माकडाच्या हातात मोबाईल

Submitted by मंदार-जोशी on 15 January, 2012 - 03:34

सर्वसाधारणपणे आपल्या देशात आधी वस्तू येते, मग त्या वस्तूच्या संदर्भातले कायदे आणि सगळ्यात शेवटी येते ती वस्तू कशी वापरायची याची अक्कल. भ्रमणध्वनी उर्फ मोबाईल हा गाडी चालवताना वापरू नये ही अक्कल आजही अनेकांना नाहीच. उलट तसे न करण्याविषयी सुचवताच आपलीच अक्कल काढली जाते.

हे महाशय पुण्यातील सेनापती बापट मार्गावरुन मोबाईलवर बोलत निवांत दुचाकी चालवत होते. अनेक वेळा हॉर्न वाजवल्यावर या साहेबांनी "काय शिंची कटकट ए" अशा अर्थाचे भाव चेहर्‍यावर आणत गाडी बाजूला केली, पण मोबाईलवर बोलायचं काही थांबवलं नाही. हे महाशयांचे मोबाईलवरचे गुफ्तगू चक्क नळ स्टॉप पर्यंत, म्हणजे साधारण दहा मिनिटं, चालले. तिथला सिग्नल आल्यावर बहुतेक समोर 'मामा' दिसल्यावर नाईलाजाने ते थांबले.

असे अनुभव वारंवार येतात. कायद्याचा धाक तर हल्ली कुणाला उरलेलाच नाही. आणि इतरांच्या सोडा, स्वतःच्या जीवाचीही काळजी या संभाषणवीरांना नसते, आणि वर यांची अरेरावी सहन करावी लागते हे वेगळंच. शिवाय यांच्यामुळे इतरांनी जीव मुठीत धरून गाडी चालवायची आणि रस्त्यावर चालायचं!!

याने वैतागून अस्मादिकांनी ठरवलं की अशांचे फोटो काढून सरळ पब्लिक फोरमवर टाकायचे. याचाच हा श्रीगणेशा. तुम्हालाही असेच घटिंगण दिसले तर बिनदिक्कत अशांचे फोटो इथे टाका. एक सूचना, फोटोत गाडीचा नंबर दिसल्यास सगळ्यात उत्तम!!

MHM0001.jpg

टीप: हा फोटो काढताना मी गाडी चालवत नव्हतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोबाईलवेड दिवसेदिवस वाढतच चाललय
काहीजणाची अन्न वस्र निवारा या प्राथमिक गोष्टीत मोबाईलची भर पडलीय
बर मोबाईलपायी यांना स्वतच्या जीवाची पर्वा नसते
मंदार लेख आवडला

मंदार, फेसबुकवर Pune Traffic Police यांचे पेज आहे. तेथे अशी माहिती दिली तर काहीतरी होऊ शकेल. तेथे बर्‍याच अशा पोस्ट्स ना उत्तर दिले जाते.

मोबाईलवर बोलत रस्त्याच्या उलट्या दिशेने जाणे, वाकडे केलेले डोके आणि खांदा यात मोबाईल पकडून तसेच बोलत जाणे (Indian version of "hands-free"), बोलत असताना ट्रॅफिकचे भान नसल्यामुळे भर रस्त्यात हळुहळू चालवून इतरांची अडवणूक करणे असले उद्योग करणारे नग रोज दिसतात.

मंदार,
हा फोरम त्यासाठी पुरेसा नाही. फेसबुक वर एक community / page तयार करायचे आणि प्रत्येक जणाने आपल्या शक्य तेव्हढ्या मित्रांना मेंबर करायचे..... आणि तिथे हे टाकायला सांगायचे........ त्याने काहीतरी परिणाम सुद्धा नक्कीच होईल......

>>हा फोरम त्यासाठी पुरेसा नाही. फेसबुक वर एक community / page तयार करायचे आणि प्रत्येक जणाने आपल्या शक्य तेव्हढ्या मित्रांना मेंबर करायचे

अनुमोदन

हे बदलणे जरा कठीणच आहे. मी नेहेमी लिहीत असतो, अमेरिकेत कायदा पाळतात, पोलीसला घाबरतात, म्हणून नियमाने वाहने चालवतात. पण गाडी चालवत असताना मोबिल वापरणे, टेक्स्ट करणे मना आहे, असा कायदा बरेच दिवसापासून असला तरी अनेक लोक खुश्शाल मोबील कानाला लावून टेक्स्ट करत गाडी चालवत असतात. वर अरेरावी अशी की, हायवेवर डाव्या लेनमधे खुशाल कमी वेगाने जात असतात (टेक्स्ट करताना!).
आमच्या न्यू जर्सीत तर गोर्‍या लोकांना, विशेषतः गोर्‍या बायकांना, सर्व गुन्हे माफ. पण गोरे नसतील तर लगेच धरतात!

Happy

जोशीबुवा, त्या हिरोच्या मागे जी स्कूटर आहे ती जरी ह्या हिरो स्वाराला दाखवली असती तरी चाललं असतं. सांगायचं बघ तुझंही असं काही होईल.

Indian version of "hands-free"> Lol

ही कल्पना चान्गलीच आहे. किम्बहुना मला असन्ख्यवेळेस चुटपुट लागुन रहाते की आत्ता क्यामेरा हवा होता हे टिपायला. केवळ दुचाकीस्वारान्ची बेशिस्तच नव्हे तर एकुणच जागोजागी असन्ख्य बाबी दृष्टोत्पत्तीस येतिल त्या टीपुन मान्डायला हव्यात. हल्ली मोबाईलमधे देखिल छान क्यामेरे असतात, ते पुरेसे होतील.
चान्गलीच कल्पना आहे. कुणालाही सहभागी होता येईल अशी.

खरं आहे टोके, फरक पडेल अशी फारशी आशा ठेवलीच नाही आहे. पण तरी बघूया एक प्रयोग करुन असा विचार केला.

हे खर आहे की असले फोटो इथे काय किंवा अजून कुठल्या फोरम वर टाकून फरक काहीच पडणार नाही.
(मी तर म्हणेन की हॉर्न वाजवून डिस्टर्ब केले म्हणून याने आपल्या चार भाई लोकांना बोलावून मंदार ला मारहाण केली नाही हेच नशीब म्हणायचे)

पण यामुळे मंदार (किंवा आपल्यापेकी कुणाचीही) ची होणारी चिडचिड मात्र नक्कीच लक्षात घेतली पाहिजे.
असे असंख्य अनुभव रस्त्यावर (पुण्यातच नव्हे सगळीकडेच) रोज येवू लागले आहेत आणि आपण हतबल होवून पाहण्याकडे काहीही करू शकत नाही.

तेव्हा ही हतबलता संपवायची असेल तर निदान सुरुवात करायला हा चांगला प्रयत्न आहे.

(फक्त जोशीबुवानी दिएल्या टीप प्रमाणे फोटो गाडी चालवताना काढू नका, नाहीतर माकडे रहायची तशीच आणि आपले फोटो भिंतीवर लागायचे !)

इकडे यूएई मधे कार ड्रायव्हिंग करताना हातात फोन धरून गाडी चालवणे हा गुन्हा आहे आणि पकडले गेल्यास मोठा दंड आणि शिवाय लायसेन्स जप्त होण्याची शिक्षा असते. तरीही असे प्रकार होताना दिसतातच. मोटरसायकलवरून जाताना मात्र असा फोन धरणे शक्यच नसते कारण हेल्मेट वापरावेच लागते.

मंदार, छान विचार मांडलास. ह्या लोकांच्या आडमुठेपणाचा खूप राग येतो. Angry
तसेच रोडवर, गाडीवरून जाताना, सिग्नलला ऊभं राहिल्यावर थुंकणार्‍या लोकांना खरेच लगेच रस्ता साफ करण्याची शिक्षा करायला हवी, तरच काहितरी फरक पडला तर पडेल.

प्रज्ञाला २००% अनुमोदन .:)
मला वाटते खरचं जर महत्वाचा फोन गाडी चालवताना आला, तर गाडी रस्त्याच्या कडेला थांबवुन तो
आपण घेऊ शकतो . म्हणजे कोणालाच त्रास होणार नाही.

महाराष्ट्र टाइम्स मधुन सभार

गूगलवर परफेक्ट सर्च कसा द्याल इथपासून मोबाइल कसा वापरावा, तुमचा मोबाइल तुम्हाला अभ्यासात कशी मदत करू शकेल, याची माहिती या लेखामध्ये तुमच्यासाठी देण्यात आली आहे.

- डॉ. दीपक शिकारपूर ( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)

...

अनेक वैज्ञानिक गोष्टी हाताळताना विविध नियम पाळावे लागतात. हे नियम तयार होण्याचे मुख्य कारण म्हणजे या गोष्टींच्या वापरामुळे इतरांना त्रास होऊ नये. सध्या आपण अनेक प्रकारचे मोबाइल वापरतो. मोबाइल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या मोबाइल वापराने इतरांना त्रास किंवा अडथळा होऊ नये यासाठी नियम पाळणे आवश्यक आहे. यासाठी हे काही नियम

महत्त्वाच्या बैठकीमध्ये, चर्चासत्रामध्ये, व्याख्यानात असताना आपला मोबाइल 'सायलेंट मोड'वर ठेवावा. अगदी महत्त्वाचा कॉल असेल, तर त्यासाठी इतरांची माफी मागून एकांतात बोलणे हा उत्तम मार्ग आहे.

मोबाइलवर बोलताना जोरात न बोलता हळू पण समोरच्या व्यक्तीला ऐकू जाईल अशा आवाजात बोला. जिथे रेंजचा प्रश्न असेल तिथे शक्यतो बोलणे टाळा.

प्रवासात अत्यावश्यक वेळीच मोबाइल वापरा. वाहने चालवताना मोबाइल वापरासाठी हँड्स फ्रीचा वापर करा. हँड्स फ्री नसेल, तर वाहन रस्त्याच्या बाजूला घ्या.

गदीर्च्या अथवा अवघड रस्त्यांवर शक्यतो मोबाइल बंद ठेवा.

निष्काळजीपणे किती तरी वेळ मोबाइलवर बोलणे निरर्थक ठरते. सार्वजनिक ठिकाणी इतरांना त्रासदायक ठरेल अशा पद्धतीने बोलू नका.

बरेचदा आपण व्यवसायातील वा खासगी जीवनातील माहितीचे आदानप्रदान करत असतो. अशा वेळी आजूबाजूचे वातावरण त्यास अनुकूल आहे की नाही हे पाहूनच बोलणे सुरू ठेवा.

शांत आणि मृदू आवाजाच्या रिंगटोनची निवड करा.

गदीर्च्या, घाई-गडबडीच्या वेळी गरज नसल्यास कॉल घेऊ नका. अशा वेळी व्हॉईस मेलचा वापर करत निरोपांची देवाण-घेवाण करा.

फोन ठेवताना पलीकडील व्यक्तीला फोन बंद करत असल्याची कल्पना देऊनच फोन बंद करा.

मोबाइल मुख्यत: संवादाचे माध्यम आहे. यामुळे संवाद अधिकाधिक अर्थपूर्ण होण्यासाठी या नियमांचा वापर करा. शेवटी मोबाइल आपल्यासाठी आहे; आपण मोबाइलसाठी नाही, हे मात्र पक्के लक्षात ठेवा

वाहने चालवताना मोबाइल वापरासाठी हँड्स फ्रीचा वापर करा. हँड्स फ्री नसेल, तर वाहन रस्त्याच्या बाजूला घ्या.
<<
चूक.

हँड्स फ्री असला तरीही फोनवर बोलताना एक शून्यात नजर लागते. तुमचे लक्ष रस्त्याकडे रहात नाही. तुम्ही कितिही अष्टावधानी असलात तरी. अन तुमच्याशी बोलणार्‍याला तुमची अडचण समजू शकत नाही.

गाडीत शेजार्‍याशी गप्पा मारणे व मोबाईलवर बोलणे यात हा फरक असा आहे, की शेजार्‍यालाही तुमच्यासोबत रस्ता दिसत असतो. ड्रायव्हिंगकडे लक्ष विचलीत होणार नाही असे बोलणे होऊ शकते. तरीही एस्टीत 'ड्रायव्हरशी गप्पा मारू नका' असे लिहिलेले वाचल्याचे अठवते.

तेंव्हा हँड्स फ्री नाही, फोन उचलायचा असेल तर रस्त्याच्या बाजूला जाऊन थांबा. मग बोला.

अजून एक जण.
गाडीचा नंबर एम.एच.१४ सी.आर.३३३१
आळंदी-पुणे रस्ता

Photo0072.jpg

त्यातल्या त्यात चांगली गोष्ट अशी कि मी मोबाईल मध्ये फोटो काढत असताना त्याने ते पाहीले आणि त्याचा मोबाइल खिशात ठेऊन दिला. नंतर आमच्या कारला ओव्हरटेक करून पुढे आला व बघितले कि कुणी फोटो काढलाय. Happy

Pages