सवाई २०११ : कॅमेराच्या डोळ्यातून

Submitted by अवल on 17 December, 2011 - 09:51

001.jpg

या वेळेस सवाईमध्ये काही फोटो काढायला मिळाले. फार वेळ जाउ नये म्हणून काहीही संस्कार न करता ते फोटो इथे टाकतेय.
पहिल्या दोन दिवशी फोटो काढलेले चालतील असे वाटले नव्हते, त्या मुळे कॅमेराच नेला नव्हता. अन शेवटच्या दिवशी घाईत कॅमेराची बॅटरी चार्ज करायलाच विसरले. त्यामुळे काही कलाकारांचे फोटो नाही घेता आले.
या वेळेस स्टुडन्ट पास मिळाल्याने खुप पुढुन अनुभवायला मिळाला कार्यक्रम. अन त्याच मुळे फोटोही काढता आले. शिवाय सकाळच्या सेशन्सलाही फोटो काढायची परवानगी मिळाल्याने तिथलेही फोटो काढता आले.
मला फ्लॅश वापरायला अजिबात आवडत नाही, शिवाय फार पळापळ करून फोटो काढायलाही आवडत नाही. कलाकाराला अजिबात डिस्टर्ब न करता, आपल्या जागेवर बसूनच फोटो काढायचे हा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे अनेक बंधने येतात, फोटो अगदी खुप मनासारखे नाही मिळत . पण मी अल्पसंतुष्ट आहे Happy
आशा आहे तुम्हालाही आवडतील हे फोटो. ( सगळ्यांच्या उपाध्या नक्की माहिती नाही म्हणून फक्त नावं लिहितेय, क्षमा करावी )
यात कद्री गोपालन अन व्यंकटेशकुमार यांचे फोटो नाहीत याचे फार फार वाईट वाटतय. कोणाकडे असतील तर प्लिज इथे शेअर कराल ?

उस्ताद अब्दूल करीम खां साहेब
3_8.jpg

सवाई गंधर्व
2_8.jpg

भीमसेन जोशी
1_7.jpg

अजय पोहनकर
IMG_1705.jpgIMG_1712.jpg

विकास कशाळकर
IMG_1734.jpg

अजय पोहनकर
IMG_1758.jpg

रोणू मुझुमदार
IMG_1777.jpgIMG_1777.jpgIMG_1788.jpg

प्रभा अत्रे
IMG_1795.jpgIMG_1803.jpg

योजना शिवानंद
IMG_1860.jpg

सुयोग कुंडलकर
IMG_1863.jpg

श्रीनिवास जोशी
IMG_1904.jpg

माऊली टाकळकर
IMG_1921.jpg

मालिनी राजुरकर
IMG_1931.jpg

उडिपी या छोट्या गावातील 'नृत्य निकेतन'या गृपमधील कलाकार
IMG_1975.jpgIMG_1977.jpgIMG_2015.jpgIMG_2037.jpg

शमा भाटेंच्या विद्यार्थीनी
IMG_2043.jpgIMG_2044.jpg

विजय घाटे
IMG_2057.jpg

अमजद अलि खाँ
IMG_2065.jpgIMG_2078.jpg

तंबोरे तयार करणारे मिरजकर
IMG_2103.jpg

दादरकर
IMG_2112.jpg

पद्मा देशपांडे
IMG_2150.jpg

नागराज हवालदार आणि त्यांची दोन मुले
IMG_2197.jpgIMG_2234.jpgIMG_2183.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

काय माणसं आहात रे महोत्सव बघायला आला होतात.. एक तरी पोस्ट टाकयचीत की त्या बाफ वर.. तेव्हढंच एकत्र बसून ऐकला असता महोत्सव

अवल,

मस्त फोटो

फक्त काही किरकोळ दुरूस्त्या सुचवतो

१. आपण ज्यांचे नाव देवगंधर्व असे लिहीले आहेत ते उस्ताद अब्दूल करीम खां साहेब आहेत. 'देवगंधर्व' ही उपाधी पं. भासकरबुवा बखलेंची आहे

२. विकास कशाळकरांना आपण उल्हास कशाळकर असे संबोधले आहेत.

धन्यवाद!!

विदिपा, केल्या दुरुस्त्या , मनापासून धन्यवाद !
हिमस्कूल, अर्र् विसरलेच... पुढच्या वर्षी आपले एक गटग तिथेच करूयात Happy

अवल - एकदा तिथे गप्पा रंगल्या तर मग लोकांचे गाण्यावरून लक्ष उडेल आणि पुढच्या वेळी मायबोलीकरांना प्रवेश नाही असा बोर्ड लागेल Happy

बाकी - फोटोंवर प्रतिसाद द्यायचे विसरलोच...फारच मस्त आलेत...तु कुठे होतीस..मला एकदा पण दिसली नाहीस

आशु, म्हटलं ना या वेळेस खुप पुढून अनुभवता आला सवाई, थॅक्स टू सवाई महाविद्यालय Happy त्या मुळे अगदी पहिल्या/दुसर्‍या रांगेत, मधोमध, भारतीय बैठकीत होते. मध्यातला कॅमेरा होता ना, त्याच्या मागेच Happy तू कुठे होतास?
बाकी गप्पांच म्हणशील तर गाणं ऐकताना मी बरी बोलू देईन तुला Wink नंतर किंवा आधी नक्की टाकता येईल अड्डा Happy
सर्नांना धन्यवाद ! अमित Happy
लाजो त्या फारच गोड अन हुशार आहेत, जसे व्यक्तिमत्व तसे फोटो Happy

वाहवा... मस्त आहेत प्रत्येकाच्या भावमुद्रा! अवले, लक्की गं तु Happy

खरय पण ...पंडीतजींच्या फोटोला हार बघवत नाही अगदी. Sad

Pages