पंख परीचे...

Submitted by प्रसिक on 4 January, 2012 - 04:56

एक जानेवारीची सकाळ निसर्गाच्या सानिध्यात, फुला-फुलांमभून मध गोळा करत भिरभिरणाय्रा फुलपाखरांच्या सहवासात गेली तर त्यापेक्षा नवीन वर्षाची सुंदर सुरवात आणखी ती काय होणार. ड्युटीच्या तासांमुळे थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनचे बारा वाजलेच होते, पण त्यामुळे सकाळी मात्र साडेपाच वाजताच जाग आली. पनवेलवरून ठाणे-ओवळा ईथे पोहोचायला जवळपास दिड तास लागतो, ट्रॅफिक मधे फसल्यावर किती वेळ लागेल याचं कॅलक्युलेशन करून घरातुन जरा लवकरच निघालो. आदल्या दिवशी मि. राजेंद्र ओवळेकरांकडे बोलणे झालेच होते. सूर्यकिरण आल्याशिवाय फुलपाखरे येत नाहीत त्यामुळे त्यांनी सकाळी ९:३० पर्यंत पोहचायला सांगितले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बरोब्बर साडे-आठ वाजता म्हणजे एक तास आगोदर त्यांच्या बागेत हजर झालो Happy

आम्ही पोहोचण्यापूर्वी आणखीही काही हौशी निसर्गप्रेमी स्वेटर घालून आलेले होते. त्यामधे एक ३-४ वर्षाची फुलपाखरांच्या डिझाईनचे शुज घातलेली चिमुरडी देखील होती. सोबतीला हा BLACK DRONGO देखिल सकाळची न्याहरी करायला आला होता.
प्रचि. क्र.१-
Black drongo
मि. राजेंद्रनीं त्या चिमुरडीला देखिल समजेल अशा शब्दांत फुलपाखरांच्या जीवनक्रमातील अंडी, आळ्या(सुरवंट), कोश (प्युपा) आणि सर्वात शेवटी फुलपाखरू यांची माहिती देण्यास सुरवात केली.

प्रचि. क्र.२- लिंबाच्या पानावरील मोहरीच्या दाण्याएवढा आकार असलेली ही फुलपाखरांची अंडी.
Butterfly's Eggs

फुलपाखराची मादी अंडी देण्यासाठी लिंब, कडिपत्ता यांसारख्या झाडांची निवड करते, फुलपाखरानां अन्न मिळण्यासाठी ओवळेकर वाडीमधे विवीध प्रकारची १५० पेक्षा जास्त जातींची झाडे लावली आहेत.

प्रचि. क्र.३- त्यानंतर लिंबाच्या पानावरची हिरव्यारंगातली कॅटरपिलर. नेहमीप्रमाणे भाजीपाल्यातली किड बघितल्यावर ई-ई~ सारखे निघणारे शब्द कोणाच्याही तोंडातून आले नाहीत.
Catterpiller - Copy
प्रचि. क्र.४- फुलपाखरू उडून गेल्यावर मागे राहीलेला कोष
Pupa
प्रचि. क्र.५-आणखी एक कॅटरपिलर
Common Rose Butterfly's Catterpiller

यानंतर आमचा मोर्चा फुलझाडांकडे वळला आणि नवीन वर्षातली पहिली सकाळ रंगेबिरंगी होऊन गेली.

कॉमन मॉर्मन- हे फुलपाखरू क्रिम्प्सन रोझची मिमीक्री करण्यात पटाईत आहे.
Common Mormon Butterfly

प्रचि. क्र.६- कॉमन सेलर- फोटो काढताना याने अजिबात त्रास दिला नाही, शहाण्या मुलासारखा कॅमेरासमोर बसला होता.
Sommon Sailor Butterfly

प्रचि. क्र.७- कॉमन जॅझबेल- दिसायला सुंदर आणि मध पिताना अतिशय तल्लीन होऊन मध पितो, फोटोग्राफरच्या भाषेत सांगायचे तर एकदम फोटोजेनीक
Common Jezebel

प्रचि. क्र.८- क्रिम्प्सन रोझ
Crimson Rose Pachliopta hector

प्रचि. क्र.९-कमांडर:याचे ऊडणे म्हणजे एखाद्या ग्लाईडर प्रमाणे होते, फोटो काढताना दुर गेला कि लवकर परत येतच नाही
Commander butterfly

प्रचि. क्र.१०- ब्ल्यु टायगर
Blue Tiger Butterfly

प्रचि. क्र.११- साईक- जमिनीपासुन जेमतेम एक फुट उंचीवर हे फुलपाखरू फडफडते आणि स्थीर झाल्यावर एखाद्या फुलाच्या पाकळीसारखे भासते
Psyche butterfly

प्रचि. क्र.१२- कॉमन ग्रास यलो- नावाप्रमाणेच कॉमन, सर्वत्र आढळणारे
Common grass yellow butterfly

प्रचि. क्र.१३- जोडी बॅरोन
Jodi baron female butterfly

प्रचि. क्र.१४- टेल-जे: फोटोग्राफीसाठी या सायबांनी सर्वात जास्त मेहनत करून घेतली, फुलांवर देखिल नुसतं भिरभीर करताना मध कसा पित असेल त्याचं त्यालाच माहीत.
Tailed jay butterfly

प्रचि. क्र.१५- ऑरेंज-टिप- या ट्रीपमधे दिसलेला सर्वात सुंदर फुलपाखरू, प्रथम दर्शनीच सर्वांचे मन मोहून घेतले, फोटो काढण्यासाठी एका जागेवर थांबतच नाही.
Orange tip butterfly

प्रचि. क्र.१६- डॅम्सेफ्लाई म्हणजेच सुई, सुकलेल्या पालापाचोळ्यात हिला शोधणे म्हणजे अक्षरशः गवतात सुई शोधण्यासारखे होते.
Damselfly

प्रचि. क्र.१७- क्रिम्सन रोझ
Crimson Rose, Pachliopta hector

प्रचि. क्र.१८- कॉमन वॅडंरर: दोन चित्रांमधील फरक ओळखा स्पर्धेसाठी याला 'टायगर ब्ल्यु' सोबत उभा केला पाहिजे Happy
Common wanderer butterfly

प्रचि. क्र.१९- कॉमन बुश बटरफ्लाय
Common bush brown butterfly

प्रचि. क्र.२०- कॉमन बॅरोन बटरफ्लाय
Common baron butterfly

या नंतर दिसलेली फुलपाखरांची नावे समजू शकली नाहीत, मि. राजेंद्र यांच्या सभोवताली क्राउड असल्याने आम्ही स्वःतच दुरवर भटकत होतो Lol
प्रचि. क्र.२१-
081
प्रचि. क्र.२२-
100
प्रचि. क्र.२३-
215
प्रचि. क्र.२४-
251
प्रचि. क्र.२५-
241
प्रचि. क्र.२६-
241
प्रचि. क्र.२७-
227
प्रचि. क्र.२८-
198
प्रचि. क्र.२९-
195

सकाळी स्वागताला हजर असणाय्रा या जोडीचा फोटोग्राफ घेतल्यावरच आम्ही फुलपाखरांच्या बागेचा निरोप घेतला
255

गुलमोहर: 

मस्तच.. नि ऑरेंज-टिप आपला पण फेवरीट.. Happy

प्रचि २४ मधे फांदीला अडकवलेले काय आहे? >> फळांचा भुसा असावा.. पाखरांना आकर्षित करण्यासाठी..

सुंदर फोटो आहेत.
सहज एक निरीक्षण, या ठिकाणी काही ठरविक जातीचीच फुलपाखरे दिसताहेत.
मला गोव्यात जास्त प्रकारची दिसायची.

प्रतिसादांसाठी सर्वानां धन्स,
प्रचि २४ मधे फांदीला अडकवलेले काय आहे? >>> फुलपाखरानां आकर्षीत करण्यासाठी ईथे ट्रे मधे अननस, चिक्कू सारख्या फळांचे तुकडे ठेवलेले आहेत. त्याच बरोबर जमेकन ब्ल्यू, कॅलेंडर सारखी फुलझाडे देखिल आहेत
ओवळेकर वाडी का?>>>>> होय Happy

वॉव सही फोटो! २७ भारी !
हे ठिकाण नक्की कुठे आलं ? अन सर्वांना जायला परवानगी आहे का ? धन्यवाद शेअर केल्याबद्दल Happy

सुंदर.

Thanks,
हे ठिकाण नक्की कुठे आलं ? अन सर्वांना जायला परवानगी आहे का ? @ अवल, ओवळेकर वाडी ठाणे-घोडबदंर रोडवर ओवळा गावात आहे, फक्त रविवारी सकाळी तिथे भेट देताना येते. ओवळेकर वाडीचे प्रो.प्रा. राजेंद्र ओवळेकर यानां 09820779729 या नंबरवर संपर्क करून ईतर माहिती मिळवता येईल.
ओवळेकर वाडीला जाताना 'एजंल्स पार्क' नावाची आणखी एक बटरफ्लाय गार्डन आहे, तिथे देखिल अवश्य भेट द्या Happy