निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सप्टें.च्या सुमारास पुण्याच्या आसपास ही फुले पाहिली होती.....

L1.jpgL2.jpg

अखेर मिळालं नाव या झाडाचं - बोटॅनिकल नाव - Phyllanthus myrtifolius, सर्वसाधारण नाव - Mousetail plant व कूळ - Phyllanthaceae

देवगडच्या किल्याच्या परिसरात हे एक वेगळेच झाड दिसले म्हणून फोटो काढला.

आणि ही सुंदर फुलं.


ह्या झाडाला उंडर म्हणतात.. ह्याची फळं (बोंड) फार उपयोगी असतात असं साबुं नी सांगितले.
ह्या उंडराच्या बोंडाचं तेलही काढतात म्हणे.

हीच उंडी का उंड्री ना? राणीबागेत पाहिलेली. नि. ग. वर खुप गप्पा झाल्यात याच्या. याची फुले अगदी सुरंगीसारखीच असतात पण सुरंगीची खोडाला लागतात.

फोटोतले झाड अगदी सुंदर दिसतेय. मुद्दाम वाढवलेल्या बोन्सायचे चुकुन झालेले मोठ्ठे रुपांतर वाटतेय. Happy

मी गेल्या आठवड्यात माडगुळकरांचे ' वाघाच्या मागावर' वाचत होते त्यात उंडीचा उल्लेख खुप वेळा आलाय.

रच्याकने, हे पुस्तक खुप छान आहे. त्यात १९४५ चा सिंहगड, तिथले वाघ, बिबटे इ. आहेत. आताच्या सिंहगडाचा संदर्भ डोळ्यासमोर ठेऊन ते वाचले की मन निराशेने भरुन येते. काय होते नी काय झाले Sad आणि का झाले तेही पुस्तकात आहे. लेखक स्वतःच बंदुक घेऊन फिरत होता. त्याची बंदुक हळुहळू कशी सुटली आणि तो निसर्गाच्या ओढीने जंगलात कसा जाऊ लागला तेही त्याने खुप छान लिहिलेय.

मागच्या आठवड्यात ऐदी कबुतरांनी माझ्या कुंडीत रोपांच्या आडोशाने अंडे घातले होते. क्षणभर पुढच्या घटनाक्रमाने हताशपणे बघत बसलो. मग त्या कबुतराला हाकलले आणि ते अंडे कुंडीबाहेर काढून सहज दिसेल असे ठेऊन दिले. थोड्याच वेळात एका कावळ्याला प्रथीनयुक्त अन्न दिल्याचे पुण्य पदरात पडले.

डॅफोडिल्स - फार सुंदर फोटो व माहिती.
याला उंडी किंवा नागचंपा असे नाव म्हणतात. कोकणात सर्वत्र आढळते. झाडाची उंची २-३ मीटर. पाने अंडाकृती, चिवट व चमकणारी असतात. फुलांना लिंबासारखा वास येतो. वर्षातून दोन वेळा फुले येतात. गोल फळांचे घड असतात. पिकल्यावर फळांची साल पिवळी दिसते व गराची चव सफरचंदासारखी असते. गराच्या आत पिवळ्या रंगाच्या बिया असतात. या बियात ५०-७५% अखाद्य तेल असते. वर म्हटल्याप्रमाणे दिव्यात हे तेल घालून दिवे लावण्यासाठी (मा बो वरील दिवे नव्हे;) Wink Wink )
याचा वापर करतात.
Calophyllum inophyllum हे बोटॅनिकल नाव व Guttiferae (Clusiaceae) हे कूळ

काय हे माधव?? असले पाप कशाला गळ्यात घ्यायचे आपण?? अर्थात तु बुद्धीप्रामाण्यवादी असशील तर मग ठिक आहे, पापपुण्याच्या ह्या फालतु कल्पना तुझ्या डोक्यात नसतील. पण माझ्यासारखी सामान्य माणसे मात्र असल्या गोष्टी करायला खुप भितात... Happy

काल संक्रातीच्या शुभमुहुर्तावर गच्चीची सफाई केली. झाकलेल्या छज्ज्यावर सतत एक कबुतर येऊन बसे नी गुटुर्गुम करुन माझे डोके पिकवी. एवढ्या अडचणीत जाऊन बसण्यात त्याला का रस असावा याचा संशय मला आलेलाच. तर काल सफाई करताना छज्ज्यावरची सगळी अडचण काढल्यावर कबुतरबाई उडाल्या आणि त्यांची दोन इवलाली अंडी दृष्टीस पडली. एका कोप-यात दोनचार काड्यांवर दोन अंडी आणि दुस-या कोप-यात नुसत्या सिमेंटवर एक अंडे. मग त्या अंड्याना मानवी स्पर्ष होणार नाही याची काळजी घेत छज्ज्ज्याची सफाई केली. उगीच अंडे फुटलेबिटले तर आपल्या डोक्यावर पाप नको. Happy

साधना, माधव यांच्या कबुतरांच्या पोस्ट वाचल्यावर खालील माहिती शेअर करावीशी वाटली (बर्‍याच मंडळींना माहितीही असेल हे) -
काही लशींच्या (व्हॅक्सीन्स) उत्पादनाकरता - १] ठराविक (एस पी एफ) कोंबडीची अंडी १०-११ दिवस उबवतात २] त्यातील पिल्लांना मारुन - चक्क पूर्ण क्रश (खिमा) करुन त्यांच्यापासून तयार केलेल्या पेशी वापरल्या जातात. याला प्रायमरी सेल कल्चर टेक्निक म्हणतात. पुढे या पेशींवर आपल्याला जो विषाणू (लशीकरता वापरला जाणारा) हवा आहे तो वाढवतात.
वेगवेगळ्या औषधांकरता (यात वेगवेगळी सौंदर्यप्रसाधनेही येतात) / लशींकरता - लॅब टेस्टींगसाठी - किती प्राणी (लॅबोरेटरी अ‍ॅनिमल) वापरले जातात त्याला गणनाच नाही - अखेर माणसाचा जीव वाचवायचा आहे ना......... दुसर्‍या प्रकारे - जीवो जीवस्य जीवनम्........
कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही - हे वास्तव आहे - प्रखर, जळजळीत का अजून काही हे काही सांगता येत नाही........ कृपया कोणी गैरसमज करुन घेउ नये, इथे ही माहिती अनावश्यक वाटल्यास तसे सांगावे - मी हे काढून टाकायलाही तयार आहे. पण यावर उगाचच वादविवाद होउ नये असे वाटते.

साधना Proud
<<<गराच्या आत पिवळ्या रंगाच्या बिया असतात. या बियात ५०-७५% अखाद्य तेल असते. वर म्हटल्याप्रमाणे दिव्यात हे तेल घालून दिवे लावण्यासाठी (मा बो वरील दिवे नव्हे;) >>> Happy

गुळपोळ्या मस्तच..

प्रयोगांसाठी प्राणी वापरले जातात हे माहित होते, पण औषधे बनवायलाही असे वापरतात हे माहित नव्हते.

ज्या लोकांनी शिक्षण घेताना हे फिल्ड निवडले (पुढे काय वाढलेय ते माहित नसताना) आणि नंतर नोकरी म्हणुन हे काम करावे लागले पण मुळ स्वभाव मात्र याला अनुरूप असा नसेल तर त्यांचे काय होत असेल हे काम करताना???? मी स्वतः असल्या फिल्डमध्ये अजिबात काम करु शकणार नाही.

सा'तै, हे गेल्या महीनाभर असेच फुललेले आहेत्......टिचभर रोपावर ४०-५० जाड्जुड गोंडे एकाच वेळी फुलतात. सर्वत्र गोंडेच आहेत दुसरे फुल नाही. Happy

फुलं सुंदरच आहेत, पण रस्तेसुद्धा किती स्वच्छ आहेत! इतक्या कमी पाण्याच्या प्रदेशात किती प्रयत्नांनी ही सुंदर बाग फुलवली असेल! मान गये..

साधना, प्राणी त्यांचे बहुतांश अन्न हे दुसर्‍या जीवाची हत्या करून (प्राणी अथवा वनस्पती) अथवा दुसरे जीवन नाकारूनच (अंडी / बिया) मिळवतात. मी फक्त एका प्राण्याला त्याचे अन्न मिळवायला मदत केली.

जेंव्हा एखाद्या प्रजातीची बेसुमार वाढ होते तेंव्हा निसर्ग त्या वाढीला आळा घालायचे उपाय योजू लागतो. त्यातलाच एक उपाय म्हणजे दुसर्‍यांना त्या वाढीपासून होणारा त्रास आणि त्या त्रासामुळे त्या दुसर्‍या जीवांनी ती वाढ आटोक्यात आणण्यासाठी केलेले प्रयत्न.

मी काही फार वेगळे नाही केले Happy

धन्यवाद सर्वांना..
कमी पाण्याच्या प्रदेशात किती प्रयत्नांनी ही सुंदर बाग फुलवली असेल! मान गये.. >> हो पण एकदा बाग सजवली की कित्त्येक दिवस पहायची गरज लागत नाही.....थंडीचा सिजन गोंड्यांना मानवतो...त्यात अगदी चोविस तास वाफ्यात ठिबक सिंचनाद्वारे 'प्रत्येक रोपाला स्वतंत्र' असा पाणी पुरवठा होत राहतो.

पण रस्तेसुद्धा किती स्वच्छ आहेत! >> रस्त्यांच्या दुतर्फा अंतरा अंरावर कचराकुंड्या दिसत आहेत. कोर्‍याकरकरीत रस्त्यावर कागदाचा कपटाही फेकायला आपलंच मन होत नाही. तो कचरा कुंडितच जातो....त्यासाठी जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही. Happy

एअर पोर्ट, बागा,रस्त्याच्या दुतर्फा, बस स्टेशन्, मेट्रो, आजच्या तारखेला संपुर्ण दुबईत लाखो नव्हे करोडोच्या संख्येने फक्त 'गोंडाच' लावला गेलाय....तेही फक्त शोभेसाठी.
झाडावरील फुल पुन्हा खालच्या मातीलाच बिलगते. Happy

मी वाचून काढले रे आज सगळे.
संभाजी महराजांना जिथे औरंगजेबांने ताब्यात घेतले, ती जागा कर्णेश्वर (संगमेश्वर ) बघून आलो. मार्लेश्वराचा धबधबा पण बघून आलो, फोटो मात्र २/३ आठवड्याने टाकेन.

मी ज्या ठिकाणी उमलणारे गुलाब टीपत असतो, त्यापैकी या काही जागा.
भर रस्त्यावर, जिथे कुणी खतपाणी घालत नाही कि काटणी छाटणी करत
नाही, अशा जागी हे गुलाब मस्त फुलत असतात. >>> दिनेशदा तुम्ही ज्या जागंची प्रचि दिली आहेत्....तिन मधुन शेवटुन दोन जागांमध्ये रोपा जवळुन सांडपाणी वाहत आहे ना?

तसे असल्यास खत/खाद्याचे पुरक तेच आहे.

माझ्या लेकींनी कोथिंबीर लावलीये कुंडीत छान आलीये अगदी , पण मला एक प्रश्न सतावतोय, तो म्हणजे एवढ्या दिवसात एकदाही चिमण्या कोथिंबिर खायला आल्या नाहीत?

मला एक प्रश्न सतावतोय, तो म्हणजे एवढ्या दिवसात एकदाही चिमण्या कोथिंबिर खायला आल्या नाहीत? >> हे फार वाईट झाले.. Sad सहानुभुती आहे.

तो म्हणजे एवढ्या दिवसात एकदाही चिमण्या कोथिंबिर खायला आल्या नाहीत?

चिमण्या आलेल्या, कोथिंबिरीला तोंड आय मिन चोच लावणार एवढ्यात शेजारी उन खात पहुडलेले कबुतर बोलले, 'चिम्स, किती दिवस हा असला पाला खाऊन दिवस काढणार आहात?? ग्रो अप ड्युड्स अ‍ॅंड एन्जॉय विथ मी." चिमण्या तेव्हापासुन लोकांनी टाकलेले चपात्यांचे तुकडे चावत कबुतरांशेजारी पडल्याएत.

Pages