१ वाटी कणीक
५ चमचे बारीक दळलेली पिठी साखर
३ चमचे साजुक तुप
थोडे तेल, थोडे मीठ
१. नेहेमी प्रमाणे कणिक भिजवुन घ्यावी. भिजवताना थोडे तेल व मीठ घालावे.
२. मध्यम आकाराची लाटी घ्यावी.
३. ती लाटी थोडी लाटुन (पुरी एवढी), त्या वर थोडे तुप पसरावे आणि सगळी कडुन लावुन घ्यावे.
४. त्या वर १ चमचा पिठी साखर पसरावी आणि चांगली पसरुन घ्यावी.
५. त्या छोट्या पोळी ची वळकटी वळुन, परत गुंडाळुन त्याची मोठी लाटी करावी.
६. हलक्या हातानी थोड्या पिठी वर ती लाटावी. जास्त पातळ लाटु नये.
७. तव्यावर मंद आचेवर करपु न देता भाजुन काढावी. हवे तर थोडे तुप लावावे.
छान सोनेरी रंगाच्या होतात. गॅस जास्त ठेवला तर करपतात. डब्या साठी उत्तम. मी रात्री कणिक मळुन सकाळी झटपट करुन देते. तुप साखर पोळी पेक्षा चांगले.
खुप खमंग लागतात.
पिठी साखरेची करुन बघते. कधी
पिठी साखरेची करुन बघते.
कधी कधी मी रॉ शुगर घालुन अशी पोळी करते. ती पण मस्त खमंग लागते. पण ही पोळी भाजताना काळजी घ्यावी लागते,
सेम टु सेम अशीच पोळी मी भल्या
सेम टु सेम अशीच पोळी मी भल्या पहाटे सहाला कॉलेजात जाण्याआधी खाऊन जायचे. आई तव्यावरच भरपूऽर तूप सोडून जवळजवळ तळूनच द्यायची ही गोड पोळी. आणि तेव्हा डाएटची चिंताही करावी लागत नव्हती
आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. लेकाला देऊन बघते आवडतेय का
वत्सला रॉ शुगर घातल्यावर फाटत
वत्सला
रॉ शुगर घातल्यावर फाटत नाही पोळी?
अगो...
लेकाला नक्कि आवडेल. माझी लेक चवीने खाते.
अगदी हलक्या हाताने लाटली तर
अगदी हलक्या हाताने लाटली तर नाही फाटत. पण मस्त खमंग लागते. मोठ्यांसाठी अशी पोळी करताना त्यात किंचीत वेलची पावडर टाकल्यास मस्त स्वाद येतो.
अरे वा! मस्तच आहे, चिरोटे अशा
अरे वा! मस्तच आहे, चिरोटे अशा पद्धतीने करता ते माहीत होतं,
पोळी पण पाहिन करून
चिरोटे करताना थोडा मैदा पण
चिरोटे करताना थोडा मैदा पण वापरतात. परत ते तळलेले असतात
रॉ शुगर घातल्यावर फाटत नाही
रॉ शुगर घातल्यावर फाटत नाही पोळी?>>> नाही फाटत. हलक्या हाताने लाटायची. ती साखर पण जरा जळुन / ब्राउन होऊन चांगली चव व खरपुसपणा देते.