नको नटण्याचा खटाटोप आता

Submitted by A M I T on 31 January, 2012 - 00:31

सुप्रियाताईंच्या करू यातनांचा समारोप आता या नितांतसुंदर गझलेचं विडंबन

नको नटण्याचा खटाटोप आता..
बघ पावली लिपस्टिक लोप आता

तुला पाहता हेच शेजारी करतील,
दिसतेस बिंदु हा आरोप आता

लाटण्याच्या जुन्या जखमा रौद्र होता..
भीती वाटते बघ मला खुप आता

इरॉसी लागला म्हणे सिनेमा कोणता?
येईल टिव्हीवर चल झोप आता

हरभरे ना शिजले ना वटाणे कधीही..
माझ्यावरी झाला तुझा कोप आता

परवड किती बघ झाली या पोटाची !
आणि वर खातो बडीसोप आता...

कार्डात या आता पैसे ना उरले..
प्रिये खरेदी तुझी आटोप आता

* * *

http://kolaantudya.blogspot.com/

गुलमोहर: 

Rofl

अम्या ____________/\____________ Biggrin

आमट्या..टवळ्या!! :)...तुझ्या होणार्‍या बायकोला सगळ्या विडंबनांचे स्क्रीनशॉट पाठवणारे मी तुझ्या!! Proud

मजेशीर !!

Lol Lol :

मस्त Happy

मस्त