« | »




आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचं झाड असणार्‍या मायबोलीनं नुकतीच १० वर्षं पूर्ण केली.

आपल्याला मिळालेल्या अनुभवांबद्दल आपण नेहमीच हितगुजवर लिहित असतो. पण त्याला थोडं व्यापक रूप मिळावं या हेतूनं, मायबोलीकरांनीच मायबोलीवरचे भाव व्यक्त करणारी एक स्पर्धा घ्यावी असं श्री. प्रसाद देशमुखांनी सुचवलं आणि दिवाळी अंकाच्या निमित्तानं ती संधीही लगेच आली.

या स्पर्धेत कुठेही एक अनुभव चांगला, दुसरा थोडा कमी प्रतीचा असं कुठलंही मूल्यमापन करण्याचा आमचा हेतू नव्हता. प्रत्येकाचा अनुभव तितकाच प्रांजळ, तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्पर्धेचा भर मुख्यत्वे, तो अनुभव कसा व्यक्त केला जातो आहे यावर होता. आलेल्या प्रवेशिका विविध विषयांवर, विविध ढंगांनी, विविध माध्यमांतून असल्यामुळे लेखक / लेखिकेला जे सांगायचं आहे ते वाचकांपर्यंत किती सहजतेने पोहोचवलं आहे हाही एक निकष होता. वेगवेगळी माध्यमं वापरली असल्यामुळे केवळ एका माध्यमाचं सामर्थ्य त्या स्पर्धकाचं पारडं जड करतंय का असाही प्रश्न आम्ही स्वत:ला विचारला. इतकंच नाही तर वेगवेगळ्या प्रवेशिका वेगवेगळ्या माध्यमात कशा भावतील याचाही ऊहापोह आम्ही केला.

सर्व विजेत्यांचं आणि स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन! विजेत्या प्रवेशिका दिवाळी अंकात प्रसिद्ध होत आहेत आणि आलेली प्रत्येक प्रवेशिका लवकरच हितगुजवर स्वतंत्र विभागात प्रसिद्ध करणार आहोत.


या स्पर्धेला शब्दमर्यादेचं किंवा वेळेचं बंधन ठेवलं नसतं तर किती छान झालं असतं, असं आम्हाला या प्रवेशिका अनुभवताना वाटून गेलं हे नक्की!


- अजय गल्लेवाले
- भावना गल्लेवाले
- संतोष किल्लेदार

प्रथम क्रमांक - तू माझी मायबोली --jayavi
 
द्वितीय क्रमांक - मायबोलीची कहाणी --swaatee_ambole