रेखाटन

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

eyes.png

MS Paint मधे केलेले एक रेखाटन.

.

आयटी
छानच आहे रेखाटन. तू सुमोपेंट ट्राय केलंस का? जबरदस्त आहे.

आजच पाहिलं गं मी सुमोपेंट माधुरी. आवडलं मलाही.
गुरुकाका, आधी चित्र काढलं होतं. आता तिथे लावलय.
सास, धन्यवाद.

छान आहे,
आम्हाला फक्त रेषा, वर्तुळ आणी चौकोन काढता येतं एम. एस. पेन्ट मध्ये Sad
कीप इट अप (मराठी - असाच प्रयत्न पुढेही सुरु ठेवा बहुतेक- बरोबर ना? नाहीतर पुन्हा कोणीतरी बोलणार मला Happy

छान काढले आहे.
केस जरा विरळ वाटत नाहीत का?
Paint मध्ये असं चित्र काढायला किती वेळ लागतो?

संदीप, तुम्ही मराठी कंसाच्या बाहेर आणि इंग्रजी कंसाच्या आत लिहावं अशी अपेक्षा होती.. Proud
(गम्मत करतोय, हलकेच घ्या)

चांगलं जमलंय ! पण अर्धाच चेहरा का गं काढलास?
************
विविध घटकांतून बाहेर पडणार्‍या ऊर्जेच्या उत्सर्जनाचा अभ्यास. तापमानाबरोबर उत्सर्जन लहरीमधेही फरक पडतो - "लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट" - विल्यम विन - फिजिक्स नोबेल (१९११)

आय टी साधना कोण?

माधुरी नाव चुकवल्याबद्दल सॉरी Happy दुरुस्ती केली आहे.
श्यामली, संदीप धन्यवाद. आश्विनी, डोळेच काढायचे होते फक्त. तसंही नाक वगैरे पेंटमधे नीटसं काढायला मला एवढं जमत नाही.
सचिन, विरळ नाहीयेत ते Proud लक्षच नाही दिलं किती वेळ लागला....

दोघंही स्पीचलेस झालात नं? Proud
थ्यांक्यू हां Happy

सक्ष्या, अरे त्या कवितान्च्या रतिबापेक्षा हे बर हे की! Happy
आयटे, चान्गला प्रयत्न! Happy पण हात अजुन स्थिर नाहीये, माऊस कोणता वापरतेस?
महत्वाचे म्हणजे पेण्ट मधे पेन सिलेक्ट न करता ब्रश सिलेक्ट करावा! Happy
चित्र काढताना २०० टक्के वाढवुन मोठ्या आकारात घ्यावे Happy
बाजुला एकेक भाग्/अवयव काढून ते मुख्य चित्रास जोडत जावे! म्हणजे बिघडले तरी बाजुस काढलेले बिघडते, मुख्य चित्र बिघडत नाही
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

सक्षम, जे चांगले असेल त्याला चागले म्हणावेच लागेल ... नाहि का ?

म्हंजे इथल्यांना (वाहवा करणारे) तूमचे लेखन आवडले
तर नक्की तूमच्या लेखनालापण इथले (वाहवा करणारे) वाहवा करतील.... Happy
आयटी मस्तच हं ! Happy

शैलजा छान आलय गं. अपनेको आवड्या.
--------------
नंदिनी
--------------

आयटे मस्त प्रयत्न. डोळे छान दिसताहेत अगदी भावांसकट..
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

किरु, भाऊ कुठायत? मला फक्त बहिणच दिसतेय !!!
************
विविध घटकांतून बाहेर पडणार्‍या ऊर्जेच्या उत्सर्जनाचा अभ्यास. तापमानाबरोबर उत्सर्जन लहरीमधेही फरक पडतो - "लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट" - विल्यम विन - फिजिक्स नोबेल (१९११)

डोळे मस्त आलेत्...मी कितीदाही प्रयत्न केला तरी दोन्ही डोळ्यांचा आकारपण सारखा काढता येत नाही पेंटमध्ये.. मग त्याच्यात भाव वैगरे दाखवणं तर दुरच..

आयटी, छान जमलय!

मल वाटतं नाकापर्यंतचा चेहरा काढून अन केस वगैरे विरळ काढून चित्राचा सगळा फोकस डोळ्यांवर आलाय. अन ते तर झक्कास जमलेत!! Happy

डोळे चांगले जमले आहेत !
बाकी अजुन बरीच मेहनत घ्यावी लागेल...जर शिकायचेच असेल तर ! Happy

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

सुन्या, नंदिनी, किरु, अल्पना, पन्ना धन्यवाद.
डोळेच महत्वाचे होते पन्ना Happy
>> जर शिकायचेच असेल तर !>>> प्रकाश, तुमच्या काही सूचना असतील तर जरुर सांगा. चित्रासंबंधी व्यवस्थित सूचना केल्या, तर त्यांचे स्वागतच आहे.

आयटी,
अजुन बरीच मेहनत घ्यावी लागेल>> हीच सुचना होती! Happy

रेखाटनाची सुरूवात कागद आणि पेन्सीलने होते.त्यावर बराच सराव करावा लागतो.
सुक्ष्म निरिक्षण आणि खूप संयमाने जर प्रयत्न केले तर त्यात फारसे काही अवघड नाही.असा माझा अनुभव.
डिजीटल रेखाटन माउसने निटसे जमत नाही.त्यासाठी एक स्केचबोर्ड आणि पेन(Pen Tablet)मिळतो. त्याने अगदी हाताने करतात तसे किंवा त्यापेक्षाही छान डिजीटल पेंटींग करता येते.यासाठी अ‍ॅडोब फोटोशॉप तर बेस्टच आहे ! 'स्केचबुक प्रो'हे पण चांगले आहे.यामधे मधे विंडोज पेंट पेक्षा जास्त टूल्स आहेत आहेत आणि युजर फ्रेंडलीही आहे.(ट्रायल व्हर्जन नेटवरुन डाउनलोड करता येते.)
मीही सध्या डिजीटल पेंटींगचा सराव करतोय. युट्युबवर बरेच व्हिडीओ लेसन्स आहेत. तेही रेफर करू शकता. मी इथे मला आवडलेल्या एकदोन लिंक देतोय.

http://www.youtube.com/watch?v=xT2sRNbKt5c

http://www.youtube.com/watch?v=5F2v0il58cU

अजुन रेखाटनासाठी शुभेच्छा ! Happy

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

लिंक्सबद्दल धन्यवाद प्रकाश. पहाते.