या वेळेस सवाईमध्ये काही फोटो काढायला मिळाले. फार वेळ जाउ नये म्हणून काहीही संस्कार न करता ते फोटो इथे टाकतेय.
पहिल्या दोन दिवशी फोटो काढलेले चालतील असे वाटले नव्हते, त्या मुळे कॅमेराच नेला नव्हता. अन शेवटच्या दिवशी घाईत कॅमेराची बॅटरी चार्ज करायलाच विसरले. त्यामुळे काही कलाकारांचे फोटो नाही घेता आले.
या वेळेस स्टुडन्ट पास मिळाल्याने खुप पुढुन अनुभवायला मिळाला कार्यक्रम. अन त्याच मुळे फोटोही काढता आले. शिवाय सकाळच्या सेशन्सलाही फोटो काढायची परवानगी मिळाल्याने तिथलेही फोटो काढता आले.
मला फ्लॅश वापरायला अजिबात आवडत नाही, शिवाय फार पळापळ करून फोटो काढायलाही आवडत नाही. कलाकाराला अजिबात डिस्टर्ब न करता, आपल्या जागेवर बसूनच फोटो काढायचे हा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे अनेक बंधने येतात, फोटो अगदी खुप मनासारखे नाही मिळत . पण मी अल्पसंतुष्ट आहे
आशा आहे तुम्हालाही आवडतील हे फोटो. ( सगळ्यांच्या उपाध्या नक्की माहिती नाही म्हणून फक्त नावं लिहितेय, क्षमा करावी )
यात कद्री गोपालन अन व्यंकटेशकुमार यांचे फोटो नाहीत याचे फार फार वाईट वाटतय. कोणाकडे असतील तर प्लिज इथे शेअर कराल ?
उस्ताद अब्दूल करीम खां साहेब
सवाई गंधर्व
भीमसेन जोशी
अजय पोहनकर
विकास कशाळकर
अजय पोहनकर
रोणू मुझुमदार
प्रभा अत्रे
योजना शिवानंद
सुयोग कुंडलकर
श्रीनिवास जोशी
माऊली टाकळकर
मालिनी राजुरकर
उडिपी या छोट्या गावातील 'नृत्य निकेतन'या गृपमधील कलाकार
शमा भाटेंच्या विद्यार्थीनी
विजय घाटे
अमजद अलि खाँ
तंबोरे तयार करणारे मिरजकर
दादरकर
पद्मा देशपांडे
नागराज हवालदार आणि त्यांची दोन मुले
प्रत्येक फोटोच्या वर
प्रत्येक फोटोच्या वर कलाकारांची नाव लिहा कृपया..
छान टिपल्यात
छान टिपल्यात भावमुद्रा.
पराग+१
शेअर केल्याबद्दल
शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
पराग यांनी केलेल्या सूचनेला अनुमोदन.
कलाकारांची नावे लिही ना अवल.
कलाकारांची नावे लिही ना अवल. प्रभा अत्रेंचे फोटो फार आवडले.
हो काहींची उद्या टाकते
हो काहींची उद्या टाकते
अगं त्या आहेच फार गोड ! अतिशय
अगं त्या आहेच फार गोड ! अतिशय समंजस अन प्रगल्भ व्यक्तिमत्व ! त्या बोलल्याही फार फार छान !
व्वा! सगळ्या
व्वा! सगळ्या दैवतांच्या(भावमुद्रा) छब्या मस्त टिपल्यास!
आणि योजना शिवानंद बर्याच वर्षांनी पाहिली पटकन ओळखलीच नाही. काळामुळे एकदम फरक पडतो माणसात.
हो आणि योजना च्या नंतरचा सुयोग कुंडलकर आहे ना...पेटीवर?
सुरेख धन्स अवल, इथे शेअर
सुरेख धन्स अवल, इथे शेअर केल्याबद्दल
सगळ्या दैवतांच्या(भावमुद्रा) छब्या मस्त टिपल्यास!>>>>+१
धन्स मानुषी, तिचं नावच आठवत
धन्स मानुषी, तिचं नावच आठवत नव्हतं , अन सुयोगचं लिहायलाच विसरले
>>>सगळ्या दैवतांच्या(भावमुद्रा) छब्या मस्त टिपल्यास! <<<
धन्यवाद सगळ्यांना.
धन्स अवल सगळ्या
धन्स अवल
सगळ्या दैवतांच्या(भावमुद्रा) छब्या मस्त टिपल्यास!<<<<<<<+१
अवल, धन्यवाद. दरवर्षी जायच
अवल, धन्यवाद. दरवर्षी जायच ठरवते. पण............
सगळ्या दैवतांच्या(भावमुद्रा) छब्या मस्त टिपल्यास!<<<<<<<++++१
येता आले नाही पण बघता आले!
येता आले नाही पण बघता आले! छानच!
भावमुद्रा छान टिपल्या आहेत
भावमुद्रा छान टिपल्या आहेत
पण 'उल्हास कशाळकर' हे नाव नजरचुकीने दिलं गेलंय का ? फोटोत असलेली व्यक्ती उल्हासजी नाही
छान.
छान.
अवल, सुंदरच टिपल्यात
अवल,
सुंदरच टिपल्यात भावमुद्रा.
पण अगदी वैयक्तीक भावना सांगायची, तर या कलाकारांच्या चेहऱ्यावरच्या
वार्धक्याच्या खुणा बघताना त्रास झाला. मी यापैकी अनेकांना प्रत्यक्ष बघितले
आहे. सुखाची बाब एवढीच, कि त्यांची गायकी मात्र अजून तशीच आहे.
पंडितजींच्या फोटोला हार बघायची सवय नाही होत, अजून.
मस्त आलेत सगळे
मस्त आलेत सगळे फोटो!
>पंडितजींच्या फोटोला हार बघायची सवय नाही होत, अजून.
दिनेशदा, अनुमोमस्त
सुर्रेख भावमुद्रा, खूप छान,
सुर्रेख भावमुद्रा, खूप छान, खूप आवडल्या.
अवल धन्स.... खुप छान आठवणी
अवल धन्स....
खुप छान आठवणी आहेत ह्या महोत्सवाच्या. मी मध्यम वयात ( ७ वी ८वीत) असताना बाबांबरोबर जायचे. ४-५ वर्ष गेले. नंतर बाबा एकटे जायचे.
मालिनी राजुरकरांन्ना पाहुन कळ आली. बाई फारच खराब झाल्यात. ठाण्याला पं. राम मराठे महोत्सव सुरु झाला तेंव्हा पहिल्या कार्येक्रमात मी बाईंचं गाणं ऐकलं होतं. त्यान्नी त्यांचा हातखण्डा मालकंस म्हण्ट्ला. मला चीज सुध्धा आठवते आहे. "नभ निकल गयो चंद्रमा". अंगावर काटा आला होता. बाई काय तेजस्वि दिसत होत्या. त्यांचं शालीन रुप खुप दिवस डोक्यातुन जात न्हवतं. नंतर मी त्यांच्या कॅसेट, सी.डी. वेड्या सारख्या ऐकल्या. त्यांचा मालकंस, आणि जसराजांचा "ललत" "मेरो अल्ला मेहेरबान".......
मी शास्त्रिय संगीतातली जाणकार नाही. तरीही ह्या लोकांन्नी खिळवुन ठेवलं.
छान आठवणी. रोजच्या धबडग्यात हे मागे पडलं होतं. आता परत सुरु होइल....... धन्स......
सर्वांना धन्यवाद ! मीरा, अगं
सर्वांना धन्यवाद !
मीरा, अगं अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस, कारण त्यांनी टप्पा असा काही गायला ना, आम्ही सगळे त्यांचं वय विसरलोच काय ताकदीनं गायल्या त्या ! सगळ्यांची अगदी छुट्टी करून टाकली
अगो, अगं ते उल्हास कशाळकरच ना ? की विकास ? नाही गं उल्हासच नक्की सांगा कोणीतरी, म्हणजे योग्य बदल करते.
>पंडितजींच्या फोटोला हार बघायची सवय नाही होत, अजून< मला तर त्या फोटोकडे बघितलं की गळा भरून येत होता प्रत्येक दिवशी... मी अगदी टाळलंच त्या फोटोकडे पाहणं... अगदी परवा सवाई महाविद्यालयात गेल्यावर पुन्हा तिथे फोटो पाहिला तेव्हाही भरून आलं...
मस्त
मस्त
सही, अवल!!!!
सही, अवल!!!!
अप्रतिम, सह्ही!!!!!
अप्रतिम, सह्ही!!!!!
धन्यवाद मंदार, स्मितु
धन्यवाद मंदार, स्मितु
विकास कशाळकरांचा आहे तो
विकास कशाळकरांचा आहे तो फोटो..
अवल फोटो मस्त आलेत सगळे..
सुरेखच ! धन्यवाद इथे शेअर
सुरेखच !
धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल आरतीताई
वाह....... मस्तच आलेत
वाह....... मस्तच आलेत फोटो....
धन्यवाद......
प्रभा अत्रे अजुनही जुना आब
प्रभा अत्रे अजुनही जुना आब टीकवुन आहेत. अमजद अली खाँ साहेब काय देखणे दिसतात अजुन. त्यांचा तो समाधी लागल्या सारखा फोटो खुप मस्त आला आहे.
वाह.... फारच छान... आठ्वणी
वाह.... फारच छान... आठ्वणी जाग्या झाल्या...
अगं एम राजन आणि त्यांच्या
अगं एम राजन आणि त्यांच्या नातींचा फोटो नाही टाकलास का....
त्यांचं वादन श्रवणीय तर होतंच पण प्रेक्षणीयही होतं...काय रंगात येऊन वाजवत होत्या दोघी आणि नंदीनीला तर इतकी सुंदर खळी पडत होती...
आशु, अरे, अन शेवटच्या दिवशी
आशु, अरे, अन शेवटच्या दिवशी घाईत कॅमेराची बॅटरी चार्ज करायलाच विसरले. त्यामुळे काही कलाकारांचे फोटो नाही घेता आले. त्यात राजम आणि व्यंकटेशकुमार यांचे फोटो गेले
Pages