अर्वाच्च पुस्तके
[Besides,] if a book is extremely popular, I become suspicious about it. The lowest common denominator of intelligence in an ordinary reader is so low, that if a book touches that, almost invariably the book must be bad.
- G A Kulkarni in a letter dated 21 April 1970 to Madhav Achval (p 73 Vol. 3 of जी. एं. ची निवडक पत्रे edited by म. द. हातकणंगलेकर, सु. रा. चुनेकर, श्री. पु. भागवत)
दोन कारणांकरता हे वाक्य इथे टाकावेसे वाटले. एक म्हणजे ते बह्वंशी सत्य आहे. अनेकांना आपापल्या आयुष्याच्या आसपासच्या (स्वभाव, जीवनमान, नोकरी-व्यवसाय, वेळ घालवायची साधने, छोटी-मोठी पापं (कायदेभंग म्हणा हवे तर)) यातच रमायला आवडतं. वेगळी फॅशन, आगळे धंदे (किंवा फंद) हे सगळ्यांनाच पचतील असे नाही. याच कारणामुळे साय-फाय चे पंखे कमी असतात. Lord of the Ring चा किस्सा तसा गमतीदारच. जेंव्हा त्या कथा प्रसिद्ध झाल्या तेंव्हा साय-फाय आवडणार्यांना आवडल्याच. पण ईतरांनी मात्र नेहमीप्रमाणे कानाडोळा केला. चित्रपटाच्या स्वरूपात संक्षीप्त कथा येताच पुस्तकांचादेखिल खप भरपुर वाढला. पण किति लोकांनी वाचल्या कुणास ठाऊक. Thrift stores मधे अनेक प्रती सापडतात. वरती जी. एं. नी पुस्तकांबद्दल लिहिलय ते त्या चित्रपटांना सुद्धा लागु होतं.
लिहिण्याचे दुसरे कारण अर्थात सध्या (पुन्हा) उफाळुन आलेला ईंग्रजी-मराठीचा वाद. जी. एं. सारखे अगम्य (अनेकांच्या दृष्टीने) मराठी लिहिणारे सुद्धा अनेक पत्र ईंग्रजीत लिहित. त्यात काही गैर आहे असे मला तरी वाटत नाही. ज्याप्रमाणे देशप्रेम हे प्रजासत्तक दिनी ध्वजवंदनाला गेल्यानेच सिद्ध होते असे नाही त्याचप्रमाणे मायबोलीचे प्रेम हितगुजवर मराठी उधळण्यानेच ठरते असे नसावे (मा. प्रां. म.).
सुरुवातीपासुनच सदस्यांवर देवनागरी वापरायची सक्ति केली तर अनेक बहाद्दर दुरुनच रामराम ठोकतील. बाकी लोकशाही जिंदाबाद.
बाकी तो
बाकी तो काळ म्हणजे- नेमाडे वाचणा-यांनी , पुलं किंवा तत्सम वाचकांवर एक पेटंट तुच्छ कटाक्ष आणि कीव वगैरे करणा-यांचा होता.>> एकदम मनातले लिहिलय.
जे पुस्तक वाचल्यावर ते आपली सोबत थोडाफार का़ळासाठी (किंवा अनंत काळासाठी)करतं, ज्यानी आपल्या मनात,ज्ञानात,जाणीवेत, नेणीवेत (कुठल्याही प्रकारचा) फरक पडतो ते (साहित्यिक निकष,भाषा, व्याकरणशुचीता, लेखनशुचीता वगैरे NotWithstanding) ग्रेट ! >>
छानच लिहिलयस. फक्त एकाच बाजूचे वाटते. वाचन करताना तू लिहिलयस तसा विचार करून वाचणारे असतात त्यांच्यासाठी एकदम चपखल. पण उरलेला ग्रुप असाहि आहे जो करमणूकीसाठी (सभोवतालचे विसरुन चार घटका वेळ घालवावा एवढ्या माफक अपेक्षेने) वाचणारा ग्रुप, त्याच्यात नकळत फरक पडतही असेल पण register होत असेल असे जरुरी नाही. बहुधा ज्या विधानावरून मी वाद सुरू केला ते विधान ह्या दुसर्या गटालाच लागू होत असावे.
माझी एव्हढीहि अपेक्षा नाही. वाचताना, मधेच खाली ठेवल्यावर "कधी एकदा परत उचलतो" असे वाटायला लावणारे पुस्तक सुद्धा माझ्यासाठी ग्रेट.
रैना..
रैना.. जबरीच... मस्त पोस्ट आहे...
मला ही पोस्ट इमेल मधे घालून साहित्याची "जाण" असलेल्या माझ्या मित्रांना पाठवायचा फार मोह होतोय..
>>>>
अडमा, रैनाच्या पोस्टमध्ये एक फार महत्वाचा मुद्दा आहे जो इथे नजरेआड होतोय. अशी मते व्यक्त करणारे बरेचदा बरेच काही वाचतात तरी. जीएंनी ज्या सामान्यांचा उल्लेख केलेला आहे त्याचा संदर्भ असा आहे की बहुतेक लोक हे फारच तोडकं वाचतात (उदा, बहुसंख्य मराठी वाचक किंवा अगदी अनेक माबोकरदेखील पुलं, वपु, मृत्युंजय, राधेय ह्याच्या आगेमागे किती वाचतात?) आणि त्या तोडक्या वाचनावर एखादे पुस्तक ग्रेट आहे असा दंगा होतो (पुन्हा 'बहुसंख्य').
कुलकर्णी, कालच सार्तेची ट्रिलॉजी आणली आहे
तेव्हडी सिगरेट गेली आयुष्यातून हे मात्र वाइट झालं. 
आशिष- मी
आशिष- मी आपल्या मुद्द्यांवर बराच विचार केला आज. जरा आटोक्यात आले विचार की लिहीते. कृष्णमूर्तिंबद्दल अगदी अगदी.
स्वाती, मृ, विजय,असामी,सायो,शोनू,केदार,adm- धन्यवाद !
शोनू- ती युलिसस एकत्र वाचायची कल्पना बेष्ट. कधी सुरु करुया ? I am game. अजून कोणकोण येतय ?
BTW-ती वरची यादी माझी व्यक्तिगत नाही, म्हणजे ती सर्व मी वाचलीत पण माझी सुहृद पुस्तके असतीलच असं नाही. वाचनप्रवासातील ती काही ठराविक ठेसने- वानगीदाखल आणि प्रातिनीधीक- सर्वसमावेशक नक्कीच नाही.:-)
माझी म्हणाल तर- वेळोवेळी झपाटून टाकणारी ही काही (च)-
दोस्तयेवस्कीचे- Crime & Punishment- यानी जो काय मनाला विंचू चावल्यागत झाले होते, ते विष अजून उतरतेय..
स्टाईनबेक- East of Eden
ओर्वेल- Animal Farm
शेक्सपियर- बरेचसे- त्यातही किंग लियर, ओत्थेल्लो, मॅकबेथ आणि सोनेटस
बाबा आमटे- ज्वाला आणि फुले
काफ्का- Metamorphosis
Krishnamoorty- Commentaries on Living
सावरकर- माझी जन्मठेप
रँड- Atlas Shrugged
बरीचशी Austen- त्यातही Pride & Prejudice
Little Women- Louisa May Alcott आणि शांताबाईंचा अनुवादः चौघीजणी
नेमाडे- कोसला, झूल, जरिला (बिढार वाचलेले नाही)
अत्रे:गावगाडा
जाधव- आमचा बाप आन आम्ही
पद्मजा फाटक आणि ई- बापलेकी
देशपांडे: दुस्तर हा घाट/थांग, मुक्काम, एकेक पान गळावया
ओशो: ताओ उपनिषद (हिंदी)
Brecht: काही जर्मन कविता आणि Caucasian Chalk Circle, पु.लं- तिन पैशाचा तमाशा
Grass- Die BlechTrommel (जर्मन)
तेंडूलकरः शांतता कोर्ट चालू आहे
बरेचसे पुलं आणि बर्याचशा सुनिताबाई
Gordimer: Occasion for Loving
Lawrence: Sons & Lovers
Hemingway: Old man & the Sea
आख्खी हॅरी पॉटर सिरीज
जिब्रानः प्रोफेट
Tolstoy: Anna Karenina
रश्दी: Midnights" Children
धर्माधिकारी- अस्वस्थ दशकाची डायरी
लाहिरी: Namesake
खानोलकर: नक्षत्रांचे देणे
यादवः झोंबी, काचवेल, घरभिंती
तोत्तोचान (अनूवाद)
Alice in Wonderland आणि बरीचशी Enid Blyton
पेंडसे: तुंबाडचे खोत
Campbell: The Hero with a Thousand Faces
वाचू आनंदे- १-४
व्यासंग हा फार मोठ्ठा शब्द झाला पण थोड्याफार तयारीने राग सादर करता येण्याइतपत गाता यावं तशी ही माझी यादी. या पुस्तकांनी मला खूप काही दिलं. म्हणजे ही पुस्तके वाचताना, भारवून जाताना, ते पुस्तक आपली साथसोबत करताना, त्या अनुषंगाने, समकालीन लेखक, तत्कालीन परिस्थिती व त्याच लेखकाची बरीच पुस्तके वाचून तयार झालेली वैचारिक बैठक आणि ब-याचदा वाचून कधीमधी प्रसन्न होणार गंधार सापडल्यासारखं/निदान समजल्यासारखं वाटावं इतपत(च) वाचलेले लेखक. गायनासारखी वाचन ही एक साधना आहे.
बाकी:

सोल्झेनित्सिनचे गुलाग आर्चिपिलॅगो वाचलेय- पण एका मर्यादेनंतर माझ्या सहनशक्तीच्या पलिकडे आहे त्यातले वास्तव.
जी.ए वाचलेत पण एखाद दुसरे- म्हणण्यासारखे समग्र अभ्यासून/समजून/झिरपून/भारावून (मी) वाचलेले नाही. भैरप्पांचेही तेच- एकतर ईंग्रजी किंवा मराठीत भाषांतरीत- त्यामूळे मनासारखे वाचलेले नाही.
नायपॉल वाचलाय- पण फक्त प्रातिनिधीक. माझा अभ्यास नाही.
स्मृतीचित्रे- अनेक वर्ष वाचायच्या यादीत
Iiliad, Odyssey वाचलेय, पण तेव्हढ्यापुरतेच
Marcus Aurelius वाचलाय, पण तेव्हढ्यापुरताच.
मारक्वेज वाचायच्या यादित आहे बरीच वर्ष. पण अजून योग आला नाही.
ज्योईस वाचलाय पण युलिसीस- वाचायची (असफल)कोशीश अनेकदा केली आहे. केदार- Way to Go
ईंग्रजीत Translated Ghalib वाचलाय- पण यात काही दम नाही. भाषेचा लहेजाच समजत नसेल तर व्यर्थ. त्याला तो उर्दू, फारफार तर उर्दू मिश्रीत हिंदीतच वाचला, ऐकला, शिकला, समजला पाहिजे.
जर्मन बरेच वाचले आहे- पण म्हणण्यासारखे नाही. Alienation कोळून पिण्याव्यतिरीक्त फार काय नाही- म्हणजे ही माझी भाषा समजण्याची, किंवा वाचनाची मर्यादा आहे - त्या भाषेत वाचण्यासारखे फारसे नाही असा याचा अर्थ घेऊ नये.
हिंदी ही बरेच वाचले आहे- पण काय कोण जाणे- एका विशीष्ट वयातील भाषांतरीत शरतचंद्र सोडल्यास खास काही नाही. प्रेमचंद वाचलाय परंतू अभ्यास तोकडा आहे.
भाषांतरीत जपानी वगळता खास काही मी वाचलेले नाही. वरची टिप ईथे ही लागू. हा माझ्या बु.दो.स- त्या भाषेचे साहित्य समृद्ध नाही असे नाही.
ज्ञानेश्वरी वाचायच्या यादित आहे बरीच वर्ष. पण अजून योग आला नाही.
वूडहाऊस वाचलाय पण कोळून प्यायलेला नाही.
बाकी Pop Literature, Paperbacks, रद्दी, Anthologies/ Selected Works/ Potboilers, हलके फुलके, टाईमपास, बेस्टसेलर्स, बुकर विनर्स, पुलित्झर विनरस, सिनेमा त्यावर बेतलाय म्हणून पुस्तक शोधून काढ, बालसाहित्य, सेल्फ हेल्प बुक्स, Management Theories, MB's, पोथी, कुकरी बुक्स पासून ते कामाच्या अनुषंगाने Wall Street Journal/FT/रोजची वर्तमानपत्र Bloomberg/Bankruptcy Statements आणि करोडोंनी legal documents, contracts, Research reports, पेशेवार वाचावी लागणारी वाचायला आवडणारी पुस्तकं, वगैरे वाचन चालूच असते. आता ब-याचदा प्रापंचिक जवाबदा-यांमुळे म्हणावे तसे किंवा पाहिजे तेव्हढे वाचन होत नाही, होण्याची शक्यता दिसत नाही.
वर ब-याच जणांनी आपापली यादी सांगीतली आहे आणि विषय निघालाय म्हणून जाता जाता सांगीतले एवढेच ! गैरसमज नसावा. आशिष -आपण विषय काढला आणि अगदी रहावले नाही. त्या निमीत्ताने सगळ्यांची यादी कळेल आणि वाचनाला जरा दिशा मिळेल या हेतूने ही यादी.
उरता उरला कळीचा प्रश्न- आपण (मी) का वाचतो (ते) ?. ह्याचे मात्र उत्तर नाही. नादिष्टपणा- दुसरं काय !शब्दा शब्दातून, भाषेभाषेतून जी जादू आहे- ती भूरळ घालते. आयुष्य समृद्ध होते (की नुसते झाल्यासारखे वाटते ?), कुठल्यातरी पातळीवर मानवी जीवनाचा अर्थ सापडतो (हे मात्र खरं असावे असे वाटते) - अध्यात्मिक बैठक वगैरे ?-
आणि कृपया शेवटचे वाक्य शब्दशः घेऊ नये. जिज्ञासू लोकांनी ओपियम ची पाककृती अथवा ओपियम पेरण्याचे तंत्र वगैरे मला विचारु नये. मी ते काळं का गोरं पाहिलेलं नाही. ha ha)
पण म्हणून जगणे सोपे होते का? (नाही. आपल्या वाटचे भोग तर भोगावे लागतातच, आणि thereotically माहीत असलं तरी विंचवाच्या दंशाचा दाह प्रत्यक्ष चावला की कमी होतो थोडाच ? अगगगग- विंचू चावला, काय मी करु... वगैरे) कोण जाणे काय की.
To each his (her) own opium !
(अरे हो! हे सर्व IMHO
रैना, जबरी
रैना, जबरी आहे तुझी यादी.
चार पाच महिन्यांपुर्वी मी वाचायचा एक प्रोजेक्ट घेतला आहे.
लोकांनी सांगीतलेली, मरायच्या आधी वाचायची १०० इंग्रजी पुस्तके. ती यादी खालील लिंक वर मिळेल.
http://www.randomhouse.com/modernlibrary/100bestnovels.html
कदाचित कोणाला उपयोगी पडायची.
फारच तोडकं
फारच तोडकं वाचतात (उदा, बहुसंख्य मराठी वाचक किंवा अगदी अनेक माबोकरदेखील पुलं, वपु, मृत्युंजय, राधेय ह्याच्या आगेमागे किती वाचतात?) आणि त्या तोडक्या वाचनावर एखादे पुस्तक ग्रेट आहे असा दंगा होतो (पुन्हा 'बहुसंख्य').
>>
तोकडं म्हणायचं होतं का टण्या ?
रैना आनंद यादवांची पुस्तकं अन तुंबाड पाठवू शकशील का ? मी मार्क्क्वेझची अन बोर्हेसची पुस्तकं पाठवीन हवी तर...
केदार अशी
केदार अशी यादी मधे लिहायचा प्रयत्न केला होता पण "सती" वाचल्यावर "कि फरक पैंदा?" म्हणून सोडून दिला
रैना,
रैना, दोन्ही पोष्ट मस्तच.
मला पु.लंच्या पुस्तकातून बरेच काही मिळाले. असे समाधान देणारी इतर लेखकांची खूप कमी पुस्तके आहेत.
रैना, छान
रैना, छान आहे यादी. आत्ता फक्त याद्यांबद्दलः लोकहो, इथे याद्या जरुर टाका, पण librarything.com वर पण नक्की टाका. तिथे त्या स्थावर, शोधेबल ई. होतिल आणि इतर लोक साधर्म्य शोधु शकतिल. मराठी नावे पण टाकता येतात.
माझी यादी: http://www.librarything.com/home/aschig
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद
टण्या, सिगा
टण्या,
सिगारेट शिवाय सार्त्र वाचणे म्हणजे तुपाशिवाय पुरणपोळी.
सिगारेट शिवाय सार्त्र वाचणे
सिगारेट शिवाय सार्त्र वाचणे म्हणजे तुपाशिवाय पुरणपोळी. स्मित
>>>
विकु , च्यायला उपमा देखील द्यायला पुणे ३० च्या बाहेर झेप नाही तुमची. कसल्या क्लासिक वाचण्याच्या गोष्टी चालल्यात ?
एनी वे आमची झेप बाबूराव अर्नाळकरांच्या पुढे नाही. हे भद्र लोकांच्या वाचनात मोडते का?
काहो, फक्त गंभीर विषयावरील,
काहो, फक्त गंभीर विषयावरील, गर्भित अर्थ असलेली पुस्तकेच वाचनीय नि बाकीची अवाचनीय? ( अर्वाच्च या शब्दाचे व्याकरण कळले नाही म्हणून सोपा शब्द वापरला आहे) आता सोपे शब्द वापरले म्हणून तुमच्या मते माझे हे लिहीलेलेहि अर्वाच्च होईल का? (एरवीहि, खूप मोठे मोठे शब्द वापरून लिहीलेले, माझे लिखाण अवाचनीय असते, पण सोपे शब्द वापरले म्हणून हे अर्वाच्च असावे.)
मग विनोदी लिखाणाबद्दल तुमचे काय मत आहे? त्यातहि उथळ नि पांचट विनोद असतात तसे फक्त विद्वान, बहुश्रुत व विनोद दृष्टी असणार्या लोकांना कळतील असेहि विनोद असतातच. त्या पुस्तकांचे काय?
(ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या हे वचन अर्थासकट माहित असल्याने, उगाच जग ज्याला गंभीर, उदात्त, वगैरे म्हणतात त्यात मला गम्य नाही. मी फक्त मला काय विनोदी वाटेल ते शोधतो.)
बोवाजी , पुन्हा आणखी ते '
बोवाजी , पुन्हा आणखी ते ' जिंदगी ख्वाब है, और ख्वाबमे भला सच है क्या ' आणि 'मौजा ही मौजा 'राहिलंच की !
sorry for typing in
sorry for typing in english......some "locha"......anyone has any comments on 50 shades of Grey??
anyone has any comments on 50
anyone has any comments on 50 shades of Grey?? >> हो! रोज वाचून डिप्रेशन आले की मध्ये मध्ये
'दिवाकरांच्या रंगछटा' वाचा.
(No subject)
Pages