पंच महाभुत व हिंदू धारणा

Submitted by विवेक नाईक on 11 December, 2011 - 06:24

पंच महाभुत,

आपण पंचमहाभुतां बद्द्ल ऐकतो की सर्व सजिव व नि र्जिवांचे अधिष्ठान ही पंचमहाभुत आहेत.
ह्या विषयाला ईतके पदर आहेत की एकच पदर उलगडत न्यायलाच आयुष्य पुरणार नाही.
हस्तमुद्रा ही भारताची खुप प्राचिन व सर्वात महत्वाची देणगी आहे व ह्या हस्तमुद्रा ही पंचमहाभुता वर आधारीत असतात.

आज आपण पंच महाभुताचे हाताच्या बोटातील आधिष्ठान बघू !
हाताच्या पाच बोटा पैकी प्रत्येक बोटाला एका पंच महाभुताचे आधिष्ठान असते.
उदा. हाताचा आंगठा म्हणजे अग्नी महाभुत, प्रथमा म्हणजे वायु.
HAND MUDRA 1_0.png

ह्या वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे सर्व बोटाना एका पंच महाभुत तत्वाचे आधिष्ठान असते.

आपल्या संस्क्रुतीत प्रत्येक बोटाच्या पंच महाभुत तत्वा प्रमाणे त्या बोटाला काम ही दिले आहे.
उदा. गंध लावताना
१. आंगठ्याचा ( अग्नी तत्व ) वापर विजय तिलक करण्या करता होतो. (रंग = लाल)
२. प्रथमाचा (वायु तत्व) वापर हा श्राध्य करतानाच्या पींडाला तिलक करताना होतो. ( रंग= अबिर, काळा)
३. मध्यमा (आकाश तत्व) वापर हा देवांना गंध लावण्या करता करतात. ( रंग = चंदंन, सफेद )
४. अनामिका (प्रुथ्वी तत्व)चा वापर हा मनुष्य ( जन सामान्याना) गंध लावण्या करता ( रंग= विभुती, राखाडी)
५. तर्जनी ( जल तत्व) चा वापर हा गंध लावण्या करता करत नाहीत.
HAND MUDRA 2 A.png

आयुर्वेदातील दोषा मध्येही ह्याच पंच महाभुताचे आधिष्ठान असतेखालील प्रमाणे
१. वायु + आकाश = वात
२. अग्नी + जल = पित्त
३. प्रूथ्वी + जल = कफ
Hand Mudra 4B.jpg

आता पर्यंत दिलेली माहीती ही बरीच बेसीक माहीती आहे.

हस्तमुद्रा ह्या पंच महाभुताच्या आधिष्ठान वर आधारीत आहे. पुढची माहीती लवकरच प्रकाशीत करीन !!

भाग २ :

आता पर्यंत आपण प्रत्येक बोटा तील तत्वा बद्द्ल बोललो. आता ह्या बोटाप्रमाणे त्यांच्या देवता चे स्थान
बघु.

१. आंगठा : तत्व : अग्नी : : देवता: शिव
२. प्रथमा : तत्व : वायु : आत्मा : देवता: हनुमान :
३. मध्यमा : तत्व : आकाश : अमर्त्य : देवता: विष्णु :
४. अनामिका : तत्व : प्रुथ्वी : मर्त्य : देवता: दुर्गा :
५. तर्जनी : तत्व : जल : : देवता: गणेश :

देवता व पंच तत्व
HAND MUDRA 4B.png

ह्या पाच बोटातील देवता म्हणजे पंचायतनातील पाच देवता ज्या प्रत्येक देव्हार्यात असाव्याच.

ह्या पाच तत्वात अग्नी तत्व हे सर्वात शुद्द आणी प्रमुख आहे. त्या मुळेच सर्व मुद्रात अग्नी तत्वाचे स्थान
महत्वाचे असते.

आंगठ्याने केलेल्या तिलकाला विजय तिलक म्हणतात, विजय तिलक हा लाल रंगाचा असतो,
आंगठ्याच तत्व अग्नी म्हणजे उर्जा, म्ह्णुन विजय तिलका साठी आंगठ्याचा वापर.

आता पर्यंत हे सर्व तुम्हाला सांकेतीक वाटत असेल म्हणजे,

आंगठ्या तील तत्व दुसरे असु शकेल का? अग्नीच का ? उत्तर मला माहित नाही
पण प्रत्येक बोटाला दिलेली तत्वे आपण बदलु शकत नाहीत एव्हडे मात्र मी जाणतो कारण त्या तत्वाची व
शरीराची अशी काही सांगड आपल्या पुर्वजांनी घालुन ठेवली आहे की सांगता सोय नाही..

विजय तिलक हा THUMS DOWN पद्द्धतीने केला जातो हे सर्वांनाच ज्ञात असेल, पण THUMS DOWN
पद्द्धतीनेच का ? कारण आपल्या संस्क्रुतीत महत्वाचे उपचार THUMS DOWN पद्द्धतीने केले जातात
उदा. उर्जा प्रदान ( विजय तिलक ) अर्घ्य ( पाणी ), तेल (पिळचील तेलाचा आयुर्वेदा तील उपचार)
आणी उर्जा घेताना THUMS UP चा वापर करतो. उदा. लिंग मुद्रा. अग्नी तत्वा ची महत्वाची मुद्रा म्हणजे
लिंगमुद्रा,

उर्जा प्रदान THUMS DOWN:
ThumbDown 1_0.png उर्जा घेण्यासाठी THUMS UP
ThumbUp 1_0.png

आपण सर्व साधारण जिवनात सर्वांना अभिवादनासाठी THUMS UP चा वापर करतो म्हणजे आपण नकळत
उर्जा देण्या एवजी घेण्याच काम करतो.

माहीती स्त्रोतः बरेचसे वाचन व अवलोकन......

टिपः मी ईथे लिहिलेले चुकीचे असु शकेल तेंव्हा जाणकारानी अधिक प्रकाश टाकून ह्या लेखाला अजुन सम्रूद्ध
करावे !. लोभ असावा !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याला हस्त मुद्रा म्हणतात.. त्यामुळे शरीरातील इडा पिंगळा नाड्या व्यवस्थीत रहातात. शरीर निरोगी रहाते असे म्हणतात. ज्ञान , वायु, वरुण .. असे बरेच प्रकार आहेत. कुचीपुडी आणि भरत नाट्यममध्येही या मुद्रा वापरल्या जातात. http://www.healthandsoul.com/hasta-mudra-beneficial-for-age-groups-part-...

इन्विजिबल डॉक्टर नावचे डॉ. चंद्रशेखर यांचे पुस्तक आहे. त्यातही त्यानी अनेक रोगांवर उपयुक्त अशा मुद्रा दिलेल्या आहेत. http://www.invisibledoctor.com/easy_neurobics

बेसिक माहिती दिली. अधिक माहितीसाठी लिंबुभाऊना त्यांची हस्त मुद्रा दाखवायला सांगा. Happy

चांगला विषय निवडलात . धागा धार्मिक विभागात ठेवला तर बरे होईल.

नाईक, तुमचं म्हणणं अर्धवटच लिहून झालंय असं वाटतंय, पण काय म्हणायचंय ते थोडंफार लक्षात आलंय.

हो, भारतीय देवतामूर्तींच्या हाताच्या (हिंदू, बौद्ध, जैन) वेगवेगळ्या मुद्रा असतात आणि त्याचे वेगवेगळे अर्थ असतात. याची स्पेसिफिकेशन्स मूर्तीशास्त्रावरील प्राचीन व मध्ययुगीन ग्रंथांत आढळतात (त्याच्याही आधीपासून या मुद्रा अस्तित्वात आहेत.). शिवाय मूर्तीशास्त्राच्या विद्वानांनी यावर सखोल अभ्यास अनेको वर्षांपूर्वीच/दशकांपूर्वीच करून ठेवलाय. जे अभ्यासक आहेत ते प्रत्येक देवतांची विशिष्ट मुद्रा, हस्तमुद्रा, आसनं (देवतांची बसण्याची/ उभी
रहाण्याची पद्धत), हातातली विशिष्ट अस्त्रं/ गोष्टी, या सर्व अंकनांमधील कालानुरूप होणारे बदल असे अत्यंत मूलभूत घटक शिकून मगच या शास्त्राचा पुढचा अभ्यास सुरू करतात.

चान्गला विषय Happy

>>>> ३. मध्यमा (आकाश तत्व) वापर हा देवांना गंध लावण्या करता करतात. ( रंग = चंदंन, सफेद )
>>>>>४. अनामिका (प्रुथ्वी तत्व)चा वापर हा मनुष्य ( जन सामान्याना) गंध लावण्या करता ( रंग= विभुती, राखाडी)

कृपया यातील वर्णन एकदुसर्‍याला बदलुन लिहावे, जसे की मध्यमा, व्यक्ति स्वतःला गन्ध लावण्याकरता वापरू शकते, तर अनामिकेने देवादिकान्ना गन्ध लावावे.
समोरिल व्यक्तिस गन्ध लावण्याकरता अनामिका व मध्यमा एकत्रीत जोडून, अनामिका खाली, मध्यमावर अशाप्रकारे पन्जा धरुन लावतात.
बदलुन असे हवे
३. मध्यमा (आकाश तत्व) चा वापर हा मनुष्य ( जन सामान्याना) गंध लावण्या करता ( रंग= विभुती, राखाडी)
४. अनामिका (प्रुथ्वी तत्व) वापर हा देवांना गंध लावण्या करता करतात. ( रंग = चंदंन, सफेद )

यातिल बोटान्ची धारीत "तत्वे" तपासू शकलो नाहीये. Happy

लिंबूंजी ,

प्रत्येक बोटाचे तत्व ठरवुन दिलेले आहे आणी त्या प्रमाणेच पुढची योजना केलेली दिसते.

उदा.
आंगठा : तत्व : अग्नी : : देवता: शिव
प्रथमा : तत्व : वायु : आत्मा : देवता: हनुमान :
मध्यमा : तत्व : आकाश : अमर्त्य : देवता: विष्णु :
अनामिका : तत्व : प्रुथ्वी : मर्त्य : देवता: दुर्गा :
तर्जनी : तत्व : जल : : देवता: गणेश :

त्यामुळे देवतां ना गंध लाव ताना मधले बोट तर मनुष्याला गंध लावताना अनामि के चा वापर
करावा/ करतात.