परस्परसंबंध ओळखा स्पर्धा - १

Submitted by माध्यम_प्रायोजक on 6 January, 2012 - 03:25

'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केलेल्या आहेत काही मजेदार स्पर्धा!!!

त्यांपैकी पहिली स्पर्धा म्हणहे परस्परसंबंध ओळखा स्पर्धा.

ही एक 'कोडे सोडवा' प्रकारची स्पर्धा आहे. प्रत्येक कोड्यात विविध चित्रे, संकेतस्थळांचे दुवे, ध्वनीचित्रफितींचे दुवे इत्यादी असतील. त्या कोड्यातील प्रत्येक चित्र इत्यादींचा 'जन गण मन' या चित्रपटाशी काही संबंध आहे.

तुम्हांला फक्त त्या कोड्यात दिसत असलेल्या गोष्टींचा एकमेकींशी काय संबंध आहे, किंवा गोष्टींमधील समान धागा काय, हे ओळखून या धाग्यावर लिहायचे आहे. आता या समान धाग्याचा चित्रपटाशी काय संबंध आहे, हे मात्र तुम्हांला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. :)

खाली तीन चित्रं आणि यूट्यूबवरच्या एका ध्वनिचित्रफितीचा दुवा दिला आहे.

Quiz_1.jpg

या चित्रांचा आणि ध्वनिचित्रफितीचा आपल्या 'जनगणमन' या राष्ट्रगीताशी काहीएक संबंध आहे.

हा संबंध काय, हे तुम्ही ओळखायचे आहे.

समान धागा, म्हणजेच परस्परसंबंध ओळखण्यासाठी तुम्ही कितीही वेळा प्रयत्न करू शकता, कितीही वेळा उत्तर देऊ शकता. यासाठी तुम्ही कुठल्याही माहितीस्रोतांचा वापर करू शकता.

मात्र पूर्ण उत्तरंच स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जातील. तीनही चित्रांचा आणि ध्वनिचित्रफितीचा संबंध उत्तरात असणे आवश्यक आहे.

बाफवर जे उत्तर सर्वप्रथम बरोबर असेल त्याला बक्षीस मिळेल. बरोबर उत्तर जेव्हा येईल तेव्हाच आम्ही तसे जाहीर करू. चूक उत्तराला आमच्याकडून काहीच प्रतिसाद मिळणार नाही. जोपर्यंत आमच्याकडून 'हे बरोबर उत्तर आहे' असे जाहीर केले जात नाही, तोपर्यंत तुम्ही कोडे सोडवण्याचे प्रयत्न चालू ठेवावेत, अशी विनंती.

आलेल्या सर्व उत्तरांमध्ये कुठलेच उत्तर अचूक नसेल, तर अचूक उत्तराच्या सर्वात जवळ जाणारे उत्तर 'बरोबर' म्हणून निवडले जाईल. याबाबत संयोजकांचा निर्णय अंतिम असेल.

उत्तर देताना 'उत्तर कसे काढले' हे सांगणे आवश्यक नाही, परंतु स्पष्टीकरण दिले तर स्पर्धेची रंगत वाढते हे मात्र नक्की. :)

या स्पर्धेच्या विजेत्याला मिळेल पुण्यात २६ जानेवारी, २०१२ रोजी होणार्‍या 'जन गण मन' या चित्रपटाच्या प्रीमियर शोचं एक तिकीट, किंवा मुंडू टिव्हीचं हा चित्रपट एकदा पाहण्यासाठीचं सबस्क्रिप्शन. त्यामुळे तुम्ही भारतात नसलात तरी या स्पर्धेत भाग घेऊ शकता.

तुम्हांला सर्वांना शुभेच्छा. :)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिले छायाचित्र श्रीमती मार्गारेट कझीन्स. 'जन गण मन' ला ज्यांनी चाल लावली. (धन्स 'आस')

मधले छायाचित्र श्रीमती अ‍ॅनी बेझंट यांचे आहे.
रविंद्रनाथ टागोरांनी रचलेल्या आपल्या 'जन गण मन' ला चाल लावली होती श्रीमती मार्गारेट कझिन्स (Margaret Cousins) यांनी. ज्या तेव्हा आंध्र प्रदेशातील मदनापल्ली (किंवा मिदनापल्ली) येथील श्रीमती बेझंट याचे नाव असलेल्या "बेसन्ट थिओसॉफीकल कॉलेजच्या" प्राचार्या होत्या. त्यांनी सुचवलेल्या अनेक चालीपैकी गुरुदेवांनी एक चाल स्विकारली जी आज आपण 'राष्ट्रगीतासाठी' वापरतो.
या कॉलेजमध्येच टागोरांनी आपल्या राष्ट्रगीताचे इंग्रजी भाषांतरही केले होते. ज्याची एक प्रत आजही 'बेसन्ट थिओसॉफिकल कॉलेजच्या' वाचनालयात ठेवलेली आहे.
गुरुदेव या कॉलेजला 'दक्षीणेचे शांती निकेतन' म्हणत असत.

तिसरे छायाचित्र आहे 'द मॉर्निंग रागा" या चित्रपटातील. आणि टागोरांनी 'जन गण मन' चे जे इंग्रजी भाषांतर केले होते त्याला The Morning Song of India असे म्हटले जाते.

परिचय मधल्या या गाण्याचा 'जन गण मन' शी असलेला संबंध लक्षात येत नाही. बहुदा असे असावे. राहुल देव बर्मन अर्थात पंचमजींच्या मातोश्री या गुरुदेव टागोरांच्या शांती निकेतनच्या विद्द्यार्थिनी होत्या. त्यावेळचं त्यांचं नाव 'मीरा दासगुप्ता' हे होतं. राजघराण्यातील सचीन देव बर्मन यांनी 'मीरा दासगुप्ता' या सामान्य मुलीबरोबर लग्न केल्यामुळे त्यांना (सचीनदेव बर्मन यांना) आपल्या घराबरोबरचे सर्व संबंध तोडावे लागले होते असे म्हटले जाते.
अजुन एक म्हणजे ध्वनीचित्र फ़िती मधील गाण्याचे बोल.."सारे के सारे गामा को लेकर गाते चले" म्हणजे सगळे मिळुन एकत्र येवुन गाणं म्हणताहेत. राष्ट्रीय एकात्मता Proud राष्ट्रगीताचीही संकल्पना हिच तर आहे. Happy

तिसरं चित्र 'मॉर्निंग रागा" सिनेमाचं आहे आणि जन गण मन ला रविन्द्र्नाथांनी इन्ग्रजी भाषांतरात "मॉर्निंग साँग ऑफ इन्डिया" नाव दिलय.

जन गण मन राग बिलावल मध्ये आहे जो सकाळचा राग आहे.

पहिले छायाचित्र श्रीमती मार्गारेट कझिन्स (मिसेस जेम्स कझिन्स ) ज्यांनी 'जन गण मन' ला चाल लावली .
दुसरे छायाचित्र श्रीमती अ‍ॅनी बेझंट यांचे ज्यांच्या नावाच्या कॉलेजमधे सध्या 'जन गण मन' ची ओरिजिनल कॉपी ठेवलेलीआहे.
तिसरे छायाचित्र 'मॉर्निंग रागाचे' जन गण मन ला "मॉर्निंग साँग ऑफ इन्डिया" असे ओळखले जाते.
परिचयमधले गाणे आणि जन गण मन' हे दोन्ही 'बिलावल' रागात आहे.

ओह नो....
मी सगळी नावे ट्राय करुन बघीतली पण हे एकच नाव दुर्लक्षीले गेले. केवढा बावळटपणा माझा Happy
"बिलावल" रागाची माहिती मात्र नवीन आहे माझ्यासाठी. धन्यवाद Happy

उत्तर देताना 'उत्तर कसे काढले' हे सांगणे आवश्यक नाही, परंतु स्पष्टीकरण दिले तर स्पर्धेची रंगत वाढते हे मात्र नक्की. Happy >> जन गण मन च्या विकीवर बरीचशी माहिती आहे. त्यातील काही नावे गुगल केल्यावर, पहिला फोटो मार्गारेट कझिन्सबरोबर जुळला .http://www.greatirishpeople.com/portraits.php?portraitid=margaret-cousins

दुसरा आणि तिसरा फोटो ओळखता आला. म्हणून संबंध लावता आला.

http://www.asavari.org/songs.html इथुन शेवटचा संबंध लावला.
http://www.asavari.org/ragamala.html#Bilawal यात हा सकाळचा राग आहे असे म्हटलेय त्यामुळे तिसर्‍या फोटोचा संबंध रागाबरोबरपण लावता येइल.

मी ही याच पद्धतीने शोधत गेलो. पण संगीताच्या बाबतीत बर्‍यापैकी औरंगजेब असल्याने ते डोक्यातच आले नाही. मी परिचयचे संगीतकार आर.डी. पण बंगाली होते, म्हणून त्याच अंगाने शोध घेत गेलो. पण मजा आली Happy

पहिले छायाचित्र श्रीमती मार्गारेट कझिन्स (मिसेस जेम्स कझिन्स ) ज्यांनी 'जन गण मन' ला चाल लावली .
दुसरे छायाचित्र श्रीमती अ‍ॅनी बेझंट यांचे ज्यांच्या नावाच्या कॉलेजमधे सध्या 'जन गण मन' ची ओरिजिनल कॉपी ठेवलेलीआहे.
तिसरे छायाचित्र 'मॉर्निंग रागाचे' जन गण मन ला "मॉर्निंग साँग ऑफ इन्डिया" असे ओळखले जाते.
परिचयमधले गाणे 'सा रे के सा रे' आणि जन गण मन' हे दोन्ही 'बिलावल' रागात आहे. जो 'मॉर्निंग रागा' आहे.

परिचयमधले गाणे 'सा रे के सा रे' आणि जन गण मन' हे दोन्ही 'बिलावल' रागात आहे. जो 'मॉर्निंग रागा' आहे.>>> ग्रेट Happy

मी पण सगळेच बंगाली यापध्द्तीने शोधले आधी. 'आशा भोसले' सोडुन बाकी सगळी नावे बंगाली होती.

आस,
तुमचं हार्दिक अभिनंदन Happy

तुम्ही दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे.

बक्षिसासंदर्भात लवकरच तुमच्याशी संपर्क साधला जाईल.

विशाल,
तुमचंही अभिनंदन Happy कोडं प्रकाशित केल्यावर अगदी थोड्या वेळात तुम्ही उत्तराच्या जवळ पोहोचलात.

मंडळी,
पुढची स्पर्धा लवकरच जाहीर केली जाईल.. या स्पर्धांमध्ये भाग घ्या आणि मिळवा आकर्षक बक्षिसं, आणि 'जन गण मन' हा चित्रपट बघण्याची संधी!!!