Submitted by अविनाश खेडकर on 22 January, 2012 - 09:43
सांयकाळी कातरवेळी
एकांती मोकळ्या हवेत
मनाने मी असतो राणी
नेहमीच तुझ्या कवेत
*******************************
जीवनापेक्षा मी आता
मृत्युचाच मित्र आहे
सगळ्या दुखा:तून सुटण्याचा
तोच एक मंत्र आहे
*******************************
शाळा कॉलेजापेक्षा मला
निसर्गच खूप आवडतो
पुस्तकांसोबत शिक्षक पोपट तर
निसर्ग माणूस घडवतो.
*******************************
शरदातील चांदण्यात
मी तुझ्या सोबत रहावं
तु मला साद देशील
मी तुला कवेत घ्यावं
*******************************
मरण जवळ येईल तेव्हा
तिच्या सोबत रहायचयं
माझ्या मरणाच दुख: तिच्या
डोळ्यामध्ये पाहायचयं.
*******************************
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
दुसरी आणि शेवटची चारोळी
दुसरी आणि शेवटची चारोळी चांगली वाटली.
शेवटच्या चारोळीतील कल्पना निराळी असल्याने अधिक चांगली वाटली.
"मरनाच" हा टायपो कृपया सुधाराल का ? .... "मरणाचं" असं हवंय ना.
mastत
mastत
माझ्या मरणाच दुख:
माझ्या मरणाच दुख: तिच्या
डोळ्यामध्ये पाहायचयं
पण तिचं काय होईल दु:खानं हा विचार कोण करणार?
मस्त कविता.
भिडे काका दुरूस्ती
भिडे काका
दुरूस्ती सुचवल्याबद्ल आभारी आहे. व करूनही घेतली आहे.
प्रतिक्रियेबद्ल आभार
सुन्या
सुन्या आभार.
प्रद्युम्नसंतुजी,
तिच्या दु़खा:ची काळजी तर आहेच. पण मृत्यु हे जीवनाचे अंतिम सत्य आहे ते कुणालाच चुकणार नाही
पण अशा या सत्याला जेव्हा सामोरे जायची वेळ येईल तेव्हा मला तिच्या डोळ्यात माझ्या मरणाच दुख:
पहायचय. तिच माझ्यावर खूप प्रेम आहे ही जाणीव जीवनात सदैव आनंद देत गेली पण मरताना सुध्दा हा आनंद सोबत घेऊन जायची इच्छा आहे.
तिच्या दुखाची जाणीव तर आहेच, किबहुना तिच्या दुखा:मुळे आत्मा तसाच घूटमळत राहील. पण मोक्षापेक्षाही त्या जाणीवेच्या आनंदासोबत आत्म्याच अस घुटमळण अधिक आवडेल.
आपल्या प्रतिक्रियेबद्ल विशेष आभार.
शंकेचे पूर्ण व सुंदर निरसन
शंकेचे पूर्ण व सुंदर निरसन झाले. आभार.
मरण जवळ येईल तेव्हा तिच्या
मरण जवळ येईल तेव्हा
तिच्या सोबत रहायचयं
माझ्या मरणाच दुख: तिच्या
डोळ्यामध्ये पाहायचयं>>>>>>>>>छानच.
तिच्यावरील शंकानिरासन तर त्याहूनही सुंदर.
जिच्यासाठी मोक्षसुध्दा नाकारावा वाटतो अशी ती खासच म्हनायची!
प्रद्युम्नसंतुजी विशेष
प्रद्युम्नसंतुजी
विशेष आभार चाफेकळी.
मला आवडल्या चारोळ्या. पहिल्या
मला आवडल्या चारोळ्या.
पहिल्या आणि चौथ्या चारोळीचा आशयार्थ साधारण एकच आहे.
तिसरी चारोळी विशेष आवडली.
पहिल्या आणि चौथ्या चारोळीचा
पहिल्या आणि चौथ्या चारोळीचा आशयार्थ साधारण एकच आहे.>>>
दक्षिणा नक्कीच. पण दोन्हीमधील भूमिका, भावना व स्वप्नरंजन हा वेगळेपणा आहेच ना.
प्रतिक्रियेबद्ल खूप आभार
छान आहे चारोंळ्यांची भारोळी.
छान आहे चारोंळ्यांची भारोळी.
धन्यवाद विभाग्रजजी.
धन्यवाद विभाग्रजजी.
छानच !
छानच !
धन्यवाद मुकु.
धन्यवाद मुकु.