माझ्या मायबोलीचं अभिमान गीत आणि मी - (जयश्री अंबासकर)

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 30 January, 2012 - 00:07

मायबोलीने शिर्षक गीत स्पर्धा आयोजित केली तेव्हा मला “मी आणि माझी मायबोली” ह्या स्पर्धेची आठवण झाली. ह्या स्पर्धेत मला मिळालेलं पहिलं बक्षिस आठवलं :)

http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/118058.html

http://www.maayboli.com/hitguj/messages/118369/marathi_audio_maayboli.html

उल्हास भिडेंना बक्षिस जाहीर झालं तेव्हा वाटलं........मायबोलीची दुसरी पिढी आपलं मनोगत व्यक्त करतेय. भावना त्याच.... फक्त शब्द थोडेसे वेगळे. मायबोली तीच फक्त तिचे चाहते वेगळे, व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आणि आता तर ह्या शब्दांना सूर, तालही मिळालाय. खूप खूप छान वाटलं.

योगची पहिली मेल आली तेव्हाच जाणवलं की काही तरी भन्नाट घडणार आहे आणि अगदी तस्संच घडलं. संपूर्ण जगभरातले मायबोलीकर आपल्या मायबोलीसाठी एकत्र आले आणि तिच्या प्रेमापोटी शब्द आणि सूरांच्या बंधनात कायमचे बांधल्या गेले आणि जन्माला आलं आपल्या मायबोलीचं शिर्षक गीत.

ह्या Global Project मधे सहभागी व्हावं असं मनापासून वाटलं आणि भाग घेताही आला. योगच्या अखंड आणि अथक परिश्रमामुळेच हे घडू शकलं असं माझं मत आहे. अर्थात अनेक जणांचा सहभाग त्यात आहे त्यामुळे प्रत्येकाचा वाटा त्यात आहेच. पण गाणं compose करणं, Music Arrangement करवून घेणं, प्रत्येकाला मेल टाकून उत्साही लोक गोळा करणं, त्यांच्या rehearsals घेणं, त्यांच्याकडून जे काय अपेक्षित होतं ते करवून घेणं हे सगळं योग ने जीवाच्या आकांताने केलंय. प्रत्येकाच्या rehearsal ची वेगळी Story असणार हे नक्की.

आता माझाच अध्याय सांगते........हो हो अध्यायच म्हणायला हवा !! एकतर यंदा मी कुवेतच्या महाराष्ट्र मंडळाची जनरल सेक्रेटरी असल्यामुळे प्रचंड बिझी होते. जेव्हा मायबोली गीत करायचं असं ठरलं तेव्हाच आमच्या वार्षिक संमेलनाची तयारी जोरात सुरु होती त्यामुळे मोकळा वेळ अजिबात नव्हता. दुबईत जाऊन रेकॉर्डींग करावं असं जेव्हा योग ने सुचवलं तेव्हा अक्षरश: पंख लावून दुबईत जाऊन यावं असं वाटलं. रेकॉर्डींग तर दूरच पण rehearsals करायला सुद्धा वेळ मिळत नव्हता. शेवटी कशीबशी एकदा आमची दोघांचीही वेळ जुळून आली आणि rehearsal झाली... अर्थातच स्काइपवर. मला स्वतःलाच गंमत वाटली. सगळंच आजकाल किती हायटेक झालंय ना....... !! गाण्याची प्रॅक्टीस..... मी कुवेतमधे आणि योग दुबईत. स्काईपवर योग मला शिकवतोय आणि माझ्याकडून गाऊन घेतोय...... मज्जा ना....... !! सगळंच वेगळं.......धम्माल !! प्रचंड एक्साईटमेंट होती. पहिल्या दिवशी योग ने त्याला अपेक्षित असलेल्या जागा, timing आणि बरंच काही सांगितलं आणि शिकवलं. मग एक आठवडा तयारी करुन रेकॉर्डींग कर असं सुचवलं. पुढच्या आठवड्यात जेव्हा स्काईप वर भेट ठरली नेमकी तेव्हापासून माझ्या फोनने जी मान टाकली ती आजतागायत वर उचललीच नाहीये. मग कसलं स्काईप आणि कसली practice ? खरं म्हणजे असं कुवेतमधे कधीच होत नाही. पण अजूनही भोग सुरुच आहेत. शेवटी मित्राकडून internet उधार घेतलं आणि योग शी संपर्क साधला. त्याने सुचवलेले बदल बर्‍यापैकी गळ्यावर चढले असावेत कारण त्याने रेकॉर्डींगची परवानगी दिली. Audacity मधे रेकॉर्डींग करायचं असं ठरलं. पण जाम घोळ झाला. माझ्या computer ने जी काही मनमानी केली त्याला तोड नाही. रेकॉर्डिंग करतांना फक्त आवाज न येता music सकटच रेकॉर्डींग होत होतं. तिकडे योग फोनवर ज्या काही सूचना करत होता त्याचं मी अगदी प्रामाणिकपणे पालन करत होते तरी काही केल्या रेकॉर्डींग होईना. असं करता करता दिवस संपत आला. तिकडे योगही थकला...... आता नवरा आणि लेक आल्यावर त्यांना विचारुन काही होतं का बघूया असं ठरलं. संध्याकाळी घरी आल्यावर नवरा आणि पिल्लु पण लागले कामाला......पण सेटींग काही जमलंच नाही. शेवटी योग ने सुचवल्याप्रमाणे iPod वर ट्रॅक ऐकून audacity वर रेकॉर्डींग करुन योगला Audio Clips पाठवल्या. त्यातल्या काही त्याने ओके केल्या. दुसर्‍या दिवशी त्याची मेल आली की त्यातल्या काही जरा बर्‍या आहेत. तेव्हा कुठे हुश्श झालं. इकडे आमच्या कार्यक्रमाचं सुद्धा बरंच रेकॉर्डींग करायचं होतं. त्यामुळे जर त्या दिवशी मी पाठवलेल्या Audio clips जर योगला आवडल्या नसत्या तर मात्र आणखी रेकॉर्डींग करणं फार कठीण होतं. पण “मायबोली-योग” बळकट होता म्हणायचा :) .

असेच प्रत्येकाची किस्से असतील. ते वाचायलाही आवडतील. खरं तर सगळ्यांसोबत स्टुडियो मधे रेकॉर्डिंग करायला मला पण आवडलं असतं. ती मज्जा मी मिसली. पुढच्या वेळी मात्र जातीने हजर राहण्याचा नक्की प्रयत्न करेन.

आता उत्सुकता आहे ती पूर्ण झालेलं मायबोलीगीत ऐकण्याची. इतक्या लोकांची मेहनत नक्कीच सफल होणार ह्याची मनापासून खात्री आहे. मायबोली एक मोठा परिवार आहे हे पुन्हा एकदा निश्चितपणे सिद्ध झालंय एवढं मात्र खरं.

योगची मात्र कमाल आहे. एक कडक सल्यूट बॉस :)

मायबोलीच्या पुढच्या अशाच अनेक प्रकल्पात भाग घ्यायला मनापासून आवडेल :)

ही माझी मायबोली ..........ही माझी मायबोली ..........!!

जयश्री अंबासकर (जयवी)

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:

झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक

संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई

ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जया,
मस्त लिहीलयस.. परत ते रेकॉर्डींग चे दिवस आठवले. घरी रेकॉर्डींग म्हणजे सोपे काम नाहीच. तू ते ठाम निश्चय करून जमवलेस त्याबद्दल धन्यवाद!

श्रीमंत पेशव्याना लिहिल्या प्रमाणे - 'स्काईप' वरुन मार्गदर्शन ठीक आहे... पण 'स्काईप' वरून 'सराव' आणी 'रेकॉर्डींग' हा सफल-उपद्व्याप माझ्या पचनी पडत नाही आहे... (माझ्याच स्वभावाचा दोष आहे...) असो...
पुढील कार्यक्रमां साठी हार्दीक शुभेच्छा...!!!... Happy

>>शक्य होईल तेव्हां 'स्टुडिओ रेकॉर्डींग' चा अनुभव घ्या.
जया अतीशयच विनम्र कॅरॅक्टर आहे. ती याही सूचनेला "धन्यवाद" म्हणेल. Happy

पण विवेक तुझ्या माहिती साठी तूर्तास एव्हडेच लिहीतो की त्या बाबतीत अनुभव असणारी/घेणारी जया ही मायबोलीवरील सर्वात पहिली व्यक्ती असावी.. तीच्याकडून मला, तुला व ईतर सर्वांनाच शिकण्यासारखे "लय" आहे...
बाकी स्काईप वरून निव्वळ सराव रे. रेकॉर्डींग लोकांनी त्यांच्या घरीच केले आहे.. जरा लेख (सर्वांचेच)नीट वाचून पहा ना राव! किती ती "स्टुडीयो" घाई.. Happy

योगेश...
सॉरी... मला कल्पना नव्हती, त्यामुळे 'आगाव'पणा घडला...

जयश्री...
आपल्याला देखिल 'सॉरी' म्हणतोय...

Happy

अरे मित्रा, मला कशाला सॉरी.. तुला माहिती असावी म्हणून लिहीलं होतं.. कारण त्यातून झाला तर तुला तुझ्या रेकॉर्डींग अभ्यासक्रमात फायदाच होईल!

जयश्री,
तुम्ही इतक्या व्यापातून वेळ काढून हे सगळं जमवलंत...... सलाम !

तुमच्यासारख्या ज्येष्ठ मायबोलीकरांचा या उपक्रमातला सहभाग
आमच्यासारख्या नवोदित मायबोलीकरांसाठी प्रेरणादायक आहे.
मायबोलीच्या दोन पिढ्या एकत्र आल्यात या उपक्रमामुळे.

“मिटवून अंतराला जोडून अंतरांना
ही स्नेहजाल विणते विश्वात मायबोली”
या ओळी प्रत्यक्ष साकारताना दिसताहेत…..
…… अविस्मरणीय आनंद.

गीतकार, संगीतकार आणि अ‍ॅडमिन वगैरे यांच्या कृपेने आजच शीर्षकगीत ऐकायला मिळाले. धन्यवाद.
अप्रतिम !!
काय करणार ... शब्दभांडार खूपच तोकडे पडते आहे आनंद वर्णन करायला. कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाहीये.
सर्व सहभागी कलावंतांचे हार्दिक अभिनंदन !! .. आणि योगला त्रिवार मुजरा. सितार, संतुर, बासरी, तबला वगैरे बरोबरच टाळ्या / चुटक्यां काय सही वापरल्या आहेत.

जयवी, 'मी आणि मायबोली' मधील तुमचा गोड आवाज खूप आवडला होता. ह्या गाण्यातही आवडलाच Happy
केवढ्या धावपळीतून जमवलंय सगळ्यांनी रेकॉर्डिंग आणि सराव ते आता सगळ्यांचे अनुभव वाचून कळतंय Happy

जयवी-खर तर प्रतिक्रिया द्यायला खुपच वेळ लावलाय मी . खरच मस्त लिहिलयत्.पण प्रत्येकाला आलेल्या वेगळ्यावेगळया प्रॉब्लेम मधुन वाट काढुन ज्या वेळी एक छान कलाक्रूती तयार होतेना तेव्हाचा आनन्द काही वेगळाच असतो नाहिका?

तहे दिल से शुक्रिया यारो Happy
आज संपूर्ण गीत ऐकतांना मजा वाटतेय. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन Happy

जयश्री,
या निमित्ताने तुमचं जुनं गीत ऐकायला मिळालं.... खूप छान आहे.
त्या गीतात दुसर्‍यांचं अस्तित्व घडवणं, अनेकांना ओळख निर्माण करून देणं हे मायबोलीचं कार्य
अगदी गोड शब्दात आणि गोड आवाजात ऐकलं. ’मायबोली’ला चेतनागुणोक्तीचा (personification)
सुंदर अलंकार चढवलाय तुम्ही त्या गीतात अणि निवेदनात.

छान लिहीलय Happy हा एकन्दरीत प्रोजेक्टच भन्नाट होता, त्यावरहि जरा माहिती येऊद्यात की Happy की येऊ घातलीये?
बर, ते अनिलभाई पण गाण म्हणलेत का? अरे व्वा! (मग झक्कीन्ना का नै गायला लावले? Wink )

>>हा एकन्दरीत प्रोजेक्टच भन्नाट होता, त्यावरहि जरा माहिती येऊद्यात की

लिंबूभाऊ,
देर से आये पर दुरूस्त आये.. Happy
या मुख्य धाग्यावरील सर्वांचे अनुभव वाचा.. त्यातून एकंदरीत प्रॉजेक्ट बद्दल माहिती मिळेलच.

देरसेच येणार ना Sad मी तिकडे मुन्जीच्या गडबडीत होतो! Proud मुन्ज उरकली अन आलो थेट इकडे

योग, अरे ते वाचतोच आहे म्हणुन तर कल्पना आली की हे रेकॉर्डीन्ग वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या वेळी झालय. पण मग ते एकत्र कस केल, मूळ कल्पना कुणाची, शब्द कुणाचे, चाल कुणाची, सन्गित/वाद्यमेळ कुणाचा, द्रव्य कितीक लागलं/कस उभ केल वगैरे सगळ तपशीलात येऊद्यात अस म्हणायचय मला. Happy
[अजुन दहा वर्षान्नी हीच माहिती महत्वपूर्ण ठरेल - सापडला रे भो, तुझा लेखही सापडला, तिथे आहे बरेच मटेरिअल, व्हेरी गुड्ड]

>>योग, अरे ते वाचतोच आहे म्हणुन तर कल्पना आली की हे रेकॉर्डीन्ग वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या वेळी झालय. पण मग ते एकत्र कस केल, मूळ कल्पना कुणाची, शब्द कुणाचे, चाल कुणाची, सन्गित/वाद्यमेळ कुणाचा, द्रव्य कितीक लागलं/कस उभ केल वगैरे सगळ तपशीलात येऊद्यात अस म्हणायचय मला

झलक बाफ वरील ऊल्हास भिडे यांचे मनोगत: http://www.maayboli.com/node/31994
माझे मनोगत: http://www.maayboli.com/node/32201
व मुख्य प्रकाशन बाफ वरील निवेदन http://www.maayboli.com/node/32337
हे सर्व जरा वेळ काढून वाचलेस Happy तर उलगडा होईल!

>>द्रव्य कितीक लागलं
अमूल्य!

वाचून काढतोय रे सगळे धागे Happy लिन्क बद्दल थ्यान्क्स
(पण बोम्बलायला इथे हापिसात मला काहीच ऐकता/बघता येत नाही, सबब येत्या रविवारी क्याफेमधे जाऊन ऐकिन्/बघिन, अर्थात आता पूर्ण गाणंच ऐकिन.
जेवढ वाचलय, त्यावरुन तर आता अस वाटतय की मनात आणल तर हे मुलखावेगळे मायबोलीकर्स विशिष्ट विषयान्ना वाहिलेला एखादा सिनेमा/डॉक्युमेन्टरी देखिल बनवु शकतील)

अरे..........अथक.......... तू पण........ अरे किधर हो दोस्त ?? अब बाहर आ जाओ परदे से. फेसबुकावर आहेस का ?

जयु, सॉरी उशिरा झाला तुझ कौतुक करायला...
तुझ आधिच माबो वरच गाण पण खुपच गोड होत..
तुझा साधा बोलतांनाच इतका आवाज गोड आहे ना तिथे गाण्याच काय !!! Happy
तुला आठवत जेव्हा ह्या प्रोजेक्ट बद्दल बोलल जात होत तेंव्हा मी तुझच नाव घेतल होत Happy