदधा येवू शकणार नाही" अस बायकोने रागावूनच सान्गीतले असल्याने या खेळात काही चूक झाली तर आऊटही मीच होणार होतो हे पुरे ठावूक होते. एरवी तीला न विचारता surprise म्हणून माझ्या पसन्तीची आणलेली साडी किव्वा एखादा दागीना ती आवश्य वापरेल पण तीने बघितल्याशिवाय अस घर "घेवून" द्यायच म्हणजे सलमानच्या गाडीपूढे उपोशणाला बसून क्याटरीनाच्या स्थळाची बोलणी करण्याईतक रिस्की आहे.
तीचा रागही योग्य होता म्हणा, एकतर मी एकटा देशात जाणार, सर्वाना भेटणार, उपर जमलच तर घरही बघणार.. आणि ती इकडे एकटीच घर अन नोकरी सम्भाळणार.
मग "हे सर्व आपल्याच साठी करतो आहे ना राणी" असा हुकुमाचा एक्का लाडाने सोडल्यावर तीने मला हा डाव खेळायला सम्मती दिली.

तेव्हा अशी मानसिक, सम्पत्तिक अन इतर logistical तयारी करून एकदाचा देशात पोचलो. दरम्यानच्या काळात म्हणजे देशवारीच ठरल्यापासून घरच्याना जरा जमल तर काही नवी घरे, property ची जरा चौकशी करून ठेवा एव्हडा निरोप दिला होता. लेक येणार या उत्साहाने बहुदा आई बाबानी शक्य तितक्या सर्व नविन जागा बघून ठेवल्या होत्या. खर तर ज्या वयात त्यानी सकाळी कुठलिही चिन्ता न करता उठाव, मुला सुनेच्या हातचा मस्त गरम चहाचा घुटका घेत मनसोक्त सर्व वर्तमानपत्रे चाळावीत, सन्ध्याकाळी एक शहराचा फेर फटका करून यावा, नेहेमीच्या Retired कट्ट्यावर आपल्या मित्र मैत्रीणीन्शी गप्पा माराव्यात त्या वयात त्यान्ना हे काम सान्गतानाही जड झाल. पण परिस्थिती, वेळेच बन्धन हे सर्व समजावून घेवून त्यान्नी उलट सार शहर पालथ घालून याही वयात त्यान्च्या उत्साहाने मला आश्चर्यचकीत केल..या धावपळीत त्यान्च्या मदतीला होता उमेश, आमच्या ओळखीच्या कुटुम्बातील नुकताच कामाला लागलेला तरूण.

पहिले दोन दिवस कम्पनीच काम आटोपून तिसर्‍या दिवशीपासून उमेश बरोबर बाहेर पडायच ठरल होत. हा पठ्ठया सकाळी बरोबर आठ वाजता घरी हजर झाला..
"तुम्हा NRI ना सगळ वेळेवर लागत ना रे" बघ आलो..म्हणत समोर उभा राहिला. माझ्यापेक्षा माझ्या वेळेची जास्त काळजी करणारा उमेश मला त्या पहिल्याच भेटीत एकाच वाक्यात बरच काही शिकवून गेला. मग आम्च रोजच सकाळी अन सन्ध्याकाळि वेग वेगळ्या builders- sites वर चकरा सुरू झाल्या. उमेश माझ्यापेक्षा कितीतरी लहान. पण नुकत्याच graduate झालेल्या या मुलाने त्याच्या घरची परिस्थिती ओळखून त्याच्या full time नोकरी खेरीज हा side business सुर केला होता. पण काय जम बसवला होता पोराने.. जवळ जवळ पन्धरा वर्षे स्वता ईकडे या व्यवसायात असूनही मला जे जमू शकल नसत ते त्याने आत्मसात केल होत.."dealing(s) with the big names". आज शहराच्या या भागात जायचे आहे, इतक्या साईट्स आहेत, इतक्या इतक्या किमती वगैरे सर्व तो येताना एका कागदावर बरोबर घेवून यायचा. जर used housing असेल तर मालकला वेळ देवून बरोबर त्या ठिकाणि न्यायचा, नविन जागा असेल तर सर्व ठिकाणी घर "दाखवणार्‍या" साईट इन्जीनीयरस शी याची ओळख... प्रत्त्येक जागा, complex बद्दल बारीक सारीक माहिती आचमनाचे मन्त्र म्हटल्यागत त्याच्या तोन्डावर होती.. अगदी कितीही मोठा, वयाने senior builder असला तरी तितक्याच खूबीने अन आदबीने उमेश त्याच्याशी चक्क धन्द्याच्या गोष्टी करत असे.. "देखोना सर, ये जोशी साब अपना दोस्त है, NRI है, एक हफ्ते मे डील करके इनको वापस जाना है.. पैसे का वान्दा नही (पहिल्या वेळी त्याने हा dialogue मारला होता तेव्हा मी शक्य तितका "नरो वा कुन्जरोवा" चेहेरा करून बसलो होतो), लेकीन मनके मुताबीक मकान चाहीये"..उमेश केवळ दोन तीन वाक्यात समोरच्या builder ला deal करायला आमन्त्रण देत असे. केवळ त्या वाक्यावर, जाहिरातीत न दाखवलेली, किव्वा इतर ग्राहकान्ना माहित नसलेली रिकामी घरे मला जवळ जवळ सर्व buidlers ने दाखवली आहेत.
अर्थात यात उमेश च्या past record चा निश्चीतच मोठा वाटा असणार.
पण एक गोष्ट नक्की होती की या "घर बान्धा, घर विका, घर घ्या" या खुळापायी (बूम टाईम मधे) तुमचा खिसा भरलेला असेल तर बोली लावायला वा बोलणी करायला कुठलाही मोठा बिल्डर देखिल तयार असतो. फक्त एकच गोष्ट मह्त्वाची: आपल्याला काय हवे अन कितपत हवे हे अगदी मनात पक्के असायला हवे आणि या धन्द्याची भाषा येत नसेल तर तुमच्या बाजूने ते बोलू शकणारा त्यातला जाणकार, तुमचा हितचिन्तक (हे जास्त महत्वाचे) हवाच!
उमेश च्या रुपाने मला तो मिळाला अन या उमेदीच्या वयात उमेश ने केलेली धडपड, जिद्द, प्रामाणिकपणा याने माझ मन जिंकल. आम्च्या शहरात अनेक जागा बघितल्या, एकन्दरीत भारतात बान्धकाम व्यवसायात आलेला बूम टाईम गल्ली बोळातून, नाक्या नाक्यावर टोलेजन्ग इमारतीन्च्या रुपाने डोके वर करून समोर येत होता. प्रत्त्येक रस्त्यावर एक नविन टॉवर तर बाजूलाच जुन्या इमारती पाडून नविन बान्धकाम चालू असलेल दृष्य हे रोजचच.
हिरानन्दानी, वर्धमान, कनाकिया, इत्यादी मारवाडी, गुजराती, सिन्धी, अशा सर्व मोठ्या नावान्पासून ते चक्क दातार, नातू, जोशी अशा आपल्या मराठी नावान्पर्यन्त सर्व builders ची सन्कुले बघितली.. शहरात, शहरापासून दूर सर्व जागा पालथ्या घातल्या. पंचवीस वर्षे राहिले वाढलो त्या शहराचे इतके काने कोपरे मी आजतागायत फिरलो नसेन.. यात बरेच बरे वाईट गमतिशीर अनुभव आले...

सर्वच मोठ्या नामाकीत builders कडे मात्र सारखेच अनुभ आले. चटकदार रिसेप्शनीस्ट पासूनच त्यान्च्या चकाचॉन्द सन्कुलान्ची ओळख होत असे..पॉश साईट ऑफिस, गेल्या गेल्या बिसलेरी पाणि, ठन्डा गरम, अप्टूडेट पोशाखात असणारे साईट इन्जीनीयर्स, सन्कुलात फिरवणारी toyota van, गृहकर्ज देणार्‍या संस्थान्चे उपलब्ध फॉर्म्स, कधी कर्मचारी, NRI म्हटल्यावर मुद्दामून इन्ग्लीश मधे बोलणारा साईट स्टाफ आणि लग्नकार्याला घरी आलेल्या वर्‍हाडी मन्डळीन्ना जाताना लाडू चिवडा बान्धून द्यावा तसे प्रत्त्येकाला जाताना हातात रन्गीबेरन्गी brochures and pamplates. बाहेरूनच ही भरभराटीची कल्पना आली की टॉवर मधील जवळ जवळ सर्व वरच्या मजल्यावरचे फ्ल्याट एक दोन वर्षापूर्वीच बूक झालेले ऐकून एकन्दर आपल्या लोकान्कडे किती buying power आली आहे याचीही जाणीव झाली.
शहरापासून थोडे लाम्ब अशा एका सन्कुलात उमेश बरोबर गेलो. "सर सबसे उप्पर का terrace flat खाली है.. ये बिल्डर का खुदका flat hai.. तो आप बस देखके आओ, पसंद आ गया तो बैठेन्गे".. तिथल्या मेन एजन्ट ने सान्गितले. प्रत्त्येक नव्या इमारतीत असे दोन चार flat बिल्डर च्या स्वताच्या मालकीचे असतात्..मग ते कुठल्याही किमतीवर विकायची त्याला मुभा असते (म्हणे).
त्या विसाव्या मजल्यावरच्या टेरेस flat वर गेलो, अन बाल्कनीत उभे राहिलो तेव्हा क्षणभर एक स्वप्नच वाटून गेले.. शहराचा असा पूर्ण ३६० कोनातून view, एका बाजूला निळेशार डोन्गर, एका बाजूला एकमेकाशी स्पर्धा करू पाहणार्‍या इतर इमारती, सर्वान्गावर खेळणारा गार वारा, फुफ्फुसाची दारे ठोठावणारा शुद्ध ऑक्सीजन, डोळ्यान्च्या बाहुल्यान्ना लाजवणारा लक्ख उजेड, अन being on top of the world literally ही एक सुखद भावना.. रात्री दिवेलागणीनन्तर या घरातून काय रोजचीच दिव्यान्ची रोशणाई बघायला मिळेल या कल्पनेनेच भारावून गेलो.
"राणी ला हे घर खूपच आवडेल".. मनात विचार येवून गेला अन देशात येवून आज एक आठवडा उलटून गेल्याची बोचरी जाणिव झाली.
"साब कैसा लगा"...क्या view है ना"... त्या एजन्ट च्या प्रश्णाने मि भानावर आलो तरी तोही असाच माझ्या सारखा स्वपान्त बुडून गेलेला वाटला.. मि मनाशीच म्हटले यालाही वाटत असेल, की एक दिवस अशा घरात रहावे..पण तो दिवस येईपर्यन्त त्याच्या नशिबात अशी घरे इतराना फक्त दाखवायचे लिहीले होते.. प्रत्येक वेळी असे गिर्‍हाईकाशी बोलताना , मनातल्या त्याच्या राणीसोबत तो ते स्वप्न बघत असेल, अन मग पुन्हा एकदा ground वर आल्यावर आपल्या या स्वप्नान्चा बाईस्कोइप तो त्या दिवसापुरता बन्द करून ठेवत असेल.. अन एखाद्या बड्या असामीने ते घर घेतलच तर पुन्हा दुसर्‍या टोलेजंग इमारतीन्वर आपले इमले बान्धत असेल... Tough Life!! त्या विचाराने मलाच वाईट वाटले.
त्या दिवशी ते घर विकत घेण्याइतका बडा असामी मि नव्हतो(च) पण तरिही एकदा बघून घेवू या इच्छेपोटी लिफ्ट चालू नसताना वीस मजले चढून वर गेलो..तितकेच मजले उतरून खाली येताना मि हे घर विकत घ्यायचे तर किती पैसे (पेट्या?) लागतील याची मोजदाद करत होतो अन त्या मोजणीत ground floor ला येईपर्यन्त माझी स्वप्ने बर्‍याच प्रमाणात पुन्हा जमिनीवर आली होती..
गिर्‍हाईक एव्हडे मजले चढून वर गेल म्हणजे निश्चीत interested असणार याची जणू खात्री झाल्याने त्या एजन्ट ने बिल्डर च्या madam ना चक्क फोन करून खाली ऑफिस मधे बोलावूनही घेतल होत.
"साब बीस माला चढके उपर जानेवाला आप फर्स्ट है" अस म्हणून त्या एजन्ट ने माझ्या थकलेल्या पायांवर चक्क सोन्याचे अवजड साखळ्दन्ड बान्धल्यागत मला भास झाला.. आता हे घर विकत घेतले नाही तर बहुतेक माझा बैल करून घाण्याला जुम्पून उरलेल आयुष्य मला इथेच तेल काढायला ही बिल्डर ची म्याडम बान्धून ठेवेल की काय या शन्केने मि अजून अर्धमेला झालो. "राणी" ला घर आवडले नाही म्हणून कारण देवून या प्रसन्गातून पळून जाण्याची सोयही नव्हती. वरती terrace flat पेक्षा इथे खाली जमिनीवर मी राणीला जास्त मिस केले Happy
एव्हड्या मोठ्या बिल्डर च्या त्या एव्हड्या मोठ्या म्याडम ने हसत माझे स्वागत केले. खोलीत फक्त मि, उमेश, तो एजंट अन म्याडम. उमेशलाही या प्रसन्गाची अपेक्षा नव्हती.. त्या थन्ड ऑफिस मधेही माझ्या कानाच्या पाळ्या भाजलेल्या पॉपकॉर्न सारख्या तडतडल्या होत्या..
"कैसा लगा? How did you like it..?" तीच्या लिप्स्टिक ने माखलेल्या ओठान्मधून मन्द गोड आलेले ते शब्द थेट वर्मी लागले..
Its amaizing.. मि शक्य तितक्या थंड सुरात उत्तरलो.
वैसे २ १/२ crores है.. थोडा कम कर सकते है. white payment कितना है..? वैसे तो साहब (म्हणजे हीचा नवरा, बिल्डर) ७०/३० (black and white) dealing करते है.. लेकीन उमेश के पेहचान के है तो 50/50 करवा सकते है.. तीने दुसरा बाण सोडला. ही किम्मत माझ्या बजेट च्या खूपच बाहेरची होती.
आता प्रश्ण फक्त माझ्या NRI Status चा नव्हता, इथे उमेश च्या reputation चाही सवाल होता. NRI गिर्‍हाईक, दो हप्ते मे डिल करनेका, पैसे का वान्दा नही, मन मुताबीक मकान चाहीये..सर्व पुरावे माझ्या विरुद्ध होते, एक गळफास काय तो आवळायचा बाकी होता.
"बाई ग इथून मोकळे करायचे किती घेशील".. असा प्रश्ण अगदी तोन्डावर आला होता (राणी कुठे आहेस तू..? "मी वीस मजले चढून गेलो ही चूक केली का..?
मी माझाच हात धरून बसलो होतो.. पायान्नी केव्हाच "राम" म्हटला होता.)
म्याडम हे बघा तुमच नाव खूप आहे.. शिवाय उमेश ची ओळख आहे म्हणून आलो पण आता लगेच घर घ्यायच म्हटल तर I am not sure.. थोडा विचार करायला लागेल.
"अरे साब आपको पसन्द है तो लेलो ना, म्याडम कम करवाके देगा ना".. त्या दुसर्‍या एजन्ट ने आता अजून दबाव आणला.
देखो सर वैसे तो हम जब डील करते है तो सामने पार्टी चेक बूक लेकेही आता है.. अभी आपके पास पुरा नही है तो ठीक है, problem नही है लेकीन बस टोकन अमाऊन्ट देके डील करलो.. म्याडम ने पुन्हा एकदा मुद्द्याला हात घातला.
इकडे डोक्यात विचारान्नी थैमान घातल होत..आज इतकी मोठी investment करायची, उद्या आपला संसार, पुढे मुलान्च शिक्षण, घरी कुणि कधी कोण आजारी पडले तर खर्च, finanacial risk, मुम्बईत भविष्यात वर्तविलेली भूकंपाची शक्यता, कधी लिफ्ट, backup बन्द पडले तर घरच्याना वर ये जा करात येईल की नाही? एक ना अनेक प्रश्णान्ची भगदाडे मेन्दूत पडत होती पण नेमकी ऐन वेळी यातला अनुभव मदतीस धावून आला.
म्याडम राग मानू नका, पण स्पष्ट विचारतो, FSI, NOC सगळ आहे ना.? नाही तुमच्या नावाचा प्रश्णच नाही पण मि परदेशात परत जाईन तर उद्या इथे नसत्या भानगडी कोण निस्तरणार? घरी आई वडील आहेत त्यान्ना शक्य नाही.. मि आजपर्यंत कधी illegal dealing केलेल नाही.
यावर म्याडम चपापल्या... तो मगाचा एजंट ही आता चुळबुळ करू लागला..
तुम्ही कुठे काम करता..? तीने विचारले.
माझा गेल्या पन्धरा वर्षातील या व्यवसायातील अनुभव अन काही वर्षे भारतातील मोठ्या बिल्डर्स्कडे काम केल्याचे ऐकून म्याडम जरा नरमल्या.
I know आपके उधर सब legal होता है...लेकीन आप क्यू टेन्शन ले रहे हो.. साहब (बिल्डर) सब "म्यानेज"कर देन्गे.. अभी अठरा माले तक काही permission है, दो तीन महिने मे, पूरा बीस माले तक हो जायेगा.
या "सन्कटकाळातून बाहेर जाणेचा मार्ग" (भले मग ती बेस्ट बस मधील अर्धीच उघडलेली खिडकी का असेना) मला दिसला अन मि शक्य तितक्या नम्रतेने "sorry madam I can not take that risk... your house is really beautiful.. " म्हणून उठलो.
इतका वेळ या सर्व नाट्ट्यात जरा बावरलेला उमेशही मग उठला.."madam ये NRI है ना.. उनको ये सब पता नही है... आपना कोई इधरका customer होता तो डील हो जाता" म्हणत बाहेर निघाला.
तो दुसरा एजन्ट थोडा हिरमुसला... "अरे क्या साब, मै होता आपके जगा पे तो डील करता था.. ऐसा flat नही मिलेगा.. ये FSI, NOC सब हो जाता है.. अभी आज आप समझो २ करोड भी देता था तो उसमेसे तो एक दो लाख उधर municipal office मे देके मै NOC करवा देता.. ये देखो ये अठरा माले के उपर बाकी सब flat बिक गया है, सब families भी उधर रेहता है..."

नशिबाने उद्या ऐपत असली तरिही घेणार नाही...मि घरी जाताना उमेश शी बोलत होतो..पुन्हा असा प्रसंग येवू नये म्हणून काय करता येईल याची आमची चर्चा चालू होती.
(क्रमशा:)

गुलमोहर: 

७० काळा आणि ३० पांढरा ?? काळ्याचे प्रमाण एवढे असते हे खरंच माहिती नव्हते !!! हे अनुभव मात्र भन्नाटच असतील ना...

*** Veni, vidi, Visa. I came, I saw, I bought. ***

वेळेला धाउन आला बर् एफ एस आय
चान आहे

योग, ठाण्यात बघितलीस काय घरं? वर उल्लेखलेली सगळी नावं तिथे अस्तित्वात आहेत....... आणि मी सध्या अश्याच परीस्थितीतून जात आहे.

सगळ्या बिल्डर्सचे प्रॉब्लेम्स इथून तिथून सारखेच. आम्हीही हल्लीच ह्या अनुभवातून गेलोय.आणि जोवर घराचं पझेशन मिळत नाही तोवर जात रहाणार.

योग..... छान सुरवात केलीस रे..... तु़झ्या नेहेमीच्याच मिश्कील शैलीत वाचायला मज्जा आली.

ह्या सगळ्यातून गेल्यामुळे वाचायला मज्जा आली. पुढील भागाची वाट पहात आहे.