२०१२ महिला दिन उपक्रम : घोषणा

Submitted by संयोजक_संयुक्ता on 18 January, 2012 - 11:46

नमस्कार मंडळी,
दरवर्षी महिला दिनाच्या निमित्ताने संयुक्तातर्फे काही उपक्रम राबवले जातात. यावर्षी संयुक्ताने एका महत्वाच्या विषयाला धरून परिसंवाद करायचे ठरवले आहे.

आज जगात वावरताना कामाच्या ठिकाणी, शिक्षणाच्या ठिकाणी वेगवेगळ्या स्त्री-पुरूषांशी आपला संपर्क येतो. या सगळ्यांशी वागताना समोरची व्यक्ती स्त्री की पुरूष आहे यावर आपल्या बर्‍याच प्रतिक्रिया अवलंबून असतात. हेच मैत्रीतही होते. पण कधी कधी असं होतं की समोरची व्यक्ती आणि आपण स्वतःही स्त्री वा पुरूष आहोत हा केवळ एक तपशील असतो. कामाच्या संदर्भाने, मैत्रीच्या संदर्भाने हा तपशील बिनमहत्वाचा होतो. कधीकधी होतही नाही.

स्वतःकडे स्त्री वा पुरूष असूनही लिंगनिरपेक्ष पाहता येते का? ते शक्य असते का? असेच समोरच्याकडे पाहता येते का? अशी मैत्री असू शकते का? आणि मग या सगळ्याचा स्त्रीवादाशी संबंध येऊ शकतो का? या परस्परविरोधी गोष्टी तर होत नाहीत? या आणि अश्या अनेक मुद्द्यांवर आम्हाला तुमची मनोगतं जाणून घ्यायची आहेत.

परिसंवादाचा विषय आहे 'लिंगनिरपेक्ष(जेण्डरलेस) मैत्री-लिंगनिरपेक्ष ओळख'.

या विषयावर १००० शब्दापर्यंत लेख/ अनुभव/ विचार तुम्ही आम्हाला पाठवायचे आहेत. ८ मार्च २०१२ रोजी आलेल्यातून निवडलेले लिखाण एका परिसंवाद विशेषांकामधे प्रसिद्ध केले जाईल.

लिखाण कुठे आणि कसे पाठवायचे, अंतिम तारीख याबद्दलचे तपशील लवकरच प्रसिद्ध करू. तोवर तुम्ही लिहायला तर सुरूवात करा. Happy

या उपक्रमाच्या संपादक मंडळासाठी आम्हाला केवळ संयुक्ताच नव्हे तर संपूर्ण मायबोलीमधून स्वयंसेवकांची जरूर आहे. हा संयुक्तातर्फे घडत असलेला उपक्रम असला तरी या उपक्रमाच्या संयोजनामधे आम्हाला सर्व मायबोलीकरांच्यातून मंडळ अपेक्षित आहे. केवळ स्त्री सदस्याच नव्हेत तर पुरूष सदस्यसुद्धा.

तर कृपया ज्यांना या मंडळात काम करायला/ मदत करायला आवडेल तसे त्यांनी इथे धाग्यावर किंवा sanyukta@maayboli.com या ठिकाणी इमेल करून कळवावे. तसेच मंडळामधे कुठल्या प्रकारचे काम करायला आवडेल याबद्दलही सुचवल्यास आवडेल.

कुठल्याही विशेषांकाची असू शकतील अशीच सर्व कामे इथेही असणार आहेत.
आलेले लिखाण वाचणे, त्यातून निवडणे, त्यासंदर्भाने चर्चा, अंकाचे स्वरूप ठरवणे, रूपडं सजवणे, जाहिरात, निवडलेल्या लिखाणांचे मुद्रितशोधन इत्यादी सर्व.
तर मंडळी तुमच्या प्रतिसादांची वाट पहात आहोत.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! छान विषय आहे. Happy

मंडळात काम करायला आवडेल. कोणकोणत्या प्रकारचे काम अपेक्षित आहे, याची यादी दिल्यास त्यातून निवड करणे सोपे होईल.

अनेकदा सार्‍याजणी किंवा अंतर्नादमधे एखादा विषय देऊन त्यावर लिखाण मागवले जाते. त्याला परिसंवाद असेच म्हणले जाते की गं. Happy
बाकी ऑनलाइन असल्याचा उपयोग करून घेत चर्चा असणारच आहे.

अरे वा! छान विषय आहे.

मंडळात काम करायला आवडेल. कोणकोणत्या प्रकारचे काम अपेक्षित आहे, याची यादी दिल्यास त्यातून निवड करणे सोपे होईल. >>>> अनुमोदन

मंडळात काम करायला आवडेल. कोणकोणत्या प्रकारचे काम अपेक्षित आहे, याची यादी दिल्यास त्यातून निवड करणे सोपे होईल. >>>> अनुमोदन

रुपडं सजवणे आणि जाहिरात मधे काम करायला आवडेल. सुचवलेल्या विषयावर लिहायला १००० शब्द पुरतील असे वाटत नाही. पण विषय छान आहे. नक्की लिहीन.
मामी +१, खोखो आठवला. छान उपक्रम होता तो. Happy

मला ह्या किंवा मराठी भाषा दिवसातल्या कार्यक्रमांमध्ये मंडळात काम करायला किंवा बाहेरूनही कुठली मदत करायला आवडेल.

मला मुशो करण्यात मदत करता येईल. त्या कामाची पूर्ण जबाबदारी घेऊ शकेन का हे आत्ताच नाही सांगता येत, पण जमेल तशी मदत करायला आवडेल.

विषय छानच आहे.

पुरूष सदस्यांना लिहायला परवानगी आहे ही एक आणखी चांगली गोष्ट आहे. यातुन साधक बाधक चर्चा नक्की होईल.

आलेले लिखाण वाचणे, त्यातून निवडणे, त्यासंदर्भाने चर्चा, लिखाणांचे मुद्रितशोधन >>> ही कामं करता येतील Happy

पण पुरुष सदस्यान्नी लिहीणे अपेक्षित आहे का?
हा उपक्रम जरी संयुक्तातर्फे असला तरी सर्व मायबोलीकरांसाठी आहे.