बंटीबाबाना आता आलेत सोळा दात

Submitted by एम.कर्णिक on 28 November, 2011 - 13:41

आई, आता बस्स तुझा खिमटेवाला भात
तोंडामधे माझ्या आले आहेत सोळा दात
भाज्यांचंही करतेस गुर्गुट वरण भातामध्धे
ओळखता पण येत नाही काय काय आहे त्यात.

कधी म्हणतेस चिकन तर कधी मासाबाऊ
सगळंच लागतंय सारखं मग सांग कसं खाऊ?
माहिताय न तुला सगळं चावता येतंय मला
वेगळंवगळं दे नं भाजी, चपाती नि भात.

आणि हो, ते बस्स तुझं बाऊलमध्धे देणं
चमच्या चमच्याने माझ्या तोंडात भरवणं
आता जेवू दे नं डायनिंग टेबलखुर्चीवर
आजोबांनी दिलेल्या त्या पाच खणी ताटात.

गुलमोहर: 

छान.

वा कर्णिकसाहेब - कित्ती दिवसांनी कविता वाचली तुमची......
तुम्ही केलेल्या कविता सुंदर असतातच, त्यामुळे वाटच पहात असतो - नवनवीन कवितांची......

नेहमीप्रमाणेच मस्त Happy

तुम्ही केलेल्या कविता सुंदर असतातच, त्यामुळे वाटच पहात असतो - नवनवीन कवितांची..>>>>+१ Happy

वा! आज बर्‍याच दिवसांनी बंटीबाबा तुमच्या कवितेतून पुन्हा भेटल्यावर छान वाटलं.