करु यातनांचा समारोप आता

Submitted by सुप्रिया जाधव. on 28 January, 2012 - 12:49

नको जाणण्याचा खटाटोप आता...
करु यातनांचा समारोप आता

तुला पाहता मी तुझी होत जाते...
जणू लाजही पावते लोप आता

नजर-कैद अथवा उमर-कैद होवो...
तुझे मान्य सारेच आरोप आता

सुन्या वर्तमानास गोंजारताना.....
तुझ्या आठवांचा घडे कोप आता

सुसंवाद कुठला?... विसंवाद नुसता !
कुशी पालटोनी उगा झोप आता

असे माळ खडकाळ झाले मनाचे....
फ़ुलावे कसे प्रीतिचे रोप आता ?

सख्या भेट ही शेवटाली ठरावी ...
तुझी सर्व दुख्खे मला सोप आता

नको डाव मांडू पुन्हा तू नव्याने...
'प्रिया' वेळ झाली ग!....आटोप आता

-सुप्रिया.

गुलमोहर: 

जमिन पार खडकाळ झाली मनाची...
प्रितीचे फ़ुलावे कसे रोप आता ?>>>>क्या बात है!मस्तच,सगळे.

तुला पाहता मी तुझी होत जाते>> मस्त शेर

प्रिया वेळ झाली ग आटोप आता >>>

'ग' या संबोधनरुपी अक्षराचा इतका सुंदर वापर आधी पाहिलेला नव्हता.

मना वादळा तू जरा थोप आता
>> संदिग्ध

तुझी दु:ख अवघी>> दु:ख लिहून अनेकवचन होणार नाही आणि दु:खे वृत्तात बसणार नाही. Sad तुझी सर्व दु:खे मला सोप आता हे बसेल. पहिली ओळ समजली नाही.

झोप शेरातही मजा आली, पहिली ओ़ळ जरा अधिक पंचिंग हवी होती असे वाटले.

शुभेच्छा

-'बेफिकीर'!

करु यातनांचा समारोप आता

नको डाव मांडू पुन्हा तू नव्याने...
'प्रिया' वेळ झाली ग!....आटोप आता

मस्तच!!

नको जाणण्याचा खटाटोप आता...
करु यातनांचा समारोप आता

तुला पाहता मी तुझी होत जाते...
जणू लाजही पावते लोप आता

सुंदर!!

सोपव अधिक समर्पक होतं पण ते वृत्तात बसत नाही. तसेच "थोप" हे बहुधा कायम प्रयोजक रूपामध्येच वापरले जाते (थोपवणे), त्यामुळे तेही जरा अडखळतंय..पण त्या शेरामधली कल्पना आवडली.

मक्ता सुंदर जमलाय! विशेषत: "आटोप आता" - अगदी आह्ह्ह!!

सुसंवाद कुठला?....प्रश्नातच विसंवाद असावा कळते.

शेवटाली..... शेवटची म्हणायचे आहे का?

बाकी बेफि'शी सहमत!!!

पु.ले.शु!

सगळ्यांचे शतशः आभार मंडळी!

बेफिजी....

<<<<<हे पाहिलेत का?>>>>>

ही गझल मी वाचली होती नि खूप आवडली होती नेहमी प्रमाणेच....

परंतु त्याही पूर्वी याच जमिनीतले (सुरवातीला शिकायला सोप्पे वृत्त असल्याने Happy ) २ शेर मला सुचलेले होते....

ते असे....

तुला पाहता का तुझी होत जाते...
नको जाणण्याचा खटाटोप आता

तुझी भेट ही शेवटाली ठरावी...
करु यातनांचा समारोप आता

काल सहज डायरी हाताळताना ते सापडले नि ही गझल जमून आली.....

तरीही गुस्ताखी मुऑफ सरजी...

लोभ असावा...

(हवालदिल)
-सुप्रिया.

अहो हवालदिल काय????

दोन्ही गझला अगदी एकाच जमीनीत असल्याने मलाही लिंक द्यावीशी वाटली इतकेच.

गझलेचे वृत्त, काफिये, बाकी जमीन, खयाल या कशावरही कोणाचाही काहीही अधिकार नाही. उलट फार बरे वाटले की त्या जमीनीत आणखी एक गझल झाली. (अवांतर - मला कृपया सर वगैरे संबोधने लावू नयेत. उगीच खडूने फळ्यावर अलामत शिकवल्यासारखे वाटते. हा हा)

अनेक शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

तुला पाहता का तुझी होत जाते...
नको जाणण्याचा खटाटोप आता>>>

व्वा, हा शेर तर अधिकच सुंदर आहे

गुणी माणसाला मुद्दाम कामावर घेतले जात नाही त्या पद्धतीने हा शेर वगळलात / बदललात का?:फिदी:

<<<<<गुणी माणसाला मुद्दाम कामावर घेतले जात नाही त्या पद्धतीने हा शेर वगळलात / बदललात का?>>>>>

खरयं खरयं!

पारखच नाही ना चांगल्या-वाईटाची....:-( Sad

असो!!!

मनःपुर्वक धन्यवाद!

<<<काय रागावलात की काय? गंमतीने म्हणालो.>>>>

नाही हो...खरच ब-याचदा चांगले शेर बदललले जातात माझ्याकडूनच Sad