अर्वाच्च पुस्तके

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

[Besides,] if a book is extremely popular, I become suspicious about it. The lowest common denominator of intelligence in an ordinary reader is so low, that if a book touches that, almost invariably the book must be bad.
- G A Kulkarni in a letter dated 21 April 1970 to Madhav Achval (p 73 Vol. 3 of जी. एं. ची निवडक पत्रे edited by म. द. हातकणंगलेकर, सु. रा. चुनेकर, श्री. पु. भागवत)

दोन कारणांकरता हे वाक्य इथे टाकावेसे वाटले. एक म्हणजे ते बह्वंशी सत्य आहे. अनेकांना आपापल्या आयुष्याच्या आसपासच्या (स्वभाव, जीवनमान, नोकरी-व्यवसाय, वेळ घालवायची साधने, छोटी-मोठी पापं (कायदेभंग म्हणा हवे तर)) यातच रमायला आवडतं. वेगळी फॅशन, आगळे धंदे (किंवा फंद) हे सगळ्यांनाच पचतील असे नाही. याच कारणामुळे साय-फाय चे पंखे कमी असतात. Lord of the Ring चा किस्सा तसा गमतीदारच. जेंव्हा त्या कथा प्रसिद्ध झाल्या तेंव्हा साय-फाय आवडणार्‍यांना आवडल्याच. पण ईतरांनी मात्र नेहमीप्रमाणे कानाडोळा केला. चित्रपटाच्या स्वरूपात संक्षीप्त कथा येताच पुस्तकांचादेखिल खप भरपुर वाढला. पण किति लोकांनी वाचल्या कुणास ठाऊक. Thrift stores मधे अनेक प्रती सापडतात. वरती जी. एं. नी पुस्तकांबद्दल लिहिलय ते त्या चित्रपटांना सुद्धा लागु होतं.

लिहिण्याचे दुसरे कारण अर्थात सध्या (पुन्हा) उफाळुन आलेला ईंग्रजी-मराठीचा वाद. जी. एं. सारखे अगम्य (अनेकांच्या दृष्टीने) मराठी लिहिणारे सुद्धा अनेक पत्र ईंग्रजीत लिहित. त्यात काही गैर आहे असे मला तरी वाटत नाही. ज्याप्रमाणे देशप्रेम हे प्रजासत्तक दिनी ध्वजवंदनाला गेल्यानेच सिद्ध होते असे नाही त्याचप्रमाणे मायबोलीचे प्रेम हितगुजवर मराठी उधळण्यानेच ठरते असे नसावे (मा. प्रां. म.).

सुरुवातीपासुनच सदस्यांवर देवनागरी वापरायची सक्ति केली तर अनेक बहाद्दर दुरुनच रामराम ठोकतील. बाकी लोकशाही जिंदाबाद.

विषय: 
प्रकार: 

तुला तुझ्या पानावर पण आता चर्चासत्र चालू करायचे आहे वाटतं ? Happy

पण अर्वाच्च असं का बरं शीर्षक आहे ? जे वाणीने उच्चारु शकत नाही (उच्चारावेसे वाटत नाही) ते अर्वाच्च ना ?

शीर्षक अयोग्य वाटते आहे.

चार लोकांना वाचाचेसे वाटणारे लिखाण टाकाऊ(च) असते ? Sad बात कुछ हजम नही हुयी.

अर्वाच्च पुस्तके>>> अर्वाच्च शिव्या असतात नं? (एक बा. प्र.)

मायबोलीचे प्रेम हितगुजवर मराठी उधळण्यानेच ठरते असे नसावे (मा. प्रां. म.).>>> ह्म्म्म्म खराय! आणि हे काय आहे?>>(मा. प्रां. म.) Sad

*********************

"जसं शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरावे तसच अनुल्लेख हे ही शस्त्र आहे आणि ते जास्त परिणामकारक आहे"

>>मा. प्रां. म

माझं प्रांजळ मत, असं असावं बहुतेक.

माझं प्रांजळ मत

ह्म्म्म ठीकाय Happy धन्स!

*********************

"जसं शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरावे तसच अनुल्लेख हे ही शस्त्र आहे आणि ते जास्त परिणामकारक आहे"

'अर्वाच्च' म्हणजे 'न वाचण्यासारखी' असं असेल. Wink
असामी, ते जीएंच्या दृष्टीकोनातून रे. बरेच लोक वाचतात म्हणजे बर्‍याच लोकांना ती आवडत असणारच ना. आणि ते म्हणतात ते फार चूक नाही आहे. इथली 'बेस्ट सेलर' लिस्ट मधली पुस्तकं फारतर 'ठीक' च वाटतात.

शिव्या अर्वाच्य असतात ---म्हणजे बोलता न येण्यासारख्या..

अर्वाच्च - वाचता न येण्यासारखे - असे अभिप्रेत आहे बहुतेक..

------------------------------------------------------------------------------
The lowest common denominator of intelligence in an ordinary reader is so low, that if a book touches that, almost invariably the book must be bad.
-------------------------------------------------------------------------------
ही जी एंची त्यांच्या पुस्तकाना तेवढी लोकप्रियता न मिळाल्याबद्दल असुया तर नाही ना? (माझे वैयक्तीक मत!)

त्याला काय म्हणायचे आहे ते मलाही कळलं आहे, पण ते जमलं नाही असं वाटलं म्हणून विचारलं आहे मी.

मनस्मी, जी ए लोकप्रियतेमागे कधिच नव्हते. ते प्रकाशझोतापासुन दुर राहणे पसंद करत. त्यांनी ग्रेसना लिहिले होते:
'तुमची कविता जशी वाढते तशी (एखादी नदी वाहावी, ज्योत जळावी तशीच) वाढु द्या. मग टीकाकार गेले खड्ड्यात'. (२४ ऑगस्ट १९७३)

लालु, 'बेस्ट सेलर' यादीचे उदा. समर्पक आहे.

मिलिंदा इथे 'ती' चर्चा नको Happy

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

याच कारणामुळे साय-फाय चे पंखे कमी असतात. Lord of the Ring चा किस्सा तसा गमतीदारच. जेंव्हा त्या कथा प्रसिद्ध झाल्या तेंव्हा साय-फाय आवडणार्‍यांना आवडल्याच. >>

Lord of the Rings तर फँटसी प्रकारात मोडते ना... म्हणजे प्रत्येक sci-fi ही फँटसीच असते पण प्रत्येक फँटसी sci-fi नसते ना.. चू.भू.दे.घे.

इथली 'बेस्ट सेलर' लिस्ट मधली पुस्तकं फारतर 'ठीक' च वाटतात. >> आणि त्यात न आलेली पुस्तके great असतात असे कशावरून ? माझे मत हल्ली बदललय. चार लोकांना आवडत असेल तर त्याचाच अर्थ ते समाजमान्य होतय. उरलेल्या मूठभर (may be intellectual) लोकांना त्याला टाकाऊ बोलण्याचा अधिकार नसावा. उलट चार लोकांना भावलय पण तुम्हाला (वैयक्तिक रित्या लालूला नाही) नाही म्हणजे त्यात तुमच्यात इतरांची विचारक्षमता समजून घेण्याची कुवत कमी आहे असे असू शकेल. generalization नको म्हणून उदाहरणे टाळतोय. पण अशी सरसकट विधाने मला कळली नाहि. Sad

अर्थात हे सर्व गोष्टींना लागू होत नाही हे मला मान्य आहे पण त्या विधानामधील generalization खटकले.

>>आणि त्यात न आलेली पुस्तके great असतात असे कशावरून ?
असे मी अजिबात म्हणत नाही आहे.
>>लोकांना त्याला टाकाऊ बोलण्याचा अधिकार नसावा
टाकाऊ पण म्हणत नाही. बरीचशी 'ठीक' च.
>>त्यात तुमच्यात इतरांची विचारक्षमता समजून घेण्याची कुवत कमी आहे असे असू शकेल
असू शकेल. किंवा 'बेस्टसेलर' झाल्याने अपेक्षा वाढत असतील एवढंच.

>>वैयक्तिक रित्या लालूला नाही
हो, ते कळले रे. Happy पण मी फक्त माझ्यापुरतेच बोलू शकते म्हणून 'असे मी म्हणत नाही' लिहिले 'कोणीच म्हणत नाही' असे नाही लिहिले. Light 1

कुवत कदाचित बरोबर शब्द नाही. इच्छा जास्ती बरोबर ठरेल.

किंवा 'बेस्टसेलर' झाल्याने अपेक्षा वाढत असतील एवढंच.>> तूझा मुद्दा माझ्या लक्षात आला., पण GA ह्यांचे विधान तसे म्हणत नाहिये. "The lowest common denominator of intelligence in an ordinary reader is so low" हि सुरुवात आहे. म्हणजे मूळात पुस्तक popular का झालेय ह्यावर जी ट्टिपणी आहे, जी मला पटली नाहिये.

पुस्तक आवडणे किंवा हे उत्तम आणि हे ठीक अशी व्याख्या होऊ शकते? यात व्यक्तीसापेक्षता असणारच ना. पुस्तकाच्या दर्जाबद्दल मत देण किंवा अधिकार वाणीने बोलणं हेही तितकेच व्यक्तीसापेक्ष.

'अनेकांना' आपापल्या आयुष्याच्या आसपासच्या (स्वभाव, जीवनमान, नोकरी-व्यवसाय, वेळ घालवायची साधने, छोटी-मोठी पापं (कायदेभंग म्हणा हवे तर)) यातच रमायला आवडतं. >>> हे पटलं आणि या अनेकात जे नाहीत, जे बर्‍यापैकी किंवा बर्‍याचवेळा स्वप्नरंजनातच (फँटसी) आनंद मानतात किंवा सद्य परिस्थितीच्या परे काहीतरी अतर्क्य, साध्या कल्पनेत किंवा स्वप्नातही दुरापास्त असणार्‍या गोष्टींत (साय-फाय) रमतात. पण असे मानले तर आता हे 'अनेक' जे आहेत त्यांची संख्याही कालसापेक्ष बदलत नाही का?

जसे 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' जर चित्रपटांमधून पाहिल्यानंतर बेस्टसेलर झाले असेल किंवा त्याचा खप वाढला असेल तर ते जीएंनी म्हंटल्याप्रमाणे त्याचा 'lowest common denominator of intelligence' घटल्यामुळे की कालसापेक्ष इतर माध्यमांच्या मदतीमुळे ते जास्त प्रभावीपणे मांडता(वाचता) आल्यामुळे?

आणि हे लॉजिक बायबल, दासबोध किंवा तत्सम ग्रंथांकडे एक पुस्तक म्हणून पाहिलं तर त्यांना लागू होते का?
'दास कॅपिटल' किंवा 'द कम्युनिस्ट मॅनिफेस्ट' चा बेस्ट सेलर असण्याचाही एक काळ होता.
'मेइन काम्फ' बेस्टसेलर होण्याचीही कारणे वेगळी होती. ही झाले जुनी उदाहरणे आता अलिकडची काही उदाहरणे...
'हॅरी पॉटर मालिका' बेस्ट सेलर बनवण्यात पुस्तकांच्या दर्जाबद्दल समज नसलेल्या अजाण पिढीचा वाटा मोठा होता. 'दा विंची कोड' बेस्ट सेलर होण्यामागे वादाचा वाटा किती होता? मला ('एंजल्स अँड डीमन' सर्वच बाबतीत जास्त उजवे वाटले)
त्यामुळे पुस्तकांचा दर्जा ठरवतांना व्यक्ती आणि कालसापेक्षता त्यावर परिणाम करणारंच.
बाकी लोकशाही जिंदाबाद. >>> हे माझंही मतदानानंतरचं आवडीचं वाक्य. Happy

>>> इथली 'बेस्ट सेलर' लिस्ट मधली पुस्तकं फारतर 'ठीक' च वाटतात.

सहमत. बर्‍याचदा बेस्ट सेलर' वाचून उचललं जातं पुस्तक आणि पहिली दहा पानंही वाचवत नाहीत.

चार आनेकी मुर्गी और बारा आनेका मसाला Happy
असो. तर मुळात मुर्गी असल्याने मीही माझ्या मसाल्याची भर टाकते.
जी ए म्हणतात ते मान्य. (जीएंची पंखा असल्यामुळं डोळे झाकून मान्य..)
सर्वसामान्यांना बेहद्द आवडले की ते काहीतरी अतिसामान्य निघते हे खरेच. कारण ते सहज सोपे अगदी बेसिक करमणुकीला हाताशी धरून केलेले असते. शिवाय काहीतरी डोके चालवावे लागणारे असेल तर कष्टांत दिवस काढून फ्रस्ट्रेट झालेला माणूस तिकडे वळत नाही, त्याची आवड लावून घेत नाही.
करमणूकीतही पुन्हा आपल्यालाच कष्ट असतील तर नकोच ते. असं म्हणून.
पण मग उत्तम करमणुकीची सवय लागली की लोक आपोआप वळतील की तिकडं.
पूर्वी लोकांना सर्वसामान्यपणे उत्तम चित्रपट, पुस्तकं आवडायची. कारण त्याला प्रतिष्ठा जोडली होती.
होऊ द्या थोडा खप कमी पण उत्तम तेच बाहेर येउ द्या असं करायला हवं.

पण एकूण यातून इंग्रजी लिहीण्याच्या प्रतिबंधाला राग उफाळून येण्याचं कारण कळलं नाही.
दुरून रामराम ठोकणारे असतील तर असोत बापडे. मायबोलीवर मराठी लिहीत नसतील तर मूळ हेतूच नाहीसा होतो ना.
आणि जीए इंग्लिशमधून पण लिहायचे म्हणून त्यांच्या इंग्लिश लिखाणाला मराठी म्हणावं असं काही म्हणणं आहे का?
तुमच्या या शिशुलेखातच विरोधाभास आहे. एकीकडं दर्जाबद्दल लिहीलंय आणि मग लगेच तो राखून ठेवण्याच्या पद्धतीवर टीका केलीय. Happy असो.
लोकशाही झिंदाबाद हे आहेच शेवटी. Happy

जीएंचे वाक्य हे साहित्याची पदवीधर होण्याच्या काळात आमचे अलिखीत घोषवाक्य होते. बाकी तो काळ म्हणजे- नेमाडे वाचणा-यांनी , पुलं किंवा तत्सम वाचकांवर एक पेटंट तुच्छ कटाक्ष आणि कीव वगैरे करणा-यांचा होता. काफ्का आपल्याला (आणि फक्त आपल्याला{च}समजलाय- त्स्वाईग, टागोर वगेरे pithy लिहितात, आपण बुवा कलेसाठी कला आणि कँटीन मधील उधारी यांचे समप्रमाण असायचे) म्हणजे हा आपला मज गरिबाचा एक Hypotheses-कँटीन मधील उधारी असणा-याची आणि वाचनाची जातकुळी-एक तौलनिक अभ्यास !! असले वाचणारे मुलगे असले तर सिगरेट हवीच आणि भणंग दिसणे, शिवाय पायात स्लिपर cumpulsory. Happy असो.
मधूनच कोणाला तरी Ayn Rand ची बाधा होई-मग त्यांची डोकी आणि मनगटं भरुन येत- आणि इतरांचे डोके उठे ,कारण मग तो इसम/ती कन्या उगीचच फर्गसन टेकडी वगैरे चढून आपण म्हणजे Howard Roark, आणि Domnique Francon असल्याचा मुकाभिनय करत. (दर्दी लोक- pls. note- I have'nt said John Galt and Dagny Taggart ha.ha.ha..). मुलींचे होस्टेल म्हणजे- Mills &Boon's (त्यातही Silhouette वगैरेची प्रतवारी होतीच), रेडियो, आणि अगदीच जास्त वाचनवेड असेल तर- Lady Chatterly's Lover वगैरे खुसरफुसर करत वाचत-त्यात खुसरफुसर आणि सर्व कँपसचे प्रेमअहवाल जास्त आणि वाचन कमी. :-)(ह्याला बरेच जणं न वाचताच Lady Chatterjee's Lover वगैरे संबोधत).
ईंग्रजी साहित्यवाले Literature Society u know, आणि मराठी साहित्यवाले "साहित्य सहवास/की सहकार मध्येच जात आणि एकमेकांना तुच्छ लेखण्याचे पुण्यकार्ये ईमानदारीत निभावत. त्यातही ईंग्रजीच्या आणि मराठीच्या प्राध्यापिका यांचाही तौलनिक अभ्यास मुलं नेमाने करायची- पण प्राध्यापिकांच्या बाबतीत असला ज्यादा विषयानुसार भेदभाव कोणी करायचे नाही- कारण तौलनिक अभ्यास करायला इतर निकष जास्त महत्वाचे होते अर्थातच !
आम्ही जर्मन/फ्रेंच वाले बहूधा दोहोंकडे तु.क टाकायचो- (वेळ असला तर !!कारण बहूतेकांची आपापले व्याकरण आणि नवीन भाषा बघता पळता भुई थोडी व्हायची.)
ईंग्रजीसाहित्य फायनल ईयर वाले कायम शेक्सपियर आणि ज्योईस यांच्या "homosexuality" बद्दलचे (नसलेले) ज्ञान पाजळण्यात घालवायचे- मधूनच "Literary Criticism " आणि "Linguistics" वगैरे आणि जे.एन्.यु ची तयारी यात. Happy त्यातही आधिक तापदायक म्हणजे - ""तुला माहितीये- शेक्सपियर नी ही कविता एका पुरुषाला उद्देशून लिहिली आहे.. वासलेला आ. आणि असलं ते सगळं. "
Ulysses किंवा Umberto Eco वगैरे वाचण्याचा अटोकाट प्रयत्न केलेली लेकरं ही होती- नाही असं नाही- पण कुठल्याही प्राध्यापकाला ते प्रकरण झेपण्यातलं नव्हतं आणि तेव्हा Google प्रकरण बोकाळलं नव्हतं- त्यामूळे ती ज्ञानसाधना तशी काय खास सफल वगैरे होत नव्हती.

तर आता बरेच Sad जास्त उन्हाळे वगैरे ) पाहिल्यावर आणि वाचन (आणि वयही)ब-यापैकी एका ट्प्प्यावर आल्यावर माझं असं मत झालय की: जे पुस्तक वाचल्यावर ते आपली सोबत थोडाफार का़ळासाठी (किंवा अनंत काळासाठी)करतं, ज्यानी आपल्या मनात,ज्ञानात,जाणीवेत, नेणीवेत (कुठल्याही प्रकारचा) फरक पडतो ते (साहित्यिक निकष,भाषा, व्याकरणशुचीता, लेखनशुचीता वगैरे NotWithstanding) ग्रेट !

असो- acshig आपल्या पानावर फार जागा घेतल्या बद्दल क्षमस्व ! विषयाला धरून वाटत नसेल तर तसे सांगा प्लीज. मी ही पोस्ट काढून टाकेन. आपण हा विषय काढल्याबद्दल धन्यवाद. Happy
अनेकांना आपापल्या आयुष्याच्या आसपासच्या (स्वभाव, जीवनमान, नोकरी-व्यवसाय, वेळ घालवायची साधने, छोटी-मोठी पापं (कायदेभंग म्हणा हवे तर)) यातच रमायला आवडतं>>>>> अगदी.

bovish-आपले पोस्ट आवडले. पटले.

जीए, सिगरेट, Ayn Rand (त्यातसुद्धा फाउन्टन हेड, अ‍ॅटलास नाहीच Happy )सगळंच लै भारी लिहिले आहेस रैना Happy

नेमाडे वाचणा-यांनी , पुलं किंवा तत्सम वाचकांवर एक पेटंट तुच्छ कटाक्ष आणि कीव वगैरे करणा-यांचा होता. >>> Rofl चला हे पुर्वीपासूनच चालत आलेले आहे म्हणजे Happy (ह्याचा अर्थ ज्यांच्या साहित्याकडे तुच्छ कटाक्ष टाकला ते ग्रेट असा मुळीच काढू नये Proud )

>>> Lady Chatterjee's Lover >>> Rofl

बाकी ते युलिसीस समजून वाचणे ही बहुतेक सरणावर जाइपर्यंतची इच्छा राहणार आहे. मी मेल्यावर कावळा शिवला नाही तर कुणीतरी युलिसीस आणि वॉर अँड पीस समजलेला माणुस आणुन समोर दाखवा Proud

धन्यवाद शंतनू. चला- आपण एक क्लास लावू युलिसिस फॉर डमीज. ! Happy मी कितिदा ते वाचायचा प्रयत्न करुन हाय खाल्ली आहे.
क्लास घेईल कोण हा प्रश्न आहेच.मायबोलीवर आहेत का कोणी ज्ञानी प्रकांड्पंडित ?
वॉर अँड पीस -त्यातल्या त्यात (युलिसीस पेक्षा) बरीच आटोक्यात आहे.

ह्याचा अर्थ ज्यांच्या साहित्याकडे तुच्छ कटाक्ष टाकला ते ग्रेट असा मुळीच काढू नये >>>> बरोब्बर.
बाकी मा. मॄ देवी म्हणाल्या तसं- तू वाचनाच्या अटी शिथील केल्याशिवाय, तुमच्या दारात मांडव घालणे जरा अवघड आहे. Happy

रैना, जियो! चांगलीच मोठी आणि छान पोस्ट टाकलीस!
बाकी <<तर आता बरेच जास्त उन्हाळे वगैरे ) पाहिल्यावर आणि वाचन (आणि वयही)ब-यापैकी एका ट्प्प्यावर आल्यावर माझं असं मत झालय की: जे पुस्तक वाचल्यावर ते आपली सोबत थोडाफार का़ळासाठी (किंवा अनंत काळासाठी)करतं, ज्यानी आपल्या मनात,ज्ञानात,जाणीवेत, नेणीवेत (कुठल्याही प्रकारचा) फरक पडतो ते (साहित्यिक निकष,भाषा, व्याकरणशुचीता, लेखनशुचीता वगैरे NotWithstanding) ग्रेट !>>

अगदी सहमत!

रैना,
सुन्दर पोस्ट,
कॉलेज च्या दिवसात "कोसला" वाचून आपण कुणीतरी ग्रेट आहोत ही भावना,
Ayn Rand वाचून डोक्यावर झालेला तात्पुरता परिणाम,
सार्त्र वाचून सिगारेट पेटवून शून्यात पहात बसणे, सारे सारे आठवले.
तेवढं युलिसिस च्या क्लास ला माझे ही नाव घाला बरे.

रैना.. रैना.. व्वा!!!
तुला या पोस्टबद्दल कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं बघ मला अगदी!!! Happy

रैना.. जबरीच... मस्त पोस्ट आहे... Happy
मला ही पोस्ट इमेल मधे घालून साहित्याची "जाण" असलेल्या माझ्या मित्रांना पाठवायचा फार मोह होतोय.. Happy

pls. note- I have'nt said John Galt and Dagny Taggart ha.ha.ha.. >>> Lol रैना तोडलेस तू.
तुझे पोस्ट फार आवडले. शेवटी पुस्तक चांगले वाईट असने हे व्यक्तीसापेक्षच आहे. (रॅन्ड अजुनही ग्रेटच आहे. माझ्यासाठी. Happy )

कलाकृती म्हणून युलिसिस उच्च आहे पण दरवेळी डोके भंजाळायला होते. युलिसिस मी दोन वेळा आणून वाचन्याचा प्रयत्न करुन ठेवले आहे. पण येत्या काही दिवसात परत आणनार आहे. Happy चिकाटी गं दुसर काय. कालच लायब्रीचे इ मेल आलेय. पुस्तक ठेवलेय घ्यायला या म्हणून. Happy ( ते लायब्री हा नेमाड्यांचा तात्पुरता प्रभाव)

टण्या, वॉर अँड पीस समजलेला माणुस तर नाही पण वाचलेला हवा असेल शेवटची इच्छा म्हणून तर विपू टाक मरायचा आधी. धावत येतो. Happy

केदार , पायांचा फोटो टाक बरं लवकर.
रैना, सुंदर पोस्ट. यात सिल्व्हिया प्लॅथ च्या कवितांचं पुस्तक अन सोल्झेनित्सिन च्या पुस्तकांचा उल्लेख असता तर माझ्या नावावर पण खपली असती पोस्ट Happy

युलिसिस चं ऑन्लाइन सामुहिक वाचन करायचंय का इथे ? दर आठवड्याला एकेक चॅप्टर ?
किंवा जास्त अग्रेसिव्ह प्लॅन असेल तर जुन १६ च्या आत वाचून संपवायचं ...

रैना, काय अशक्य लिहिलं आहेस. तुझ्याही पायांचा जरा फोटो टाक.

>>> जे पुस्तक वाचल्यावर ते आपली सोबत थोडाफार का़ळासाठी (किंवा अनंत काळासाठी)करतं, ज्यानी आपल्या मनात,ज्ञानात,जाणीवेत, नेणीवेत (कुठल्याही प्रकारचा) फरक पडतो ते (साहित्यिक निकष,भाषा, व्याकरणशुचीता, लेखनशुचीता वगैरे NotWithstanding) ग्रेट !
वाक्य कुठेतरी टिपून ठेवायला हवं! बाकी पोस्ट तर लाजवाब!

रैना, तुझ्या पोस्ट वर ईतक्या लोकांनी लिहिल्यानंतर (म्हणजे वाचल्यानंतर) मी कसे म्हणणार की ते ग्रेट नाही? Happy छान लिहिले आहेस.

काही गोष्टींचा अर्थात वयाशी संबंध असतो. वयामुळे (आणि आजुबाजुच्या परिस्थितीमुळे) ती जास्त भावतात. खूप आवडलेली काही पुस्तके पुन्हा वाचल्यास तितकी आवडत नाहीत. बो-वीशने म्हंटल्याप्रमाणे एखादी जॉन्र आवड्णार्यांची संख्या बदलणारच.

आपल्याला आवडेल ते उत्तम हा अर्थातच अंतिम (स्वतःकरता) निकश असतो आणि असावा. पण ते बर्‍यापैकी आपल्या कंडीशनींगने ठरते. त्यामुळे बायबल सारख्या ग्रंथांचे पंथ तयार होतात. मला विवेकानंदांचे शिकागोतील भाषण खूप आवडायचे. अलिकडे वाचल्यावर लक्षात आले की त्यांच्या काळाकरता त्यांची (दूर-)दृष्टी खरंच वाखाणण्याजोगी होती, पण जे. कृष्णमुर्तींप्रमाणेच ते देखिल अतिशय बांधेसुदपणे आपले विचार मांडतात आणि कुठेतरी एक उडी (अतर्क्य) मारतात. ती जर तुम्ही मिस केलीत तर पुर्णपणे भारावून जायला वेळ लागत नाही.

सुदैवाने कथा-कादंबर्‍यांना त्या निकशाची गरज नसते. त्याचमुळे एलिस ईन वंडरलँड, विनी द पूह, डॉन कियोट यासारखी उत्कृष्ठ पुस्तकं बनु शकली. ही लहानांची जरी समजल्या जात असली तरी मोठ्यांना ती वाचण्यात जास्त मजा येते (येऊ शकते). मराठीमधील विंदा करंदिकरांचे साहित्य याच प्रकारात मोडणारे व त्याच दर्जाचे आहे.

गेल्या काही वर्षात २-३ अतिशय सुंदर पुस्तकं वाचली. वाचायला एका अर्थाने थोडी कठीण पण त्यांच्यातील मार्मीक अशा विव्ह-पॉईंट्स मुळे ती लक्षात राहिलि:
(1) His Masters Voice (Stanislaw Lem)
(2) One Hundred Years of Solitude (Gabriel García Márquez)
(3) Glass Bead Game (Hermann Hesse)

वर नमुद नव्हती झाली म्हणुन कराविशी वाटली

वरील सर्व I.M.H.O Happy

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

Pages