निसर्गाच्या गप्पा (भाग - ५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 December, 2011 - 06:16

सर्व निसर्गप्रेमींच्या निसर्गमय माहीती व गप्पांनी निसर्गाच्या गप्पांचा पाचवा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधने सरळ सरळ नेहमी मला कल्टी मारत असतेस ना ? ते काही नाही आता तू कितीही लांब ठरवलास गटग तरी मी विमानाने येईन Happy

वा छानच ,, २२ तारखेला महाराष्ट्र नेचर पार्क मध्ये मधमाश्यांच्या पोळ्यावर देखील परिसंवाद आहे

कळविण्यात अत्यंत दुख्ख: होते की संक्रांतीच्या मुहूर्तावर माझ्या सुट्टीवर संक्रांत आली असून मला कामावर जाण्याचा खलिता प्राप्त झाला आहे.

तेंव्हा मी हे गटग प्रचंड मिसणार आहे. गेल्या रविवारी जिप्सी आणि दिनेशदा यांची भेट झाली हीच काय ती समाधानाची बाजू... Happy

सेनापतींनाही खलिते येतात काय आघाडीवर हजर व्हायचे?? आम्हाला वाटले आमच्यासारखे रुकीज जातात तळहातावर शीर घेऊन आणि सेनापती खलबते करत मागे राहतात Happy

जागू.. मग आता येच...

गावाला गणपतीच्या दिवसात फुललेले एक सुंदर (माझ्यासाठी) अपरिचित फुल. याचा वापर गौराईला सजवण्यासाठी केला होता Happy

मला नाही मिळाला, दिनेशदा त्याच्या दुस-या दिवशी परतताहेत त्यांच्या मायदेशी, त्यांनी २१-२२ हे दोन दिवस दिलेत माबोकरांना. २१ ला शनवार असल्याने काहीजणांना (माझ्यासकट) जमणार नाही म्हणुन रविवार..

रच्याकने, तु येणार होतास ना या दिवसातच परत?? २६ तारखेला मला शोफर ड्रिवन गाडीतुन आंबोलीला जायला मिळणार होते ना???????????

गावाला गणपतीच्या दिवसात फुललेले एक सुंदर (माझ्यासाठी) अपरिचित फुल. याचा वापर गौराईला सजवण्यासाठी केला होता>>>>>>> ईन मीन तीन, याचे - Cleome speciosa हे बोटॅनिकल नाव व Capparaceae हे कुळ, Showy spider flower या सर्वसाधारण नावाने ओळखले जाते.

ईन मीन तीन - गैरसमज नसावा - http://www.flowersofindia.in या लिंकवर फुलांच्या रंगानुसार असे नाव कोणालाही ओळखता येईल. दिनेशदा वा तत्सम जाणकार व्यक्ति (इथे बर्‍याच आहेत) फुल वा फळ वा पान पाहून नुसते नावच काय इतरही अनेक गोष्टी सांगू शकतात. माझी अजून तेवढी काय, अजिबातच तयारी नाही. केवळ एक उत्सुकता म्हणून मी ही नावे शोधत असतो. हा अभ्यास जमत नसल्याने सोईस्कररित्या मी फक्त 'निसर्गावर प्रेम करणे महत्वाचे' असे माझे मला बजावत असतो. Happy Happy Happy

निसर्गावर प्रेम करणे महत्वाचे, >>> हा विचारच महत्वाचा आहे अगदी घेण्यासारखा,
मास्टर स्टोकच Happy

वेल न. १ मी गोव्याला भरपुर पाहिलेली. नाव माहित नाही (फ्लॉ. वर शोधायला पाहिजे)'
वेल न. २ काय सुंदर आहे!!!!!१

पहिल्या वेलीचे नाव आईस्क्रीम क्रीपर आहे. बोटॅनिकल नाव Antigonon leptopus
आणि दुसरी मोरवेल असावी. बोटॅनिकल नाव Clematis gouriana (आपल्या रानजाईची बहीण) (अर्थात नक्की नाव माहीत नाही.)

ती मोरवेलच आहे.
मागे एकदा साधनाने फ्लॉवर्स ऑफ इंडियाचा उल्लेख केला होता तेव्हा मी तिला त्याबद्द्ल विचारले होते.
तिच्याकडूनच या साईटची माहिती मिळाली. ही एक खूप उपयुक्त साईट आहे. साधनाचे किती आभार मानावेत तितके थोडेच आहेत. तिच्याकडून अजून एका साईटबद्दल कळाले होते ती साईट म्हणजे gardentia.net ही पण खूप मस्त साईट आहे.

लहान पणी एक नं. च्या फोटोत आहे त्या गुलाबी फुलांच्या वेली ला आम्ही हत्तीचे कान (वाली वेल ) म्हणायचो. पानांवर हत्तीच्या कानांसारख्या रेषा असतात म्हणून. विदर्भात अनेक बंगल्यांच्या कुंपणावर ही वेल हमखास चढवलेली दिसे. आम्ही मुले हाताच्या पंजाच्या पोकळ मुठीत( तर्जनी व अंगठा जुळवुन) वर त्या वेलीच पान ठेउन पानाचा पेल्या सारखा आकार करायचो, त्यावर दुसर्‍या हाताने चापट मारली की पान हवे मुळे फाटून "प्पॉक्क" असा छोटा फटाका फोडायचो. मज्जा होती !! बेस्ट थिंग्ज इन लाइफ आर फ्री !! Happy

सर्व नि.ग. प्रेमिंना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

त्या वरच्या दोन्ही वेल मी पाहिल्या आहेत. दोन्ही खुपच सुंदर दिसतात.

Pages