अ‍ॅपल पाय - एक प्रयत्न

Submitted by अव्यक्त on 9 January, 2012 - 22:42

या वेळेस नविन वर्षाच्या स्वागतासाठी अ‍ॅपल पाय करुन पहावे असे ठरवले. त्याला कारण म्हणजे अ‍ॅल्टन ब्राउनची टिव्ही/इंटरनेट वरची रेसिपी व ऑफिसमधे त्यावर झालेली चर्चा आणि त्याबद्दल सहकार्‍यांनी दिलेले प्रोत्साहन.

अ‍ॅल्टन ब्राउनची रेसिपी ईथे मिळेल. तिच पाककृती वापरली असल्यामुळे नेह्मीच्या विभागात न देता प्रत्यक्ष पाय बनविताना आलेले अनुभव, केलेले बदल लिहावेत असे वाटले व त्याबरोबर काही प्रकाशचित्रे टाकली आहेत.

Apple Pie M - 1.jpg
ताजी सफरचंद : ग्रॅनी स्मिथ, ब्रेबर्न, रेड डिलीशिअस व ह्नीक्रिस्प्(डावीकडून उजवीकडे)

Apple Pie M - 2.jpg
सफरचंदांची सालं काढून त्याच्या फोडी केल्या. अ‍ॅपल कोअरर वापरुन

Apple Pie M - 3.JPG
त्यावर साखर, अ‍ॅपल जेली, सायडर घालून मिसळ्ले.

Apple Pie M - 4.JPG
टार्ट पॅनमध्ये पाय क्रस्ट्चा खालचा भाग ठेवून त्यावर सर्व फोडी रचल्या.

Apple Pie M - 5.JPG
क्रस्ट्चा वरचा भाग त्यावर लावून पाय ओव्ह्नमधे जाण्यासाठी सज्ज

Apple Pie M - 6.JPG
त्यापुर्वी शेवटचे काम - क्रस्टवर ग्लेझचा हलकासा थर दिला.

Apple Pie M - 7.jpg
ओव्ह्नमधून नुकताच बाहेर काढलेला पाय.

Apple Pie M - 8.JPG
ह्यानंतर शेवटची सगळ्यात अवघड कृती - किमान ४ तास वाट पहाणे, जेणेकरुन खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे थंड झाल्यावर पॅनमधून सहज काढता येईल.

चवीला पण चांगला झाला होता असे वाटते, कारण २४ तासांत संपला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users