चिंकी, एक बिहारी प्रकार- फोटोसह

Submitted by दिनेश. on 18 December, 2011 - 11:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
एकंदर २०/२५ चिंकी होतील.
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
माझ्या बिहारी मित्राची बायको, सौ. रानीभाभी मिश्रा.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

फोटो अ‍ॅज युज्वल सुरेख Happy
हा प्रकार आवडला तर मुलाच्या डब्यासाठी चांगला पर्याय आहे पण तसे सारण भरुन, रोल्स खरपूस करुन नंतर कापले तरी तुमच्या फोटोतल्या सारख्या त्या वड्या एकसंध राहतील का ह्याची मला शंका वाटते. सारण बाहेर पडेल असे वाटले. करुन पाहिले पाहिजे.

अगो,
म्हणून तर मी गाजर वापरलेय. शिवाय रोल करतानाच अगदी घट्ट करायचा.
आणि हवे तर प्रत्येक चकती जरा हाताने दाबायची. मग नाही सारण येणार
बाहेर.

अरे भई ई तो हमार देस की फेमस डिसवा है! हमार दरभंगा के सुरेश की रानीभौजी बहूतही अच्छा बनाती है| उनसे सिखकेही दिनेसदा ने ये बनाया है |अगर आपको स्वाद चखना है तो तुरंत हमसे संपर्क करे|

अरेच्च्या. पाभे तूम्हाला कसं कळलं त्या दरभंगाच्या आहेत त्या. (खरेच त्या तिथल्या आहेत.) अगदी रोज मी त्यांच्याकडे चहा पितो, आणि महिन्यातून दोन / तीन वेळा जेवतोदेखील.

मस्त दिसतायत चिंक्या. पण अगोसारखाच प्रश्न मलाही पडलाय.
चिंक्यांच्या शेजारी दुसरं केचप घालून ठेवलंय तो काय प्रकार आहे?

आधी तळलेला प्रकार असेल म्हणून शेवट वाचला पण कणकेचा वापर केल्याचे वाचून व तेल कमी हे कळल्यावर करून बघेनच. छान बदल!

भाऊ

दुपारी लेकिला शाळेतुन आल्यावर पोळी भाजी भरवावी लागते ( अजुन नीट खात नाही, आणि एखाद्या घासाने बास करते स्वतः खाल्ले तर).

तुमच्या रेसिपी सारख्याच काही करते मी पण.

आजचा मेनु

पोळी ,भात
कोबीची बटाट्याच्या काचर्‍या घालुन भाजी होती.

भात गरम करुन तुप घातले. भाजी घालुन हाताने कुसकरला. पोळी गरम करुन त्यावर सगळे पसरले. थोडे श्रेडेड चिझ पसरले. रोल करुन तव्यावर तुप सोडुन भाजुन घेतले. चार तुकडे केले.

मस्त आहे प्रकार. बरेच वेळा हे असे टॅकोज ( पोळी आणि असेल ती भाजी + चिझ) करते आणि मग पिझ्झा कटर ने ४ / ५ तुकडे करायचे.

लेकिला टॅकोज आवडतात आणि मी पण खुश कारण भाजी पोटात जाते.

छान दिसतोय प्रकार, पण मिश्रण बाहेर येईल हीच भिती आहे, शिवाय कापताना हि नीट कापले जाईल का ततपप उडेल असं वाटतय. करून बघणेत येईल Happy

माझ्या फोटोतल्या चिंकी कापताना पण काही टवके उडालेले दिसताहेतच. यातला एक रोल मी तसाच ठेवला होता, दुसर्‍या दिवशी कापताना, जास्त सुलभतेने कापता आला.

Do you have any plans to visit Pune? > Biggrin डिश बद्दल आणखी काही म्हणत नाही.