गुळ उत्पादन व विक्री व्यवसाय

Submitted by चंपक on 20 January, 2010 - 21:57

ग्रामीण भागातील शेती मध्ये दुध अन ऊस हे महत्वाचे घटक आहेत! दुधाचे काम सुरु आहे. मग ऊसाबद्दल विचार सुरु केला..... साखर कारखाना काढण्याची ऐपत तर नाही! पण एक १०० टन प्रतिदिन गाळप क्षमतेचे गुळ उत्पादन केंद्र (गुर्‍हाळ/ खांडसरी/कहाकी-काकवी) बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

काही सरकारी अन काही खाजगी बॅन्कांकडे तीस लाख रुपयाच्या प्रकल्पाला ६० लाख रुपयाचे तारण देऊनही कर्ज मिळेना! सॅटरडे क्लब ह्या मराठी व्यावसायीकांच्या संघटनेलाही साकडे घातले...पण हाती आले शुन्य! शेती अन पुरक उदयोगांची हीच खरी अडचण आहे....इथुन परतल्यावर पुन्हा प्रयत्न करेलच!

यासंदर्भात सध्या काही गोष्टी करतो आहे-
१) गुळ बनवण्याच्या आधुनिक प्रक्रियेबद्दल माहीती मिळवणे.
२) ज्य लोकांची गुर्‍हाळे सध्या सुरु आहेत त्यांचेशी कायम संपर्कात राहणे.
३) कोल्हापुर/सातारा भागातील मित्रांकडुन याबद्दल अधिक माहिती मिळवणे.

....चंप्या गुळवाला!

********
आरती यांनी दिलेल्या पत्तावरुन जय किसान ऑरगॅनिक जॅगरी (सेंद्रिय गुळ) उत्पादन केंद्र, केरली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापुर येथील श्री मारुती पाटील यांना संपर्क केला. अस्सल कोल्हापुरी टोन मध्ये अध्यात्मिक पिंड असलेला शेतकरी माणुस मिळाला! आरतीला धन्यवाद!

जय किसान ऑरगॅनिक जॅगरी (सेंद्रिय गुळ) उत्पादन केंद्र मध्ये, निवाळ सेंद्रिय खतावर पिकवलेल्या उसावर प्रक्रिया करुन गुळ निर्मीती केली जाते. देशभरात त्याची विक्री होते. परदेशात पाठवायला गुळ च शिल्लक राहत नाही! कुणाला हवा असेल तर त्यांचेशी संपर्क करा! (आधी माझेकडुन नंबर घ्या!)

त्यांचे एक सहकारी श्री बागल सर (जे डी. फार्म. कॉलेजवर प्राध्यापक आहेत) ते देखील सेंद्रीय गुळ, तांदुळ, गहु चे उत्पादन घेतात. त्यांची उत्पादने भारतातील पंचतारांकित हॉटेल अन लंडन येथे विकली जातात. कुणाला हवा असेल तर त्यांचेशी संपर्क करा! (आधी माझेकडुन नंबर घ्या!)

श्री बागल व श्री पाटील अन त्यांचे ६८ शेतकरी मित्र मिळुन वसुंधरा सेंद्रीय शेतकरी संघटना चालवतात. शेतकर्‍याच्या मालाला योग्य मोबदला मिळावा म्हणुन प्रयत्न करीत असतात. त्यांना अनेक शुभेच्छा Happy

*********

श्री सुनिल परचुरे ह्यांनी लिहिलेल्या कोल्हापुर कि गुळपुर च्या अनुशंगाने दोन व्हिडेओ:

सदर व्हिडीओ हे यु.पी. टाईप गुर्‍हाळाचे आहेत. कोल्हापुर टाईप मध्ये एकच कढाई/काहिली असते. ह्यात तीन ते चार असतात.

१) ह्यात उसाचा रस बनवण्याचे क्रशर आहे. अगदी कमी खर्चात @ १५ लाखात हे उपयुक्त काम केले गेले आहे. क्षमता: ५०-६० टन प्रति दिन उस गाळप. मेकॅनिकल इंजिनीअर नी यावर कॉमेंट करावी अशी अपेक्षा आहे.

http://www.youtube.com/watch?v=lwnNpceVpmA

२) हा व्हिडेओ पाहण्या अगोदरः इथे बनलेला गुळ हा खाण्यासाठी नसुन, गुजरात, दीव, दमन ला डिस्टीलरी मध्ये लागणारा गुळ आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी अस्वच्छता खुप आहे.
http://www.youtube.com/watch?v=fFxM9zgSsNk

३) कोल्हापुर टाईप चे गुर्‍हाळ मधील काहील. (श्री सुनील परचुरे ह्यांचे कडुन साभार!)
http://www.youtube.com/watch?v=XOCxKzuJKGc

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा उघडून चांगले काम केलत चंपक.
काकवी टिकते का? टीनपॅक करता येइल का? अश्या काकवीला ग्राहक असतील का?
चंपक लवकर सुरु होवू देत गुर्‍हाळ! ताजा गुळ खायला न काकवीसाठी येणार बघ मी!

१) काकवी टिकते का? टीनपॅक करता येइल का?
- हवाबंद डब्यात वर्षभर टिकते.

२) अश्या काकवीला ग्राहक असतील का?
- प्रचंड. जिथे काकवी बनवली जाते, तिथे मुंग्या/ मधमाश्या सारखे लांबुन लांबुण ग्राहक येतात.

माझ्या मित्राचे माझ्या गावाजवळच एक छोटे गुर्‍हाळ आहे. तो काकवी बनवतो. (लोक भांडे घेउन येतात, काकवी न्यायला!) त्याचे गुर्‍हाळ जानेवारी एन्ड किंवा फेब ला सुरु होईल असा अंदाज आहे. ते सुरु केले अन स्थानिक बाजारात विकुन जर काकवी उरली तर नगर, पुण्यात मार्केटीग करायची योजना आहे.

मी घेतो , माझी ऑर्डर नोंदवा .
- आपण काय घेता! Happy ते सोदाहरण स्पष्ट करा@ Happy

************
जर युएस ला काही स्कोप असेल तर बघु शकाल का? पुण्यात काही नेटवर्क असेल तरी उत्तम. आपण कोल्हापुर च्या शेतकर्‍यांना मार्केटिंग ला मदत करु शकु. मी त्यांना एक्स्पोर्ट संदर्भात परवाणे मिळवण्याचे सुचवले आहे.

युएस मध्ये फुड प्रॉडक्ट इम्पोर्ट करायला एफडीए च्या खुप सार्‍या किचकट पॉलीसीज आहेत.
नक्की माहीती नाही , पण बहुतेक ह्या रेस्ट्रीक्शन्स मुळेच मागे इथल्या इंडियन ग्रोसरी स्टोअर मध्ये तांदुळसुद्धा वेळेवर मिळाला नव्हता .

हे काही एजंटस अमेरिकेत फुड इम्पोर्ट करण्याचा परवाना मिळवण्यासाठी मदत करतात. मला प्रत्यक्ष अनुभव नाही. पण ती प्रक्रिया बरीच किचकट आहे असे ऐकून आहे. किंवा जगात अमेरिकेत सगळ्यात जास्त किचकट आहे त्यामुळे बहुतेक उद्योजक आधी इतर देशांशी व्यापार करून मग शेवटी अमेरिकेचा विचार करतात (विशेषतः अन्न आणि औषधे या क्षेत्रातल्या).

http://fdaagents.com/
http://www.registrarcorp.com/food.jsp?lang=en

अमेरिकेत भारतातून अन्न मोठ्या प्रमाणात आयात करून इथे डिस्ट्रीब्यूट करणार्‍या काही कंपन्या आहेत. शक्य असेल तर आधी त्यांच्या बरोबर गेले तर सुरूवातीच्या कायद्याच्या कचकटी सोडवायला मदत होऊ शकते.

हे एक मोठे डिस्ट्रीब्यूटर आहेत
http://www.rajafoods.com/home.htm

USA मधे आन्खि एक गोश्त म्हन्जे ग्रोसरि store मधे एक प्रशन विचारतात What is shelf life of the product. 1 year shelf life is good thing. तुम्हाला जर agent चि महिति हवि आसेल तर मि लोकल contact तुम्हाला देवु शकतो. And the store would first like to keep the product on shelf on experiement basis to see how much is demand etc. As Ajay suggested the process is cumbersome and you need a export license. (FDA) approved.

गुळासाठी स्वतंत्र बोर्डाची आवश्‍यकता

गूळ हा आरोग्यदायी व जीवनावश्‍यक शेतमाल आहे. राज्याच्या सर्व भागांत ऊस आणि साखर कारखानदारी आहे. पण गूळ उद्योग मात्र विखुरलेल्या अवस्थेत आहे. गूळ करण्याच्या पद्धती, गुऱ्हाळघरांची रचना, तेथील वातावरण, भरणीपासून पॅकेजिंगपर्यंत आणि मालाची चव, आकार, प्रकार, विक्रीपर्यंत या उद्योगात कोठेच सुसूत्रता नाही. जो तो शेतकरी, गुऱ्हाळमालक, गुळवी त्याच्या त्याच्या मर्जीप्रमाणे यंत्रणा राबवितात.

http://72.78.249.125/esakal/20100211/5537726258605762717.htm

<काही सरकारी अन काही खाजगी बॅन्कांकडे तीस लाख रुपयाच्या प्रकल्पाला ६० लाख रुपयाचे तारण देऊनही कर्ज मिळेना!>

अमेरिकेत याच्या उलट परिस्थिती होती. म्हणून उद्योगधंदे वाढले, पण पुढे त्याचा अतिरेक झाल्याने देशाची अर्थव्यवस्था बुडाली! पण भारताची आर्थिक परिस्थिती भक्कम राहिली. हळू हळू भारतीयांना पण धीर येईल, थोडा धोका पत्करून कर्ज द्यायला.

UAS म्हणजे अमेरिका? U S A असे आहे ते. खरे तर आपण आपले 'उसगाव' म्हणावे. ते नाही का भारताला इंडिया म्हणत? किंवा इतर देशांच्या नावाची मोडतोड करत?

काल ऑस्ट्रेलियन मेड 'काकवी' टेस्ट केली. खुप दिवस शोधत होतो. काल एका सुपर्मार्केट मध्ये मिळाली.

३.५५ ऑ. डोलर. ला ५५० ग्रॅम! स्वस्त पन अतिशय सुमार दर्जाची!

भारतात माझा मित्र बनवतो तो दर्जा खुपच चांगला वाटला! अन ते ही फक्त ७५ रु. किलो! Happy

सेंद्रिय गुळ विक्रीसाठी उपलब्ध

नको होळी, नको दिवाळी !
दररोज खा "सेंद्रिय गुळाची" पुरण पोळी!!

"महाराष्ट्र ऑर्गॅनिक फेडरेशन" कडुन प्रमाणित केलेला १०० % सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केलेल्या ऊसापासुन बनवलेला "सेद्रिय गुळ" विक्रीसाठी उपलब्ध आहे.

दरः १ किलो : रु. १००/-
१० किलो : रु. १०००/-

संपर्क : ५-६. पुजा गार्डन, "रायसोनी पतसंस्थे" समोर, "बी.एस्.एन्.एल. ऑफीस" समोर, सेक्टर २६,
आकुर्डी रेल्वे स्टेशन च्या शेजारी, निगडी प्राधिकरण, पुणे-४११ ०४४
फोनः ९५०३ ६३६ ९९९
ई मेलः kardakwadi@gmail.com

माझा एक मित्र नुकताच जपानवारी करुन आला. त्याच्या सांगण्यानुसार तिकडे साखर खात नाहीत. त्यामुळे सेंद्रीय गुळाला मागणी आहे. इथे जपानचं कुणी असेल तर खुलासा करावा.

धन्यवाद!

जपानला पाठवण्या इतपत जास्तीचे उत्पादन पुढील वर्षी अपेक्षित आहे. तोवर माहिती घेतो. सध्या फार फार ५० टन माल उपलब्ध असेल.

आपल्या भागातील जास्तीत जास्त लोक घेणारे असतील तर माल घरपोहच करण्याचे व्यवस्था केली जाईल. लवकरच पुणे परिसरातील मोठ्या दुकानांमध्ये माल उपलब्ध करुन देण्याचे व्यवस्था करतो आहे.

(मागणी मोठी असेल तर ट्रक पाठवुन देतो . मी दुकाणाच्या वरच राहतो... प्रत्यक्ष आलात तर मोफत चहा मिळेल .. गुळाचा! Happy )

जपानमध्ये साखर खात नाहीत हे आहेच. पण गूळ वापरण्यासारखा एकही पदार्थ त्यांच्या खाण्यात नाही. निदान विचार करुनही लक्षात येत नाही.
चंपक, अभिनंदन

अरेरे...जपानमधले लोक आमटीत गूळ घालीत नाहीत का? चिंच गुळाची आमटी शिंच्याना माहीतच नाही. हाय कंबख्त तू (आमटी)पीही नही...

USA मधे आन्खि एक गोश्त म्हन्जे ग्रोसरि store मधे एक प्रशन विचारतात What is shelf life of the product. 1 year shelf life is good thing.

एखाद्या खाण्याच्या वस्तूचं शेल्फ लाईफ १ वर्षापर्यंत ठेवायचं असेल तर त्यात रसायने, प्रिझर्वेटीव्ज टाकावी लागतातच कां??. हे न टाकता शेल्फ लाईफ वाढू शकते कां?? जर शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी हे टाकावे लागत असेल तर हे सेंद्रीय कसे??

हे न टाकता शेल्फ लाईफ वाढू शकते कां?? जर शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी हे टाकावे लागत असेल तर हे सेंद्रीय कसे??>> + १ मलाही हे जाणुन घ्यायला आवडेल. कोणी खुलासा करु शकते का?

maazyaa mistrancha mobil repair che dukaan aahe tya barobar ajun kai jod dandha kela tar faida hoil pls suggest kara

Pages